Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
अनहोनी को होनी कर दे, होनी को
अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी..
एक जगह जब जमा हो तिनो
अमर अकबर अॅन्थोनी
Lol Rofl
Lol Rofl
परवा या धाग्याबद्दल आईशी चर्चा करत असताना तिचेही काही मोती मिळाले
"रात का समा, झुमे चंद्रमा"
हे गाणं आई आणि तिच्या मैत्रिणीना "सासू सासरा, झुमे चंद्रमा" असं ऐकू यायचं.
"पांडुरंगी सदा लीन राहू" हे "पांडू रंगीत गाडीनं जाऊ" असं ऐकू यायचं.
(No subject)
सासू सासरा, झुमे चंद्रमा >>>
सासू सासरा, झुमे चंद्रमा >>>
पांडू रंगीत गाडीनं जाऊ <<< हे
पांडू रंगीत गाडीनं जाऊ <<< हे मलाही ऐकल्याचं आठवतंय.. रेडियोवर गाणी लागायची तेव्हा
"पांडू रंगीत गाडीनं जाऊ" >>
"पांडू रंगीत गाडीनं जाऊ" >> सई
"बसंत बहार" चित्रपटातले
"गूंज उठी शहनाई" चित्रपटातले लताजींनी गायिलेले त्यावेळचे अत्यंत लोकप्रिय गाणे "तेरे सूर और मेरे गीत, दोनो मिलकर बनेगी प्रीत".
त्यात एक ओळ आहे...
मेरी मुहोब्बत में तासीर है, तो खींचके मेरे पास आओगे तुम
अकरावीच्या वर्गात असताना वर्गातल्या एका स्वयंघोषित गाणेपंडिताने हाताची घडी घालून मोठ्या अविर्भावात सांगितले होते
"मेरी मुहोब्बत में कासीर है", उर्दूमध्ये कासीर म्हणजे दोरी. यावरूनच मराठीत बैलाच्या दोरीला "कासरा" शब्द आलेला आहे
म्हणजे आपल्या प्रियकराला बैलाला दोरीचा लावतात तसा प्रेमाचा कासरा लावून तिने जखडून ठेवले आहे असे काहीसे

अगदी अलीकडच्या काळात इंटरनेटवर लिरिक्स मिळेपर्यंत "कासीर" असेच ऐकत होतो.
चित्रपट : अँखियों के झरोखों
चित्रपट : अँखियों के झरोखों से (१९७८)
सचिन आणि रंजिता यांच्यावर चित्रित झालेले नितांतसुंदर गीत
अँखियों के झरोखों से, मैंने देखा जो सांवरे
तुम दूर नज़र आए, तुम (बड़ी) दूर नज़र आए
यातील पहिल्या कडव्यातील मी ऐकलेले शब्द
इक मन था मेरे पास वो, अब खोने लगा है
पागल तुझे, हाय मुझे, कुछ होने लगा है
मूळ रचना
इक मन था मेरे पास वो, अब खोने लगा है
पाकर तुझे, हाय मुझे, कुछ होने लगा है
कल हो ना हो मधील प्रेटी वूमन गाण्यातील शब्द "कुडी गुमान" असेच ऐकू येतात.
नवीन खुबसूरत चित्रपटातील गाणे
एंजन की सिटी में म्हारो मन (बम) डोले
दौडा दौडा रे ड्रायव्हर गलबत हौले हौले
यात रेल्वेच्या गाण्यात गलबत कसे आले हा प्रश्न मला पडलेला ....
कदाचित दोन्ही वाहतुकीचे साधन असल्यामुळे गीतकाराने गलबत चालविले असणार
दौडा दौडा रे ड्रायव्हर चाल मत हौले हौले
"सासू सासरा, झुमे चंद्रमा" <<
"सासू सासरा, झुमे चंद्रमा" <<<
मेरी मुहोब्बत में तासीर है,>>
मेरी मुहोब्बत में तासीर है,>>> तासीर म्हणजे काय?
तासिर म्हणजे बहुधा ताकद...
तासिर म्हणजे बहुधा ताकद... खेचण्याची/आकर्षित करण्याची ताकद किंवा क्षमता.
@ दक्षिणा, धन्यवाद.
@ दक्षिणा, धन्यवाद.
'तासीर' म्हणजे प्रभाव/विशेष
'तासीर' म्हणजे प्रभाव/विशेष गुण/योग्यता
'मोहब्बत की झूठी कहानी पे रोये' हे मी बरेच दिवस,
'मोहब्बत की झूठी कहानी पिरोयें' असं ऐकत होतो!
'मोहब्बत की झूठी कहानी
'मोहब्बत की झूठी कहानी पिरोयें' >>>
इक मन था मेरे पास वो, अब खोने
इक मन था मेरे पास वो, अब खोने लगा है
पाकर तुझे, हाय मुझे, कुछ होने लगा है
>> धन्यवाद! इतक्या वर्षात हे आजच कळले. माझे हे आवडते गाणे आणि आजवर पागल असेच म्हणत गात आलोय
'मोहब्बत की झूठी कहानी पिरोयें' असं ऐकत होतो! >> पुरा रायता फैलाय दिये तुम!

नानाकळा>>
नानाकळा>>
हे नक्कीच आधी लिहिलेले असणार.
हे नक्कीच आधी लिहिलेले असणार. मला "बन्नो तेरा स्वॅगर" हे "बन्नो तेरा स्वेटर" ऐकू यायचं. आणि त्यात तिनी स्वेटर पण घातलेला आहे.
खूप दिवस गाडीतून येता जाता स्वेटर स्वेटर गाऊन (म्हणजे गाणं म्हणून, घालायचा गाऊन नव्हे) झाल्यावर जेव्हा स्वॅगर आहे असं कळलं तेव्हा आधी त्या डायरेक्टरचा तिला गाण्यात स्वेटर घालायला लावल्याबद्दल राग आला.
सई मला पण स्वेटर च ऐकू आलेलं
सई मला पण स्वेटर च ऐकू आलेलं. म्हणलं इतकं काय त्या स्वेटर चं कौतुक?
न जाणे उद्या चड्डी बनियन चं कौतुक करतील 
)
लेहेन्गा, चुनरी पर्यंत ठिक होतं; आता स्वेटर पण?
(इथवर विचार करून झालेला माझा गाणं ऐकल्यावर
"बन्नो तेरा स्वॅगर" हे "बन्नो
"बन्नो तेरा स्वॅगर" हे "बन्नो तेरा स्वेटर" >>> लक्ष देऊन ऐकलं कि लक्षात येतं नायतरं स्वेटरचं ऐकु येतं
न जाणे उद्या चड्डी बनियन चं
न जाणे उद्या चड्डी बनियन चं कौतुक करतील 'रुमालाचं' कौतूक करतात (मै कुडी पंजाबकी मेरा रेशम का रुमाल वे') तर चड्डी बनियन का नको?
(रेशमी रुमालाचा उपयोग काय, घामही पुसला जाणार नाही.. हे वेगळंच)
इथे कोणी आधी लिहलं का माहित
इथे कोणी आधी लिहलं का माहित नाही पण, ऋणानुबंधाच्या हे गाणं खूपच बोबडं गायलय असं वाटतं कुमार गंधर्वांनी( त्यांची माफी मागून लिहितेय),
मला एकदम लहानपणी,
कुणा निबंधाच्या ,
तॄष्टता एवजी दुष्टता ,
वगैरे वगैरे
मलाही स्वेटरच वाटलेलं.
मलाही स्वेटरच वाटलेलं.
तसेही पंजाबी गाण्यात कसलेही कौतुक असते म्हणून समजून घ्यायच्या भानगडीत पडले नाही.
ते लंडन ठुमकदा किती वेळा एकून समजले..
तु कैसी बिग भेंडी ... असे वाटते एकायला..
नंतर त्यांची शिवी वाटली बेंद दी ट... असे वाटते होते
>>>>तु कैसी बिग भेंडी
>>>>तु कैसी बिग भेंडी
या वाक्यावर गेली पाच मिनिट मी एकटीच हसतीये ऑफिसमध्ये बसून. नशीब कुणी आलं नाहीये इथे अजून भेटायला. मॅडम आता कन्फर्मड वेड्या झाल्या असं म्हणत जातील आले तर.
सैराट मधील 'याडं लागल' या
सैराट मधील 'याडं लागल' या गाण्यातील 'झोप लागना सपानं जागवाया लागलं' हि ओळ मला 'झोपला ससा(?)' अशी ऐकू यायची
झोपला ससा
झोपला ससा
सुरूवातीला मी पण चक्रावलेच कि
सुरूवातीला मी पण चक्रावलेच कि अशी कशी ओळ असेल गाण्यात? नंतर बहिणीला विचारले तेव्हा ती म्हणाली कि मुर्खा गाण्यात अशी ओळच नाहिये आणि बरोबर शब्द सांगितले.
झोपला ससा>>>
झोपला ससा >>>
>तु कैसी बिग भेंडी>>>>>>>
>तु कैसी बिग भेंडी>>>>>>>

झोपला ससा >>>>
खुप हसतेय मी.
लंच मध्ये मी वरील दोन्ही गाणी
लंच मध्ये मी वरील दोन्ही गाणी चुकीची म्हणून पहिली.
"झोपला ससा" च्या पुढे गावेना. खूप हसले.
आईचे अजून एक कर्णसुमन मिळाले:
रांझन दे यार बुलेया हे गाणं मागच्या वर्षीचं सगळ्यात फेव्हरेट ठरलं तेव्हा आई मला, "काय दिवस आलेत हल्ली! असल्या गाण्याला बक्षीस मिळतं" असं म्हणाली. तेव्हा मी तिला विचारलं की काय वाईट आहे या गाण्यात.
तर त्यातली "तू ही तो यार बुलेया, मुर्शिद मेरा" ही ओळ तिला "बुलशीट मेरा" अशी ऐकू यायची.
एवढ्या खालिज उर्दू गाण्यात कुणी बुलशीट हा शब्द का वापरेल?
Pages