मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनू.... Happy इजाजत मधल्या अनुराधा पटेल ला सगळे माफ!
एक सो सोला चांद की राते....... म्हणजे फक्त तिने काउंट ठेवलाय एव्हढंच अभिप्रेत असेल... की ते कितीदा भेटले...पौर्णिमाच म्हणून नाही..कारण मग तो खूपच मोठ्ठा काळ होतो..नाही का.? ओव्हर ऑल रात्री चंद्र असताना एकशे सोळा वेळी भेटले असतील...बाकी दिवसा....!!!!!

Biggrin

गुलजार कुठल्यातरी मुलाखतीत म्हणाले होते की एकसो सोला नको असतील तर एकसो सतरा घ्या! त्यात काय एवढं? Happy
नासिरुद्दिन शाहच्या कांधे का तिल बघायला अनुराधा पटेल त्याचा शर्टही खांद्यावर फाडून ठेवते Happy
वरची लिंक आता वाचते.

नुसता २ बटणे काढून काम झाले असते.
फुकट ची फाडाफाडी
हल्लि रफू वाले टेलर मिळणे प्रचंड अवघड आहे.प्रत्येकाला न्यु क्रिएशन करायचे असते. रिपेअर नव्हे

हल्लि रफू वाले टेलर मिळणे प्रचंड अवघड आहे.प्रत्येकाला न्यु क्रिएशन करायचे असते. रिपेअर नव्हे<<<<
तरी त्या काळात मिळत असेल एखाददुसरा रफू करणारा टेलर... करीनाने 'मैं प्रेम की दीवानी हूं'मध्ये तर हृतिकच्या भारी शर्टाची अख्खी बाहीच ओरबाडून फाडली..

नुसता २ बटणे काढून काम झाले असते.>>
तिला नेमका फक्त तेवढा तीळ दिसत रहावासा वाटत असेल. बटणं काढून कायम फिरायला तो काही अशोक सराफ नाही Wink

काल आमचे चिरंजीव म्हणाले, "मिस्टर इंडिया" मध्ये ती डान्स करते तिचे नाव बिजली राणे आहे का?" मी म्हणालो नाही ती श्रीदेवी आहे. तर म्हणाला गाण्यात ती म्हणते: बिजली गि. राणे मै हू आयी, कहते है मुझको हवाहवाई Biggrin

कभी खुशी कभी गम चित्रपटातल बोले चुडिया गाण्यातल कडव मी अस म्हणायचो

अपनी मांग उजागर हो
साथ हमेशा साजन हो

(वाटायच ही बाई काय मागून राहीली बे )

जाके मेरे जीवनसे वापस ना आना
चेहरा बांधके जोगी तू मेरे घर आना

म्हणा बोले चुडिया

"मेरा कुछ सामान" बद्दल एक शंका आहे. हे गाणं जेव्हा नुसतं ऐकतो तेव्हा गाणं sad mood चं वाटतं पण पाहताना तिच्या चेहऱ्यावर जराही दुःखी भाव नाही आहेत. असं का? म्हटलं चित्रपट पाहिल्यावर कळेल पण नाही कळलं Uhoh

गाणं sad mood चं वाटतं पण पाहताना तिच्या चेहऱ्यावर जराही दुःखी भाव नाही आहेत>> नासिरुद्दिन शाह म्हणतो तसं, ' This is Maya' Happy

दु:खी नाही कारण हा पंटर आयुष्यात थोडा कन्फ्युज्ड आहे, लग्न झालं तरी आपल्याला मनातून काढू शकणार नाही याचा अपार आत्मविश्वास Happy

जुनं सध्यात चर्चेत आलेलं मराठी गाणं
शूर आम्ही सरदार...
" आईच्या गर्भात उमगली शिणगाराची रीत...."
बरं तलवारीशी लगिन लागलं ऐकून वाटलं हेच बरोबर असेल. अर्थ कळल्यावर फार लाज वाटली होती.

तिच्या चेहऱ्यावर जराही दुःखी भाव नाही आहेत>>

जुने दिवस आता राहिले नाहीत या दु:खावर कधीकधी त्या गोड आठवणी मात करतात अन चेहऱ्यावर स्मितहास्य येते Happy

Pages