मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिहाले मस्कीं मकुन बा रंजीश बहाले हिजरा बेचारा दिल है.... -
इस लाचार (मस्कीं) दिल को जब देखो (ज़िहाल), तो गुस्से से (बा-रंजिश) नहीं (मकुन)
इस बेचारे दिल को हाल ही में (ब-हाल) अपने महबूब से जुदाई (हिज्र) का गम मिला हैं..!!

"मय से, मीना से, ना साकी से
दिल बहलता है मगर आपके आ जाने से "
असं आहे ना ते?>>>>>>>

मय से, मीना से, ना साकी से,
ना पैमाने से
दिल बहलता है मेरा आपके आ जाने से"

हे गाणं नाहीये, पण लगान सिनेमा मधे जेव्हा सुहासिनी मुळे आमिर खान ला सांगत असते की, 'तू बिलकूल अपनी बापू की तरह है, वह ऐसे ही झूजारू थे' हे वाक्य मी अनेक वेळा 'तू बिलकूल अपनी बापू की तरह है, वह ऐसे ही तो चालू थे' असं ऐकलय.

हे गाणं नाहीये, पण लगान सिनेमा मधे जेव्हा सुहासिनी मुळे आमिर खान ला सांगत असते की, 'तू बिलकूल अपनी बापू की तरह है, वह ऐसे ही झूजारू थे' हे वाक्य मी अनेक वेळा 'तू बिलकूल अपनी बापू की तरह है, वह ऐसे ही तो चालू थे' असं ऐकलय. >>> चला हवा येऊ द्या मध्ये जेव्हा लगान वर स्पुफ असेल ना तेव्हा हा जोक फिट्ट बसेल त्यात. Rofl सागर कारन्डे- सुहासिनी मुळे , भाऊ कदम/ कुशल बद्रीके- आमिर खान, आणि ग्रेसी सिन्ग- श्रेया बुगडे

जय जय शिव शंकर
काटा लगे ना कंकर
...........
...........
जो तुमने मुझे थाम ना लिया ओ सौरभजी.....असं ऐकू यायचं.... म्हटलं असेल राजेश खन्नाचं नाव सौरभ Proud

ओ सौरभजी >>> Lol

राजेश खन्नाचंच आणखी एक गाणं - छुप गये सारे नजारे ओय क्या बात हो गयी - त्यातली एक ओळ :
अंबुवा के डाली पे गाए मतवाली कोयलिया काली निराली

आमच्या घरची एक कन्यका ती ओळ 'अंबुवा के डाली पे गाय मतवाली कोयलिया काली निराली' अशी ऐकायची आणि तिला प्रश्न पडायचा, आंब्याच्या झाडावर गाय कशी काय चढून बसते? Biggrin

लले Lol

कागज कलम दवा दिला लिख दूं दिल तेरे नाम करू Lol (कलम केल्यानंतर लावण्यासाठी औषध असे काहीतरी वाटून गेले होते तेंव्हा)

उंची है बिल्डींग
लिफ्ट तेरी बंद है
कैसे मै आऊ
दिल जरा मंद है>>>>
Lol
actually, 'मंद' शब्द बरोबर आहे. 'जरा' च्या ऐवजी 'रझा' आहे. 'रझामंद' असा शब्द आहे. म्हणजे 'agree'

Dehli ६ मधलं ससुराल गेंदा फूल गाण्यात शेवटी मला असं ऐकू यायचं

पुरे रायपूर से अलग है
सैय्या जॅकी चॅs न

आणि खूप दिवस हा जॅकी चॅन रायपूर मध्ये काय करतोय ते कळत नव्हतं
मग एका मैत्रिणीने सांगितलं अगं जॅकी चॅन नाहीsss

पुरे रायपूर से अलग है
सैय्या जी कि शान
असं आहे

कागज कलम दवा दिला लिख दूं दिल तेरे नाम करू>> हे काय आहे मग ओरिजिनल? मी तर 'दवा खिला' असं ऐकत आलोय. मला वाटायचं की तू जर मला दवा खिलवलीस तर मी माझे ह्रदय तुझ्या नावावर करेन..

सुलतान मधील 440 व्होल्ट गाण्यातील

तू आये घूमे फिरे हम दोनो
मुझे यही वेटींग हुई
हा वेटिंग हुई वेटिंग हुई वेटिंग हुई

यातील वेटिंग हुई च्या जागी 'बेटी हुई' असच ऐकायला येतं. कितीही पट्टीचा ऐकणारा असला तरी त्याला तेच ऐकायला येईल. मिकाच्या गळाशप्पथ.

शकीरा का शकीला ताईंच पृष्ठभाग खोट बोलत नाही या सुगम गीतातल्या काही शब्द मला अश्या समजल्या

आय वांट टू लाय बट माय हिप्स डोंट लाय

म्हणजे माला जरा झोपायच / पडायच आहे पण माझा पार्श्वभाग मला पडू डेट नाही ( कदाचित बिचारीला गळू झाल असेल )

मधेच काहीतरी ओळ ऐकायला येते

यू डान्स एकोर्डीनग टू द साईझ ऑफ यूअर बोडी

( म्हणजे प्रत्येकाने आप आपल्या तब्ययतीत नाचा )

ओ शकीला शकीला

Pages