पद्मावत कसा वाटला ( कॉमन धागा)

Submitted by दीपांजली on 24 January, 2018 - 19:40

F520E053-1A4C-4E1C-8353-68A064DAF566.jpeg
संजय लीला भन्सालीचा बहुचर्चित पद्मावत आता खरच रिलिज होतोय, तो कसा वाटला याबद्दल लिहायला हा कॉमन धागा .
असंख्य धागे काढण्या ऐवजी इथे लिहा पद्मावत बद्दल आपापले रिव्ह्युज/ मतं / पिसे काढणे इ. (सिनेमा पाहिल्यावर मग ) Wink
त्यातून काढायचाच असेल नवा धागा त्यांनी काढा खुशाल, मी अ‍ॅडमिन /वेमा नाही .
IMG_1207.JPG

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

< राजपूतो की तलवार क्षत्राणियोंकी शान काही ही न समजता बोलते.>
याची सुरुवात दो चुटकी सिंदूर पासून झालीय.

मलिक गफूर चित्रपटात काय आहे माहीत नाही. तो खिलजीचा हिजडा गुलाम होता हा इतिहास आहे. कदाचित खीलजीसाठीच हिजडा केला गेला असावा. गफूरने त्याच्यासाठी खूप युद्धेही केली.
<<
शिवाय त्याचा सुध्दा खिल्जीला बाजुला करून गादीवर बसायचे मनसुबे होतेच असही वाचलय, सिनेमात युध्दाला जाताना दाखवलाय पण मोस्ट्ली खिल्जीचा गुलाम दाखवलाय.

अमा Lol मस्त लिहिलंय.
शाहिद तिचा बारका भाउ वाटतो, नथण्यांची साइज वाढत जाते, हे भारी आहे.
सलिभला सिलेक्टीव्ह विजन आहे आणि नैसर्गिक चित्रण तर अजिबात नाही ह्याला अनुमोदन.
दिपिका आजिबात आवडत नाही. रणवीर अफाट आवडतो. शाहिद ठीकठाक आवडतो.
टीव्हीवर येइल तेव्हा बघेन.

शाहिद खरं तर बराच मोठा असेल दीपिका पेक्षा पण एखाद्याची पर्सनॅलिटीच असते कायम लहान दिसायची Happy
त.टि. मला शाहिद आवडतो. कमीने, जब वी मेट, हैदर इ. , इथेही काही वाइट अभिनय केला नाही पण त्या रोल मधे फिट्ट नाहीये इतकच वाटलं, रणवीर डॉमिनेट करतो ते वेगळच.

काल पाहून आले. प्रेक्षणीय सिनेमा. एकदा बघायला नक्कीच आवडला.
त्रुटी भ र पू र आहेत पण Happy
*****इथुन पुढे स्पॉयलर आहेत *********

रणवीर एन्ट्रीपासूनच छा गया है. काय वेड काम केले आहे!! खतरनाक! चेहरा, डोळे, बॉडी लँग्वेज, विचित्र नाचायची पद्धत, ते लांब केस सगळेच खिल्जीची क्रूरता आणि सनकीपण जबरदस्त कॅप्चर करतात. अदिती राव हय्दरीने पण चांगले काम केलेय. दिसायला पण सुरेख दिसलीय. रझा मुराद आणि खिल्जीचा कारा मधला सीन( रझा मुराद चे काम तमाम करतो त्यावेळेचा) भारी झालाय. ज्या सीन्स मधे ते दोघे आहेत तेव्हा रझा मुराद चे डिक्शन , मुस्लीम लहेजा ( जरी तोही अस्सल अफगाणी नसला तरी) रणवीर पेक्षा जास्त ऑथेन्टिक वाटतो हे लक्षात येते. भन्सालीने रणवीर च्या भाषेवर जरा मेहनत घ्यायला हवी होती. बाम आणि रामलीला, बँड बाजा बारात मधे रणवीर ने त्या त्या भाषेचा लहेजा मस्त पकडला होता. इथेही जमले असते त्याला.
सिंहल मधली हिरवी गार दृष्ये खूप सुंदर आहेत. दीपिका सुंदर दिसलीय. अ‍ॅक्टिंग तसे खटकले तरी नाही पण हर एक सीन मधे सिमिलर भाव आणि अ‍ॅक्टिंग बद्दल अमांनी लिहिलेले वाचले ते पटले मात्र. तिची मधेच काही वाक्यं एकदम मॉडर्न टोन मधे येतात , आता ये जवानी है दिवानी टाइप एखादे हिंग्लिश वाक्य बोलेल असे वाटते एकदम.
तिचे राजस्थानी कपडे अन ज्वेलरी एक से एक सुंदर. पण मधे मधे विशेषतः शाहिद बरोबरच्या दृष्यात पुरुषी दिसते जरा. शाहिद साठी मला खरं जरा वाईट वाटले. त्याने चांगले काम केलेय, दिसतो पण छान पण दीपिकापुढे आणि इतर पात्रांपुढे जास्तच लहानखुरा नाजूक वाटलाय त्यामुळे प्रभाव पडत नाही. त्यालाही आधी नॉर्मल फिल्मी हिंदी आणि मधेच एक दोन वेळा राज्स्थानी ढंगातली १-२ वाक्ये दिलीत , बास्स!
दीपिकाची ती कपाळावर खूप वर टिकली/ कुंकू लावायची स्टाइल तिचे कॅरेक्टर डिझाइन तसे केलेय म्हणून उगीचच तशी लावलीय असे वाटले, नो थॉट बिहाइन्ड इट. कारण चितोड मधल्या इतर बायका तशी फॅशन करताना दाखवलेल्या नाहीत.
बाकी किल्ल्याच्या आतली दृष्ये सुंदर, प्रत्येक फ्रेम सुंदर, सिमेट्रिकल वगैरे आहेच. पण अमांच्या पोस्टप्रमाणेच आम्हाला पण नवल वाटले, उंट अजिबात का दिसत नाहीत?!!! मी राजस्थानमधली सुंदर लँडस्केप्स , वाळूच्या टेकड्या , उंटांच्या लाइनी, स्पेक्टॅक्युलर सनसेट, बॅकग्राउंड ला राजस्थानी संगीत वगैरे फिल्मी अपेक्षा केली होती Happy पण तशी काहीही दृष्ये नाहीत. भन्साळीने संधी घालवली ती.
घूमर गाणे मस्त घेतले आहे. पण बाकी संगीताच्या बाबतीत काहीच उल्लेखनीय नाही. आहेत त्या होळी वगैरे गीतांना
लोकल फ्लेवर पण नाही. चितोड आहे की छत्रसालाची मध्यप्रदेशातली गढी हे डिस्टिंग्विश व्हायला हवे ना?! ते होत नाही.
पहिल्या युद्धाच्या दरम्यान बर्‍याच गोष्टी कळत नाहीत. इथे कोणीतरी लिहिल्याप्रमाणे खिलजी अकेला निहत्था वगैरे असताना राणीचा चेहरा दाखवायवी मागणी करतो तिथे रतन सिंग ची काय अशी मजबुरी असते? की बॉ शक्य नाही , निघ इथून असे का नाही म्हणता येत ? का मान्य करतात त्याची मागणी ? तसेच तिथून जाताना खिलजी जवळपास आदेश देतो की उद्या माझ्या तंबूत ये. जायलाच पाहिजे असा काही रिवाज आहे का ? बर गेला तरी एकट्याने भेटायचे ठरलेले असते, तरी तिकडे खिल्जीचे १५ लोक आत तंबूत घुसतात , रणबीर त्याला कैद करतो याची बाहेर थांबलेल्या त्याच्या माणसांना हवाही लागू नये? बर ते बहिरे आहेत समजू पण खिल्जी तंबूच्या मागच्या दाराने त्यांच्या राजाला किडनॅप करून घेऊन निघून जातो हे दिसत नाही ? दूरवर सपाट आणि मोकळे असलेल्या वाळवंटी भागात ?
नंतर पद्मावती त्याची सुटका करून आणते तो पूर्ण सिक्वेन्स आवडला. एकदम एन्गेजिंग आहे. अगदी त्या चेतन राघव चे शिर पाठवण्याच्या अटीपासून ते गोरा सिंग- बादल यांच्या बलिदानापर्यन्त. त्या चेतन राघव चे काम चांगलंय. आणि मलिक काफुर चं पण. त्याचं ते एक गाणं पण काही च्या काही कर्कश्य आणि उगीचच टाकलंय. (बाकी फिल्मी गोष्टी चालत/ आवडत असल्याने बाम मधला बाजीरावाचा नाच आणि खली वली आय डिडन्ट माइन्ड Happy )
नंतर अजून खटकलेली गोष्ट म्हणजे या सुटका प्रकारानंतर खिलजी पुन्हा आक्रमण करणार याचा या लोकांना अंदाज येत नाही का ? तो येतोय ही बातमी कोणीतरी सांगते की एकदम हातातले काम टाकून दीपिका , रतनसिंग किल्ल्याच्या गॅलरीतून डायरेक्ट धुळ उडवत सैन्य येताना बघतात हे विचित्र वाटले. त्यापेक्षा याची कल्पना असल्याने हे लोक चितोड मधे काही तरी पूर्वनियोजन वगैरे करतात असा एखादा सीन टाकायचा की!
शेवटचा अर्धा तास पुन्हा एकदाएअकदम एन्गेजिंग आहे. रतन सिंग आणि खिल्जीच्या द्वंद्वाचा सीन छान आहे, त्या सीन मधे मात्र माझ्या मते शाहीद कमी पडला नाहीये रणवीर समोर. त्याचा सात्विक संताप, पराक्रम वगैरे दिसतो त्याच्या लढ्ण्यात.
जौहर ची तयारी आणि खिल्जी ने तिथे पोहोचण्याची केलेली पराकाष्ठा, त्या धडधडणार्‍या चितेतून उडणार्‍या ठिणग्या आणि त्या दिशेने निघालेल्या लहान मोठ्या सर्व स्त्रिया हा सीन परिणामकारक घेतलाय , तरीही अजिबात ग्राफिक नाहीये. सिनेमा संपतोच तिथे खटकन. माझ्य फिल्मी मनाला उलट वाटले खिल्जीचं फ्रस्ट्रेशन आणि आक्रोश टाइप एक दोन सेकंदाचा सीन असता आणि त्याच्या फ्रस्ट्रेटेड स्टिल वर संपला असता तर चाललं असतं Happy
एकंदर मला असं दिसलं की राजपूतांच्या आन, बान, उसूल वगैरे त्यांची बलस्थाने नसून मजबुरी असल्याचे सतत समोर येते! युद्ध हरण्याची तत्कालिक कारणे ! शत्रू कसलेच उसूल पाळत नसला तरी हे लोक आपले उसुलांनी बांधलेले. आपण त्याला अमक्या वेळी मारायचे नाही तमक्या अवस्थेत मारायचे नाही, तमक्या ठिकाणी नाही, शत्रूच्या तावडीत सापडले असता सुटका करायला कोणी आले तरी शत्रूला "निघतो बर का " असे सांगूनच निघायचे! अरे काय! अशाने मग हारणार नाही तर काय!! Happy शिवाजीमहाराज आग्राहून सुटकेच्या आधी पेटार्यातून उतरून औरंगजेबाला निघतो बर का , भेटु दख्खनात असे सांगायला गेले असते तर ?!! असे मनात येऊन गेले Lol
तरी पण एकदा बघा सिनेमा . Happy

एकंदर मला असं दिसलं की राजपूतांच्या आन, बान, उसूल वगैरे त्यांची बलस्थाने नसून मजबुरी असल्याचे सतत समोर येते! युद्ध हरण्याची तत्कालिक कारणे ! शत्रू कसलेच उसूल पाळत नसला तरी हे लोक आपले उसुलांनी बांधलेले. आपण त्याला अमक्या वेळी मारायचे नाही तमक्या अवस्थेत मारायचे नाही, तमक्या ठिकाणी नाही, शत्रूच्या तावडीत सापडले असता सुटका करायला कोणी आले तरी शत्रूला "निघतो बर का " असे सांगूनच निघायचे! अरे काय! अशाने मग हारणार नाही तर काय!! Happy शिवाजीमहाराज आग्राहून सुटकेच्या आधी पेटार्यातून उतरून औरंगजेबाला निघतो बर का , भेटु दख्खनात असे सांगायला गेले असते तर ?!! असे मनात येऊन गेले >> एकदमच +१११

सांगायचे राहिले - अमांच्या पोस्टी छान आहेत Happy ते अत्तर वगैरे तुम्हीच नोटिस आणि अप्रिशिएट करू जाणे अमा !
दीपिकाच्या अभिनयाबद्दल लिहिलेले पण पटले. तसे बघताना खटकले नव्हते अगदी पण आता आठवताना वाटतेय की शाहिद तिच्यापेक्षा जास्त 'ह्यूमन ' वाटतो त्याच्या डोळ्यातल्या , चेहर्‍यावरच्या भावांमुळे. ही सुंदर दिसते, निर्धार , करारीपण दाखवू शकते तिच्यात नॅचरल असलेल्या पॉइज वगैरे मुळे. पण सेन्सिटिव , भावूक पणा नाही दिसत कुठे. डोळ्यात कचरा गेल्यामुळे पाणी आलेय असे इमोशनल सीन्स मधे वाटत रहाते. एक चटकन आठवलेला सीन म्हणजे शाहिद ला तुरुंगात भेटते तेव्हा. इतक्या दिवसानंतर नवर्‍याला बघून भावनाविवश वगैरे अज्जिबात वाटली नाही . तसेच शाहिद ची सुटका करून आणते त्यानंतर बादल च्या आई शी बोलतानाचा सीन आहे. त्यात इतक्या निर्विकारपणे दीपिका म्हणते "बादल को नही बचा पाये" याउलट बादल च्या आईचे काम करणारी अभिनेत्री गुणी वाटते. तिने मात्र त्या १ मिनिटात बरोबर दु:ख, डोळ्यातले पाणी परतवून पण गळा भरून आलेला अभिनय सुरेख केलाय.
बाकी ते खिल्जीचे बायसेक्शुअल असणे अगदी म्हणजे अगदी सटल पणे येते , त्याबद्दल भन्सालीला धन्यवाद दिले पाहिजेत , नाहीतर इतर कुणी दिग्दर्शक असते तर काहीतरी उथळ हिडिसपणा दाखवायला स्कोप होता Happy

मै चा रिव्ह्यु पण पटला :).
मै,
तुझ्या शंकांची उत्तरं भारत एक खोज मधे मिळतील.
स्पॉयलर :
भारत एक खोज मधल्या पद्मावती एपिसोड मधे बर्याच गोष्टी क्लिअर आहेत.
मुळात राघव चेतन एक जादुगार असतो, त्याच्या मायाजाल करामतींना कंटाळून राजा त्याला हाकलतो, पद्मिनीने तोवर त्याला पाहिलेही नसते, ब्राम्हण शाप नको म्हणून ती निघून जाणार्या चेतनला खिडकीतून हाक मारून माफी मागते आणि तो नाराज होऊन जाऊ नये म्हणून गळ्यतला एक दागिना फेकते.
चेतन तिला बघून फारच दीपून जातो आणि खिल्जीला गाठतो .
त्याच्याकडचा दागिना बघून हा माणूस कोणी आलतु फालतु नाही हे खिल्जीला समजत.
तो राणीचं वर्णन करतो, यावर खिल्जी हसतो आणि त्याला कित्ती बायका आहेत, तुझ्या राणीचं मला काय, तिच्यासाठी मी सैन्य का पणाला लाऊ टाइप प्रश्नं विचारतो.
राघव काहीतरी काव्यं करून खिल्जीला पद्मिनीच्या सौंदर्याबद्दल कन्व्हिन्स करतो.
खिल्जी चित्तोडला वेढा घालून बसतो, पण किल्ल्याच्या आत जणु पूर्ण नगरी वसलेली असते , कित्येक महिने अन्न धान्य पुरेल अशी सोय असते, त्यांना काहीच फरक पडत नाही.
त्यातही घुमर आहे पण ते खिल्जीच्या सैनिकांचं लक्ष वेधायला , अगदी त्यांना दिसेल असं , लोककलाकार स्त्रिया करतात.
खिल्जी सेना आणि खिल्जी हे पाहून विचलीत्/अचंभित होतात, ही अशी लोककला, बायका त्यांनी पाहिलेल्याच नसतात.
तर त्या राजाला भेटायच्या आणि अट घालाय्च्या सीन मधे बहुदा खिल्जीने अजुन सैन्य पूर्णपणे हटवलं नसतं, तो किती दिवस डेरा टाकायचा म्हणून शेवटी तडजोड करायला येतो.
बुद्गीबळ खेळताना राजाला सांगतो कि मी सैन्य हटवेन, राणी बद्दल एवढं ऐकलय मला फक्तं राणीची एक झलक पाहु दे.
पद्मिनी स्वतः तयार होते जर तिच्या एका प्रतिबिंबानी चित्तोडवरचं संकट टळणार असेल तर.
मग झलक पाहिल्यावर तो एकदम हक्काबक्का होतो, त्याला आपेक्षा नसते कि राणी चेतनराघव ने सांगितल्याप्रमाणे खरच एवढी सुंदर असेल.
( रणवीरची पद्मावतीला पाहून एक्स्प्रेशन्स अजुन थोडा वेळ चालली असती सिनेमात Happy )
पण दुसर्याच क्षणाला जणु काहीच झालं नाही अशा थाटात राजाला सांगतो तू अट पूर्ण केलीस अता मी निघतो, रजपुत मेहेमाननवाझी प्रमाणे मला राजद्वारापर्यंत विदा करायला ये. राजा जातो.
खिल्जी बोलत बोलत त्याला बराच पुढे आणतो , वेषीबाहेर. खिल्जीचे सैनिक अचानक प्रकट होतात आणि राजाला कैद करतात. तेंव्हा त्याला दगा झाल्याचं कळतं .
मला आठवतय त्या प्रमाणे राणी जातच नाही कैदेतून सोडवायला, गोरा बादल पैकी एक पद्मिनी बनून जातो आणि राजाला सोडवतो.
अर्थात भारत एक खोज बघून झाले बरेच दिवस, मी लिहिलय त्यात काही चूका असु शकतील, पण साधस्रण प्लॉट असा होता.
खिल्जी : ओम पुरी , पद्मावती : सीमा केळकर आणि राजा राजेंद्र गुप्ता.
अगदीच लो बजेट आहे आणि त्यात पद्मिनीला फार कामच नाहीये पण कथा नीट सांगितली आहे, कुठे तरी वाचलं कि त्यावेळी भन्साली एडीटींग टिम मधे होता :).
त्यातही खिल्जीलाच जास्त काम आहे.

ग्रेट दीपांजली.

भारत एक खोज अनेक वर्षापूर्वी बघितलं पण हे काही आठवतंच नाहीये. परत दाखवलं तेव्हा बघता नाही आलं. आता बघायला हवी ती मालिका परत.

अमा छान रिव्ह्यू.
मैत्रेयी छान लिहिले आहात.
दिपांजली सगळ्या पोस्ट आवडल्या.

मुळात पद्मावतीची कहाणीच काल्पनिक आहे. पद्मावत हे काव्य चित्तोड च्या लढाईनंतर सुमारे दोनशे वर्षांनी अवधी ( राजस्थानी नव्हे) कवीने लिहिले आहे. समकालीन इतिहासात पद्मावतीच्या कहाणीचा उल्लेख नाही. अमीर खुस्रो सारखे लेखक खिल्जिच्या पदरी होते त्यांनीही उल्लेख केलेला नाही. पद्मावती काल्पनिक आहे यावर इतिहासकारांचे एकमत आहे. करणी सेनेला खुष करण्यासाठी किंवा एकंदरीतच आजच्या धृवीकरणाचा फायदा उचलण्यासाठी खिल्जीची व्यक्तीरेखा एकांगी, क्रूर आणी कॅरिकेचर सारखी रंगवलेली दिसते. असा चित्रपट पाहून रजपूतांच्या पराभावाची ऐतिहासिक मीमांसा करणे अयोग्य आहे.

बाहुबली चा जसा आस्वाद घेतला तसाच पद्मावत चा घ्यावा.

अमानी सॉलिड लिहिलेय हे सांगायला विसरले. अत्तर व त्याचा खिलजीशी संबंध यावर छान लिहिलेय.

भा इ खो मी खूप वर्षपूर्वी पाहिलाय, त्यातले काहीही आठवत नाही. मला वाटते पूर्ण मालिका यु ट्यूबवर आहे. बघायला हवी.

सलीभचे चित्रपट म्हणजे सगळे नेत्रदीपक, मस्त पण कशाचाही एकसंध ठसा न उमटावणारे असे आता वाटायला लागलेय.

नागराज मंजुळेच्या एका मुलाखतीत त्याने उल्लेख केलेला की चांगला दिग्दर्शक एक चांगला स्टोरीटेलर असायला हवा. गोष्ट कितीही खोटी असली तरी ती ऐकताना खरी वाटायला हवी.

सुभाष घईसुदधा लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखांच्या प्रेमात पडून फुकट गेला.

करणी सेनेला खुष करण्यासाठी किंवा एकंदरीतच आजच्या धृवीकरणाचा फायदा उचलण्यासाठी खिल्जीची व्यक्तीरेखा एकांगी, क्रूर आणी कॅरिकेचर सारखी रंगवलेली दिसते. असा चित्रपट पाहून रजपूतांच्या पराभावाची ऐतिहासिक मीमांसा करणे अयोग्य आहे.

बाहुबली चा जसा आस्वाद घेतला तसाच पद्मावत चा घ्या >>>>> सहमत.

वर स्वरा भास्करने पद्मावत बघून भन्साळीला लिहिलेल्या ओपन लेटरची लिंक दिली होती. ती या वादात त्याला सपोर्ट करत होती पण फेमिनिस्ट म्हणून मुव्ही खटकला आहे.

सिम्बा यांनी नेहमीप्रमाणे पर्सनल होणे व राजकीय विषयावरचे वाद इतरत्र आणणे सुरू केल्यामुळे उडवली.

दिपांजली सॉरी इथे हे झालं, प्लीज कँटिन्यू अबाऊट मुव्ही.

सनव यांनी "चित्रपट कसा वाटला " विषयावर स्वर भास्कर चा दाखल देत फेमिनिसम, जुन्या प्रथा, धर्म इत्यादी विषयाशी असंबद्ध गोष्टी आणून धागा भरकटवायचा प्रयत्न केला,
त्यांचा प्लॅन वेळीच ओळखून त्याला विषय संबंधित धाग्यांवर हलवायला सुचवले,
प्लॅन फसल्यामुळे ,चिडून त्या माझ्यावर वैयक्तिक आरोप करत आहेत.त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो.
त्यांनी मूळ पोस्ट डिलिट केली असल्याने माझी पोस्ट सुद्धा डिलिट करत आहे.

हिंदू-मुसलमान असा भावनिक लढा आहे त्यामुळे बाहुबली सारखं कितीही काल्पनिक असलं तरी enjoy करता येणार नाही. भारतामध्ये भारतीयांच्या पराभवावर चित्रपट काढलाय, म्हणून enjoy करता येणार नाही. भारतीय राजे परकीयांकडून युद्ध हरले, बंदी झाले की कसे त्यांच्या बायकांचे, मुलांचे प्रजेचे धिंडवडे निघायचे हे पैसे, वेळ खर्च करून enjoy करु शकत नाही.
ज्यू लोकांची कत्तल कितीही आर्टिस्टिक्स केली म्हणून जग enjoy करतंय का! पाकिस्तान मध्ये हा चित्रपट का नाही without cut दाखवणार? त्यांना किती असुरी आनंद मिळत असेल! कसे मुस्लिम लोक हिंदूना हरवायचे आणि नुसतं हरण्याच्या शंकेने सुध्दा हिंदू बायका स्वतः आणि मुलांना आगीत लोटून जीव द्यायचा, सगळीच दिवाळी. (आपलं ईद का मोहरम).
बाकी मला काय कलेतील कळतं, कलाकार प्रेक्षक enjoy करु दे.

" आपला सबसेट" जिंकला म्हणजे एंजॉय करण्यास पात्र सिनेमा का? हे करणी सेनेच्या वरताण विनोदी लॉजिक आहे Happy म्हणजे सिनेमा तयार करताना दिग्दर्शकासाठी गाइडलाइन्स ठरवल्या पाहिजेत.
" आपली" बाजू जिंकली असेच दाखवणे मस्ट - पण मग आपली चा अर्थ प्रत्येक सिनेमात आणि प्रत्येक प्रेक्षकासाठी वेगळा सापडू शकतो. भारत- पाक, भारत -अमेरिका, हिंदू - मुस्लीम, काळे वि. गोरे, अमूक जात वि तमूक जात, अमूक भाषिक वि. तमूक भाषिक, स्त्री वि. पुरुष , अमूक राज्य आणि तमूक राज्य, पुणे वि. मुंबई, सदाशिव पेठ वि. पिंपरी, दगड वि. धोंडे. अवघड च त्या दिग्दर्शकांचं Happy

हे विदाउट कट पाकिस्तानात वगैरे खरं आहे का ? आय डाउट !
सेन्सॉर सर्टीफिकिट इंडीयाचं आहे तर असं चालेल का वेगळी व्हर्जन्स ? नाहीतर मग यु.एस. मधेही आला असता विदाउट कट .
एनीवे, जर असेल तिथे रिलिज झालं वेगळं व्हर्जन्स तर पायरसीच्या माहेरघरातून येइलच् बाजारात !
बाकी पराभव् कोणाचा झाला हे पहाणार्याच्या दृष्टीकोनाचा प्रश्नं आहे, ज्याच्या साठी खिल्जी लढ्ला ते त्याला मिळालं नाही ते नाहीच हा कथेचा आत्मा आहे.
जोहार म्हणजे पराभव कि विजय हा सुध्दा पहाणार्याच्या दृष्टीकोनाचा प्रश्नं आहे , राजस्थानी लोककथेत त्यालाही एक लढा -आत्मसमर्पण बलिदान म्हणलेलं आहे. योध्याला रणांगणात केसरीया रंग लाऊन वीरगति प्राप्त होते तशी ही लढाई किल्ल्यात लढलेल्या क्षत्राणींची .
सिनेमात तो सीन अतिशय सुंदर दाखवलाय, बायका नुसत्या आत्मसमर्पण करत नाहीत तर लढा देतात.
असो, बाकी खर्या शोकांतिकांवर सिनेमे आले नाहीत असं काही नाहीये, भारतात अनेक अतिरेकी हल्ल्यांवर आले आहेतच, पण जगभरात अशा विषयांवर शिवाय ज्यु लोकांच्या छळावरही आलेत.
पहायचा कि नाही ज्याचा त्याचा प्रश्नं !

<रणबीरचा अखि मला एका कारणासाठी फारच आव्डला त्याचा सेवक पहिल्यांदी येतो तेव्हा तो त्याला कोणते अत्तर लावले आहे असे विचारतो व सेवक म्हणतो जन्नतुल फिरदौस !!!!!>

अलाउद्दीन खिलजी हा पर्शियन आणि अब्बासिद या दोन्ही संस्कृतींच्या प्रभावाखाली होता. त्याचा जन्म भारतातला होता. उत्तम अत्तरं, खाद्यपदार्थ, कपडे, इमारती यांचा तो शौकीन होता. अमीर खुस्रो त्याच्या पदरी होता. हौझ खास आणि सिरी ही त्याची निर्मिती आहेत. त्यामुळे भंसाळी आणि रणवीर सिंग यांचा मांस बकाबका खाणारा, घाणेरड्या, काळ्या गुहेसदृश वास्तूत राहणारा अलाउद्दीन खिलजी हा तद्दन खोटा आहे. तो क्रूर होता, पण विकृत आणि राक्षसी नव्हता. त्याला सौंदर्याची जाणीव होती.
त्यामुळे नवाजुद्दीन किंवा ओम पुरी यांचा खिलजी कदाचित ऐतिहासिक सत्याच्या अधिक जवळ जाणारा ठरला असता / असावा.

मलिक कफूर आणि समलैंगिकतेबद्दल -

पद्मावतमध्ये या समलिंगी संबंधांचा उल्लेख नाही. झियाउद्दीन बरानीच्या तारीख इ - फिरोझशाहीमध्ये या संबंधांचा उल्लेख आहे. एब्राहम एरालीच्या मते कफूर आणि अलाउद्दीन यांच्यात तसे संबंध नव्हते, बरानीनं वैयक्तिक द्वेषातून तसं लिहिलं असावं.
पण अगदी रोमन, ग्रीक संस्कृतींतही असे संबंध प्रचलित होते. मध्ययुगीन भारतातही अशा संबंधांना मज्जाव नव्हता. बाबरही आपल्या आत्मचरित्रात आपल्या खास मित्राबद्दल लिहितो.

*
हे केवळ इथल्या प्रतिक्रिया वाचून आणि ट्रेलर पाहून लिहिलं आहे. चित्रपट बघितलेला नाही.

Pages