सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "
खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,
" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "
अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्याला भिजवणं. अनंत आठवणी!
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,
"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "
निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.
वरील मोगर्याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825
साधना मस्त फोटो.
साधना मस्त फोटो.
माझ्या मोगर्याच्या पानांना
माझ्या मोगर्याच्या पानांना आणि आता तर गोकर्णालापन कुणीतरी खा खा खात सुटलय.. एक एक पान आडव तिडव करुन पाहून झालय पण कोणे तो त्याचा पत्ता नाही. एखादा किडा विडा असेल म्हणुन तिखटाच पाणी, तंबाखुच पाणी स्प्रे करुन झालय तरी बधत नाहीये..
काय करु..
उपाय सुचवा प्लीज...
टीना, सगळे फोटो मस्त
टीना, सगळे फोटो मस्त
रोजच्या वाटेत एक डबल टगर चे झाड लागते, खुप मस्त फुले आलियेत त्याला, अगदी भरुन गेलेय फुलांन्नी
सकाळचे जेव्हा तीथुन जाते तेव्हा खुप प्रसन्न वाटते.
माझीही खुप इच्छा होते की एखादा फोटो काढावा त्याचा, पण असे रस्त्यावर ऊभे राहुन एखाद्याच्या दारातील झाडा चा फोटो काढणे जमत नाहीये मला
चला पटकन गजरा करून घ्या
चला पटकन गजरा करून घ्या

की मी केलेला आवडतोय पहा
की मी केलेला आवडतोय पहा, जागुतै म्हणते तसा कदंबा

Rachana ,mastach g
Rachana ,mastach g
खुपच सुंदर पुष्परचना रचना
खुपच सुंदर पुष्परचना रचना
मधे कसली पानं घातलीए?
रचना सॉलिड मस्त.
रचना सॉलिड मस्त.
डोंबिवलीत ब-याच ठीकाणी सोनमोहर मस्त बहरलेत. आमच्या मागच्या झाडांना मात्र बहर नाहीये. जॅकरांडा कमी ठीकाणी आहे डोंबिवलीत, पण तोही मस्त बहरला. डोंबिवलीत सोनमोहर आणि रेनट्री जास्त आहेत.
रचना, गजरा मस्त बनवलाय.
रचना, गजरा मस्त बनवलाय.
मला फोटो अपलोड का करता येत
मला फोटो अपलोड का करता येत नाहीत इथे??
साइझ मुळे का?
धन्स सगळ्यांना
धन्स सगळ्यांना
टीना त्या पानांना आम्ही झिपरी म्हणतो
हो किट्ट्टु साईझ मुळेच. https://www.maayboli.com/node/63032?page=21 इथे बघ साधनातै ने दिलाय फोटो टाकण्याचा नवा पर्याय
रचना अबोली मस्त!!
रचना
अबोली मस्त!!
Double तगर घरी फुलली आहे.
Double तगर घरी फुलली आहे.

अजुन झाड खूपच लहान आहे.
Double तगरीचे फूल
Double तगरीचे फूल

मोगरा फुलला. १.
मोगरा फुलला.

१.
२.
२.

Spider Lili च्य कळ्या आणि
Spider Lili च्य कळ्या आणि फुले


१.
२.
३.

अरे काय एकेक सुरेख फोटो सर्वच
अरे काय एकेक सुरेख फोटो सर्वच, मस्तच.
सर्वच फोटो मस्त
सर्वच फोटो मस्त
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
सुंदर फ़ोटो!
सुंदर फ़ोटो!
![photo1367[1].jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31938/photo1367%5B1%5D.jpg)
शोभा१ , कसली फळे आहेत?
शोभा१ , कसली फळे आहेत?
(No subject)
मी निशिगंधाचा म्हणून कंद आणला
मी निशिगंधाचा म्हणून कंद आणला होता प्रदर्शनातून . लावून खूप दिवस (फेब मधे लावलय) झालेत पण अजुन तिथे काहीच हालचाल नाहीये :(. माझ काही लावायला चुक्लाय का?
शोभा१ , कसली फळे आहेत? औदुंबर
शोभा१ , कसली फळे आहेत? औदुंबर का?
देवकी, उंबराची फ़ळे आहेत.
देवकी, उंबराची फ़ळे आहेत.
मस्त फुललीय तुमची बाग tamruta
मस्त फुललीय तुमची बाग tamruta
शोभा ताई काय सुंदर मल्टीकलर आहेत उंबर
मला मदत करा ना प्लीज.
मला मदत करा ना प्लीज.
रावी, फेबमधे लावला आहात तर
रावी, फेबमधे लावला आहात तर पाने यायला पाहिजे होती.रोज पाणी टाकत जा.माझी हळदही २ महिन्यांपासून सुकली आहे.कदाचित मातीच्याआड तयार झाली असेल.रोज पाणी टाकते.पावसाळ्याच्याआधी परत कोंब येतात.
देवकी , पाणी घलते रोज. उलटा
देवकी , पाणी घलते रोज. उलटा तर नाही ना लावला मी? किंवा अजुन मातीत आत खोल ठेवायला हवा होता ?
Pages