पद्मावत कसा वाटला ( कॉमन धागा)

Submitted by दीपांजली on 24 January, 2018 - 19:40

F520E053-1A4C-4E1C-8353-68A064DAF566.jpeg
संजय लीला भन्सालीचा बहुचर्चित पद्मावत आता खरच रिलिज होतोय, तो कसा वाटला याबद्दल लिहायला हा कॉमन धागा .
असंख्य धागे काढण्या ऐवजी इथे लिहा पद्मावत बद्दल आपापले रिव्ह्युज/ मतं / पिसे काढणे इ. (सिनेमा पाहिल्यावर मग ) Wink
त्यातून काढायचाच असेल नवा धागा त्यांनी काढा खुशाल, मी अ‍ॅडमिन /वेमा नाही .
IMG_1207.JPG

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्लाउद्दीन खिलजी ची अधिकृत बायको म्हणजे त्याची चुलत बहीण जिच्या बापाला म्हणजे जलाल-उद-दीन खिलजी याला मारुन तो सुलतान झाला. दुसरी त्याने पळवुन आणलेली गुजराथच्या कर्णावतीच्या राजाची म्हणजे करण घेला याची राणी कमलदेवी. तिसरी महाराष्ट्रातल्या राजा रामदेवराय यादवच्या गळ्यावर सुरी ठेऊन पळवलेली त्याची राजकन्या जेठाई.

अलाउद्दीन खिलजीच बाकीचे सगळे कामजीवन म्हणजे त्याने बाटवलेेला हिंदु गुलाम ज्यांच्याशी त्याचे बळजबरीचे विकृत संबंध होते. ज्यास त्याने खच्चि केले ( castrated ) तो आवडता गुलाम म्हणजे मलिक काफुर, शेवटी यानेच खिलजीला ठार मारले.

आता अशा व्यक्तीमत्वाच्या सुलता्नात भन्साळ्याला प्रेमभावना कुठ दिसल त्यालाच ठाऊक.

तो कट्टा धर्मांध होता. त्याच्या काळात हिंदुंची अत्यंत दयनीय अशी स्थिती झाली होती. मुसलमानी रियासतीचे लेखक रावबहाद्दुर सरदेसाई इतिहासकारांमधले मोठे नाव, बडोद्याच्या गायकवाडांच्या दरबारातले ख्यातनाम इतिहासकार , ते अल्लाउद्दीन खिलजी विषयी लिहितात,

"हिंदूंना हत्यारे,घोडे मिळू नयेत किंवा त्यांनी ते बाळगू नयेत,उंची पोषाख करु नये,छानछोकीने राहू नये असा बंदोबस्त अल्लाउद्दीन खिलजीने केला. हिंदुंना जमिनीचे अर्धे उत्पन्न कर म्हणून भरावे लागे.गाईम्हशींचासुद्धा कर द्यावा लागे.कोणाही हिंदुच्या घरात सोने,चांदी वा सुपारी चा तुकडा सुध्दा उरलाी नाही.हिंदू अंमलदारांच्या बायकांना मुसलमानांच्या घरी चाकरी करावी लागे. हिंदूंना सरकारी नोकर्‍या मिळेनाशा झाल्या. मात्र एखाद्याला दरबारात नोकरी मिळालीच तर त्याला लोक आपली मुलगी लग्नासाठी देत नसत कारण अशा मुलींना मुसलमानांच्या जनानखान्यात नोकरीस रहावे लागे" मुसलमानी रियासत पृ. १४१

आधी तुघलक झाले, टिपु झाला , औरंगजेबाचे उदात्तीकरण चालुच आहे, आता खिलजी असे करत करत महमुद गझनीसुध्दा धर्मनिरपेक्ष होईल आणि त्यांच्या हिंदु राण्या, राजकन्या , स्त्रिया यांच्याबरोबरच्या खोट्यानाट्या प्रेमकथा प्रसृत केल्या जातील.आणि परत हिंदु समाजच रांगा लावुन कोटि कोटीचा सिनेमा चालवत मिटक्हेया मारत आपल्या इतिहासाची आणिि ऐतिहासिक व्यक्तींच्या चरित्राची लत्तरे मिटक्या मारत पॉपकॉर्न अन कोक पित चघळतीलाी.

संदर्भ

तारिख ए फिरोजशाही - लेखक झियाउद्दीन बरनी
तुघलकनामा - अमीर खुस्रो
History of Khalajis by K.S.Lal
History of India by Its own Historians VOL III by Elliot and Dowson
मुसलमानी रियासत- गो.स. सरदेसाई

भिडे, ही माहिती आपल्या जागी बरोबर असेलही, पण पद्मावत सिनेमात खिलजीची प्रेमकथा दाखवलीय असे कुणी सांगितले तुम्हाला Happy

हिंदूंना सरकारी नोकर्‍या मिळेनाशा झाल्या. मात्र एखाद्याला दरबारात नोकरी मिळालीच तर त्याला लोक आपली मुलगी लग्नासाठी देत नसत कारण अशा मुलींना मुसलमानांच्या जनानखान्यात नोकरीस रहावे लागे"
इसके बारे में डौट है. दरबारात नोकरी मिळायचे वय आणि लग्नाचे वय काय होते साधारण तेराव्या शतकात? तेव्हा तर सर्रास बालविवाह व्हायचे मग दरबारात नोकर्‍या (तेही दिल्ली दरबारात) बालवयातच लागत असत?

मेघपाल, तुम्ही फारच लॉजिक लावत आहात,
800 वर्षांपूर्वी झालेल्या अपमानाबद्दल दात ओठ खाऊन लिहिलेल्या पोस्तीत इतके लॉजिक शोधायचे नसते.
इकडे चित्रपटाबद्दल बोलूया, इतिहास, खिलजी कसा जुलमी होता, त्याने काय महसूल सुधारणा आणल्या या सगळी रणधुमाळ्या दुसऱ्या धाग्यांवर करू या.

बघितला एकदाचा... हुश्श...
जस्ट इतर जसे बॉलिवूड पिक्चर बघतो तसाच हा पण एक म्हणून गेले होते..

पिक्चर तसा बरा आहे पण लांबलचक आहे.
रणवीरने अफलातून काम केलेय. थोडा विचित्र, तिरसट, क्रूर सगळेच भाव त्याने मस्त दाखवलेत.

दिपीका टोटल फ्लॉप. एकतर पूर्ण पिक्चरभर कुठेतरी शुन्यात आंधळ्यासारखी बघत बोलते. पापण्या बंद करायच्या नाहीत असं सांगित्ले आहे का संलिभ ने देव जाणे... सतत ते लालसर डोळे आणी डोळ्यात पाणी. राणी आज्जिबात वाटली नाही. स्ट्रेट फेस, ना हावभाव, ना आवाजात चढउतार.. शेवटचा सीन तर बिलकूल च अपील झाला नाही. आवरा आता एकदाचं असं फिलिंग आलं.

बाकी रझा मुराद, तो ब्राम्हण, मलिक काफूर चे काम छान आहे.
शाहिद पण ओकेच. लहानखुरा वाटतो..
भंसाळी स्पेशल दिवे, ज्वेलरी, महाल, भांडीकुंडी सगळे काही आहे. बरेचसे शॉट, ठिकाणे, बाजिराव मस्तानी सारखेच वाटतात.
३डि पण कशाला केलाय काही कळले नाही.

इकडे चित्रपटाबद्दल बोलूया, इतिहास, खिलजी कसा जुलमी होता, त्याने काय महसूल सुधारणा आणल्या या सगळी रणधुमाळ्या दुसऱ्या धाग्यांवर करू या.
>>>>>>>
काढा ना दुसरा धागा. रमेश भिडे, आपण तरी काढा. मजा येते हे खरेखोटे करायला.
बाकी आमच्याकडे कोणाला इंटरेस्टच नाहीये खिलजी बघायला Sad

स्पॉयलर अ‍ॅलर्ट
ज्यांनी अजून सिनेमा पाहिला नसेल त्यांनी वाचू नये.

मुळात हा सिनेमा ज्या काव्यावर आधारित आहे तेच काल्पनिक आहे. त्यातही लबाडी करण्याचा मोह सलीभ यांना आवरता आला नाही. सत्ताधारी पक्ष व करणी सेना यांना खुष करूया, एखादे सरकारी बक्षीस मिळेल अशी आशा असावी. मूळ काव्याचा शेवट असा आहे.
पद्मावती ला शेजारचा रजपूत राजा देवपाल मागणी घालतो. त्यावरून देवपाल व रतनसेन यांचे युद्ध होते व दोघेही मरतात. पद्मावती सती जाते, खिल्जी हल्ला करतो व मग उरलेल्या स्त्रिया जोहार करतात. खिल्जीच्या हातात राख येते. अर्थात हा शेवट दाखवला तर रजपूतोंकी आन बान शान वगैरेंना काहीच अर्थ उरत नाही.

सध्या देशात असलेले मुस्लिम विरोधी वातावरणात हात धुवून घेण्याचा उद्देशाने सलीभ ने हा शेवट बदलून टाकला आहे. तरी नशीब खिल्जी ने जे एन यू मधून पी एच डी केली होती असे दाखवले नाही. खिल्जीचा झेंडा बदलून पाकिस्तानी झेंडा दाखवला आहे. इतिहास बदलायचा त्रेंड शी सुसंगतच आहे म्हणा.

लबाडी काय? फॅन फिक्शन आहे म्हणा.

बाकी खुद्द पद्मावत काव्याबद्दल माहिती नाही, पण राणी पद्मिनीने जोहार केला हेच ऐकलं/वाचलं होतं आत्तापर्यंत. अगदी सावरकरांच्या 'भारतीय इतिहासातिल सहा सोनेरी पानां'तदेखील असाच उल्लेख आहे.

भंसाळी स्पेशल दिवे, ज्वेलरी, महाल, भांडीकुंडी सगळे काही आहे. बरेचसे शॉट, ठिकाणे, बाजिराव मस्तानी सारखेच वाटतात.>>>

अगदी अगदी! बाजीराव मस्तानी मधे छत्रसालची गढी आणि त्या मोहे रंग दे लाल गाण्याच्या मागे तो जो गढीचा सेट आहे तोच चितोडगढाला वापरला आहे बहुतेक. महालातली सजावट, झुंबरं, मधूनच पाण्याची कुंडेही अगदी त्याच सेटवरून उचलून इथे लावली आहेत.

बाकी दिपिका सिंहलची राजकन्या असताना एकूण तिथल्या माहोलवरून बौध्द दाखवली आहे आणि मग शिकार करून निरपराध प्राण्यांना मारणे कसे चालते तिला? तसंच लग्न झाल्यावर एका मिनिटात राजस्थानी भाषा कशी बोलू शकते? तसंच रावल तिच्याशी हिंदीत कसं बोलून शकतो आणि तिला ते कसं समजतं? तिची मातृभाषा तर श्रीलंकन पाहिजे ना?
जाऊदेत..भन्सालीच्या सिनेमात असे प्रश्न विचारायचे नाहीत Lol

रच्याकने, ती खिलजीची बायको पद्मावतीपेक्षा जास्त सुंदर दिसते Lol तिला सोडून तो अर्धवट बघितलेल्या पद्मावतीच्या मागे कसा काय लागला हे गूढच आहे Happy

मूळ काव्याचा शेवट असा आहे.
पद्मावती ला शेजारचा रजपूत राजा देवपाल मागणी घालतो. त्यावरून देवपाल व रतनसेन यांचे युद्ध होते व दोघेही मरतात. पद्मावती सती जाते, खिल्जी हल्ला करतो व मग उरलेल्या स्त्रिया जोहार करतात. खिल्जीच्या हातात राख येते. अर्थात हा शेवट दाखवला तर रजपूतोंकी आन बान शान वगैरेंना काहीच अर्थ उरत नाही. >>> +११११

>>मुळात हा सिनेमा ज्या काव्यावर आधारित आहे तेच काल्पनिक आहे. <<

आय्ला, मग आता "डिस्कवरी ऑफ इंडिया" पण काल्पनीक कथांवर आधारीत आहे कि कॉय? Lol

रच्याकने, ती खिलजीची बायको पद्मावतीपेक्षा जास्त सुंदर दिसते >>> कोण दाखवलीय? फोटू तर टाका, मग आम्ही ठरवू

अटेन्शन राज, येड्यागत दात काढण्याआधी..
"डिस्कवरी ऑफ इंडिया" मध्ये वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण, चाणक्य पण आहे बरं का.. सगळेच काल्पनिक म्हणायचे ना?

>>>>>काढा ना दुसरा धागा. >>>>
ऋन्मेष, ही सगळी रंगपंचमी "ती येतेय ....." वर खेळून झालीये.
तू एकदा स्वतःचाच धागा वाचून बघ पाहू,
आणि हो भिडे काकांना पण त्याची लिंक दे...

सिंबा, ओके. मी माझ्या धाग्यावरच्या अवांतर पोस्ट इग्नोर करतो.

अंजली, धन्यवाद.
छान आहे पण दिपिकाच सरस आहे.
दिपिकापेक्षा सुंदर ऐकून अपेक्षा फार वाढवलेल्या मी .. कतरीना दर्जाची अपेक्षा करत होतो. Happy

I may be wrong , पण मला काही प्रतिसादात टिपिकल देशी सूर दिसतोय.
आय मिन गोरी, निळे कि भुरे डोळे वाली मेहरुन्निसा म्हणजे सुंदर , पण दीपिकाच्या रुपात श्रीलंकन डस्की पद्मावती म्हणजे मात्रं सामान्यं अस काहीसं Happy
असो, ऑपोझिट्स अ‍ॅट्रॅक्ट्स या लॉजिकने ठिक आहे , पण त्याच लॉजिकने खिलजीला डस्की ब्युटी आवडण सुध्दा लॉजिकल आहे .

भिडे बाकी भलत्याच ट्रॅक्॑वर आहेत :).
भन्सालीच्या सिनेमात ना खिल्जीचे ग्लोरिफिकेशन ना लव्ह स्टोरी, काहीच नाहीये.
उलट गरजेपेक्षा ज॑स्तं क्रुर आणि पाशवी दाखवलाय असं मेजॉरिटी क्रिटिक्सचं मत आहे.

मुळात खिलजी कुठे मदनाचा पुतळा दाखवलाय?
मला ते हेडरमधील फोटो बघवतही नाहीत, धाग्यावर आलो की पटकन घाईघाईत स्क्रॉल करून खाली येतोय ..
बाकी तुम्हाला आम्हाला काय सौंदर्य वाटते यापेक्षा खिलजीला काय सौंदर्य भावले ते मॅटर करते. नुसता चेहरा रंग रूपच नाही तर कमनीय बांधा आणि ओवरऑल पर्सनॅलिटी सुद्धा मॅटर करते. स्त्री-पुरुष दोघांबाबत.

येनीवेज, खिलजी आणि पद्मावतीचा खरा फोटो आंतरजालावर उपलब्ध आहे का? मी शोधतोय तर दिपिका आणि रणवीरच येत आहेत... अध्येमध्ये पद्मिनी कोल्हापुरे रॉन्ग नंबर लागून येतेय..

हो तर ऋन्मेष, फोटोच काय , खिलजी आणि पद्मिनी ला इन्स्टाग्राम वर फॉलो कर ना. व्हिडिओ पण बघायला मिळतील Happy

मैत्रेयी मस्करी का?
येनीवेज, alauddin khilji love story असे लिहून सर्च मारल्यावर दोन पुरुष आले. पण त्यांच्यातला खिलजी कोणता ते समजत नाही.
तसेही आता रात्र झाली आहे. मी उद्या अभ्यास करून प्रकटतो,. शुभरात्री Happy

मै Lol

alauddin khilji love story असे लिहून सर्च मारल्यावर दोन पुरुष आले. पण त्यांच्यातला खिलजी कोणता ते समजत नाही. >> बर मग त्यांना फॉलो केलेस का ? Lol

असामी दोघांना का? मला फक्त खिलजीमध्ये ईंटरेस्ट आहे.
येनीवेज, तुम्हालाही शुभरात्री, हा माझा धागा नाहीये, अवांतर जास्त झाल्यास नेहमीसारखे बिल माझ्यावर फाटेल Happy

>>सगळेच काल्पनिक म्हणायचे ना?<<

मेघपाल - दीर्घ श्वास घ्या. १-१० मोजा आणि मग मी दिलेल्या कामेंटचा कांटेक्स्ट समजुन परत एकदा वाचा. तरीहि नाहि झेपलं तर तुमची खरी ओळख द्या, मी समजुन जाईन...

>>मला फक्त खिलजीमध्ये ईंटरेस्ट आहे.<<
एडिट कर रे बाबा, हे वाक्य लोडेड आहे...>>> Rofl

वरची चर्चा वाचून आता बघावाच लागणार असं दिस्तंय. बाकी आता सगळे स्पॉयलर वाचून काढल्यामुळे काय पिच्चर्ची मजा येणारे म्हणा... Wink

>>मला फक्त खिलजीमध्ये ईंटरेस्ट आहे.<< Sad अरे काय हे... ऋन्मेऽऽष भाउ बर आहेस ना !!!! Lol

पूर्ण पिक्चरभर कुठेतरी शुन्यात आंधळ्यासारखी बघत बोलते. पापण्या बंद करायच्या नाहीत असं सांगित्ले आहे का संलिभ ने देव जाणे... सतत ते लालसर डोळे आणी डोळ्यात पाणी.>>+१००००
हे प्रोमोज मध्येच दिसलं होतं.
पण मला दिसायला आवड्ते दिपिका. मला ती अतिशय सुंदर वाटली प्रोमोज मधे तरी.

Pages