Submitted by दीपांजली on 24 January, 2018 - 19:40

संजय लीला भन्सालीचा बहुचर्चित पद्मावत आता खरच रिलिज होतोय, तो कसा वाटला याबद्दल लिहायला हा कॉमन धागा .
असंख्य धागे काढण्या ऐवजी इथे लिहा पद्मावत बद्दल आपापले रिव्ह्युज/ मतं / पिसे काढणे इ. (सिनेमा पाहिल्यावर मग ) 
त्यातून काढायचाच असेल नवा धागा त्यांनी काढा खुशाल, मी अॅडमिन /वेमा नाही .
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<अरे काय तुम्ही लोक !
<<अरे काय तुम्ही लोक !
मराठीत सगळे ऐतिहासिक रोल्स कोण करतं ???
अर्थात ...... सुबोध भावे झाला असता खिल्जी Happy
हो
रतनसिंग सुद्धा बनेल तो, काही नेम नाही!
अंजूताई, मिलिंद गायकवाड कोण?
हो Biggrin रतनसिंग सुद्धा
हो Biggrin रतनसिंग सुद्धा बनेल तो, काही नेम नाही! >>> म्हणजे डबल रोल का?
हे सही होईल. म्हणजे रतनसिंग ला बांधून ठेवून खिल्जी तिला भेटायला येतो रतनसिंग म्हणून. पण तिला बघितल्यावर एकदम खलीबली डान्स करू लागतो. तेव्हा तिला कळते की हा रतनसिंग नाही कारण तो असला डान्स करूच शकत नाही 
उंची हा मुख्य क्रायटेरिया असायची गरज नाही. रणवीरही काही उंच कॅटेगरीतला नाही. कॅमेरा अँगल्स घेउन ते आड येणार नाही याची काळजी घेतात. नाहीतर सगळे खान लोक, अजय देवगण वगैरे इतके उठून दिसले नसते.
माझ्या कानावर आलं की, डॉ.
माझ्या कानावर आलं की, डॉ. काशीनाथ घाणेकरांवर निघत असलेल्या चित्रपटात डॉक्टरांची प्रमुख भूमिका सुबोध भावे करीत आहे. अरे! ‘लोकमान्य टिळक’ सुबोध भावे, ‘नारायणराव बालगंधर्व’ सुबोध भावे आणि ‘डॉ. घाणेकर’ही सुबोध भावेच? मी त्याला आणखी काही भूमिका सुचवू इच्छितो- सेरेना विल्यम्स, डॉ. अब्दुल कलाम व अफझलखान! मराठी व्याकरणात ‘भावे प्रयोग’ म्हणून ओळखला जातो तो हाच असेल का?
- शिरीष कणेकर
अंजूताई, मिलिंद गायकवाड कोण?
अंजूताई, मिलिंद गायकवाड कोण? >>> सिरीयलमधे क्रुर व्हिलन अगदी सहजतेने करतो. अर्थात रणवीरशी तुलना नाही अजिबात, फक्त क्रुर विक्षिप्त व्हिलन दाखवायचा असेल तर एवढंच डोक्यात आलं. पण नाना, सयाजी शिंदे जास्त बेस्ट आहेत खिलजीसाठी त्याच्यापेक्षा.
सुबोध ला पण मलिक कफुर साठी
सुबोध ला पण मलिक कफुर साठी कन्सिडर करता येईल. नो खिलजी.

पहिल्या क्रमांकासाठी जसे कोणी मिळाले नाही की ते बक्षिस देतच नाहीत तसे खिलजीचा रोल कुणालाच नका देऊ मग
ललित प्रभाकर , छे छे दात पुढे आलेला रतन सिंग काय
रतनसिंग भुषण प्रधान, वैभव
रतनसिंग भुषण प्रधान, वैभव तत्ववादी कसे करतील. सचित पाटील पण चालेल.
दिपिकाच्या भुवया का अश्या
दिपिकाच्या भुवया का अश्या दाखवल्या आहेत? काही फोटो मधे नॉर्मल आहेत. पद्मावतीच्या होत्या का अश्या unibrow?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=7Dh0HwU6q-8 या गाण्यात सयाजीने जे चेकाळलेले काम केलयं ते पाहुन मला तोच मराठीतला खिलजी वाटतोय.
मला हिंदीत खिलजी म्हणून मुकेश
मला हिंदीत खिलजी म्हणून मुकेश ऋषी (सरफरोश, गर्दिश वाला) चालेल.ताकदीचा अभिनेता आहे.
पद्मावतीचे मिस्टर म्हणून रजत कपूर महेश अंकल (मला माफ करा, मला तो खूप आवडतो.) आणि पद्मावती म्हणून श्रद्धा कपूर किंवा अनुष्का (परत एकदा माफ करा) चालेल.
मुकेश ऋषी (सरफरोश, गर्दिश
मुकेश ऋषी (सरफरोश, गर्दिश वाला) >>>>>+१२३४५६
अनू, एकदम पर्फेक्ट निवड आहे.
सिनेमा पाहिला नसल्याने नो
सिनेमा पाहिला नसल्याने नो कमेंट्स खरं तर..
पण तरीही.. मराठीत पद्मावत आला तर याबद्दल..
मला काहून विसरला रे, रत्याळ्याहो !
-इति मक्या
मराठी खिलजी - अशोक सराफ
मराठी खिलजी - अशोक सराफ
पद्मावती - सचिन >>
म हा न ....माझ्या डोळ्यासमोर एकदम बनवाबनवी च आला ...
पण तरीही.. मराठीत पद्मावत आला
पण तरीही.. मराठीत पद्मावत आला तर याबद्दल..
मित, मग हा पद्मावत मराठवाडी ठसक्यात झाला असता. मक्या रतनसिंग झाला असता, सोनाली ज्यु पद्मावती तर सयाजी शिंदे किंवा नागेश भोसले खिलजी झाले असते. सगळ्या चित्रपटात रताळ्या, भुसनळ्या, सुक्काळीच्या असे बहारदार संवाद ऐकायला मिळाले असते. 
मला काहून विसरला रे, रत्याळ्याहो !
-इति मक्या Happy>>>>>
अंजू तो मिलींद शिंदे आहे, तू
अंजू तो मिलींद शिंदे आहे, तू तिथे मी चा तांबडे बाबा.
रतनसिंग एकच, ललित प्रभाकर >>>
रतनसिंग एकच, ललित प्रभाकर >>>>>>
डिजे, हवे तितके मोदक घे गं.....
मक्या रतन्सिंग "राणी माझ्या
मक्या रतन्सिंग "राणी माझ्या हवेलीत नांदशील का?" म्हणत ढिपारी ढिपांग नाचला असता.
आणि पद्मीच्या एंट्रीला अप्सरा आली आहेच.
रतनसिंग प्रभासला घ्यायला हवे
रतनसिंग प्रभासला घ्यायला हवे होते. खिलजीला दोनचार वेळा उचलून उचलून बुकलताना दाखवायला हवे होते. जसे डर मध्ये सनी शाहरूखला मारतो. रणवीरला बुकलले जातानाचा अभिनय दाखवायची संधीही मिळाली असती. मग त्याने कपट करून शक्तीशाली प्रभासचा काटा काढला असता. ते पाहून पद्मावती सती जाण्यापूर्वी गपचूप एका तान्ह्या बाळाला जन्म देऊन सती गेली असती. भाग दोनची सुद्धा सोय झाली असती. त्यात पुन्हा प्रभास आला असता आणि पुन्हा एकदा रणवीरला बुकलला असता. आज जे भन्साळी करोडो कमावतोय ते किमान डबल झाले असते. आणि करणी सेनेला हसावे की रडावे समजले नसते.
बघितला पद्मावती मला तरी जितका
बघितला पद्मावती मला तरी जितका हाईप केला तितकाwow वाटला नाही.. कुठलाही प्रसंग खुलवलेला नाही.
मुव्ही फक्त आणि फक्त रणवीर चा आहे.
दीपिका प्रत्येक सीन मध्ये नुसती ताठ उभी आहे, डोळे ताणलेले, चेहऱ्यावर भाव शून्य.
नवरा गेला कळल्यावर ही काही कसलेच भाव नाही उलट , ये तो होना ही था अश्या टाईप चा फेस वाटला मला
रतन सिंग मस्त , शाहिद आवडला कधी नव्हे तो..
नागमती ला काही काम च नाही टोमणे मारणे आणि नौटंकी सोडून .
जोहार चा सीन मला गुंडाळल्या सारखा वाटला. कोणी इतकं पटकन तयार झालं नसेल तेव्हा इतक्या मोठ्या गोष्टी साठी.
ते थोडं खुलवून दाखवता आलं असतं.
खिलजी चा हरलेला हताश ( याच साठी केला अट्टाहास ) बघायला मजा आली असती पण ते ही नाही...
सर्व तुकड्या तुकड्यात मांडलाय मुव्ही असं जाणवत राहिलं...
स्पेशल इफेक्ट्स आणि रणवीर ला तोड नाही
अदिती पण मस्त
आणि तो चेतन राघव हवस का पुजारी पण मस्त...
करणी सेनेला हसावे की रडावे
करणी सेनेला हसावे की रडावे समजले नसते.>>>>>
हे सगळ्यात भारी.
रतनसिंग प्रभासला घ्यायला हवे
रतनसिंग प्रभासला घ्यायला हवे होते. खिलजीला दोनचार वेळा उचलून उचलून बुकलताना दाखवायला हवे होते. जसे डर मध्ये सनी शाहरूखला मारतो. रणवीरला बुकलले जातानाचा अभिनय दाखवायची संधीही मिळाली असती. मग त्याने कपट करून शक्तीशाली प्रभासचा काटा काढला असता. ते पाहून पद्मावती सती जाण्यापूर्वी गपचूप एका तान्ह्या बाळाला जन्म देऊन सती गेली असती. भाग दोनची सुद्धा सोय झाली असती. त्यात पुन्हा प्रभास आला असता आणि पुन्हा एकदा रणवीरला बुकलला असता. आज जे भन्साळी करोडो कमावतोय ते किमान डबल झाले असते. आणि करणी सेनेला हसावे की रडावे समजले नसते.>>>>>>>

हो रश्मी हाच मिं गा. मला
हो रश्मी हाच मिं गा. मला त्या सिरियलमधे कुठला तरी बाबा म्हणायचे आठवत होते पण तांबडे नांवच आठवेना. जबरदस्त करतो हा मात्र. सध्य सरस्वतीमधे आहे.
रतनसिंग ललित प्रभाकर वाचून रमडची आठवण आली. मला ल प्र म्हटलं की रमड आठवते.
ललित प्रभाकर रतनसिंग सगळेच्या
ललित प्रभाकर रतनसिंग सगळेच्या सगळे दात दाखवुन वेडगळ हसेल
पद्मीनी - अमृता खानविलकर किंवा मृण्मयी डेशपांडे
रतन्सिंग - गश्मीर
खिल्जि- शरद केळ्कर
विनोदी पद्मावत
पद्मिनी - क्रांति रेडकर
रतन्सिंग - भरत जाधव
खिल्जि - वैभव मांगले
आणि एक इरिटेटिंग विनोदी पद्मावत
पद्मिनी - श्रेया बुगडे
रतनसिंग - भाउ कदम
खिल्जि - निलेश साबळे
शरद केळकर कुठलाही छान करेल
शरद केळकर कुठलाही छान करेल मात्र. सात फेरेमधे त्याचा हिरो आणि नंतर एका सिरीयलमधे टोकाचा व्हिलन बघितलाय हिंदीत. लय भारी मात्र मुवि थोडाच बघितला.
सस्मित, अमृता खानविलकर म्हणायचं आहे ना.
हा पद्मावत कसा वाटतो त्या
हा पद्मावत कसा वाटतो त्या ऐवजी मराठीत आला तर वर किती त्या पोस्टी!
हो हो अमृता आदिती नव्हे.
हो हो अमृता आदिती नव्हे.
सिटी प्राईड कोथरूड मधून एक
सिटी प्राईड कोथरूड मधून एक आठवड्यात उंडतोय पद्मावत.
शनिवारची तिकिटे पहात होतो, तर शो नाहीये
आणि तो चेतन राघव हवस का
आणि तो चेतन राघव हवस का पुजारी पण मस्त...
<<<
आवडलं टायटल
प्रसाद ओक खिल्जी. अवघाची
प्रसाद ओक खिल्जी. अवघाची सन्सार मध्ये त्याने खिल्जी टाईप रोल केला होता. मलिक काफूर पुष्कर श्रोती.
पद्मावतीचे मिस्टर म्हणून रजत कपूर महेश अंकल (मला माफ करा, मला तो खूप आवडतो.) आणि पद्मावती म्हणून श्रद्धा कपूर किंवा अनुष्का (परत एकदा माफ करा) चालेल. >>>> काहीही हा. महेश कोठारे मग पद्मावतीचे पप्पा वाटले असते .
विनोदी पद्मावत
विनोदी पद्मावत
पद्मिनी - क्रांति रेडकर
रतन्सिंग - भरत जाधव
खिल्जि - वैभव मांगले>>>>>>>>हॅट्स ऑफ टु यु सस्मित. मला दोन्ही कॉम्बिनेशन जाम आवडले
आणि एक इरिटेटिंग विनोदी पद्मावत
पद्मिनी - श्रेया बुगडे
रतनसिंग - भाउ कदम
खिल्जि - निलेश साबळे>>>>>>जबरी!!!!!
हिंदीत खिलजी म्हणून मुकेश ऋषी
हिंदीत खिलजी म्हणून मुकेश ऋषी (सरफरोश, गर्दिश वाला) चालेल.ताकदीचा अभिनेता आहे. >>> बर्याच वर्षापुर्वी सोनीवर पद्मावती वर एक सिरियल लागायची त्यात मुकेश ऋषी खिल्जी झाला होता आणि सई लोकूर पद्मावती.
सिटी प्राईड कोथरूड मधून एक आठवड्यात उंडतोय पद्मावत. >>> करणी सेना पुण्यात पोहोचली कि काय?
Pages