मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संत ज्ञानेश्वरांची एक सुंदर रचना बाबूजी सुधीर फडकेंनी गायिली आहे... समाधि साधन संजीवन नाम । शांति दया सम सर्वांभूतीं

त्यात एक ओळ आहे...
शम-दम-कळा, विज्ञान-सज्ञान । परतोनि अज्ञान न ये घरा

हे शम-दम-कळा शब्द लहानपणी रेडिओवर नीट कळायचे नाहीत. "रमत गमत चला" असे काहीतरी ऐकू यायचे Lol Lol Biggrin

सचिन वर्षा व अशोक सराफ यांचा एक सिनेमा आहे. नाव आठवत नाही. त्यातल्या गाण्याचे शब्द मी ऐकते.
वळवळवळणारी नागीण जशी
हुरहुर माझ्या मनी भरली अशी

बरोबर काय ते माहित नाही

दिल तुही बता कहा था छुपा
क्यू आज सुनी है तेरी धड़कन पहली बार हे क्रिश मधल गाणं असंच आहे का

चंदन सा बदन , चंचल चितवन

हे गाणे नेहमीच
चंदन सा बदन , चंचल सी पवन
असे ऐकू यायचे , अजूनही येते

मीनु Rofl

ये अबोली लाज गाली, रंग माझा वेगळा
ऐक राणी गुज कानी हा सुखाचा सोहळा

असं आहे ते

गोरी तेरा गाव बडा प्यारा या गाण्यातल्या एका कडव्यात "मोड के पाव में" असेच मला नेहमी ऐकू यायचे. ऑफीसमध्ये एकदा तसेच गाणे म्हटल्यावर गाण्यातल्या जाणकार मित्राने जाम फटकारले होते. ते "मोर के पाव में" असे आहे म्हणाला...

ते टायगर श्रॉफ च्या सुपरमॅन वाल्या पिक्चर मधलं जे एन पी टी गाणं नक्की काय आहे?
अजूनही कळलं नाही.
आगे जे एन पी टी, सोना विच पिटी..
अस्सी दुनिया जीती असं काहीसं ऐकू यतं आणी मग कोरस बायांचा गॅन्गस्टर गॅन्गस्टर असा काहीतरी.

जे एन पी टी >>> Lol Lol

Ho aa gaye J A T T
Maaro saaro seeti
Gabru aine sohne
Piche Tina Sweety Pretty
JATT phir se maaro seeti
Sadne waale sad’de reh gaye
Assi duniya jeeti

Pagg peg swag set
Pagg peg swag set

Ho aa gaye JATT
Maaro saare seeti
Sadne waale sad’de reh gaye
Assi duniya jeeti

Yaara da yaar sadda yaara…
Pagg peg swag set
Karda veriyan da khilara…
Pagg peg swag set

Yaara da yaar sadda yaara
Veriyan da khilara
Phir jatt be like a gangster gangster
Gaddi kaali nu leke daude
Sheeshe thalle haule haule
Phir jatt be like a gangster gangster

अस आहे ते... Happy

#माझ्या एका मैत्रिणीला शाहरूख खानचे "प्रिटी वुमन" हे गाणं "कुडी गुमान" असं ऐकू यायचं. नंतर मी ते तसं ऐकून पाहिलं आणि खरंच तसं वाटायला खूपच चान्स आहे.
#माझ्या एका मैत्रिणीच्या वडिलांनी "कांची रे कांची रे" या गाण्यातलया "कोतडपाना" शब्दाचा अर्थ विचारला. सच्चे प्रेमी कोतडपाना अच्छा नही. या ओळीचा.

#मी लहान असताना एजी ओजी हे रामलखन मधलं गाणं आम्ही शाळेच्या रिक्षात म्हणायचो. आणि पुणेरी असल्यामुळे हिंदीचा गंध नव्हता. म्हणून मैं हूं मनमौजी चा मनमौजी आम्ही मनीमाऊ जी असं म्हणायचो. ५-६ वर्षांचे असल्यामुळे तोच जवळचा शब्द होता.

साथिया ये तुने क्या किया .. ह्या सुंदर गाण्यात एक कडवं आहे
दो रंग मिलने के बाद..होते नही हैं जुदा

माझ्या मित्राला ते नेहमी अस ऐकू येतं
दो रंग मिलने के बाद..होते नही हैं जुलाब Happy

त्यामुळे मी आजही जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा
असचं ऐकू येतं
काय करणार आता Sad

>> गोरी तेरा गाव बडा प्यारा या गाण्यातल्या एका कडव्यात "मोड के पाव में" असेच मला नेहमी ऐकू यायचे.
जी करता है मोड के पांव में Biggrin

>> ऐक राणी तु जपानी हा सुखाचा सोहळा
Lol Lol बाय द वे मला हे "ऐक राणी गूढगाणी" असे ऐकायला यायचे.

"बॉम्बे टू गोवा" मधले किशोरकुमार आणि लता मंगेशकर यांचे गाणे: दिल तेरा है मैं भी तेरी हूँ सनम
त्यातल्या कोरस चे शब्द नक्की काय आहेत? मला ते नेहमी "कितनी शानदार जोडी, हि सोळा सालची घोडी" असे काहीतरी ऐकायला येते Biggrin Lol

दो रंग मिलने के बाद..होते नही हैं जुलाब
>>> आता याची पुढची ओळ अशी असावी मग...

"लोटा संभाल.... ये मै चला....
जा रहां कहां... बाजूंमें आ...."

अंथोनी को टोनी कर दे
टोनी को अंथोनी
एक जगह जब जमा हो तिनो
अमर अकबर अंथोनी

मला तेव्हा नेहमीच प्रश्न पडायचं, अंथोनी ला टोनी का करणार

Pages