पद्मावत कसा वाटला ( कॉमन धागा)

Submitted by दीपांजली on 24 January, 2018 - 19:40

F520E053-1A4C-4E1C-8353-68A064DAF566.jpeg
संजय लीला भन्सालीचा बहुचर्चित पद्मावत आता खरच रिलिज होतोय, तो कसा वाटला याबद्दल लिहायला हा कॉमन धागा .
असंख्य धागे काढण्या ऐवजी इथे लिहा पद्मावत बद्दल आपापले रिव्ह्युज/ मतं / पिसे काढणे इ. (सिनेमा पाहिल्यावर मग ) Wink
त्यातून काढायचाच असेल नवा धागा त्यांनी काढा खुशाल, मी अ‍ॅडमिन /वेमा नाही .
IMG_1207.JPG

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्याच कमेंट्स Lol

इथेही पुलंच आठवले. मुलाने बापाचा हा एवढाच गुण उचलावा? ("कुमार अल्लाउद्दीन वर्गात झोपतो")
<<<<<< Rofl

काय प्रतिसाद एकेक. Lol

अरे मग मारायचे नव्हते तर झोपेतून कशाला उठवले? चांगला डोळा लागला होता....
आणि
कुमार अल्लाउद्दीन वर्गात झोपतो>> कहर Lol

>>ती खिलज्यांची फॅमिली ट्रेट दाखवली आहे >>> Lol इथेही पुलंच आठवले. मुलाने बापाचा हा एवढाच गुण उचलावा? ("कुमार अल्लाउद्दीन वर्गात झोपतो")>> Lol

थोडसं विषयांतरः मध्यंतरी एका हाडा-मांसाच्या, जित्या-जागत्या रजपूत बाईला भेटायचा योग आला. डिस्नेलँड मधे मोठा मिकी माऊस चा वेष परिधान करणार्याने, बाथरूम ब्रेक वर जाताना तो भलामोठा, हसरा मुखवटा काढून ठेवल्यावर आतला ईवलासा, साधा-सुधा माणुस दिसल्यावर आपलं जे होतं (हा मुखवटा आहे हे माहित असूनही), तसं काहीसं माझं झालं. तिच्या तोंडून, 'हल्ली राजस्थानात, राजपूतांची अवस्था फार वाईट आहे. सासू कशी नणंदेची बाजू घेते, भावजय कशी काहिही न करता, नुसतीच मिरवते, कुत्र्याचं पोट बिघडलय' छाप गप्पा (एकतर्फीच होतं हे सारं. मी काय बोलणार ह्यावर!) ऐकून, हिंदी सिनेमाने राजपूतांची तयार केलेली 'आन, बान शान.... उसूल, रस्मे वगैरे इमेज कुठे मॅच च होत नव्हती.

तसं माझं पंजाबी माणसांविषयी सुद्धा झालय. हे चोप्रा, जोहर वगैरे प्रभृतींमुळे पंजाबी माणूस म्हणजे, 'यारा दिलदारा.... ओ प्पाजी' टाईप्स, सतत नाच-गाणी-भांगडा ह्यात रमणारा किंवा एकदम 'चिडिया नाल ........ गुरू गोबिंद नाम तडावा' करणारा वगैरे वाटावा, आणी प्रत्यक्षात तो एखाद्या गॅस स्टेशन वर गेटोरेड, बीयर ('अल्कोहोल पंजाब की छटी नदी है' असं एका पंजाबी माणसाकडून ऐकलय) वगैरे चेक-आऊट करताना दिसावा असा भ्रमनिरास बरेच वेळा होतो.

फेफ Happy

एकतर्फीच होतं हे सारं >>> म्हणजे गप्पांबद्दलच बोलताय ना? Wink

काय एकेक कॉमेंट आहेत Happy

ती पद्मावती श्रीलंकन बौध्द असते (निदान त्या सेटिंगवरून तरी तसे वाटले) तर शिकार करणे कसं बरं चालतं तिला?

ओह्ह सिंहासनावर झोपतो पण का! >> ऊसुलवाले राजपुत आणी पद्म्मावती निसटण्यामागे अराहै अस जेव्हा गफुर सान्गओत त्यानतर तिला घेवुन सैनिक येतात तो वर हा एक झोप काढतो...

खाल्लेलं चालतं शिकार नाही करत मला वाटतं

>>> शिकार करणं चालतं<<<<<
पद्मावती हि सिंहाली असते. ते मुळात योद्धेच होते. बौद्ध विचारांचा प्रचार व स्विकार( बौद्ध जीवन्पद्ध्ती) हा श्रिलंकेत नंतर झाला(असावा) असे वाचलेले आठवते.
नाहितर, सिंहाली प्रणाली वेगळी होतीच. मिक्स आणि मॅच ( बौद्ध जीवन्पद्ध्ती आणि सिंहाली) हे बरेच नंतरचे आहे.

Pages