पद्मावत कसा वाटला ( कॉमन धागा)

Submitted by दीपांजली on 24 January, 2018 - 19:40

F520E053-1A4C-4E1C-8353-68A064DAF566.jpeg
संजय लीला भन्सालीचा बहुचर्चित पद्मावत आता खरच रिलिज होतोय, तो कसा वाटला याबद्दल लिहायला हा कॉमन धागा .
असंख्य धागे काढण्या ऐवजी इथे लिहा पद्मावत बद्दल आपापले रिव्ह्युज/ मतं / पिसे काढणे इ. (सिनेमा पाहिल्यावर मग ) Wink
त्यातून काढायचाच असेल नवा धागा त्यांनी काढा खुशाल, मी अ‍ॅडमिन /वेमा नाही .
IMG_1207.JPG

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंकुश राजा रतनसिंग चालला असता. आणि अप्सरा आली पद्मावती झाली असती.>>> +११११११

खिलजी मात्र अजूनही सुचत नाहीये.. मराठीत तसा कोणी चटकन आठवत नाहीये.. नवतरुणांमध्ये तरी नाही.. आणि खिलजी अगदीच वयोवृद्ध दाखवण्यात मजा नाही.. >>>>> जितेन्द्र जोशी कसा वाटतो?

गंमतीचा भाग जाऊ दे पण पद्मावतीवर खरोखर मराठीत सिनेमा निघाला असता तर खालील लोक शोभून दिसले असते.
पद्मावती: वर्षा उसगावकर किंवा अश्विनी भावे. वर्षाने झाशीची राणी चांगली वठवली होती आणि अश्विनीही मस्तानी म्हणून शोभून दिसली होती.
खिलजी: नाना पाटेकर
रावलः अजिंक्य देव किंवा रवींद्र मंकणी

सध्याच्या अभिनेत्यांपैकी कोणीही पटकन डोळ्यासमोर येत नाहीये.

मराठी पद्मावती का , वा वा Happy
खिलजी आपला अतुल कुलकर्णी करेल की. राघव चेतन - जितेन्द्र जोशी. आणी स्वप्निल जोशी- मलिक कफुर ! पर्फेक्ट Happy

रच्याकने, ते बिन्टे दिल नुसतं ऐकायला मस्त वाटतं..एक haunting feel आहे त्याला..पण पडद्यावर त्या मलिक काफूरच्य तोंडी फारच विसंगत वाटतं, ते बघताना मला सारखी रामलीलाच्या अंग लगा देना ची आठवण येत होती Happy फक्त त्यात रणवीर-दिपिकाच्या ऐवजी इकडे रणवीर-जिम सर्भ Lol

हो पडद्यावर फारच वाट लागते त्या गाण्याची . निदान बॅकग्राउंड ला असतं तरी चाललं असतं एक वेळ , पण तो मलिक कफूर ते अ‍ॅक्चुअली म्हणताना दाखवलाय ते फार फनी आहे!!

मराठी खिलजी शरद केळकर. लय भारी मधला व्हिलन.

सध्या राणी मटेरियल एकच. अनुष्का. शेट्टी -"देवसेना". शर्मा नव्हे.

शरद केळकर हँडसम आहे (मराठी आणि हँडसम - रेअर काँबिनेशन Proud ) . तो रतन सिंग म्हणून पण शोभेल. लय भारी नाही पाहिलेला, त्यामुळे निगेटिव रोल मधले पोटेन्शियल नाही माहित.

उलट अशा ब्लॅक/ निगेटीव्ह शेडच्या भूमिका करणेच आव्हान असते. गोंडस बाळाला ते जमले असते का? रणवीरने नाही का ते स्वीकारले?
>>>>>>>

रणवीरची ईमेज मुळातच वाह्यात टपोरी टाईप्स आहे. तो काही रोमाण्टीक चॉकलेट बॉय नाही. त्यामुळे त्याला काही आव्हान वगैरे नव्हते हा.. प्लीजच..

स्वप्निलसाठी आव्हान असेल. येस्स. तुम्हा लोकांचा त्यावर विश्वास असेल तर तो प्रयत्न करू शकतोच. पण स्वप्निलसारखा गोड चेहरयाचा खिलजी ठेवल्यास चित्रीकरणा दरम्यान पद्मावतीचे काम करणारी तरुणी त्यावर खरेच भाळली आणि ते चित्रपटात अभिनय करतानाही तिच्या चेहरयावर जाणवू लागले तर करणी सेना आणखी चवताळून नाही का उठणार?

बाकी गिरीश कुलकर्णी फाफे फेम व्हिलन सुद्धा खिलजीच्या जागी ट्राय करू शकतो... "ए फेणेss" जसा बोलतो तसे "ए पद्माss" .. आणि पुढे अंगाचे थरकाप उडवणारे वासनांध हास्य ..

स्वप्निलसाठी आव्हान असेल. येस्स. तुम्हा लोकांचा त्यावर विश्वास असेल तर तो प्रयत्न करू शकतोच.>>>येस, झपाटलेला बाहुला सुद्धा तो करु शकतो यावर तरी माझा विश्वास आहे. मग खिलजीचा प्रयत्नही होऊन जाऊ दे Happy

झपाटलेला बाहुला सुद्धा तो करु शकतो यावर तरी माझा विश्वास आहे.>>> Rofl
स्वजो एक गुटगुटीत बच्चू बाळ आहे व सई त्याची आई शोभेल. अशा प्रकारची स्टोरी असेल तर घ्या त्या दोघांना. Wink
बाकी रणवीरला बिग बी ने ही कौतूकाचे पत्र लिहिल्याचं कळलं, खिल्जीच्या रोल साठी... आता खिल्जीसाठी पद्मावत बघणे आले...

रणवीर चे डान्सेस मस्त असतात. त्याचे तत्तड तत्तड मला खूप आवडते. तसेच बाजीराव मस्तानी मधलेही. Total quirky डान्स असतो Happy

काही वर्षांपूर्वीच्या एका फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात त्याने बॉलीवूड च्या वेगवेगळ्या जनरेशन्सचा डान्स केला होता... काय एनर्जी आहे पठ्ठ्याची, सॉल्लीड!

रणविर ची एनर्जी आणि डेडिकेशन जबरदस्त आहे , प्रत्येक भुमिकेत झोकुन देवुन काम करतो तो, त्याच्यासाठी पद्मावती/त बघणार.

अ‍ॅग्री... त्याची एनर्जी जबरदस्त आहे... ती खलीबली मधली एका पायावरची स्टेप भन्नाट दिसते तो करताना आणि त्याचे हावभाव Lol

हो खलीबली पाहिला आहे डान्स. मस्त आहे.

या २-३ डान्सेस चा पॅटर्न बघितला तर भयंकर वेगात हाताच्या, डोक्याच्या वगैरे ५०-६० वेळा रिपीट होणार्‍या हालचाली हा त्याचा पेटण्ट डान्स आहे. आणि मग त्यानंतर एकदम काही सेकंद स्लो मोशन डान्स Happy

मल्हारी मधला सिक्वेन्स मजेदार आहे. कोणीतरी याचे वर्णन "तुम्ही नापास होण्याच्या अपेक्षेने रिझल्ट बघायला गेलात आणि ३५ का होईना पडून पास झाला आहात असे कळाल्यावर तुम्ही कसे बाहेर याल" असे केले होते Happy
https://www.youtube.com/watch?v=l_MyUGq7pgs&t=1m25s

फा - डान्सेस आणि ती स्टाइल रणवीर मुळे लक्षात राहते हे खरे पण तिन्ही डान्सेस गणेश आचार्य ने कोरिओग्राफ केलेत त्याची ती सिग्नेचर असावी बहुधा. Happy

ओह ते माहीत नव्हते. शक्य आहे Happy

एक डान्स पूर्ण बसवून झाला की रणवीर ला त्या आठवड्यात वेगळा व्यायाम करावा लागत नसेल Happy

अरे काय तुम्ही लोक !
मराठीत सगळे ऐतिहासिक रोल्स कोण करतं ???
अर्थात ...... सुबोध भावे झाला असता खिल्जी Happy
पद्मावती अमृता खानविलकर, रतनसिंग एकच, ललित प्रभाकर Happy

अर्थात ...... सुबोध भावे झाला असता खिल्जी >>> Lol .

अमृता खरंच छान करेल पण पूजा सावंतचापण विचार करायला हरकत नाही.

मिलिंद गायकवाड बुटका आहे पण खिलजी तो छान करेल. ललित चालेल रतनसिंग.

Pages