आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२७६१ हिंदी ५० - ६०
च ह ध च ह च स
म द क ध त प
ख ख स य म न
ठ ठ स य र क ध
ढ र ह त स ह

२७६१ -

चुप है धरती, चुप हैं चाँद सितारे
मेरे दिल की धड़कन तुझको पुकारे

खोये खोये से ये मस्त नज़ारे
ठहरे ठहरे से यह रंग के धारे

वरचे उत्तर बरोबर आहे असे ग्रुहित धरुन

आणी जरी चुकले असेल तरी, मला एकदा तरी इथे कोडे द्यावे असे वाटले म्हणुन, एक खुप सोप्पे कोडे देतीये >>>

२७६२ - हिंदी ( २०१० - २०१८)

ह ज ह म प म ल
व त ह व त ह
ह ज स अ स क ल
व त ह व त ह

हम जो हर मौसम पे मरने लगे
वजह तुम हो, वजह तुम हो
हम जो शेर ओ शायरी करने लगे
वजह तुम हो, वजह तुम हो

लागी छूटे ना अब तो सनम
चाहे जाए जिया तेरी क़सम

२७६४ हिंदी - ५० - ६०
अ ब ब क ल क च ग
क र थ ज द म छ क च ग

२७६५ -

दाग़ न लग जाये हाय
कहीं दाग़ न लग जाये हाय
प्यार किया तो कर के निभाना

कोडे क्र. २७६७ मराठी (२०१२ - २०१८) -- उत्तर
मौला इश्क़ है खुदा, दुहाई देती है जुबां
दाटले रेशमी आहे धुके धुके, दाटले हे धुके
बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके, दाटले हे धुके
दिवे लाखो मनामध्ये लागले लागले
दाटले रेशमी आहे धुके धुके, दाटले हे धुके

२७६८ हिंदी (१९६१ - १९७०)
झ झ ढ र
ल क च म अ स
ज क ल ज द भ य द
ज स द ह ख ह म
छ प म छ ह

मला एकदा तरी इथे कोडे द्यावे असे वाटले म्हणुन, >>>>>
Happy स्वागत VB, कधीही या आणि द्या. इथे कोडी सोडवायला सगळे, घालणारेच कमी.

फक्त, मराठी / हिंदी -- देवनागरी लिरीक्स वरून अक्षरे द्यायची. इंग्रजी लिरीक्स स्पेलिंगवरून नाही
उदा -- वर शेर शायरी शुरू ला (sher shayari shuru) s चा स पडलाय आणि ख़तम (khatam) ला k चा क पडलाय.
बाकी मस्त.

२७६८ हिंदी (१९६१ - १९७०) >> उत्तर
झूम झूम ढलती रात
ले के चली मुझे अपने साथ
जाने कहाँ ले जाए दर्द भरा ये दिल
जैसे सदा देती है खोई हुई मंज़िल
छोड़ो पिया मेरी छोड़ो हाथ

२७६९ उत्तर
देखो इन्हें ये हैं ओस की बूँदें
पत्तों की गोद में आसमां से कूदें
अंगड़ाई लें फिर करवट बदल कर
नाज़ुक से मोती हंस दें फिसल कर
खो ना जाएँ ये तारे ज़मीं पर

तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलना
ये ग, ये ग रखुमाई, ये भक्तांच्या माहेरी
सावलीच्या पावलांनी, विठूच्या गाभारी
रखुमाई, रखुमाई, रखुमाई, रखुमाई

२७७१.

सखे गं मुरली मोहन मोही मना
गाऊ किती पुन्हा पुन्हा त्याच्या गुणा

२७७२ मराठी
भ अ प प ग ब श्र अ म झ
प प प न स ब श्र अ म झ

२७७२ मराठी -- उत्तर
भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं बाई श्रावणाचं उन मला झेपेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना गं बाई श्रावणाचं उन मला झेपेना

२७७३ हिंदी ८०-९०
ध म न न क र क र
ग र क न प ज
म म अ स छ न म
म म त न प ज

२७७३ उत्तर

धूप में निकला न करो रूप की रानी
गोरा रंग काला ना पड़ जाए

Pages