आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२४७३.

तुमसे कुछ कहना है, गर तुम कुछ कहने दो
अजि बोले बिना हुम जाने, रहने दो जि रहने दो
इन आँखोंं में रहना है अगर प्यार से रहने दो
पहले दिल को नजरोगे, कुछ तीर तो सहने दो

२४७४.

हिंदी (५०-६०)

र क न क ब द क ख
च क ग क द क र
ज ख ह ख म झ क
अ भ स ह क
स स ह

पुन्हा निद्रिस्त?झोपू नका कोडे सोडवा!

सोप्पयं गाणे!

२४७४. हिंदी (५०-६०) -- उत्तर
रंगी को नारंगी कहे, बने दूध को खोया
चलती को गाड़ी कहे, देख कबीरा रोया...
ज़िंदगी ख़्वाब है, ख़्वाब में झूठ क्या
और भला सच है क्या
सब सच है

२४७५. हिंदी (५०-६०)
ज स अ ल (२) र
स म क स क
र स क स क
ज क य ब ब

Happy म्हणूनच उठल्या उठल्या सोडवले.... चहा पण न घेता ( हा क्ल्यू नाही )

कोणाला लागलाच तर --
सांगू सखे कुणा मी, ती दृष्टभेट खास
नकळे मला, असा का, वाढताच ध्यास

परफेक्ट!

तरी म्हटलेले झोपू नका! Happy

@ अक्षय, तुमचे आणि आईचे अभिनंदन Happy .... काय स्पर्धा / निमीत्त होते?

आणि मभादिचा समारोप + आभार इ. जाहीर करणार ना? दत्तू नवीन शब्दाची वाट बघतात शब्दशॄंखला धाग्यावर....

२४७५ - उत्तर
जुल्मी संग आंख लडी रे
सखी मै का से कहूं
री सखी का से कहूं
जाने कैसी ये गाठ पडी

कारवी, हे माझ्या खुप आवडत्या गाण्यापैकी एक आहे. ते तुम्ही दिलत. आहा, आज माझा दिवस मस्त जाणार यात शंका नाही.

सांगू सखे कुणा मी, ती दृष्टभेट खास
नकळे मला, असा का, वाढताच ध्यास >>> या ओळी कुणाच्या, तुमच्या?

हे माझ्या खुप आवडत्या गाण्यापैकी एक आहे >>>>> हो, मधुमतीची गाणी मस्तच आहेत... Happy पुढचे कोडे द्या ना... सगळ्यांचा दिवस मस्त होऊ दे
ओळी माझ्याच, जाता जाता क्ल्यू म्हणून लिहील्या होत्या, खूप वेळ ओळखले गेले नाही म्हणून ...

ओळी माझ्याच, जाता जाता क्ल्यू म्हणून लिहील्या होत्या, खूप वेळ ओळखले गेले नाही म्हणून >> वा मस्तच लिहील्यात की. मी काल सकाळी थोडा वेळ आले नंतर नाही जमल यायला

२४७६ - हिंदी ६० - ७०
म ज क क ह व अ ध प ह
य क ह न क ह य ह द क क ह

क्लू - कोकीळा / गायक संगीतकार एकच

२४७६ >>
मुहब्बत जिस को कहते हैं वो इक धड़कन पुरानी है
मुहब्बत जिस को कहते हैं वो इक धड़कन पुरानी है
ये क़िस्सा हर नज़र का है ये हर दिल की कहानी है
ये क़िस्सा हर नज़र का है ये हर दिल की कहानी है

@ अक्षय, तुमचे आणि आईचे अभिनंदन .... काय स्पर्धा / निमीत्त होते? >> गुणवंत मुलांच्या आईला मिळतो दरवर्षी.

२७४७ उत्तर

मुझे देख कर आपका मुस्कराना
मुहब्बत नहीं है तो फिर और क्या है

२७४८ हिंदी ५०-६०
र र म ब र त ब ज म ल न
ल न र ज ल न त ब ज म ल न

२७४८.

रसिया रे मन बसिया रे तेरे बिना जिया मोरा लागे ना
लागे ना रे जिया लागे ना तेरे बिना जिया मोरा लागे ना

२७४८..
मराठी

द द भ त स
अ न अ क व
व व ज व
ह प अ स न
ज द ज द म
स व त स

अजुनी नाही सोडविले एवढे सोप्पे!!??

कुणीही नाही आज?
जाम दिनाची सर्वांनाच सुटी की काय? Uhoh

कृष्णाजी क्लू द्या एखादा ??>>>

अहो रोजच्या ऐकण्यातले! महिलादिनासाठी खास दिले आहे! Happy

२७४८
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्ममरणाते वारी
हारी पडलो आता संकट निवारी
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी
सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी
जय देवी जय देवी

२७४९.
एक प्यार का नग़मा है, मौजों की रवानी है
ज़िंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है

२७५०.
मराठी
क ब स क ग स
म म व ल क ह ग अ

कोडे क्र. २७५१ मराठी
द द म अ अ प

ज अ ह स त द ह अ
ज द ल त द च

द द द क ह ज द
त स म ज द द क प

बरोबर सायू Happy
देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ॥१॥

जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ।
जसे दुग्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणि ॥२॥

देव देहात देहात, का हो जाता देवळात ।
तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ॥३॥

२७५२

फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार
विठ्ठला तू वेडा कुंभार

२७५३.

मराठी

प अ ध म प ग
त ग प र ह म म
अ ब स ग व

प्रतिमा उरी धरोनी मी प्रीतीगीत गावे
ते गीत प्रीतीचे रे हळुवार मी म्हणावे
अस्फुट भावनांच्या स्वप्नांत गुंग व्हावे

२७५४ उत्तर
कधी वाटे मन का हरवते
आसू लपवून का मिरवते
हे प्रेम की यातना

Pages