मायबोलीकरांच्या वापरावयाच्या नावांची कथा

Submitted by राजधर्म on 6 April, 2010 - 12:00

माबोवर अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण नावे (सभासदाचे नाव) आढळतात. आपल्याला हे नाव कसे सुचले हे जाणून घ्यायला आवडेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

:आदरमोद:

ऋन्मेऽऽष तेच वाचले, मग जमले. आधी रिया ने पोस्टलेला प्राणी कॉपी - पेस्ट करून cheating करायचा प्रयत्न केला. पण :ह ह ग लो असे आले Rofl

मला माझ्या विनय या नावाने आयडी हवा होता पण मिळाला नाही. काय नाव घ्यावं या विचारात असतानाच डोळ्यांसमोर संशोधक हा शब्द आला म्हणून तोच आयडी घेतला.

माझे मायबोलीवर पूर्वी बासुरी या आयडी ने लेखन होते , कारण मला स्मि हा माझ्या नावाचा आयडी हवा होता पण तो न मिळाल्याने मग बासुरी घेतला,,.. शेवटी आता माझ्या नावाचा स्मिता आयडी घेतला,......:)
गंमत मात्र अशी की जे लोक बासुरीच्या लिखाणावर हल्ला करत होते तेच स्मिता२०१६ पण करतात, शेवटी नावात काय असते Happy हे मात्र पटले Happy दिवा घ्या

रसिया (रसिक) तर होतोच..लग्नानन्तर बालम पन झालो (:इश्श:)
नाम हि काफी है!

मी माबो २ वर्षापासून follow करतेय,आत्ताच माबोवर सभासद झाले.माझ नाव दिपाली आणि नवर्याचे हेमंत आहे.दोघांच्या नावाचे सुरवातीचे शब्द घेवून "हेमदिप" हे नाव घेतले.लग्न झाल्यापासून नवर्याचा मो. नं. सुद्धा याच नावाने सेव आहे म्हणून हेच नाव घेतले.

माणकु हे आपलं लहानपणापासून टोपण नाव. आधी तेच घेतलं होतं मायबोलीवर आलो तेव्हा.
आता मी केसास्नी कलप लावतो. म्हणजे डाय.
पण दाढी बरीच पांढरी हाय.
काळे केस पांढरी दाढी या वरुन काकेपांदा.

अरे वाह! मस्तच आहे हा धागा .

माझ्या 'मद्रकन्या' आयडी बद्दल सांगायचं तर त्यामागे दोन कारण आहेत...

एक ... मी (पूर्वीचं) मद्रास (बाबा) आणि मुंबई (आई) ची कन्या. बाबांसाठी मी त्यांची राजकन्या होते आणि मला माझ्या घरच्यांनी वाढवलंही तसचं. राजकन्या म्हणजे Delicate Darling नाही तर एकदम Rough and Tough.
“मुलीच्या जातीने...” या पालुपदाने सुरु होणारी कोणतीही गोष्ट माझ्यावर कधीहि लादण्यात आली नाही.

आणि दुसर म्हणजे... युद्धाची चांगली जाण असलेली, रणांगणावरची एक अतिशय कुशल आणि निपुण सारथ्य करणारी अशी माद्री ही मद्रदेशाची राजकन्या. मद्रदेश जिथे स्त्रियांना त्याकाळातही भरपूर स्वातंत्र्य होत.

तर म्हणून मी मद्रकन्या.

माझं नाव पल्लवी कुलकर्णी आहे.. भलतंच कॉमन नाव असल्यामुळे दोन्ही शब्दांमधली अक्षरं घेऊन हे नाव तयार केलं... .
धागा छान आहे.. मलाही कुतूहल होतंच ह्या IDs विषयी...
तशी मी मायबोली ची नियमित वाचक आहे आणि अजून तरी पोस्ट लिहिली नाही.... लिहीन लवकरच.
आभार .. Happy

मस्त धागा आहे हा.
माझे जवळचे मित्र मला 'आनंदी माणूस' समजतात.. म्हणून मी आनंद. 'आनंद' नावानं आयडी बनत नव्हता मग अ नंतर काना म्हणून '।' वापरलं. Happy

माझ्या आयडितला १२ म्हणजे माझी जन्मतारीख.... आणि बागराज्यात राहात असल्याने बाराकर Wink म्हणून अंजली_१२ (बाराची नाहीये हां पण मी Wink

जवळपास १० वर्षा पुर्वीची गोष्ट आहे..
तर त्या वेळी आम्ही कोकणात ट्रीपला गेलेलो... खुप छान ग्रुप होता. बीच, समुद्र सगळ खुपच सुंदर होत..
परतताना गाडीत मध्ये तंद्रीत अर्धवट विचारा मध्ये एक खुप छान कवीता सुचलेली.. (अहो तेच ते प्रेमात वगेरे पडायच वय इ. इ. मुळे)
" मी इथे उभा/उभी या क्षीतिजा वरती..... something.. something.. वार्‍या जा निरोप दे त्या मोरपंखिस.."
" मी something.. something.. जा घेउन ये त्या मोरपंखिस.."

मोरपंखिस हे त्या किंवा ती ला उद्देशुन होत कवितेत.. घरी परते पर्यंत रात्र झाली.. थकुन सकाळी उशीरा जाग आली..
मग नंतर ती कवीता लिहुन काढावी म्हंटल पण ती अठवली नाही... ती अर्धवट लिहलेली / आठवलेली कवीता आहे आजुन.. Happy
त्या नंतर काही दिवसांनी इथे प्रोफाइल बनवल तेव्हा ते "मोरपंखिस" हे नाव ठेवल...

'मैं तेजा हूं क्यूं की मेरा नाम भी तेजा है!' असेच एक्स्प्लेनेशन माझ्या नावाबाबत म्हणता येईल. फक्त माझ्या नावात र्‍हस्व नु आहे, पण ते नाव ऑलरेडी कुणीतरी घेतल्याने मी दीर्घ नू घेतले.

Pages