पद्मावत कसा वाटला ( कॉमन धागा)

Submitted by दीपांजली on 24 January, 2018 - 19:40

F520E053-1A4C-4E1C-8353-68A064DAF566.jpeg
संजय लीला भन्सालीचा बहुचर्चित पद्मावत आता खरच रिलिज होतोय, तो कसा वाटला याबद्दल लिहायला हा कॉमन धागा .
असंख्य धागे काढण्या ऐवजी इथे लिहा पद्मावत बद्दल आपापले रिव्ह्युज/ मतं / पिसे काढणे इ. (सिनेमा पाहिल्यावर मग ) Wink
त्यातून काढायचाच असेल नवा धागा त्यांनी काढा खुशाल, मी अ‍ॅडमिन /वेमा नाही .
IMG_1207.JPG

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरे झाले चित्रपटाचे नाव "पद्मावत" झाले,
नाहीतर धाग्याचे नाव, पद्मावती कसा वाटला ,वगैरे विचित्र झाले असते Happy

यावर 'पद्मावती' फ्लेवर चा (चेट्टीनाड वगैरे फ्लेवर असतात तसे) मसाला पाट्यावर वाटला वगैरे काहीतरी अत्यंत फाको करायचा मोह आवरत नाहीये. Happy

पद्मावतीवर ईथेही अन्याय !
सैराटवर दहा धागे निघतात तर पद्मावतीवर चार निघाले तर हरकत काय आहे?

एकाच धाग्यात सर्वांनी आपापले रिव्यू लिहायचे हे तुम्हाला योग्य वाटते का? हा मायबोलीवर चुकीचा पायण्डा पडत आहे का? याची चर्चा ईथेच करायची का वेगळा धागा काढूया?

>>पद्मावतीवर ईथेही अन्याय !

+७८६ ऋण्म्या

कासव पाहिलेल्या प्रत्येक व्यक्तीने इथे वेगळा धागा काढुन आपली अभिरुची फ्लॉन्ट केलेली मग आताच ही बंधनं का?

रच्याकने सैराटला २ स्टार देणारे संतुलित समिक्षक दिसत नाहीत हल्ली इथे.

पाकिस्तानाचा व्हिसा आणि तिकिट कसे मिळवायचे?
कट्टरवादी पाकिस्तानी सेन्सर बोर्ड ने एक ही कट ना करता चित्रपटाला सर्टिफिकेट दिले आहे . आपल्या पेक्षा यांचे सेन्सर बोर्ड चांगले म्हणावे लागेल. खिलजी ला सैतान म्हणून दाखवले तरी त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या नाही आपण मात्र पद्मावती ची कंबर दिसली म्हणून तोडफोड करत आहे

सिनेम्या बद्दल काहीतरी वाचयला मिळेल असं इतक्या पोस्टी बघुन वाटलं.
इथेही तेच दळण नको लोकहो.
सिनेमा कसा आहे ते लिहा.
आणि काही बंधन वैगेरे नाही. ज्याला लिहायचे आहे तो दुसरा तिसरा धागा काढुच शकतो.

राजा सेनला बोअर वाटलेला आहे.
शोभा डे ला इन्सिपीड आणि तो खिल जी काउबॉ य बूट्स घालून फिरतो ते विनोदी वाटलेले आहे.

अजून एका चाटर्जी कि कोईतोबी है उसने र रिव्हु लिखके पिक्चर को फाडा है. जौहार जौहार करून मुलासहित व प्रेग्नंट स्त्रीला पण सती जायला फोर्स करत असणा र्‍या मिझोजिनिस्ट पॅट्रिआर्कीला ग्लोरिफाय करायची गरज नाही.
पण ते डिस्क्लेमर असले तरीही सिनेमात झाले आहे हे पटले नाही.

मला फक्त घूमर गाणे मोठ्या पडद्यावर बघायचे आहे तिकीट स्वस्तात मिळाले तर वीकांतात बघून येइन. मस्ताने पण दीपिका, पद्मा पण दीपिका ह्या युनिफॉर्मिटीला पण माझा विरोध आहे. त्यात्या रीजन मधले कलाकार त्या त्या फिल्म मध्ये घेतले पाहिजेत. म्हणजे ऑथेंटिक वाटेल नाहीतर बॉलिवूड चे उथळ प्रॉड्क्ट.

एकच धागा असलेला बरा. (हे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणातल्या सगळ्या नायिका स्वतःकडे वर्ग करून घ्याव्यात तसं झालं असलं तरी).
काही काही मंडळी एकच प्रतिसाद प्रत्येक धाग्यावर चिकटवतात. तर कधी इकडच्या प्रतिसादाचं उत्तर तिकडे असं काहीतरी होतं.

सैराट की बात और थी | वह सैराट था और देखनेवालों को सैराट बनाता था| Wink

पाकिस्तानाचा व्हिसा आणि तिकिट कसे मिळवायचे?
कट्टरवादी पाकिस्तानी सेन्सर बोर्ड ने एक ही कट ना करता चित्रपटाला सर्टिफिकेट दिले आहे . आपल्या पेक्षा यांचे सेन्सर बोर्ड चांगले म्हणावे लागेल. खिलजी ला सैतान म्हणून दाखवले तरी त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या नाही आपण मात्र पद्मावती ची कंबर दिसली म्हणून तोडफोड करत आहे>>>>>>

चांगली बातमी. भन्साळीचे इथे झालेले नुकसान तिथे भरून निघेल.

मी बघून आले. घूमर गाणे लगेचच आहे पण पूर्ण बघितला. एकदा बघा नक्की. राजपुतांना अपमानास्पद असे काही ही नाही. माझा रुमाल्ल. दीपांजली बाईसा धागा काढल्याबद्दल धन्यवाद हुकुम.

बघितला नाही अजून . बघितला तर केवळ आणि केवळ रण्वीर सिन्ग साठीच बघेन .
एखाद्या कॅरेक्टर्मध्ये घुसणं त्याला भारी जमतं .
दिपू आणि शाहिद मध्ये आवडण्यासारखं नाही . शाहिद तर कम्प्लीट मिस्फिट वाटतोय ट्रेलरमध्ये बघून.
सलीभाचे मोठे मोठे सेट बघण्याचा उत्साह संपला आता.

जौहार जौहार करून मुलासहित व प्रेग्नंट स्त्रीला पण सती जायला फोर्स करत असणा र्‍या मिझोजिनिस्ट पॅट्रिआर्कीला ग्लोरिफाय करायची गरज नाही.>>>
त्यात प्रेग्नंट स्त्री आणि तिची छोटी मुलगी जौहार करायला जात आहेत असा अंगावर काटा आणणारा सीन आहे. पण त्याकाळी अशा वेळी गरोदर बायका आणि त्यांच्या छोट्या मुली जौहार करत असत आणि लहान मुलांना जौहार करण्याआधी मारण्यात येत असे म्हणजे शत्रू किल्ल्यात आला की त्याच्या हाती कोणीही जिवंत सापडू नये.
मला तर वाटतं की हा सीन आहे या प्रसंगाच्या वेळी त्यामुळे जौहारचे उदात्तीकरण न होता त्याची शिसारी येते आणि अशा घाणेरड्या प्रथेला ग्लोरिफाय न होऊ देण्यासाठी हा सीन घातल्याबद्द्ल भन्सालीला धन्यवादच द्यायला हवेत.

ऋन्मेऽऽष तू लेका निखील वागळे झाल्यासारखा कोकलतो आहेस... Happy >>>>> Lol हो.. ते असेच गंमतीने होते. तसेही मला नवीन धागा काढायचा नाहीये. कारण मी रिव्ह्यू लिहिणार नाहीये. कारण मी पद्मावती बघेन असे वाटत नाही. लॅपटॉपवर वर्षभर पडून आहे तरी अजून बाजीराव पाहिला नाही तर खिलजी कश्याला बघतोय..

हॅट्स ऑफ टू रणवीर! दिपीका ठीक आहे, शाहिदची छाप अजिबात पडत नाही. स्पेशल मेंशन - जीम सर्भ!!! सेट्स, कॉस्ट्यूम, ज्वेलरी अमेझिंग!!!

हॅट्स ऑफ टू रणवीर! दिपीका ठीक आहे, शाहिदची छाप अजिबात पडत नाही. स्पेशल मेंशन - जीम सर्भ!!! सेट्स, कॉस्ट्यूम, ज्वेलरी अमेझिंग!!!
<<<<
थोडक्यात , That’s what I expected and looking forward Happy

हॅट्स ऑफ टू रणवीर! दिपीका ठीक आहे, शाहिदची छाप अजिबात पडत नाही. स्पेशल मेंशन - जीम सर्भ!!! सेट्स, कॉस्ट्यूम, ज्वेलरी अमेझिंग!!! >>> माझी मैत्रीण काल बघून आली, तीनेपण हेच सांगितले (तिच्या bf ने तिच्यासाठी पेड प्रिव्यु चे तिकिट घेतले होते म्हणे २३०० प्रत्येकी,
आम्हाला तर काल कळले तिच्याकडून असे काही असते म्हणून, अन फक्त हा मुव्ही बघायला ऑफीसाला दांडी पण मारली Uhoh )

एकदा तरी बघवासा वाटतोय पण सध्यातरी घरून परवानगी नाहीये

काय्येना टीव्हीवर ईतक्या बातम्या बघून त्यांनी स्पष्ट सांगितले जर वातावरण थोडे शांत झाले तर जा वाटल्यास पण आता नाही, कारण निमित्त नसताना सुद्द्धा उगाच राडा करणाऱ्या माथेफिरुंची कमतरता नाहीये.

बघू कदाचित पुढच्या आठवड्यात जाता येईल का

शाहीदची छाप नाही पडली का अजिबात, अरेरे. मला तो आवडतो. रणवीर बेस्ट काम केलंय हे प्रोमोत जाणवतंय. टीव्हीवर आल्यावर बघेन.

मस्ताने पण दीपिका, पद्मा पण दीपिका ह्या युनिफॉर्मिटीला पण माझा विरोध आहे. त्यात्या रीजन मधले कलाकार त्या त्या फिल्म मध्ये घेतले पाहिजेत. म्हणजे ऑथेंटिक वाटेल नाहीतर बॉलिवूड चे उथळ प्रॉड्क्ट.

jacklin fernandise ला घ्यावं लागलं असतं मग! Uhoh Proud

मस्ताने पण दीपिका, पद्मा पण दीपिका ह्या युनिफॉर्मिटीला पण माझा विरोध आहे. त्यात्या रीजन मधले कलाकार त्या त्या फिल्म मध्ये घेतले पाहिजेत. >> Biggrin स्थानिक लोकाधिकार समितीच्या निवडणुकीत उभ्या रहा तुम्ही. असलेच काय काय मुद्दे लागतात तिकडे.

टीव्हीवर आल्यावर बघेन.<<
>>हाच चांगला पर्याय वाटतो. >>> पण ती मजा नाही येणार जी थेटरात बघताना येईल

घ्या पद्माबाईंचा रिव्यू:

कथा माहीतीच आहे . चित्रपट सुरू होतानाच अनंत प्रकारची डिस्क्लेमर्स दाखवतात. आणि अमॅझॉन प्राइम पार्टनर आहे तेव्हा घरी बघायचा तर तिथे मिळेल काही महिन्यात. मी थ्रीडी बघितला. हिंदी पिक्चर थ्री डी बघायची माझी पहिलीच वेळ. त्यामुळे जरा मजेशीर वाटेल. पण शेवट बघायला थ्रीडी नक्की वर्थ आहे. मला काल दीड ला जाउन दोन च्या मुव्हीचे तिकीट मिळाले. सोफ्याचे तिकीट उगीचच घेतले व १०० रु कूपन जे मी वापरले नाही. बट जस्ट इन केस.

तर ओपनिंग बॅट्स्मन आपली पद्माराणी शिकार करत असते सिंघल देशात. पक्षी श्रिलंका!!! ती बुद्धीस्ट असते असे दाखवले आहे. !!!!! तर आवाजाच्या साइड ला बाण मारते आणि तिथे आपला शाइद लपलेला असतो. असे मीट क्यूट
होते. ती तिथली राजकन्या आहे. व डायफॅनस कपडे घालते व शाहिदची सेवा सुश्रु षा करते. तो तिला म्मोहित होउन
मागणी घालतो डिरेक्ट लग्नच. चट मंगनी उससे भी पट ब्याह. पहिल्याच बॉल ला शाहिदला विराटची विकेट मिळते.
हिचे आईबाबा, माहेरचे वगैरे काहीही दाखवत नाहीत. मग लगेच राजस्थान सीन बदल. राजाचे सलिभ स्टाइल वेलकम पक्षी लाखो दिवे, घोळदार रंगीत कपडे घातलेल्या स्त्रिया. डिफ्यूज लाइटिंग. मग गिफ्ट उघ डल्या सारखे पद्मिनीला दाखवतात.

ही लगेच पार्टी बदलून राजस्थानी बोलायला वागायला लागते. इथे घूमर गाणे आहे व त्यांचे प्रेम घट्ट घट्ट होत जाते.
असे आपण समजून घ्यायचे. सिनेमात काही त्शी केमिस्ट्री दिसत नाही. ते एकांतात असताना एक ब्राम्हण बघतो त्याला शिक्षा म्हणून लगेच देशाबाहेर पक्षी मेवाड बाहेर काढतात. हा लगेच दिल्लीची नेक्स्ट फ्लाइट घेतो. व अ. खिलजी ला मिलतो.

ह्या अ खि. चा चित्रपटात ओपनिन्ग सीन आहे. तो सीजीआय शहामृग पकडून आणतो व त्या बदल्यात त्यांच्या
चीफ च्या मुलीचा हातच मागतो. धिस इस अगेन चट पट ब्याह. पण हा फारच हार्मोनली ड्रिव्हन ब्याड म्यान दाखवल्याने लग्नाच्या आधीच दुसृया एका बाईबरोबर नेट प्रॅक्टिस करून घेतो. लग्न उरकून हे लोक मंगोलांना मारून दिल्लीच्या तख्तावर राज्य करायला सेट होतात. हे साइडचे पब्लिक विचित्र उर्दू कम हिंदी कम पाकिस्तानी डायलेक्ट बोलतात. कधी मसला वो नही है म्हणतात पाकी सिरीअल मधल्या सारखे तर कधी फिल्मी उर्दू तर कधी अखि एकदम इतिहास वगैरे गुगली टाकतो. दुनिया की हर नायाब चीज पर सिर्फ उसका इच हक है कते. हा
वाइट वाई ट आहे हे कायम सिद्ध करत राहतात. ह्याला खूप खूप सब टेक्स्ट आहेत . एकतर मुस्लीम, मांसाहारी,
बाय सेक्क्षुअल मनाला येइल तेच करणा रा सत्तांध , नृशंस मानव आहे. हे ठसवण्यात फार फूटेज खर्च झाले आहे. त्यात ते काउ बॉय बूट आहेत.

तर कुठे होतो आपण राजवाड्यात गडावर घूमर फेस्टिवल व नाच होतो. शाहिद हा छान दिसतो व ज्वेलरी कपडे मस्त आहेत. पण तो तिचा नव्रा वाटत नाहीच. बारका भाउ वाटतो. एकंदरीत स्मॉल स्केल दिस्तो तिच्या मानाने.

क्रमशः

अमा Proud
हे सगळं मान्य असून आवडला, अतिशय आवडला सिनेमा.
भन्साली टच दिसतो तसा झुंबर लटकताना रोमान्स, पाण्यातून इकडे तिकडे चालायचा महाल, खल्बली वर नाचणार्या खिल्जीला पाहून वाट लागलीची कोरिओग्राफी आठवते ,पण चलता है, भन्सालीचे सिनेमे ज्यासाठी पहातो त्यासाठी सगळ मान्य करून आवडला.. नक्की पहा आणि ३ डी !
रणवीरला बेस्ट, हॅट्स ऑफ वगैरे फार कमी झाले , गब्बर सिंग नंतर हिस्टरी बदलणारा एकच सैतानी व्हिलन, खिल्जीरुपी रणवीर !
दीपिका आधी आवडली नव्हती पण सिनेमा पहाताना आवडली , तिच्या जागी दुसरी कोण हा प्रश्न्ण आहेच.
शाहिदच्या जागी ह्रितिक मस्तं वाटला असता.
शाहिद दिसतो झकास पण शूरवीर योध्दा दिसत नाही.
अर्थात मुळात सिनेमा रणवीरचा आहे आणि त्यानी जसा खिल्जी तंगड्या खातो तसा ओरबाडून खाल्ला आहे.
रणवीर नंतर लक्षात रहातो तो मलिक काफुरच्या रोलमधे जिम सर्भ , कम्माल आहे हा माणुस !
कपडेपट दागिने, सेट्स अतिशय सुंदर.
जोहारचा सीन बघताना काटा येतो अगदी !
बाकी आता लिहित नाही, सावकाश.
स्पॉयलर
शंका राहिल्या १-२.
खिल्जी राणीला पहायची अट बोलून दाखवतच नाही सिनेमात, फक्तं बुध्दीबळात मात आणि डायरेक्ट दीपिका अट मान्यं करतानाचा सीन !
हे सेन्सरची कात्री लागल्यानी झालं का ?
मुळात त्यावेळी खिल्जीची सेना गेलेली असते परत, तो हत्यार न घेता आलेला असतो, अशा वेळी त्याची अट का मान्य करेल राजा आणि पद्मावती ?
कैदेत असलेल्या राजाला सोडवायला पद्मावती स्वतः गेलीच नव्हती ना? तिच्या वेषात घुंगट घेउन गोरा /बादल पैकी कोणी तरी गेले होते असं वाचलं होतं.
शिवाय खिल्जीची बेगम म्हेअरुन्निसाला क्रेडीट का दिलय चोरवाट दाखवल्याचं ते समजलं नाही.
असो, मुळ कथा काय याची किती व्हर्जन्स आहेत माहित नाही आणि इतिहासाशी प्रामाणीक असल्याचा दावा सिनेमा करत नाही पण शंका आल्या झालं !

त्या दिपीका समोर शाहिद पिचका बार दिसतो.
दिपीका शिकवलय तर नाचते बाई मोडात.
मला तर रामलीला ते मस्तानी ते पद्मावत चे सर्व हावभाव जपून जपून तेच वापरतेय असे वाटले डिपू बघताना.

इतिहासाप्रमाणे खिलजी गे होता ना?

सर्व उगीच्च खिलजीचे सीन्स भेसूर दाखवलय.

क्रमशः

Pages