Submitted by दीपांजली on 24 January, 2018 - 19:40

संजय लीला भन्सालीचा बहुचर्चित पद्मावत आता खरच रिलिज होतोय, तो कसा वाटला याबद्दल लिहायला हा कॉमन धागा .
असंख्य धागे काढण्या ऐवजी इथे लिहा पद्मावत बद्दल आपापले रिव्ह्युज/ मतं / पिसे काढणे इ. (सिनेमा पाहिल्यावर मग ) 
त्यातून काढायचाच असेल नवा धागा त्यांनी काढा खुशाल, मी अॅडमिन /वेमा नाही .
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमा आणि झंपी दोघी क्रमशः ?
अमा आणि झंपी दोघी क्रमशः ?
३०० कट्स आहेत म्हणे आणी
३०० कट्स आहेत म्हणे आणी पाकिस्तानात नो कट मुव्ही दाखवतायत , आता हा कुणाचा कट?
अग्ग बाई हे काय नवीन.. खिलजी
अग्ग बाई हे काय नवीन.. खिलजी बायसेक्शुअल होता..
मग तो शाहीद कपूरच्या मागे का लागत नाही. शाहीदही चिकणा आहे की..
आणि मग खिलजीच्या भितीने काही पुरुषांचा जोहार दाखवलेलाही चालला असता..
ऋनम्या
ऋनम्या
३०० कट्स आहेत म्हणे आणी
३०० कट्स आहेत म्हणे आणी पाकिस्तानात नो कट मुव्ही दाखवतायत , आता हा कुणाचा कट?
<<
No , that's just a rumour.
Censor board only demanded 5 modifications mainly 2 -3 disclaimers, covering Deepika's bare belly in ghoonar but not a single cut in movie .
तर रणवीरने छानच काम केले आहे.
तर रणवीरने छानच काम केले आहे. पण इथेही तो ऑथेंटी सिटीचा मुद्दा येतो, रणवीर नेहमीप्रमाणे हाय एनर्जी रासवट स्त्रियांना आव्डेल असा शक्तिमान अवतार धारण करतो. पण ह्या जागी नवाजुद्दीन सिद्दिकीसारखा कसलेला अभिनेता असता तर त्या कॅरेक्टरला एक वेगळी डेप्थ आली असती. हा आता काकाची विकेट घेउन दिल्लीचा व पर्यायाने भारताचा राजा झाला आहे. व आत त्याला दुसृया इनिंगची स्ट्रेटेजी आखायची आहे. इथे पंडित येउन त्याला मेवा ड वर हल्ला करून पद्मा सारखी सुरेख विचारशील स्त्री तुझ्याबरोबर असेल तर तू जगही सहज जिंकशील असा मिसलीडिंग सल्ला देतो. ह्यामुळे अखिच्या सेवक कम सेविकेला असूया वाट्ते. ही चांगली व्यक्त झाली आहे.
मग अखि एक जंग प्यार के लिये म्हणून हल्ला बोल करतो. लार्ज स्वीपिन्ग शॉट्स ऑफ सेना, ऑन बोथ साइड्स,
डोंगरावरील किल्ल्या तून पद्मा व रावळ बघतात. पण किल्ल्यात बंद असलेली जनता व राजे वगैरे काहीही फिकीर न
दर्शवता दिवाळी होळी वगैरे उत्साहात सलिभ स्टाइल सेलिभ्रेट करत राहतात. सर्व सिनेमात शेवटच्या सातशे स्त्रिया मुली सोडल्यास जनतेचे किंवा त्यांच्या त्रासाचे आनंदाचे एक ही क्षन दाखवलेले नाहीत. हे सर्व कायम एका
बॅक ग्राउड मध्ये दिसत राहतात. कोणत्याही चित्रणात डेप्थ अशी नाहीच. पद्मा कायम फुल राणी गीअर ज्वेलरी इथून तिथे फिरत राहते. व स्वाभिमानी संवाद म्हणत राहते.
अखि रावल ला भेटायला येतो व पद्माला बघायची जिद करतो. जी पुरी होत नाही पण दोघांच्यातली तेढ अधिक
दृढ होते. खरे तर तो एकटाच आलेला असताना त्याला तिथेच मारून जिता गाडणे शक्य होते. पण रावल हॅज
इशूज. सो एनिमी वॉक्स अवे.
मग रिटर्न म्हणून रावळ अखि कडे येतो. अखि त्याला कैद करोन दिल्लीला नेतो. राजपुतानी त्याला दिल्लीहोन युद्ध करून सोडवून आणते हा सर्व भाग अतिशय एंटरटेनिन्ग आहे. मोठ्या पडद्यावर बघण्यालायक आहे. गोरा सिंग
जय एकलिंगजी म्हणतो तेव्हा आत हलायला होते मनात. तो राजाला पळून जाता यावे म्हणून लढत बलिदान करतो.
अखिची राणी ला हस्तगत करायची इच्छा आता सुडाचे रूप घेतो व तो परत आक्रमण करतो. ही पहिल्यासारखी टेस्ट मॅच नसून ट्वेंटी ट्वेंटी ठरते. परत युद्ध , प्राइड रिपीट संवाद. पण एक प्रकारची फायनालिटी आहे. राणी राजा
शेवटाचा निरोप घेतात . निर्णायक युद्ध होउन राणीला जोहार करायची परिस्थिती येते. दीपिका इथे " तुम्हारे पास
सिर्फ सत्तर मिनिट है टाइप मोटिव्हेटिं ग भाश्ण देउन सर्व स्त्रियांना जौहार करायला उद्युक्त करते. संवाद चांगले आहेत. पण तिच्या चेहर्यावरची एक नसही हलत नाही. वाचून दाखवते निव्व्ळ. नुकते आलेले वैधव्य, आपण हून केलेला मृत्युचा स्वीकार हार न मानायचा स्वाभिमानी पणा हे एकही चेहर्यावर दिसत नाही . जसा पहिल्या फ्रेम मधे चेहरा तोच लास्ट फ्रेम मध्ये. फक्त नथण्या बदलत बदलत मोठ्या मोठ्या होत जातात.
सलिभ नेहमी एकेका समुहाचे कल्चर मोड तोड करून प्रेझेम्ट करतो. च पण त्यात एक ट्विस्ट ही आहे. पारो व चंद्रमुखीची भेट होणे, अजय सलमानची भेट होने( ह दिदेचुस) तसे इथे अखि व रावळ ची भेट होते. लंबे चौडे संवाद.
आपला क्लिंट इस्ट्वूड असता तर एका क्षणात निर्णायक खातमा केला असता. पण इथे अर्धा अर्धा तास शत्रू सोबत जेवण बुद्धीबळे खेळणे हे अन ते चालू राहते शेवट काय तर राणीचे नखही तुला दिसणार नाही. !!! हे आधीच सांगायचे ना. उन्हे समज जाता था.
घूमर सोडले तर एकही गाणे चांगले नाही. अखिचे एक चिल्लर डान्स टाइप गाणे पिटातील प्रेक्षक वर्गाला आ वडेल म्हणून घातले आहे. ते क्रिंज वर्दी आहे.
शेव्टाचाआ अर्धा तास क्लायमॅक्स उच्च घेतला आहे. बायका प्रतिकार करतात ती आयडीया पूर्वी मिर्च मसाला सिनेमात बघितलेली आहे. पण त्या सिनेमातील ग्रिट व बेअर कॉन्फ्लिक्ट इथे हजारो मीट र फॅब्रिक खाली दडवून टाकले आहे.
सेट्स चांगले आहेत पण वीअर्ड. अफगाणिस्तानातले घर फिल्मी कटाउट आहे. तर चितोडचा किला बाहेरून राजस्थानी आतून इंडिअन टेंपल आर्किटेक्चर!!!! द माइंड बॉगल्स. सिंहला राज्यातला भाग तर मला कंबोडियातील ता प्रोम मंदिराशी साधर्म्य साधतो असे मला वाटले. राजकन्या सोडा लोकल पण सिंहलीज दिसत नाहीत. कंबोडिअन किंवा फिल्मी दिसतात.
शेवटाची चिता वगैरे सर्व सीजीआय आहे पण थ्री डीत त्या ठि णग्या आपल्या परेन्त येतात ते खूप टचिंग आहे. ऑस्म शॉट्स. त्या बायकांच्या चेहर्यावरचा निर्धार व परिस्थितीतली अटळता आपल्याला भिडतेच.
राजपूतांना किंवा त्यांच्या वे ऑफ लाइफ ला कमी पणा येइल असे काहीही सिनेमात नाही. उलट सर्वत्र त्याचे कौतूकच केलेले आहे. सम ब्डी प्लीज टेल द करणी पीपल.
अखि सामना जिंकतो पन पद्मा गेट्स मॅन ऑफ द मॅच. दीपिकाला फिल्म फेअर पुढील वर्शाचे घट्ट आहे.
ऑथेंटी सिटीचा मुद्दा येतो,
ऑथेंटी सिटीचा मुद्दा येतो, रणवीर नेहमीप्रमाणे हाय एनर्जी रासवट स्त्रियांना आव्डेल असा शक्तिमान अवतार धारण करतो. पण ह्या जागी नवाजुद्दीन सिद्दिकीसारखा कसलेला अभिनेता असता तर त्या कॅरेक्टरला एक वेगळी डेप्थ आली असती
<<<
Nawazuddin is great but I disagree here
New generation actors do not hesitate playing negative roles, character roles , supporting roles even!
Ranveer is definitely someone who can and has ability to portray and look like a character , unlike other mainstream actors including Amitabh !
दीपीकाबद्दल अमांना अनुमोदन.
दीपीकाबद्दल अमांना अनुमोदन. पण फिल्मफेअर मिळणे म्हणजे जरा जास्तच होईल
ह्रिथिकबद्दल डिजेला अनुमोदन. शाहिद अगदीच फिका पडतो.
नवाजुद्दिन नको हां, रणवीर हॅज गट्स
>>>संवाद चांगले आहेत. पण
>>>संवाद चांगले आहेत. पण तिच्या चेहर्यावरची एक नसही हलत नाही. वाचून दाखवते निव्व्ळ. नुकते आलेले वैधव्य, आपण हून केलेला मृत्युचा स्वीकार हार न मानायचा स्वाभिमानी पणा हे एकही चेहर्यावर दिसत नाही . जसा पहिल्या फ्रेम मधे चेहरा तोच लास्ट फ्रेम मध्ये. फक्त नथण्या बदलत बदलत मोठ्या मोठ्या होत जातात.<<
अगदी अगदी.
————————-
ते क्रमशः ह्यासाठी की माझा पेशन्स संपतो लवकर असले इतिहासपट(?) रीव्यु लिबिताना.
अमा तुमचा पेशन्सला सलाम.
मी टाकते अधून मधून आठवेल तसं.. रणवीरची एनर्जी मस्त आहे. तो बाम मध्ये सुद्धा मस्त वाटलेला. नवाजुदीन नो वे.
नवाजुद्दिन नको हां, रणवीर हॅज
नवाजुद्दिन नको हां, रणवीर हॅज गट्स
रणवीरची एनर्जी मस्त आहे. तो बाम मध्ये सुद्धा मस्त वाटलेला. नवाजुदीन नो वे.
<
+१
अॅक्टींग बरोबर खिक्जीसारखा अडदांड अपिअरन्स , शौर्य , कृर जंगली बॉडी लँग्वेज सुध्दा हवी.
नवाझुद्दिनची पर्सनॅलिटी फार किरकोळ आहे.
खिल्जी फक्त रणवीर करु जाणे !
शेवटाची चिता वगैरे सर्व सीजीआय आहे पण थ्री डीत त्या ठि णग्या आपल्या परेन्त येतात ते खूप टचिंग आहे. ऑस्म शॉट्स. त्या बायकांच्या चेहर्यावरचा निर्धार व परिस्थितीतली अटळता आपल्याला भिडतेच.
राजपूतांना किंवा त्यांच्या वे ऑफ लाइफ ला कमी पणा येइल असे काहीही सिनेमात नाही. उलट सर्वत्र त्याचे कौतूकच केलेले आहे. सम ब्डी प्लीज टेल द करणी पीपल.
+1
Climax is super ,full of goose bumps!
Btw , looks like Karni ppl are least bothered about Rajput pride, what they are doing are terror attacks.
मस्त लिहिलंय अमा आणि दिपांजली
मस्त लिहिलंय अमा आणि दिपांजली.
अमांकडून असा रिव्ह्यू लिहून
अमांकडून असा रिव्ह्यू लिहून येईल असा चित्रपट बनवल्याबद्दल संलीभंचे आभार.
अमा, सध्या माबोवर चित्रपटसमीक्षकाची जागा रिकामी आहे. विचार करा.
अमा मस्त लिहिला आहे रिव्ह्यू
अमा मस्त लिहिला आहे रिव्ह्यू !!
ती नव र्याला माघारी घेउन
ती नव र्याला माघारी घेउन येते तेव्हाच्या फ्रेम्स मिस करू नका ती अगदी राजपुत मिनिए चर पेंटिंग मध ल्या राणीच्या प्रोफाइल चित्रा सारखीच दिसते. चित्रपटात तिच्या त्यावेळच्या वेलकम च्यावेळी सावित्री ने कसे सत्यवानाला परत आणले तसे हिने आणले असा उल्लेख आहे पण सत्यवान पहिले मेला होता हा बारका डिटेल मिस झाला आहे.
आया कसे दंगा करणार्या पोर्याला स्कूल बस मधून रपटत घरी घेउन येतात तसा निर्धार तिच्या चेह् र्यावर तिने आणला आहे.
रणवीर कधी कधी फ्लीस लाइन्ड किंवा फर चे जाकिट घालतो वाळवंटात भर उन्हाखाली. टॉप डाउन शॉट्स सलिभ स्टाइल खूप वेळा आहेत. वाळवंटातील चित्रण असूनही एक ही एकही उंट नाही. दोन सीजीआय हत्ती
मात्र आहेत तोफेला कॅरी करतानाचा शॉट आहे. सलीभला सिलेक्टिव्ह व्हिजन आहे. नैसर्गिक नॉर्मल चित्रण फारसे नाही. इतकी भपक्याची गरज का भासत असावी?
अमा, मस्त रिव्ह्यू.
अमा, मस्त रिव्ह्यू.
आज बघणार आहे.
Submitted by ऋन्मेऽऽष on 26
Submitted by ऋन्मेऽऽष on 26 January, 2018 - 12:56 >> लॉल हे बेष्ट आहे. दोघं पायजेत
इतकी भपक्याची गरज का भासत
इतकी भपक्याची गरज का भासत असावी?>>>> त्याने डोळे दिपले की तुम्हाला वाळवंटातले फर जॅकेट दिसणार नाही असं त्याला वाटते हो....
शेवटी युध्द जिंकूनही पद्मावती
शेवटी युध्द जिंकूनही पद्मावती मिळत नाही तेंव्हाही काय भारी काम केलय रणवीरने, चवताळून पद्मावतीला जंग जंग पछडत पिसाटल्यासारखा चित्तोरगढ भर तलवार घेऊन फिरतो.. खिल्जी टोटली ओन्स द फिल्म !
अमा,
तुम्ही भारत एक खोज मधला पद्मावती एपिसोड पहा, त्यात ओम पुरीनी केलाय खिल्जीचा रोल, तुम्ही म्हणताय तसा नवाझुद्दिन च्या ताकदीच्या अभिनेत्याने.
कंपेअर करून सांगा कोणाचा खिल्जी जास्तं आवडला
आया कसे दंगा करणार्या पोर्
आया कसे दंगा करणार्या पोर्याला स्कूल बस मधून रपटत घरी घेउन येतात तसा निर्धार तिच्या चेह् र्यावर तिने आणला आहे. >>>
इतकी भपक्याची गरज का भासत असावी?>>>> Sometimes glass glitters more than diamonds because it has more to prove. मी चित्रपट पाहिलेला नाही पण हे वाक्य आजच वाचनात आले होते म्हणून लगेच त्याचा वापर केला.
पण त्यात एक ट्विस्ट ही आहे.
पण त्यात एक ट्विस्ट ही आहे. पारो व चंद्रमुखीची भेट होणे, अजय सलमानची भेट होने( ह दिदेचुस) तसे इथे अखि व रावळ ची भेट होते. लंबे चौडे संवाद.
<<<
असं कसं ! मेहरुन्निसा पद्मावती भेटही होते
मेहरुन्निसा पद्मावती भेटही
मेहरुन्निसा पद्मावती भेटही होते >>>> मग एक डोला रे डोला अणि पिंगा टाइप डान्स नाहीये का इथे??
आया कसे दंगा करणार्या पोर्
आया कसे दंगा करणार्या पोर्याला स्कूल बस मधून रपटत घरी घेउन येतात तसा निर्धार तिच्या चेह् र्यावर तिने आणला आहे.>>>
अमा, फारच छान लिहीले आहे. थोडक्यात, प. पू. भन्सालीबापूंनी अजिबात निराश केलेलं नाही
भन्सालीचे चित्रपट भव्यदिव्य वगैरे असतात, प्रत्येक फ्रेम कटाक्षानं सुंदरच दाखवली जाते. मेकप, कॉश्च्युम्स, दागिने, सेटस सगळं सगळं सुंदरच दिसतं. दुर्दैवानं चित्रपट संपल्यावर फक्त तेच आणि तेच लक्षात रहातं. एखादी इतिहासातली एखादी ट्रॅजिक प्रेमकहाणी घेऊन त्यावर सुंदर सुंदर सेटस वगैरे दाखवून चित्रपट बनवायचा हा त्याचा ट्रेण्ड झालाय.
सुमुक्ता, Sometimes glass glitters more than diamonds because it has more to prove. >>> +१. But diamonds can shine (not just glitters) eternally. ही माझी त्यात अॅडीशन
बॉलीवूडमधे कोणीतरी ग्लॅडीएटर, बेनहर वगैरेच्या तोडीचा चित्रपट एकदा तरी बनवायला हवा.
Sometimes glass glitters more
Sometimes glass glitters more than diamonds because it has more to prove
<<<
Or simply because you like the bling
कंपेअर करून सांगा कोणाचा
कंपेअर करून सांगा कोणाचा खिल्जी जास्तं आवडला>> र णवीरचे काम उत्तमच आहे. दोन वेण्या पण शोभतात त्याला. पण जेव्हा तुम्ही एक डिरेक्ट र म्हणून कास्टिंग करता तेव्हा ते केरेक्ट र कुठून ओरिजिनेटेड आहे त्याचा पूर्ण व्यक्तिमत्वाचा ग्राफ काय आहे. ह्याचा विचार करून कास्टिंग केले तर ते जास्त फिट होते. आहे तेच तीन प्यादे फिरविण्यात काय ग्रेट आहे. पूर्वीच्या काळात देखील अम्मिताभ बच्चन व श्रिदेवी अफगाण म्हणून आजिबात शोभत नाहीत. इतके रिसोर्सेस सलिभ किंवा तत्सम बॉलिवूड बिगीज च्या हातात असतात. पण त्याचा योग्य उपयोग केला जात नाही. तुम्ही सैफ अली खान शाहरूख ह्याम्ची प्रोफाइल पाहिलीत तर एक टिपिकल इस्लामिक लुक प्रामु ख्याने दिसतो. ते नाक केस चेहरेपट्टी इत्यादि. अश्या रूप वैशि ष्ट्यांचा उपयोग नीट करून घेण्याची ऑप्शन असते.
रणबीरचा अखि मला एका कारणासाठी फारच आव्डला त्याचा सेवक पहिल्यांदी येतो तेव्हा तो त्याला कोणते अत्तर लावले आहे असे विचारतो व सेवक म्हणतो जन्नतुल फिरदौस !!!!! ओएम जी झाले मला तर. आणि तो सारखा स्वतः ला अत्तर लावत असतो. काही लोक शारीर अनुभवांचे जास्त शौकीन असतात. त्यातला तो आहे हे व्यवस्थित दाखवले आहे. चित्रपटाचे मेन कॉन्फ्लिक्ट दोन पुरुषांमधलेच आहे. अप्रतीम सौंदर्यवति राणीचे पझेशन कोणाकडे आहे ह्यासाठी लढा आहे. पण त्यात शाहीदची बाजू लंगडी पडते. राणी आपल्यामनानेच त्याच्या बरोबर राहते आहे त्याचे त्यात फार कर्तुत्व नाही असे फील येते.
अखि कायम एक कमळाचा वास घेताना दाखवला आहे. त्याचे सब टेख्स्ट देखील विचार करण्यालायक आहे.
सर्व फौज गड उतरून खाली येइ परेन्त अखि पेशंट ली थांबतो तोफांची गोळेमारी करून तीन चतुर्थांश तरी संपवता आली असती. हे मा म.
भारी लिहिलंय अमा.
भारी लिहिलंय अमा.
ती बुद्धिस्ट असते तर शिकार का करत असते?
>>खिल्जी राणीला पहायची अट
>>खिल्जी राणीला पहायची अट बोलून दाखवतच नाही सिनेमात, फक्तं बुध्दीबळात मात आणि डायरेक्ट दीपिका अट मान्यं करतानाचा सीन !<<
आहे आणि ती पुर्ण झालेली (आरश्यातुन) पण दाखवलेली आहे. त्या राघव चेतनला तर हग्यादम दिल्याचा सीन आहे कि तु वर्णन केल्याप्रमाणे पद्मावती नसली तर...
>>मग एक डोला रे डोला अणि पिंगा टाइप डान्स नाहीये का इथे??<<
हाहा. बहुतेक त्या ३०० कट्स्मध्ये गेला असेल. खिलजीला नाचवुन भंसाळीने त्याची परंपरा कायम ठेवली आहे...
माझे दोन शब्द - नेफि/टिवी वर येइस्तोवर थांबा; नथिंग ग्रेट अबाउट दि मुवि. ३डि पण घरच्या टिवीवर बघतोय अशी क्वालीटी. आणि हो, नांव बद्लुन फक्त पद्मावत केलंय पण संपुर्ण सिनेमात तिचा उल्लेख पद्मावती असाच केलेला आहे. मग या बदलाने नक्कि काय साध्य झालं?
रेटिंग - खाया पिया कुछ नहि, गिलास तोडा बारा आना...
अग्ग बाई हे काय नवीन.. खिलजी
अग्ग बाई हे काय नवीन.. खिलजी बायसेक्शुअल होता..
मग तो शाहीद कपूरच्या मागे का लागत नाही. शाहीदही चिकणा आहे की..
आणि मग खिलजीच्या भितीने काही पुरुषांचा जोहार दाखवलेलाही चालला असता..
Submitted by ऋन्मेऽऽष on 26 January, 2018 - 12:56
भाऊ यावर एक धागा पाहीजेच.
शाहीद मला फक्त हैदर मधे
शाहीद मला फक्त हैदर मधे आवडलाय.
Runmesh cracking old jokes,
Runmesh cracking old jokes, that too chaun chotha zalele
आजकाल पुरुषांच्या लुक मध्ये
आजकाल पुरुषांच्या लुक मध्ये ते दाढी वाढवायचे एक फॅड आले आहे ते मला बोअर होते. खूप चांगली जॉलाइन फार कमी लोकांची असते. मग वाढवा दाढी. नीट ग्रूम केलेली नसेल तर फारच विचित्र वाट्ते.
Pages