पद्मावत कसा वाटला ( कॉमन धागा)

Submitted by दीपांजली on 24 January, 2018 - 19:40

F520E053-1A4C-4E1C-8353-68A064DAF566.jpeg
संजय लीला भन्सालीचा बहुचर्चित पद्मावत आता खरच रिलिज होतोय, तो कसा वाटला याबद्दल लिहायला हा कॉमन धागा .
असंख्य धागे काढण्या ऐवजी इथे लिहा पद्मावत बद्दल आपापले रिव्ह्युज/ मतं / पिसे काढणे इ. (सिनेमा पाहिल्यावर मग ) Wink
त्यातून काढायचाच असेल नवा धागा त्यांनी काढा खुशाल, मी अ‍ॅडमिन /वेमा नाही .
IMG_1207.JPG

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदिती राव दिपीकापेक्षा सुंदर दिसतेच. वैम.
त्यात गोरी, निळे डोळे छान आणि डस्की हस्की असुंदर असं काही नाही.
आणि ह्यात टिपीकल देसी काय आहे?
आम्हाला तर कल्की पण छान वाटते आणि कोंकणा पण छान वाटते.
म्हणुन कोंकणाला मस्तानी नैतर आणि कुठल्या सौंदर्याची मिसाल असलेल्या स्त्रीची भुमिका दिली तर चालेल का? Happy

दिपीका मस्तानी बनण्यात काही प्रॉब्लेम नाही.पण बाजीराव मस्तानी, गोळ्यांचा वर्षाव रामलीला आणि हा पद्मावत सगळ्यात ती साधारण एकाच स्टाईल च्या गेटप आणि कपड्या दागिन्यात आणि फेशियल एक्स्प्रेशन मध्ये आहे.अश्याने स्टिरिओटाईप बनण्याचा धोका तिला स्वतःला जास्त आहे.

एकाच स्टाईल च्या गेटप आणि कपड्या दागिन्यात आणि फेशियल एक्स्प्रेशन मध्ये>>>>> आणि रणवीर राहिला ग Happy

दिपिका सुंदर नाहिये असं नाहिच,,
पण नाजुक , लावण्यवती असं कोणाला म्हणत असतिल तर ती समोर येत नाही..
आदिती पण काही गोरीगोमटी नीळे डोळे कॅटॅगरी मधे नाहिये.. पण ती छान वाटते..
दिपिका थोडी मॅनली वाटते..फार उंच आणि खप्पड..बारीक..
कॉकटेल मधे शोभलिये..
आणि ते शुन्यात हरवण .. डोळ्यात विषेश भाव नसणं .. उगाच धीरगंभीर होणं यामुळे विचित्र वाटते..
आपापलं मत..

दिपीका मस्तानी बनण्यात काही प्रॉब्लेम नाही.पण बाजीराव मस्तानी, गोळ्यांचा वर्षाव रामलीला आणि हा पद्मावत सगळ्यात ती साधारण एकाच स्टाईल च्या गेटप आणि कपड्या दागिन्यात आणि फेशियल एक्स्प्रेशन मध्ये आहे.अश्याने स्टिरिओटाईप बनण्याचा धोका तिला स्वतःला जास्त आहे.>>>>>>>>हा संलिभ इफेक्ट असावा. कारण बेसिकली कथा काहिही असली तरी संलिभ चे चित्रपट 'दिसायला' सारखेच दिसतात.

रणवीरने संधीचे सोने केले. पिक्चर अजून पाहिला नाहीये. पण शीतावरुन भाताची परीक्षा तसे खली वली हा डान्स पाहुन जाणवले. अमिताभनंतर मनापासुन आवडलेला हा एक.

राणी पद्मिनीचे ( पद्मावती) सौंदर्य असा निकष होता तर ऐश्वर्या माझी पर्सनल चॉईस होती, पण राजस्थानी स्त्रिया गोर्‍या असल्या तरी घारोळ्या नाही पाहील्या. उलट डस्की सौंदर्यच जास्त पाहीलेय. त्यामुळे दिपीका हीच भन्साळीची पसंत बरोबर वाटतेय. मी दिपीका फॅन आहेच.

ओ, ती राजस्थानी स्त्री नाहीय, राजस्थानात लग्नानंतर देलेली आहे. राजस्थानी लग्गेच बोलायला लागली म्हणून काय झालं?
सिंहली आहे म्हणे.

राजस्थानी स्त्रिया गोर्‍या असल्या तरी घारोळ्या नाही पाहील्या> >>> रश्मी, पदमिनी राजस्थानी नव्हती मुळची. श्रीलंकन होती म्हणे. लग्न करुन राजस्थानात गेली. तरीही ऐश्वर्यासाठी नो नो Happy

ओह! असे आहे होय. धन्यवाद सोनू आणी सस्मित.
पद्मावत जर जुन्या काळात काढला असता तर अनुक्रमे आधी मधुबाला, मग वैजयंती माला, हेमा मालिनी अशी वर्णी लागु शकली असती. सध्या तरी ऐश्वर्या मनात होती.

अर्रर्र!! ते खलीबली गाणं कसलं पकाव आहे.
रण्बीरच्या जीवावर काय पण.
मधे मधे काही स्टेप्स तर वाट लागली च्याच वाटतात.
वाट लागलीचं मुझिक ऐकुनच स्फुरण चढल्यासारखं होतं.
खलीबली सपक आहे.

वाट लागलीचं मुझिक ऐकुनच स्फुरण चढल्यासारखं होतं.
खलीबली सपक आहे.>>>>> हाच तर फरक दिसतोय. पण उलटे शब्द मजेशीर वाटले.

तार वार दिलके सब टुटसे गये
निंदोवाले वाले जूगनू रुठ रात लुटसे गए..

बाय द वे, कलबिया कैस वल्ला ऐकताना आधी कल भी है गॅस भरा असेच ऐकु येत होते. Proud

https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-movie-padmaavat-song-...

अर्रर्र!! ते खलीव ली गाणं कसलं पकाव आहे.>> +१०० कडकनाथ मुर्गा वाटून राहिला आहे तो त्यात एका पायावर नाचताना.
ह्याला तुलना एकच कुर्बा नी कुर्बानी कुर्बानी हे गाणे. सिनेमा ३/४ झाल्याने उठता येत नाही व तीन कडव्याचे भले मोठे पठा णी गाणे. तालासुराशी फारकत.

घूमर व एक दिल एक जान मस्त आहेत गाणी. एदिए जा त्या पांढर्‍या हाताचे ठसे असलेल्या कप्ड्या इतकेच छो टे पण मस्त आहे.

गाणं पाहिलं युट्यूबवर आणि मगच गाण्याबद्दल लिहिलंय.
सिनेमा बघितला की सिनेम्याबद्दल पण कसला पकाव आहे असं लिहिन. Happy
बाकी इथे तिथे ज्या पोस्टी लिहिल्यात त्या ट्रेलर बघुन आणि रोजच कुठल्याना कुठल्या चॅनेलवर दिसणार्‍या घुमर बघुन लिहिल्यात. Happy

मधुबाला, मग वैजयंती माला, हेमा मालिनी>>>>> काहीही हं रश्मी Lol

काही काय सस्मित्? Uhoh उलट हेमा राजपुताना वाटलीय बर्‍यापैकी, बर्‍याच सिनेमात. कारण तिचा चेहेरा खानदानी वाटतोच. मग तूच सांग तुझी चॉईस काय आहे या बाबतीत. समजा तू पद्मावत डायरेक्ट केला असतास तर तू कुणाला रोल दिला असतास?

ह्याला तुलना एकच कुर्बा नी कुर्बानी कुर्बानी हे गाणे. सिनेमा ३/४ झाल्याने उठता येत नाही व तीन कडव्याचे भले मोठे पठा णी गाणे. तालासुराशी फारकत.

https://www.youtube.com/watch?v=AlheSuZyEKU

हे कसे वाटतंय ते सांगा मग

हे गाणे असेच्या असे भन्साळ्यीनी वापरले असते तर पब्लिकनी थेटर डोक्यावर घेतलं असत

अगं ते असंच लिहिलंय काहीही म्हणुन. म्हणजे तु अगदी कास्टिंग करु लागलीस म्हणुन. Happy
बाकी मधुबाला माझी आवडती आहेच. आणि हेमाला राजेशाही लूकमधे बघितलंय.
पण मी कोणाला कास्टिंग केलं असतं नाही सांगु शकत. सध्याच्या काळात तरी कोणताच चेहरा नाही येत लगेच डोळ्यसमोर.
भंसालीचंही तसंच होत असावं Wink
पण सारखी सारखी दिपीका नको वाटते मला. Happy

मराठीत पद्मावती निघाला असता तर एकदोन छान पर्याय होते. ओळखणे अवघड जाऊ नये.
शाहीदही मिळाला असता.. फक्त खिलजी अवघड गेला असता.. आता तर निळू फुलेही राहिले नाहीत.. पद्मावती बाई वाड्यावर या

तो रामलीला सुद्धा संजयचाच होता का?
मी तिनही पाहिले नाहीत.. ट्रेलरच पाहिलेत..
पण दिपिका, रणवीर, संजय यांचे गोविंदा, करिश्मा आणि डेविड धवन झालेत वाटते.

बरोबर आहे सस्मित. मी उत्सुकता वाटली म्हणून लिहीले. माझ्या नजरेसमोर पटकन कुणीच येईना. भन्सालीला दिपीकाच आवडत असावी.

मराठीत पद्मावती निघाला असता तर एकदोन छान पर्याय होते. ओळखणे अवघड जाऊ नये.
शाहीदही मिळाला असता.. फक्त खिलजी अवघड गेला असता.. >>>>>>
म्हणजे काय....
पद्मावती - सई ताम्हणकर
अल्लादिन- स्वप्नील जोशी
रतन सिंग- अंकुश चौधरी
किंवा 1-2-3 ची कशीही अदलाबदल करा काय फरक पडतो... इतकी भयानक कास्टिंग असल्यावर.

<< पद्मावती - सई ताम्हणकर
अल्लादिन- स्वप्नील जोशी
रतन सिंग- अंकुश चौधरी
किंवा 1-2-3 ची कशीही अदलाबदल करा काय फरक पडतो... इतकी भयानक कास्टिंग असल्यावर

Biggrin

३ सिनेमा एकत्र करण्याची काहीतरी ऑफर असावी बहुतेक. २ पे १ फ्री असं काहीसं Wink

सिंबा, सई ही सो कॉलड पारंपारीक सौंदर्यात मोडत नाही. माझ्या आवडीची असली तरी मी तिला पद्मावती बनबले नसते.
स्वप्निल हा खिलजी? आर यू सिरीअस? गोण्डस लोभसवाण्या बालकृष्णाची भुमिका ज्याने केली आणि ज्याला शोभली तो क्रूर कपटी खिलजी?
अंकुश राजा रतनसिंग चालला असता. आणि अप्सरा आली पद्मावती झाली असती.
खिलजी मात्र अजूनही सुचत नाहीये.. मराठीत तसा कोणी चटकन आठवत नाहीये.. नवतरुणांमध्ये तरी नाही.. आणि खिलजी अगदीच वयोवृद्ध दाखवण्यात मजा नाही..

म्हणजे काय....
पद्मावती - सई ताम्हणकर
अल्लादिन- स्वप्नील जोशी
रतन सिंग- अंकुश चौधरी
किंवा 1-2-3 ची कशीही अदलाबदल करा काय फरक पडतो... इतकी भयानक कास्टिंग असल्यावर.>>>> Rofl

मराठीतला खिलजी आठवेना? ठवेना? वेना? ना?

मराठीतला खिलजी..

१:- मकरंद देशपांडे

२ :- सयाजी शिंदे

३ :- संजय नार्वेकर

अजून काय सुचतयं ते बघा.

स्वप्निल हा खिलजी? आर यू सिरीअस? गोण्डस लोभसवाण्या बालकृष्णाची भुमिका ज्याने केली आणि ज्याला शोभली तो क्रूर कपटी खिलजी?>>>>> उलट अशा ब्लॅक/ निगेटीव्ह शेडच्या भूमिका करणेच आव्हान असते. गोंडस बाळाला ते जमले असते का? रणवीरने नाही का ते स्वीकारले? पूर्वी अमिताभने पण निभावलेय की हे.

Pages