पद्मावत कसा वाटला ( कॉमन धागा)

Submitted by दीपांजली on 24 January, 2018 - 19:40

F520E053-1A4C-4E1C-8353-68A064DAF566.jpeg
संजय लीला भन्सालीचा बहुचर्चित पद्मावत आता खरच रिलिज होतोय, तो कसा वाटला याबद्दल लिहायला हा कॉमन धागा .
असंख्य धागे काढण्या ऐवजी इथे लिहा पद्मावत बद्दल आपापले रिव्ह्युज/ मतं / पिसे काढणे इ. (सिनेमा पाहिल्यावर मग ) Wink
त्यातून काढायचाच असेल नवा धागा त्यांनी काढा खुशाल, मी अ‍ॅडमिन /वेमा नाही .
IMG_1207.JPG

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवाजुद्दीन किंवा ओम पुरी यांचा खिलजी कदाचित ऐतिहासिक सत्याच्या अधिक जवळ जाणारा ठरला असता / असावा. >>बाकी ओके पण हे नाही कळलं. भन्साळीने सिनेमा बनवला म्हटल्यावर त्यात नवाजुद्दीन ला रोल दिला काय, ओम पुरीला काय किंवा रणवीर ला तरी खिलजीचं कॅरेक्टर भंसाळीच्याच कल्पनेप्रमाणे असणार. अ‍ॅक्टर बदलला म्हणून ते कॅरेक्टर ऐतिहासिक सत्याच्या जवळ जाईल असे कसे सांगणार?!

<भन्साळीने सिनेमा बनवला म्हटल्यावर त्यात नवाजुद्दीन ला रोल दिला काय, ओम पुरीला काय किंवा रणवीर ला तरी खिलजीचं कॅरेक्टर भंसाळीच्याच कल्पनेप्रमाणे असणार. अ‍ॅक्टर बदलला म्हणून ते कॅरेक्टर ऐतिहासिक सत्याच्या जवळ जाईल असे कसे सांगणार?!>

बरोबर. मी ओम पुरीचा उल्लेख भारत एक खोजच्या संदर्भात केला होता.
नवाजुद्दीन रणवीरपेक्षा जरा अधिक संयत वाटला असता, असा माझा अंदाज.

चिनूक्स शी सहमत. शिवाय खिल्जी ने महसूल सुधारणा, मंगोल आक्रमकांना परतवून लावणे अशीही कामे केली आहेत. वर लिंक दिलेले स्वरा भास्कर यांचे पत्रही छान आहे.

फार पूर्वी पाहिलेली एक साधीच टी व्ही मालिका अंधूकशी आठवते, एक गरीब मुलगी प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने आय पी एस बनते व चांगले काम करते अशी काहीशी होती. कमी बजेट वर बनलेली व मोजकेच एपिसोड असलेली ही मालिका होती. काही टिपिकल एकता कपूर टाईप ( किंवा माझ्या नवर्‍याचे बायको) मालिकांमध्ये बंगले, उंची साड्या, दागिने, मर्सिडीझ, फॉरेन लोकेशन यांची रेलचेल असते पण मेसेज मत्र रिग्रेसिव्ह असतो, पद्मावत हा दुसर्‍या प्रकारचा चित्रपट दिसतो.

पद्मावत मध्ये इतिहासाची केलेली मोडतोड, जोहार चे उदात्तीकरण, खिल्जी चे एकांगी व क्र्रूर पात्र, यावर वेगळा धागा करूयात का?

या धाग्यावर संहिता, वेषभूषा, दागिने, अभिनय, निर्मितीमूल्ये अशावर बोलले तर विषयांतर होणार नाही.

पद्मावत मधे इतिहासाची मोडतोड हे इथेच लिहिले तरी चालेल की. जनरल सिनेमात इतिहासाची होणारी मोडतोड यावर बोलायचे असेल तर वेगळा धागा ठीक.

केशभूषेबद्दल बोलायचं तर अलाउद्दीन लांब केस ठेवणं शक्य नाही. तो शरिया वगैरे न मानणारा असला तरी इस्लाममध्ये लांब केस ठेवण्यावर असलेली बंदी त्याने पाळलीच असती.

पद्मावत मधे इतिहासाची मोडतोड हे इथेच लिहिले तरी चालेल की. जनरल सिनेमात इतिहासाची होणारी मोडतोड यावर बोलायचे असेल तर वेगळा धागा ठीक. >>> +१

विकु,
लिहा कि इथेच.
चिनुक्स,
भारत एक खोज चा खिल्जी फारच subtle आहे, एक नॉर्मल मह्तत्वांकांक्षी मुघल राजा.
भारत एक खोज चा फॉर्मॅटच subtle होता, कोणाच्या अ‍ॅक्टींगचा कस पणाला लागेल असा एपिसोड नाही पण अर्थात ओम पुरीने चांगलच केलय.\
रणवीर अर्थात भन्सालीच्या सिनेमॅटीक लिबर्टीला अनुसरून रंगवलेलं commercial cinema कॅरॅक्टर आहे आणि impossibly तुफ्फान जमलय , माझ्या फिल्मी मनाला इतका व्हिलन ओरिएंटेड सिनेमा दुसरा कुठला भावला नाही आणि असं सैतानी कॅरॅक्टर सुध्दा नाही (गब्बरचा अपवाद सोडता.)

बाय द वे, खल्ली बल्ली गाण्यात बरेच मोठे सिक्वेन्सेस सिंगल टेक आहेत, कट नाहीये! अमेझिंग आहे. एक्स्प्रेशन्स आणि स्टेप्स !

बाय द वे, खल्ली बल्ली गाण्यात बरेच मोठे सिक्वेन्सेस सिंगल टेक आहेत, कट नाहीये! अमेझिंग आहे. एक्स्प्रेशन्स आणि स्टेप्स !
<<<
वॉव , कम्माल आहे रणवीरची , कसली एनर्जी आहे, बापरे.. बघत बसावं !
कोरोग्राफी मस्तं जमलीये, त्याची ती एका पायावर नाचायची स्टेप तर खतरा .
Btw, भारत एक खोज मधे पद्मावतीच्या सौंदर्याचं वर्णन खिल्जीसमोर राघवचेतन गाण्यात करतो, छान होतं ते गाणं.
मी पद्मावत मधे त्या सिच्युएशनला “मनमोहिनी तेरी अदा” टाइप भन्साली फॉरमॅट गाणं येइल म्हणून वाट पहात होते , चाललं अस्स्तं तिथे गाणं Happy

<<<मी पद्मावत मधे त्या सिच्युएशनला “मनमोहिनी तेरी अदा” टाइप भन्साली फॉरमॅट गाणं येइल म्हणून वाट पहात होते , चाललं अस्स्तं तिथे गाणं

Proud
राघव चेतनची डायलॉग डिलिव्हरी मस्त आहे.
रझा मुराद चं डिक्शन फार मस्त आहे. खरंतर तिन्ही मेन कॅरॅक्टर्सच्या लेहजावर काम करायला हवं होतं. तो मेन मिसिंग पॉईंट होता माझ्यासाठी.

बरोबर संपदा, especially रणवीरची ability आहे accent आत्मसात करायची !
रझा मुराद खरोखर इथे आणि बा.म. दोन्ही मधे ऑथेंटीक वाटतो.

फार पूर्वी पाहिलेली एक साधीच टी व्ही मालिका अंधूकशी आठवते, एक गरीब मुलगी प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने आय पी एस बनते व चांगले काम करते अशी काहीशी होती. कमी बजेट वर बनलेली व मोजकेच एपिसोड असलेली ही मालिका होती.

ही मालिका बहुतेक उडान. कविता चौधरी ची.

पण उडान मध्ये ती आ पी एस् होते ना, आय ए एस् नाही?

(ह्याचा पद्मावत शी सबंध काय ते मात्र विसरले Wink )

मी पद्मावत दुसृयांदा पाहिला तेव्हा मला राघव चेतनचे काम कर णारा व्यक्ति पण अपील झाला. ते केस ( चंदन की खुश्बूअ) आणि राजासमोर क्या उखाड लेते अभिच उखाड म्हणून पाय रोवुन उभाराहण्याचा आविर्भाव. बासरी वाजवण्याचे स्किल. ह्यात एक असे सब टेक्स्ट आहे की तो ब्राम्हण ब्रम्हचारी त्याच्या मनात राणी विषयी अभिलाषा निर्माण झाली तर त्याला हाकलून दिले. पण अखि च्या मनात तीच अभिला षा निर्माण झाली तर त्याने ह्यांचाच सर्वनाश केला. राघव चेतन पण समाज व्यवस्थेचा बळी आहे. त्याच्यावर ब्रम्हचर्य पाळण्याचे जोखड. इसकी मट्टीमे ही मिलावट इतका मोठा अपमान व खिलजीच्या मनात तीच खोट असूनही घरी जेवण वगैरे. असंच असतं.

रच्याकने माझे स्टँडिंग ओव्हेशन जन्नतुल फिर्दोस ह्या अप्रतिम अत्तराला जास्त होते. अत्तरां च्या दुनियेतला
हा सिकंदरच आहे एक प्रकारे.

मैत्रेयी तुझ्या रिव्युच्या दोन्ही पोस्ट्स्ला मम. शेवटचा पॅरा तर +१००.

तो खिलजी पाठी मागुन वार करतोय आणि रतनसिंग बसलाय उसुल उसुल करत..
दिपीकच्या चेहेर्यावर कसलेही भाव नाहीत. सतत डोळ्यात पाणी फक्त.
शाहिद कपुर एक्दम नाजुक वाटतो राजा म्हणुन दिपीका व रण्वीर समोर.
मला कुठल्याच गाण्याचे गरज वाटली नाही. चारही गाणी नसती तर पिच्चरचा वेळही कमी झाला नसता.
शेवटी रतन्सिंग युध्दावर जाणर असतो तेव्हा दि.प. का तयार होते दुल्हनसारखी?

बादल च्या आईचे काम करणारी अभिनेत्री गुणी वाटते. तिने मात्र त्या १ मिनिटात बरोबर दु:ख, डोळ्यातले पाणी परतवून पण गळा भरून आलेला अभिनय सुरेख केलाय..+१००.

मैत्रेयीच्या पोस्ट आवडल्या.
आणि अमा म्हणतात तसं मस्तानी पण दिपीका, पदमिनी पण दिपीका नको वाटतं खरंच.
आणि दोघीही अतिशय सुंदर अगदी लावण्यवती होत्या. आणि चित्रपटात कोण? तर दिपीका :D:
दुसरी कुणी नाही का? रणवीर दिपीका तर मला एकत्र बघायलाच नको वाटतात Happy

ह्या सिनेमात तोफा दाखवल्यात? खिलजीच्या काळात भारतात तोफा नव्हत्या. त्या दोनशे वर्षांनी बाबराच्या काळात भारतात आल्या.
राजसी ह्यांचा मुद्दा लक्षात आला. चित्रपट चांगला असणे आणि तो एखाद्या प्रेक्षकाला enjoy करता येणे ह्या दोन गोष्टी नेहमीच overlap होतील असे नाही. कथेशी किंवा कथेतल्या पात्रांशी जर एखाद्याचा भावनिक धागा/दुखरी नस असेल तर त्याला चित्रपट चांगला असूनही enjoy करता आला नाही तर समजण्यासारखं आहे. काही लोकांना अशा भावना बाजूला ठेवून चित्रपट एक कलाकृती म्हणून enjoy करता येतही असेल पण बऱ्याच जणांना नाही करता येत. उद्या निर्भया वर चित्रपट काढला तर तिचे कुटुंबीय तो "enjoy" करू शकतील का? ह्याचा अर्थ असे चित्रपट काढू नयेत असा नाही. पण कितीतरी लोक वेळ आणि पैसे खर्च करून मनाला त्रास करून घेण्याऐवजी तो न पाहणे पसंत करतील and it is their prerogative.

क्लायमॅक्स मध्ये दिग्दर्शकाने लोकप्रियतेच्या मोहाला बळी पडून एक चांगली संधी गमावली आहे. रावल पडल्यावर क्लायमॅक्स खूप गति पकड्तो. अखि वेगाने किल्ल्याकडे येतो बायका जौहारा ला निघतात. इथे राणीच्या गौरवस्पद गीत व आनंदी संगीत घातले आहे . ह्यामुळे प्रसंगा चे गांभीर्य प्रेक्षकापरेन्त पोहोचत नाही. एक लग्नच आहे असा साधारन माहौल निर्माण होतो. पण बायका उभ्या आहेत. व एक गडी हुकुम एव्ढेच म्हणतो. तिथे दीपीकाचा फेस क्लोजप घेउन
पतिवियोगाचे असह्य दु:ख एक क्षण तरी दिसायला हवे होते. तो देशकार्यात धारातीर्थी पडला असला तरी एक प्रियकर म्हणून ही ती त्याच्या शिवाय राहू शकत / इच्छित नाही . मग सर्व बायका एकेक निघतात. काही प्रतिकार करत आहेत व काही विडा खाउन प्रदक्षिणा घालून जिना उतरऊन चितेत स्वाहा होउ लागल्या आहेत. व चिता धडाडून पेटते आहे. हा फार एपिक मोमेंट आहे. एका बाजूला सैनिक जे आत येउ लागले आहेत त्यांचा कल्लोळ खन खनाट, व एका बाजूला ह्या जळत असलेल्या स्रियाचा कोलाहल. मृत्यू वेळे च्या किंकाळ्या असा असह्य दु:खद आवाज व त्याला एक भेसूर असा फिमेल मेल कोरस देता आला असता. व करूण संगीत. इट इस अ‍ॅन अन नेसेसरी एंडींग ऑफ सो मेनी लाइव्हज फॉर अ‍ॅन अवॉइअडेबल कॉन्फ्लिक्ट. स्वतःच इनिशिएट केलेली एक जिनोसाइडच आहे ही बायकांची . तितकेच सैनिकही मेले आहेत. तर हा डेथ डान्स प्लेंझंट संगीत न देता जरा भेसूर केविलवाणे असे संगीत दिले असते. मध्येच सारंगीचे करूण स्वर, व शेवाटी फक्त असहायतेने ओरड णारा अखि आणि जळनार्‍या मोठ्या चितेचा लाकडांचा आवाज.. मग दोन तीन क्षण शांतता. ह्यांने प्रेक्षकाला कंटेंप्लेट करायला सवड मिळाली असती की व्हेद र धिस कुड हॅव बीन अवॉइडेड.

आता काय होते ती परी सारखी गायब होते बाजूला अग्नीचा पडदा आहे. ह्यात एक प्रकारे अद्भुत रंग येतो. व्हिच इज हिज प्रेरोगेटिव. पण मग ते कॉन्फ्लिक्ट व त्याचे परिणाम बॉलिवुडीच राहतात वैश्विक होत नाहीत. हे डिरेक्टरचे लिमिटेशन आहे प ण संहार बघून आपण विचार करू शकतो.

अमा,
त्याने कदाचित प्रसंग अंगावर येऊ नये म्हणून गिमिक केले असावे.

अक्च्युअलि सती जाताना पण मागे ढोल, ताशे वगैरे बेभान करणारे संगीत वाजवले जात असे, ( ज्याने सती जाणार्या बाई ला थोडेसे हिप्नोतैझ झाल्यासारखे वाटत असावे)
इकडे जर प्रत्यक्ष गाणे , वाद्य वगैरे दाखवली असतील तर कदाचित त्याचा हेतू जौहर करणाऱ्या बायकांचे मोराल ढळू न देणे हा असू शकेल.

जर संगीत/ गाणे पार्श्वगायन स्वरुपात असेल तर , प्रियकराला भेटायला निघालेली प्रेयसी वगैरे काहीतरी कल्पना असेल, म्हणून नववधू सारखे नटून जौहर करायचा (पण या कल्पनेने जौहरवरचा पूर्ण फोकस हलेल)

शिवाजीमहाराज आग्राहून सुटकेच्या आधी पेटार्यातून उतरून औरंगजेबाला निघतो बर का , भेटु दख्खनात असे सांगायला गेले असते तर ?!! असे मनात येऊन गेले Lol
Submitted by maitreyee on 27 January, 2018 - 22:>>>>>>>>>>>>> हा हा हा हा मस्त.

छान दिसतिल अशे वेगवेगळे सिन्स एकत्र बसवल्यासारखा सिनेमा आहे..
दिपिका अज्जिबात भिडत नाही..हाईट हा एकच फॅक्टर आहे.. बाकी ठिकच आहे ती.. दुसरी एखादी नवी लावण्यवती.. लाजणारी.. नवर्याचे हाल बघुन कळवळ्णारी स्त्री तिथे हवी होती..
पद्मावतीला खंबीर दाखवायचय मग सगळीकडे खंबीर..
आणि सरळ एकमेकांशी नीट बोलतही नाहित.. काहितरी गुढ , रहस्यमय.. मी काय आहे फक्त मलाच माहिती आहे.. पद्मावती क्या चिज है तुम्हे पता नही, मीच ती पद्मावती टाईप हाव्भाव
शाहिद आणि ती पहिल्यांदा भेटल्याचा सिन पण उगाचच गुढ केलाय.. तो असा पडतोय बाण लागुन आणि ती शांत .. मधुनअच उठुन जाते.. त्याच्या अंगचटिला येते.. सदरा खेचते.. काय कळलच नाही...
रण्वीर छान एनर्जेटिक..पण इमोशन्ली भिडला नाही सिनेमा..
दिपिका तर फार बोअरिंग..

अजबराव - तोफा दाखवलेल्या नाहीत. पेटते गोळे फेकणारे कॅटापुल्ट आहेत ते. तिथे राजपूत साइड चे लोक म्हणताना पण दाखवलेत की ही काय नविन चीज आहे वगैरे.
अमा परत एकदा छान पोस्ट. हो राघव चेतन चे ते पाय रोवून उभे राहणे लक्षात राहते. शेवटच्या प्रसंगातले संगीत आणि सन्नाटाबद्दल पण सहमत.
बायदवे मी आधी वाळवंट आणि उंटांबद्दल लिहिले होते पण नंतर लक्षात आले की चित्तोड बरंच ईस्ट ला आहे, तुलनेने मध्यप्रदेश बॉर्डर च्या साइड ला, तिथे उंटाच्या लाइनी आणि वाळवंट नाहीये Happy

अमांनी सन्नाटा पॉइंट बद्दल लिहिलय ते वाचून परत एकदा सैराट मधला शेवटचा सीन , सन्नाटा आणि फँड्रीचा जब्याने मारलेला दगड , त्या नंतर येणारा नुसताच काळा स्क्रीन आठवला :).
मलाही पहायचाय परत पद्मावती सगळ्या डिटेल्स साठी आणि रणवीरसाठी.
बाकी लोकांच्या दीपिका कशी सुंदर नाही बद्दल पोस्ट्स बर्याच आल्यायेत, आश्चर्यं वाटलं आणि तथाकथित भारतीय सौंदर्याच्या आपापल्या कल्पना आहेत त्यात ती बसत नाही हे वाचून जास्तं अश्चर्यं वाटलं . त्या विषयी लिहायचय, सेपरेट पोस्ट मधे नंतर :).
असो, मला तरी ते जौहारच्या बॅग्राउंडचं म्युझिक दु:खी छटा अस्स्लेलच वाटलं, इन फॅक्ट भन्सालीच्या सगळ्याच सिनेमात ट्रॅजिकच बॅक्ग्राउंड म्युझिक असतं असं वाटतं.

शेवटचा जो सीन आहे तिथे actually त्या काळी बायका जोहार करताना नववधूसारख्याच सजत असत, पतीची स्वर्गात भेट होणार आहे या कल्पनेने. तेव्हा ढोल, लग्नाचं संगीत वाजवण्यात येत असे. पण अमा म्हटल्याप्रमाणे शेवटची १-२ मिनिटे जर बदलली असती तर अजून impact आला असता. सिनेमा एकदम खाटकन संपतो असे वाटत राहाते.

दीपिका अजिबात आवडली नाही, एकतर ती काही फार सुंदर वगैरे अजिबात दिसत नाही, शाहीद पुढे थोराड वाटते. शाहीद आवडला पण कोणी अजून जरा उंच, धिप्पाड चालला असता. रणवीर, अदिती राव, जिम सर्भ, रझा मुराद मस्त!

घूमर आणि बिन्ते दिल सोडल्यास एकही गाणं लक्षात राहात नाही. गाणी नसती तरी चाललं असतं.

रावलच्या पहिल्या राणीला काही स्कोपच नाही आहे. पद्मावती आल्यावर सगळे पदमावतीचंच ऐकतात, तिच्याकडे पूर्ण दुर्लक्षच होतं. निदान मस्तानी आणि काशीबाईचा समेट झालेला दाखवला होता. यात दोन्ही राण्यांची दिलजमाई होताना दाखवली नाहीये. पद्मावतीशी लग्न झाल्यावर रावलचाही पहिल्या राणीबरोबरचा एकही सीन नाही.

रावलचे उसूल पहिल्या वेळी ऐकायला चांगलं वाटतं, नंतर प्रत्येक वेळी ते डोक्यात जातात. शत्रू कसाही वागत असला तरी आपण उसूल पाळायचे,..यात रावल स्वतःच्या हाताने स्वतःची आणि चितोडची चिता रचतोय असं वाटत राहातं. खिलजीला मारण्याचे इतके चान्सेस असताना एकदा वचन निभावायचं म्हणून मारायचं नाही, एकदा निहत्ता आहे म्हणून मारायचं नाही, एकदा जखमी आहे म्हणून मारायचं नाही.. तिकडे तो खिलजीच सांगतोय की तलवार उचलून मार मला नाहीतर मी चितोडला आणि तुला सोडणार नाही..तरीही हा उसूल पाळायचे म्हणून त्याला 'निघतो मी', एवढेच सांगून निघतो :(..पहिल्या वेळीच खात्मा केला असता तर चितोड आणि त्यातल्या निरपराध स्त्रियांवर ही जौहारची वेळ आलीच नसती. शिवाजीमहाराज आणि त्यांच्या गनिमी कावा युध्द् नीतीची पदोपदी आठवण येत राहाते.

ह्या सर्व उसुलांची पिसे प्रेमरोग सिनेमात छान निघाली आहेत. " लडकियां उठवाना राजपुतों के लिये कोई मुश किल काम नही है. चुप चाप शिकार वाली कोठी पे आ जाउ असे हिरॉइनचा उद्दाम भाउ तिच्या गरीब ब्राम्हण मैत्रीणीला साम्गतो सप स्ठ. हिरॉइनचा जेठ ती विधवा झाल्यावर तिच्या वर बलात्कार करतो. व ती घरी येते तर आई खोलीचे दार बंद करून तिला सांग ते हे घरात कोठेही बोलू नकोस तुझे बाबा दादा मारामारी खूनच करतील " मुलीचे काय धिंडव्डे उडताहेत ते कोणी लक्षातही घेत नाही. ती अजाण कुमारिका असते तेव्हा राजकन्ये सारखी राहात असते. प्राइड सगळे घराबाहेर.

प्रेम रोग चित्रपट यूट्यूब वर उपलब्ध आहे मी बघते कायम गाण्यांसाठी व रिषी फार गोड दिसला आहे.

अमा, तुमची जोहार सीन ची व्हिजन मस्त! Happy
सिम्बा शी सहमत. अमांनीं लिहीला आहे तसा सीन असेल तर मला तरी बघवणार नाही. किंवा मी अपसेट होईन.

डीजे, दिपीका च्या किंवा पद्मावतीच्या सौंदर्याबद्दल ज्या अपेक्षा आहेत लोकांच्या त्याच्या अगेन्स्ट असलेल्या मताबद्दल सहमत.
तिला तेव्हढ्या ताकदीचं अ‍ॅक्टींग जमलं नसेल हे मात्र पटण्यासारखं आहे.

निदान मस्तानी आणि काशीबाईचा समेट झालेला दाखवला होता. यात दोन्ही राण्यांची दिलजमाई होताना दाखवली नाहीये. --

समेट कधी होतो? पिंगाच्या आधी काशी मस्तानीला मस्त सुनवते मला पेशविण म्हणायचं, आपली बरोबरी होत नाही, वगैरे. नन्तर पण ती मस्तानीला परकीच मानते. जीव वाचवणं वगैरे करते ते पेशविण म्हणून कर्तव्य असतं. माफ तर ती बाजीरावलाही करत नाही. दीपिका तिथेही मंद, obsessed, स्वार्थी वाटते.
तिथे दोन 'राण्या' नव्हत्या. इथे पद्मिनी राजकन्या आहे व ती अधिकृत महाराणी आहे, त्यामुळे सगळे तिचा स्वीकार करणं साहजिक आहे. त्या काळात दोन काय वीस राण्याही असू शकल्या असत्या.

Pages