पद्मावत कसा वाटला ( कॉमन धागा)

Submitted by दीपांजली on 24 January, 2018 - 19:40

F520E053-1A4C-4E1C-8353-68A064DAF566.jpeg
संजय लीला भन्सालीचा बहुचर्चित पद्मावत आता खरच रिलिज होतोय, तो कसा वाटला याबद्दल लिहायला हा कॉमन धागा .
असंख्य धागे काढण्या ऐवजी इथे लिहा पद्मावत बद्दल आपापले रिव्ह्युज/ मतं / पिसे काढणे इ. (सिनेमा पाहिल्यावर मग ) Wink
त्यातून काढायचाच असेल नवा धागा त्यांनी काढा खुशाल, मी अ‍ॅडमिन /वेमा नाही .
IMG_1207.JPG

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेवक म्हणतो जन्नतुल फिरदौस !!!!! ओएम जी झाले मला तर. आणि तो सारखा स्वतः ला अत्तर लावत असतो. काही लोक शारीर अनुभवांचे जास्त शौकीन असतात. त्यातला तो आहे हे व्यवस्थित दाखवले आहे. चित्रपटाचे मेन कॉन्फ्लिक्ट दोन पुरुषांमधलेच आहे.
<<
+1
Happy

शाहीद मला फक्त हैदर मधे आवडलाय. >> 'कमीने'मधेपण चांगलाय की!

खूप चांगली जॉलाइन फार कमी लोकांची असते. >> बरोबर! पिअर्स ब्रॉस्नन?

सलीभ च पिच्चर म्हंजे वाटलंच होतं पांचट असणार...पण दीपू आणि रणवीर साठी बघायला लागणार. मस्त लिहीलंय अमा तुम्ही.

प्लीज त्या अल्लादीनच्या दिवट्याला अखि म्हणून नका...
उगाच तो अक्की उर्फ अक्षय कुमार उर्फ आधुनिक मनोजकुमार असल्याचा फील येतोय मला

अमा, डीजे - मस्त लिहीले आहेत! डायलेक्ट्स, सेट्स, ड्रेसेस वगैरे सगळी वर्णने भन्नाट. अमा तुमचा अत्तराबद्दलचा सीन इतर बहुतेकांनी बहुधा नोटिस केला नसता.

कमळाचा वास? सेन्सॉरने सक्ती केली असावी का? Wink

तिच्या जागी दुसरी कोण हा प्रश्न्ण आहेच. >>> फक्त हे काही पटले नाही. मला मुळात मस्तानी, पद्मावति वगैरे ला ती अजिबात सूट होते असे वाटत नाही. ती दिसायल अफाट सुंदर वगैरे नाही - रूढ भारतीय लूक प्रमाणे. गर्ल नेक्स्ट डोअर लुक जास्त आहे. मुळात आजकाल नुसत्या प्रेझेन्स ने फ्रेम्/स्क्रीन लाइट अप करणार्‍या हीरॉइन्सच नाहीत. त्यातल्या त्यात कत्रिना आहे पण तीही फक्त लाँग शॉट्स मधे.

बाय द वे अमा, मी खुदा गवाह पूर्ण पाहिलेला नाही पण पोस्टर्स मधे बच्चन शोभतो पठाण. लांब नाक वगैरे टीपिकल आहे. उलट खान अब्दुल गफारखानांवर जर पिक्चर काढायचा म्हंटला तर बच्चन परफेक्ट चॉइस आहे.

बाकी ते युनिफॉर्मिटी बद्दल मला पटले. अगदी स्थानिक हीरॉइनच पाहिजे असे नाही पण तशी किमान वाटली पाहिजे. 'बॅण्ड बाजा बारात' मधे अनुष्का दिल्लीकर वाटते तशी. दीपिका चेन्नई एक्सप्रेस मधे खटकली नाही. एरव्ही 'चोरबजारी' सारख्या गाण्यात "चौक चबारे, गली मोहल्ले, खोलके मै सारे घूँघट गयी" मधे जो उत्तर भारतीय संदर्भ आहे तो तिला समजला आहे असे अजिबात वाटत नाही. इतर ओळींसारखीच ती एक ओळ गाण्यातली.

जवळजवळ पावणे तीन तासाचा सिनेमा बनवल्यामुळे बराच फापटपसारा जमा केलेला आहे, थोडाफार बोअरिंगहि आहे. (बरेच जण रुटीन गाण्यांव्यतिरिक्त इतर वेळेला बायोब्रेक घेत होते) . फक्त खिलजी-पद्मावती वर फोकस ठेउन बनवलेला दीड तासाचा सिनेमा जास्त परिणामकारक झाला असता.

थोडक्यात, ट्रॉय आणि या सिनेमाच्या कथेत थोडंफार साम्य असल्याने (राणीच्या सौंदर्यावर भाळुन झालेलं युद्ध, किल्ल्याला घातलेला दीर्घकाळ वेढा, ट्रोजन हॉर्स वगैरे वगैरे) भंसाळीचा एक एपिक बनवायचा प्रयत्न (एपिक) फेल गेलेला आहे... Happy

अनुपमा चोप्राकडून २.५ रेटींग
http://www.firstpost.com/entertainment/anupama-chopras-review-of-padmaav...

"But films are not paintings. They need a beating heart to come alive and this is where Sanjay stumbles."

"I have no idea how much the ugly politics surrounding Padmaavat has distorted the director’s original vision but what we get is an unapologetic valorization of Rajputs and an unqualified demonizing of Khilji and his entire clan. Apart from his wife, played by a radiant Aditi Rao Hydari, the Muslims – down to the last man - are murderous, manipulative, cheating barbarians. The valorisation makes the Rajput characters cardboard. "

"Padmaavat is designed as an unabashed ode to Rajput bravery but ironically, the character who makes the biggest impression is Alauddin Khilji."

चित्रपट जर फिक्शनच आहे तर सलिभनं अल्लाउद्दिन खिलजीलाच जोहार करायला लावायचा खर तर Wink

अमा मस्त रिव्ह्यु, डिजे तु फुल पेज लिह ना .
राजा रतनसिन्ग म्हणून रणबिर, सुशान्त सिन्ग राजपुत वैगरे चालले असते , शाहिद प्रोमो पासुनच पटत नव्हता , उन्चपुर्‍या दिपिकासमोर एवढासा वाटतो तो, पद्मावत बिलॉन्गस टु रणविर अस वाटतय रिव्हुज वाचुन

चांगले लिहिलंय सर्वांनी. टीव्हीवर आल्यावर बघेन.

अग्ग बाई हे काय नवीन.. खिलजी बायसेक्शुअल होता..
मग तो शाहीद कपूरच्या मागे का लागत नाही. शाहीदही चिकणा आहे की..
आणि मग खिलजीच्या भितीने काही पुरुषांचा जोहार दाखवलेलाही चालला असता.. >>> Lol point है. पण नवीन धाग्याची गरज नाही यासाठी, एवढं पुरे.

शाहीद आवडत असला तरी दीपिकापुढे लहान वाटतो प्रोमोजमधेच आणि रणवीर भूमिका जागलाय असं वाटतंच आहे प्रोमोज बघून.

>>नांव बद्लुन फक्त पद्मावत केलंय पण संपुर्ण सिनेमात तिचा उल्लेख पद्मावती असाच केलेला आहे. मग या बदलाने नक्कि काय साध्य झालं?
माझ्यामते हा सिनेमा "पद्मावत" ह्या काव्यावर बेतलेला आहे हे दाखवण्यासाठी तो बदल आहे. तिचं नाव कसं पद्मावत ठेवणार? Proud

मला अंधूकसं आठवतय , घूमर गाणं रिलीझ झालं तेव्हा, डिपूच पोट ज्यास्त दिसत हितं ( उघडं) आता मूवीजमधे ते कवर्ड आहे.

परत शूट केले गाणं का?

अशा ऐतिहासिक पुरुषांची/बायकांची सेक्शुअ‍ॅलिटीही ऐतिहासिक दस्तावेजात उपलब्ध असते?

>> अशा ऐतिहासिक पुरुषांची/बायकांची सेक्शुअ‍ॅलिटीही ऐतिहासिक दस्तावेजात उपलब्ध असते?
त्याच्यावर अव्हेलेबल असलेल्या दस्तावेजातून ते अल्युड केलेलं असू शकतं ?
बायोडेटा म्हणून नसेल कदाचित.

अखि बायसेक्श्युअल होता हे आजच कळलं.
>>>>
त्यात ते चित्रपटात दाखवलेही आहे असे वरच्या काही रिव्यूत समजले.
जर पद्मावतीची कथा किती सत्यासत्य यावर वाद होत असेल तर हे कश्यावरून 100 टक्के सत्य आणि कसे बिनधास्त चित्रपटात दाखवले? आणि त्यापेक्षा कमाल म्हणजे यावरून खिलजी समर्थकांच्या भावनाही दुखावल्या नाहीत? हे असे बायसेक्शुअल असणे तेव्हा गौरवशाली तर नाही ना समजले जायचे?

त्याच्यावर अव्हेलेबल असलेल्या दस्तावेजातून ते अल्युड केलेलं असू शकतं ? >> अल्युड केलेलं आहे पण बरेच पर्शियन/ अफगाण राजे/महाराजे तसे होते त्यात तेंव्हा काही वावगे समजले जात नसावे. (किंबहुना, वाटले तरी सांगणार कोण ? असेही असू शकेल)

>>माझ्यामते हा सिनेमा "पद्मावत" ह्या काव्यावर बेतलेला आहे हे दाखवण्यासाठी तो बदल आहे. तिचं नाव कसं पद्मावत ठेवणार?<<

ते मान्य आहे हो, मला म्हणायचंय कि मूळात ते नांव बदलायची काहिहि गरज नव्हती. आणि हे नांव बदलल्यावर, ज्यांनी विरोध केलेला त्यांचा विरोध मावळला असेल तर ते "धन्य" आहेत...

(याचा अर्थ त्यांचा विरोध लेजीट आहे असं गृहित धरु नये... Proud )

मी एक थियरी वाचलेली चढाई करून आलेले योध्ये आणि त्यांचे मानसिक व शारीरेक जीवन ह्यावर.

त्यानुसार घरापासून लांब, अस्थिर जीवन, हवा त्या स्त्रीचा सहवास उपलब्ध कमी आणि एकम्दरीत मानसिक आणि शारीरेक परीस्थिती व लैंगिक गरज पहाता, बाय्सेक्श्युल असण्यांचे प्रमाण अश्या योध्यांमध्ये ज्यास्त होते. खास करून बाहेरून चढाया करून आलेले मोंगल, तुर्क, अरब आणि मुघल .. तशी मुलतः हिंसक क्रूरता सुद्धा बरीच आहे त्यांच्यात.
आता भारतात सुद्धा असे यौध्ये असतील्च. तसेही बायसेश्युलीटी बरीच ओपनली असायची त्या काळात.
हि थिअरीत किती तथ्य आहे व खरे खोटे देव जाणे....

मला अंधूकसं आठवतय , घूमर गाणं रिलीझ झालं तेव्हा, डिपूच पोट ज्यास्त दिसत हितं ( उघडं) आता मूवीजमधे ते कवर्ड आहे.
परत शूट केले गाणं का?>>>> नाही स्पेशल इफेक्टने ( ब्लाउज फुल साइझ केला)झाकल ते

ग्राफिलकी चेंज कली आहे तिच्या ब्लाउज ची लेंथ, अतिशय ग्रेसफुल आणि सुंदर आहे घुमर.
तरी हे लोक गोंधळ घालतातच आहेत, मेंटली इल !

नाही स्पेशल इफेक्टने ( ब्लाउज फुल साइझ केला)झाकल ते >>> हो का. मागे news मध्ये सांगितलं की घुमरचं परत शुटींग केलं.

अर्थात स्पेशल इफेक्टनेच केलं असेल कारण ते सोपं जास्त.

अतिशय ग्रेसफुल आणि सुंदर आहे घुमर.>> नक्कीच ! पण मुळात दिपिका १-२-३-४ डान्सर आहे त्यामूळे माधुरी किवा श्री सारख ती गाणे ओन करु शकत नाही , सान्गितल्या बरहुकुम नो व्हॅल्यु अ‍ॅडिशन..केल छान पण नो मॅजिक

बाय किंवा गे असण्याला गुन्हा बनवणं हि ख्रिश्चनिटीची देणगी असावी. पण मग त्यातूच फुटलेले मुस्लिमांचे धर्मग्रंथ याबद्दल काय म्हणतात माहित नाही. किंवा त्याआधीचे ज्युंचे ओल्ड टेस्तामेंट काय म्हणतात तेदेखील माहित नाही....

भारतात गे असण्याला गुन्हा समजणारा कायदा 1860चा आहे.

अतिशय ग्रेसफुल आणि सुंदर आहे घुमर.>> नक्कीच ! पण मुळात दिपिका १-२-३-४ डान्सर आहे त्यामूळे माधुरी किवा श्री सारख ती गाणे ओन करु शकत नाही , सान्गितल्या बरहुकुम नो व्हॅल्यु अ‍ॅडिशन..केल छान पण नो मॅजिक>> अनुमोदन. ही लिमि टेशन्स मोहे रंग दे लाल किंवा दिवानी मस्तानी मध्ये पण दिसून येतात. कथक बाय नंबर्स डान्स केला आहे.
बादवे तिथे पण हिरोला पाहिले झटक्यात प्रेम आणी पटकन डोलीत बसून पुण्यात हजर. अगं बाई काही चौकशी करशील कि नाही. कटार से शादी होगयी. राजपूतो की तलवार क्षत्राणियोंकी शान काही ही न समजता बोलते.

पूर्ण गे कुराणातही नाकारले गेले असावे. पण त्याच कुराणात युद्धात हाती लागलेल्या स्त्रिया व मुलांचे काय करायचे याचे पूर्ण हक्क युद्ध जिंकणाऱ्या मुस्लिमांना दिले आहेत.

हे हक्क काय आहेत हे त्यांच्या प्रेषिताने विविध युद्धात जिंकलेल्या स्त्री-मुलांसोबतच्या वागण्यातून दाखवून दिलेले आहेत.

सेक्स स्लेव ही कल्पना इस्लाममान्य आहे. आजही इसिस ती देवाचा आदेश म्हणून मनोभावे पाळते. इसिस बॅड बॉय असल्याने त्याची चर्चा होते. काही लोक लगेच निषेध वगैरे करून कर्तव्य पार पाडतात. जणू इसिस यांच्या निषेधामुळे शहाणे होणार आहे. पण बाकी मुस्लिम जगात आज सेक्स स्लेव आहेत/नाहीत याबद्दल खुली चर्चा होत नाही/होणार नाही.

भारतात मुस्लिम राज्यकर्त्यांचे जनाने तरुण मुले व स्त्रियांनी भरलेले असत. तरुण मुलांना हिजडे बनवून वापर केला जात असे. असे ऐतिहासिक संदर्भ सांगतात. गे असणे नामंजूर असले तरी बाय असण्यात हेटरो असणेही समाविष्ट असल्याने बाय मंजूर असावे.

मलिक गफूर चित्रपटात काय आहे माहीत नाही. तो खिलजीचा हिजडा गुलाम होता हा इतिहास आहे. कदाचित खीलजीसाठीच हिजडा केला गेला असावा. गफूरने त्याच्यासाठी खूप युद्धेही केली.

दिल्लीचे तख्त व गुलाम यांचा संबंध माहिती करून घ्यायचा तर 1200-1300 या कालखंडातील भारतीय इतिहास वाचा. एकमेव स्त्री सुलतान रजियाचा पिताही गुलाम होता.

भारतीय इतिहासावर तटस्थपणे लिहिलेली भरपूर पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. ती इतिहासाची खरी साधने आहेत. बाजारात काय विकले जाईल याचा विचार करून बनवले गेलेले तथाकथित ऐतिहासिक चित्रपट बघून इतिहासाबद्दल अंदाज बांधू नका.

Pages