मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते तर मला खूप वेळा
मेरी ढोलक सोने दि असं ऐकू यायचं
बाकीची दुनिया पितळेची पण माझं ढोलक सोन्याचं लोल Wink

कैलाश खेर चे अल्ला के बंदे गाण मला अस ऐकू येत

अल्ला के बंदे हसदे अल्ला के बंदे
अल्ला के बंदे डसदे अल्ला के बंदे

जो भी है फिर कल आएगा

टूटा टूटा एक परिन्दा कैसे टूटा
फिर जुड़ ना पाया
लुटा लुटा जिसने उसको लुटा
फिर उड़ ना पाया

उड़ता हुवा जमीन पर आके गिरा धडाम से
आखो में उड़ाने के फिर भी सपने थे मगर

अल्ला के बंदे हसदे अल्ला के बंदे

एखाद्या शब्दाच्या जागी तसाच ऐकू येणारा दुसरा शब्द समजू शकतो, पण इथे तर चक्क शब्द मागे पुढे. आणि जागा सोडून भलतीकडे कसे काय जात असावेत? Wink

टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा, के फिर जुड़ ना पाया
लूटा लूटा किसने उसको ऐसे लूटा, के फिर उड़ ना पाया

गिरता हुआ वो आसमां से, आकर गिरा ज़मीन पर
ख्वाबों में फिर भी, बादल ही थे, वो कहता रहा मगर

"तू इस तरह से मेरी ज़िंदगी में शामिल है" हे गाणे पूर्वी मला नेहमी "तू भी जरासी मेरी जिंदगी में शामिल है" असे ऐकायला यायचे Biggrin

शबानाचे मला अतिशय आवडणारे एक गीत आहे,
अजनबी कौन हो तुम, जबसे तुम्हे देखा हैं !
या गीतातल्या एका ओळीतला शब्द कधीच कळाला नाहीये अजुन पर्यंत.
ऐसा लगता है के बरसोंसे शनाथ आयी हैं ?
हे काय आहे नक्की ? शनाथ, शनाख, अनाथ ? Uhoh

माझेही आवडते गाणे असल्याने त्याचे अर्थ मी समजून घेतलेला आठवतोय एका मुस्लिम मैत्रीणीकडून

शनासाइ म्हणजे एक कनेक्शन वाटते जुनेसे.. वाकीफ असणे/ ओळखीचा / जवळचा वाटणे.
तुम्ही उषा खन्नाचे म्युझिक आआहे, नीट एका. आपल्या लता दीदी कधी कधी मला लाडीक वाटतात.

>>ऐसा लगता है के बरसों से, शमा आज आई है
ओह, हे काहीतरी वेगळेच आहे, आता कानात प्राण आणून ऐकून पहावे लागणार Happy

झंपी+१
ऐसा लगता है के बरसों से शनासाई है

शनासाई - परिचय

मी ऐकलेले 'जिया जले ' अजून एक व्हर्जन -- 'सुंदरी बंदर गंजी क्यों गज्जीनी बंदर गंजी क्यों सुंदरी बंदर तंदुरी खावे ,नागासाकी तंदुरी बंदर मंदिर जावें ' Lol

माझा भाचा (वय ४ वर्षे) बाजीराव च मल्हारी सॉन्ग असे म्हणतो " अटक मटक चवळी चटक झाली दुश्मन कि वाट लावली ........धबधबा धबधबा धबधबा धबधबा " (तंटा नाय हो Lol )

सगळ्यांचे लक्ष त्या गाण्यातल्या मुखड्यावरच आहे.... अंतर्‍यातल्या खुडबूडकुस्तीबद्दल कोण सांगणार?

<<<मी ऐकलेले 'जिया जले ' अजून एक व्हर्जन -- 'सुंदरी बंदर गंजी क्यों गज्जीनी बंदर गंजी क्यों सुंदरी बंदर तंदुरी खावे ,नागासाकी तंदुरी बंदर मंदिर जावें ' Lol<<< अगागा.... Rofl Rofl

इजाजत मधील प्रसीध्द गाणे - मेरा कुछ सामान .. मधील या ओळी
एक तो सोला चांद की राते एक तुम्हारे कांधे कातील
मला बरीच वर्षे १६ चंद्राच्या रात्री आणि खुनी खांदे हे अस गुलजारनी का लीहीले असाव हे श्याप कळत नव्हत. तरी ते एक तो सोला चांद की राते म्हणजे अमावस्या पोर्णिमा असे काहीतरी असेल म्हणुन सोडुन दिले तरी खुनी खांदे हे माझ्या आकलनच्या बाहेर होअत.
आत्ता आत्ता कधीतरी ते
एक सौ सोला चांद की राते एक तुम्हारे कांधे का तिल अस आहे हा शोध लागल्यावर काय आनंद झाला म्हणुन सांगु.
तरी अजुन एकशे सोळा चा हिशेब काय समजला नाहीये पण ठीक आहे शब्द तर बरोबर आहेत.

खुनी खांदे Happy
११६ चंद्र रात्री म्हणजे १ पौर्णिमा चंद्र पर मंथ अशी नायकाबरोबर रिलेशनशिप मध्ये घालवलेली ९.६ वर्षे असावी.

सहस्त्र चंद्र करायला नसिरुद्दिन आणि रेखाला ८० वर्षे रिलेशनशिप मध्ये रहावे लागेल.(प्रेमात पडण्याचे वय किमान १६ धरल्यास हे दोघे रिलेशनशिप ब्रेक करताना ९६ वर्षाचे असतील.गाणी आठवणार नाहीत.)

Lol
एक वो सोलह चाॅद की रातें.. एक तुम्हारे कांधे का तील!
असं नाहीये का?
काटेकोर हिशोबही असेल, प्रेमात पडल्यावर काहीही करतात लोकं.

चित्रपट बघा हो... कळेल सोळा आहेत की एकशे सोळा! Wink

म्हणजे मीही बघितला नाहीये अजून, खूप कौतुक ऐकून आहे...

त्यांच्या अफेअरचा काळ जवळपास दिड वर्षाचा दाखवलाय... नसीरुद्दीन शहा रेखाला असं सांगताना दाखवलेय चित्रपटात( नक्की आठवत नाहिये) पण रेखाला कळतं आणि तो सांगत असतो.. असा सीन आहे.. )

१६-१८ पौर्णिमा येतात की दिड वर्षात... करा हिशिब.. अनुराधाला मध्येच पळून जायचा छंद असतो तेव्हा ती १६ पौर्णिमाच असेल नसीरुद्दीन बरोबर.. Proud

गोर्‍या देहावरती कांति, नागीणीची कात
येडे झालो आम्ही ज्यावी, एका दिस रात>>>याचा अर्थ काय?
(मी इतके दिवस, येडे झालो आम्ही, द्यावी एकादीच रात, असं ऐकत होतो Blush )

ओ सजना बरखा बहार आयी
रस की फुहार लायी

फुहार शब्द आहे करेक्ट हे मला हल्ली समजलं, मी पुहार समजत होते लहानपणापासून. Thanx to भरत, त्यांच्यामुळे मला नीट कळलं.

अजून एक गाण्यातील चुकीचे ऐकू आलेले शब्दः

तू मिले, दिल खिले, और जीने को क्या चाहिये
राहो तू, दास तेरे आसपास, मैं रहूंगा जिंदगीभर
सारे संसार का प्यार मैने तो जीने पाया

अनुराधा पटेल ओढणी बाईक मध्ये अडकून गळफास लागून मरते तेव्हा तिची जीभ बाहेर का येत नाही हा प्रश्न कोणाला पडला नाही का?

>>>>अनुराधा पटेल ओढणी बाईक मध्ये अडकून गळफास लागून मरते तेव्हा तिची जीभ बाहेर का येत नाही हा प्रश्न कोणाला पडला नाही का?<<<

प्रश्ण तर बरेच आहेत हो , हा चित्रपट पाहून.
अनुराधा नक्की करते काय? खाते काय? पळून जाते तेव्हा रहाते कुठे ? कारण कोणालाच तिचा पत्ता माहीत नाही.
नसीरुद्दीन आणि रेखा नक्की कोणती ट्रेन पकडून चालले असतात? अक्ख्य्या स्टेशनवर फम्त हे दोघेच पावसात अडकतात?

तो शशी कपूर कसा प्रवास करून भर पावसात दुसर्‍या दिवशी पोचतो?....

Pages