आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२७५६ उत्तर
युही चला चल राही
युही चला चल

कितनी हसीन है ये दुनिया

२७५७ हिन्दी १९५०-५५

क ब
क ब ज स त अ
म त य ब क द त ह क
द त ह क

हे लोक्स! मी गाणेच विसरले. केव्हापासुन शोधतेय. Sad >>> अगं गुणगुणून बघ. गायक गायिका, नट नटी आठवायचा प्रयत्न करुन बघ

जुने गाणे आहे ग! मी कधी ऐकले नाहीये.
मी यु ट्युब वर पाहिले नाहिये. असेच नेटवर सर्चतान्ना सापडलेल. Proud

हे लोक्स! मी गाणेच विसरले. >>>> आठवा आठवा ...... Happy
तेव्हा काय ऐकले, मागे पुढे? आधीच्या गाण्याचा शब्द / भाव यातून सुचले होते?
पहिली ओळ -- क ब काय होते?
कारे बदरा / बदरिया
कोयल बोले
कुछ बोलू

काहीच आठवत नाही... सापडत नाहीये हे गाणे!! नेटवर १०वेळा सर्च केले. कुठल्या धुन्दीत मला ते गाणे दिसले आता असे वाटतेय.

<<मी माझे लिरिक्स् टाकुन तयार करु का एखादे ??? Happy<< टाका टाका.. गाडीला गियर मारा! Happy

२७५७ - उत्तर
क़िस्मत बनानेवले
क़िस्मत बनानेवले जरा सामने तो आ
मैं तुझको ये बताऊं दुनिया तेरी है क्या
दुनिया तेरी है क्या

चित्रपट : परदेस (१९५०)
लता मंगेशकर
हुश्श!! - आता ह्यावर उतारा म्हणून हे अती सोप्प गाणं

२७५७
हिंदी (१९८० -९०)

द अ द द अ ज
द म ज अ
प त म श थ
अ ब अ

ताई ग्रेट एकदम दणक्यात आगमन __/\__
२७५७
हिंदी (१९८० -९०)>>> उत्तर
दर्द-ए-दिल, दर्द-ए-जिगर, दिल में जगाया आपने
पहले तो मैं शायर था, आशिक बनाया आपने

<<२७५७ - उत्तर
क़िस्मत बनानेवले
क़िस्मत बनानेवले जरा सामने तो आ
मैं तुझको ये बताऊं दुनिया तेरी है क्या
दुनिया तेरी है क्या

चित्रपट : परदेस (१९५०)
लता मंगेशकर <<<

बाप्रे, बाप्रे... जब्बरदस्त!!
हेच गाणे.. झिलमिल हॅटस ऑफ!! Happy

सगळे फेटे आकाशात गेलेले आहेत असे या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे.
Happy झकास Happy
झिलमिल !! सीआयडी .... क्ल्यूशिवाय गाणे हजर !!
झिलमिल बनानेवाले जरा सामने तो आ
मैं तुझसे सिख लूं जरा ये हुनर ये अदा

बाप्रे, बाप्रे... जब्बरदस्त!! हेच गाणे.. >>>> आता द्या आर्या विसरलेली गाणी बिनधास्त .... झिलमिल हांव

अक्षय, २७५९ मराठी जुने की ७-१७?

झिलमिल ताई ग्रेट! Happy
२७५८ उत्तर
आम्ही बि-घडलो तुम्ही बिघडांना
सद्गुरुच्या संगे शिष्य बिघडला
शिष्य बिघडला सद्गुरुची झाला

सायू, बरोबर
अभंगा रिपोस्ट नावाचा एक बॅंन्ड आहे त्यांनी अभंग भारी बनवलेत ऐका युट्युब वर भेटतील त्यांची गाणी.

अभंगा रिपोस्ट नावाचा एक बॅंन्ड आहे त्यांनी अभंग भारी बनवलेत ऐका युट्युब वर भेटतील त्यांची गाणी.>>+११

२७६० हिंदी (२०००-२०१०)
ह य र ह त त अ ज ह
ह य स ह त त प ह
त अ य द ह
र त अ य ज अ अ
प ज ल ह त
ल क ह ह म प ह

हाँ यही रस्ता है तेरा तूने अब जाना है
हाँ यही रस्ता है तेरा तूने अब जाना है
हाँ यही सपना है तेरा तूने पेहचाना है
हाँ यही रस्ता है तेरा तूने अब जाना है
हाँ यही सपना है तेरा तूने पेहचाना है
तुझे अब ये दिखाना है
रोके तुझको आँधीयाँ या ज़मीं और आसमाँ
पाएगा जो लक्ष्य है तेरा
लक्ष्य तो हर हाल में पाना है
चित्रपट:- लक्ष्य्
२७६१ . हिंदी २०००-१०
क प ह य प प प
ह ह अ ब ह ह अ ब
अ न ह य द
ह म द च ल
च व म क

कितना प्यारा है ये प्यार प्यारा प्यारा
हुआ है पहली बार होता है एक बार
फिर ना होगा ये दोबारा
हाय मेरा दिल चुराके ले गया
चुराने वाला मेरा क़ातिल

Pages