आठवणीतलं पुणं

Submitted by चिनूक्स on 27 March, 2017 - 03:17

गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.

जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टण्या, तुझं शालेय शिक्षण भावेस्कूलात झालंय हे माहित नव्हतं!! मॅप मस्त आहे तो.

सायकली शिकण्यासाठी/ चालवण्यासाठी भाड्याने मिळायच्या... २५ पैसे तास. सायकल परत देताना चेक करून घ्यायचे ते. पण भाड्याच्या मुलांना द्यायच्या सायकली वेगळ्या असाव्यात कारण सगळ्यांनाच चिकार पोचे आलेले असत! Proud आम्ही न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर अनेकदा जायचो सायकली घेऊन. पण तिथे फक्त पॅडलिंग शिकले. व्यवस्थित सायकल चालवायला शिकले ते रस्त्यावरच. एकदा एका म्हशीला धडकले होते, एकदा एका आजोबांना Proud पॉइंट टु बी नोटेड, की पेठेच्या रस्त्यांवरून म्हशी सर्रास हिंडत असत तेव्हा Happy

पेरुगेटपासचं संजय सायकल मार्ट ना? तिथली एक लाल सायकल सगळ्यात भारी होती. ती मिळावी म्हणून सगळ्यांचा आटापिटा असायचा. ती सायकल एकदा घेतल्याघेतल्याच तिथून जाणार्‍या पीएमटीच्या खाली येणार होते. बसड्रायवरने माझी आणि त्या दुकानवाल्याची तोंडी चंपी केली. मग दुकानवाल्या काकांनी मला नीट चालव असा मायेने सल्ला दिला Proud
आम्हीही घरासमोरच्या रस्त्यावरच चालवायला शिकलो. निवांत असायचे दुपारच्याला. मी पहिल्यांदा धडकले ती नवीकोरी स्वत:ची सायकल घेऊन शनिवारात आजीकडे जाताना. कुंटे (उर्फ जयहिंदचा) चौकात भर गर्दीत एका सायकलवाल्याला. व्यवस्थित खरचटलं होतं.

व्यवस्थित खरचटलं होतं.>>> कोणाला? Proud

टिळक रस्त्यावर होतं एक सायकलचं दुकान, अंबिका अमृततुल्याशेजारी. तिथलीही एक लाल सायकलच भारी होती Happy

>>>सायकली शिकण्यासाठी/ चालवण्यासाठी भाड्याने मिळायच्या... २५ पैसे तास. सायकल परत देताना चेक करून घ्यायचे ते. पण भाड्याच्या मुलांना द्यायच्या सायकली वेगळ्या असाव्यात कारण सगळ्यांनाच चिकार पोचे आलेले असत!

अगदी अगदी!!

यावरून शोभा भागवत यांनी एका पुस्तक प्रकाशनात सांगितलेला किस्सा आठवला. त्यांच्या मुलीला आणि मुलाला त्यांनी "जा भाड्याची सायकल घेऊन या" म्हणून पैसे दिले. तर मुलगी जाऊन दुकानदाराला म्हणाली, "अहो भाड्या, तुमची सायकल देता का?"

हा किस्सा ऐकून हसताना मला अशाच पोचे आलेल्या सायकली आठवल्या!

सायकल वरून आठवलं, मला बाबांनी सायकल चालवायला शिकवली ती भर टिळक रस्त्यावर. शुक्रवार पेठेतून, अत्रे सभागृहाजवळून बाहेर पडायचे, उजवीकडे वळायचे ते थेट विश्रामबाग वाड्यापर्यंत. नंतर लक्ष्मीरोड, कुमठेकर रोड, चितळे बंधू वरून उजवीकडे ते थेट हिराबाग पर्यंत! हा संपूर्ण रूट करताना बाबा माझ्या मागे पाळायचा. आणि हे करायला सकाळी पावणे सहाला उठावे लागायचे. जाम चिडचिड!

तर ७४६ भागवत बिल्डिंग हे इतके अफाट लोकेशन आहे की ऑलमोस्ट १०० जीवनावश्यक गोष्टी इथे अगदी हाके पेक्षा कमी अंतरावर उपलब्ध होत्या. आहेतही. पण तिथे राहणारे कमी झालेत.
१) गोखले हॉस्पिटल मुला चा जन्म व एकं दरीत गायनॅक केअर.
२) वडगावकर डॉक्टर
३) पोस्ट ऑफिस डे. जि. रजिस्टरे व काचेच्या पेटीतून उभे राहून ट्रंक कॉल्स.
४) सेंट्रल बँक. घरा समोर रोड क्रॉस केलाकी.
५) इंटर्नॅशनल बुक स्टोअर व उत्क र्ष बुक व स्टेशनरी. हे बुधवारी बंद असे तेव्हा उगीचच काहीतरी मिसिन्ग वाटे
६) ह्याला लागून एक जनरल स्टोअर होते जे मंगळ्वारी बंद असे व सोमवारी उघडे जेव्हा इतर सर्व दुकाने बंद असत
त्यामुळे कधी पंचाइत व्हायची नाही. ओनर सिंधी होते बहुतेक.
७) नंदन हेअर कटिंग सलून.
८) शंकराचे व हनुमानाचे मंदीर
९) मशीद
१०) गण पती विसर्जनासाठी मोठी नदी अगदी लागूनच की घराला.
११) शिशु विहार, केजी पासून ची शाळा. इथे पण समोर एक बँक होती. पण आम्ही सेंट्रल वाले.
१२) विमला बाई शाळा. कधी कधी घंटा ऐकू येइ
१३) प्रभात लॉज. जास्तीचे पाव्ह णे आल्यास.
१४) दोन लाटेची दुकाने. बी एम दुसरा म्हातारा कानात जास्त केस असलेला( हा प्लॅन बी वाला होता) बी एम खरा आपला वाणी वाटे.
कायम दाणे व खोबर्‍याचा वास येइ. ह्यांची मुलगी आमच्याच शाळेत होती व पुढे हैद्राबादसाइडलाच दिली. तिची हनुवटी अगदी वडी लांसारखी होती.
१५) नवमहा राष्ट्र ऑइल मिल्स. घाणीचे शुद्ध तेल हर प्रकारचे. हे शनिवारी बंद. इथे सर्व तेलांचा एक मिक्स्ड बुके वास येइ. व जमीन जरा तेलकट असे घसरल्याचे फीलिन्ग येइ.
१५) मोरे सायकल मार्ट. सायकल हवी असल्यास.
१६) बिल्डिंगच्या पायथ्यातच टायर रिपेरीचे दुकान, मग
१७) श्रि. युसूफ बोहोरी ह्यांचे भारत हार्ड वेअर. ह्यांचे काही हैद्राबाद कनेक्षन होते. त्यामुळे त्यांचे सामान आम्ही नेत असू कधी कधी.
१८) अजून एक बारका म्हातारा बोहरी ह्याचे फ्रेमचे दुकान. बिल्डिंगच्या एकदम एंट्रन्स ला. तेव्हा नेट नव्हते पण तिथे फ्रेम करायला येणारे अनंत फोटो बघायला मिळत. व फ्रेम कशा बनवायच्या हे पण आम्ही पोरे तिथे बसून बघत असू. भोरी गप्पा मारत काम करी.
१९) टेलर हा जरा आचर ट होता. फार बोलायचो नाही. जेंट्स टेलर होता.
२०) अजून एक श्री बोहोरी ह्यांचे काचसामानाचे दुकान. बाहेर काचा कापत बसत.

२१) पूजा, पूरब व अजून एक अशी उडपी हॉटेले. ह्यातील पूरब मध्ये कधीतरी गेलो आहे. पण इथे कायम जेंट्स व बस डायवर कंडक्ट् र लोकांची वर्दळ असे. पान बिडी सिगारेट चा वास. पूरब पुलाची वाडी साइड्ला होते. पूजा बिल्डिंग समोर. नवे झाले त्या आधी पण एक असेच
साधे हॉटेल होते.
२२) चितळे दोन दुकाने एक खाउचे व एक दूध दह्याचे. थोडे पुढे गेले की दुधाच्या रतिबाचे. ते बील मी भरत असे. ह्याच्या अलीकडे हिंदुस्तान बेकरीचे पॅटिस व खारी मिळे. मनात आले की फक्त दुकानात जाउन आणायचे. किती वेळा तिथून ताजी गरम बाकरव डी, व दुसृया दुकानातून चक्का आणला आहे. व त्यात साखर मिसळून लगेच गार गार खायचा.
२३) फोटो डेवलपमेंट साठी स्टुडिओ. व पॉप्युलर प्रकाशनचे दुकान पन हे जरा दूर झाले घरा पासून.
२४) कराची, वेफर्स व बर्फी. चे दुकान.
२५) घड्याळ हवे असेल तर डायमंड वॉच कंपनी.
२६) माधव, प्रसाद व अजून एक अशी चांगली औषधां ची दुकाने. रात्री नौ परेन्त उघडी असत.
२७) ह्याच्याच पुढे एक खेळ सामानाचे दुकान होते. क्यारम बोर्ड, क्रिकेटचे सेट रॅकेट्स वगैरे.
२८) विलास नावाचे छोटे जनरल स्टोअर एकाच माणसा ने चालवलेले. पण ते खूप उत्साहाने माल दाखवायचे. नवनव्या बाहुल्या वगैरे आणा यचे.
२९) उत्तम भाजी व फळे, चितळे समोर, घरा समोर व एकंदरीत पूर्ण समोरच्या रस्त्यावर
३०) बिलिडिंगीच्या पायाशीच फिशरीचा स्टॉल होता. अजून आहे बहुतेक. इन केस फिश हवे असल्यास!!
३१) फार पूर्वी तिथेच बाजूला दुधाचा व्यापार असे. बर ण्या भरून दूध येइ. व विक्रेते त्यात हात बुडवून चेक करत. ते बघून आम्ही वरून इ उ करू. व चित्ळेचे दूध पीत असू.
३२) समोर वृंदावन चितळेची चीपर व फ्रेंडली व्हरजन. इथे सीझनला आंबे मिळत. आमसुलाचे सार पण लै भारी मिळे. मटार करं जी पापड्या कु रड्या. ..
३३) तेलाच्या दुकाना लगत रद्दीचे दुकान होते. माणूस पाठवून रद्दी नेत. ह्यांच्या समोर एक बाई भिजवलेले कड धान्य घेउन बसे. व एक बाई चांगली पालेभाजी विके.
३४) रीगल बेकरी पेस्ट्री व क्रीमरोल
३५) दर्शन. कटलेट्स चिक्कू मिल्कशेक्स, एकंदर कूल प्लेस.

मस्त आठवणी आहेत . तुम्ही सगळ्यानी खूप मस्त आणि भरभरून लिहिलं आहे पण पूना कॅफे हाऊस चा उल्लेख कोणीच कसा केला नाहीये कि मी मिसलंय की तुम्हाला कोणाला डेक्कन वरच तेव्हा लय भारी वाटणारं रेस्टॉरंट माहित नाहीये ?

३६) प्रभातरोड सुरुवातीलाच शाळेला लागून एक ब्युटी पार्लर. तिथली बाई बॉयकट लै भारी करून द्यायची.
३७) दहामिनिटावर टिळक टँक सारखा मोठा पूल कायम अवेलेबल.
३८) गरवारे कॉलेज दहा मिनिटा च्या वॉक अंतरावर.
३९) पूल ओलांड्ला की अलका थिएटर.
४०) नाईतर नटराज, त्याअलिकडे डेक्कन चित्र मंदिर( धरमवीर इथे बघितला रे फारेंड)
४१ -५१) हाँग कॉग लेन.
५२) बसस्टोप दोन कोथरूड साइडला जायला अगदी घरासमोरच. मग तो अजून साइडला गेला. व डे.जि. चा मेन
५३) उडडाण पूल व्हायच्या आधी साधा व कमी रहदारीचा रस्ता होता. तिठा म्हणावा असा.
५४) इथे एक चस्मे रिपेअर चे दुकान होते. अजूनही असेल. उत्तम सर्विस.
५५) मॉडर्न बेकरी, व जवळच पालेभाज्या व मक्याचे दाणे सोलून मिळत. परवा तो मालक भेटला आई स्टॉल चालवायची तेव्हा तो व मी
शाळकरी पोरे होतो.
५६) काका हलवाई ऑलवेज प्लॅन झी.
५७) नंदन हेअर कटिंग सलून च्या कोपर्‍यात एक माणूस अत्तरे विकायचा. अगदी बारके दुकान होते.
५८) काका हलवाईपासून पुढे गेले की इराणी हॉटेल. ( टु बी अवॉइडेड बाय गर्ल्स नाहीतर चंपी. एकदा इथून आइसक्रीम घेउन ओरडा खाल्ला होता)
५९) तिथून जरा पुढे गेले की एक वाइन शॉप पण आहे. नन ऑफ अवर बिझनेस देन. ऑर नाव.
६०) विमला बाई शाळे समोरच्या गल्लीत पोलिस स्टेशन.

मस्त वर्णन अमा. नवमहाराष्ट्रमध्ये मी यायचे आईबरोबर तेलाची किटली घेऊन. एक प्रकारचा तेलकट-ओशटपणा होता तिथे.
आणि समोर गरवारे पुलापाशी कुठलं हॉटेल होतं? उर्वशी का काहीतरी ना? बाहेर एका बाईचा पुतळा होता तो? तिथे एक लायब्ररी होती, माझी बहिण मेंबर होती तिथे.

अमा, मस्त. एकदम सगळा परिसर तपशीलात उभा राहिला. त्यातली काही दुकाने माहित आहेत. काही नाहीत. डायमंड वॉच कंपनी बंदच झाली ना आता? Sad

सगळेच भारी लिहितायत..
अमा, तुमच्या बर्‍याचश्या आठवणी डेक्कन / (आपली )विमलाबाई गरवारे प्रशाला या परिसरातल्या असल्याने भरपूSSSSSर गोष्टींची उजळणी झाली ! Happy

६१) अलकाच्या शेजारी पूल ओलांडला की विठो बा मंदिर.
६२) लेडीज टेलर हे मंदीर सोडून पुढे घराकडे आलेकी पूल सुरू व्हायच्या आधी. ब्लाउज वगैरे शिवायचा. मध्ये एक चपलांचे दुकान होते.
६३) संगीत विद्यालयः हेतर आमचेच घरचे.
६४) गाडी/ आटो कधी लागल्यास खालच्या मजल्यावरचे भागवतांचे नातेवाईक हाडके म्हणून होते ते आटो चालवायचे व कारां भाड्याने
द्यायचे.
६५) चांगल्या प्रतीचे लेडीज होस्टेल. शिशु विहारच्या वरच्या बाजूस.
६६) चांगले खेळाचे ग्राउंड : डेक्कन जिमखाना ग्राउंड इथे संध्याकाळी खेळ वर्ग असत. एक तासाचे. .
६७) एम एस ई बीचे ऑफिस. बिले भरा तक्रार करा काय पण अगदी घरा जवळ.
६८-८०) घरा समोर म्हणजे चौकात इंटरनॅशनल बुक हाउस समोर रस्ता क्रॉस केला की एक मल्टि स्टोरीड बिल्डिंग आहे
तिथे अनेक ऑफिसेस व डॉक्टर, डेंटिस्ट आय स्पेशालिस्ट ची ऑफिसे आहेत. गणवेश मिळतात. मोबाईल हॅडसेट इत्यादि मिळतात.
इथे फारसे जाणे होत नसे कारण घरचा व माझा जगण्याचा प्याटर्न वेगळा होता. जास्त करून शैक्षणिक बेस.
८१) ग्यआसबत्ती व गॅस शेगडी रिपेअर केंद्र. पायाशीच. मंदिराच्या पायर्‍या सुरू व्हायच्या आधी.
८२) पानडबा. हे दोनतीन होते. एक घराजव्ळ एक दोन समोर.
८३) बॅगा पिशव्या रिपेअरींग चे दुकान. इंटरनॅशनलच्या जरा आधी दोन तीन दुकाने होती त्यातले एक.
८४) काचेच्या बांगड्यांचे दुकान. बायकांच्या हाताच्या मापाला वीड म्हणतात. हे इथे कळले.
८५) फुले व हार माळ्याचे दुकान हा पण आमच्या इमारतीतच तळमजल्याला राहत असे. चितळे शेजारी मेन दुकान. त्यांच्या दोन्ही बायका बसत. समा व यश्वदा. फुलांचे बुके यायच्या आधीचा काळ हार व गजरे, पुष्प गुच्छ मिळत. हिरवी पाने व हिरवा दांडा हातात धरायचा, दोर्‍याने गुंडाळलेला, मग पिवळी फुले, व आत ट्यूबरोज, व मधे एक गुलाब. वर कलाबतुंने गुडाळलेले. आधी सांगितले की गजरे घरपोच येत.
८६) चितळेच्या अलिकडे एक मोठे खेळण्यांचे दुकान होते. सिंधी ओनर.
८७) त्याच्या पायरीवर दुकान बंद असले की पेरू, आंबे विक्रेते बसत.
८८) ह्याच्या अलिक डे कपड्याची दोन तीन दुकाने आहेत. पंचे टावेल, रोज वापरायचे कपडे, बेबी क्लोथ्स.
८९) पोस्टा समोरः नारळाचे खास दुकान.
९०) ह्याच्या अलिक डे पूजा सामग्रीचे दुकान. शेंदूर पासून सर्व मिळते. कापूर, बत्त्या वस्त्रे,

सगळेच भारी लिहितायत..
अमा, तुमच्या बर्‍याचश्या आठवणी डेक्कन / (आपली )विमलाबाई गरवारे प्रशाला या परिसरातल्या असल्याने भरपूSSSSSर गोष्टींची उजळणी झाली ! Happy
+११११११

अमा,
६ नंबर चे दुकान आंतर भारती
मॉडर्न बेकरी शेजारची बॉम्बे बेकरी त्याच्या व बाजूच्या इमारतीतले पहिल्या मजल्यावरचे मुलांचे डॉक्टर शिरोळे, (स्पेशॅलिस्ट हे प्रकरण फार दुर्मिळ होते त्यावेळी)
डेक्कन पोस्टाची इमारतीत इन बिल्ट असलेली चौकोनी आकाराची पेटी, त्याच्या आसपासच बसणारा फक्त लिंबे विकणारा मुलगा,
तिथल्याच नारळ विकणार्‍या माणसाकडे नारळ, आख्खा, अर्धा, खोबर्‍याचे तुकडे अशा स्वरुपात मिळत असे.

९१) पोस्टाच्या अलिकडे झेरॉक्स ची दुकाने आहेत. व खेळसामान वाला पण कॉपी द्यायचा. इथे सायक्लोस्टाइल पण कुठेतरी मिळत असे.
९२) घरासमोरच मोरे सायकल मार्ट च्या शेजारी एक मिठाईचे दुकान होते. पन तिथून कधीच काही घेतले नाही
९३) सर्वात मजेचे दिवाळीची किल्ल्यात ठेवायची चित्रे गवळणी, हरितालिका, पिंड ह्या मूर्ती घेउन येणारे विक्रेते घरासमोरच बसत. फूट पाथ वर. बो अर झाले की खाली चक्कर मारून सर्व बघून यायचे.
९४) गणपती मंडळ हाडके लोक कार्य कर्ते होते. लागूनच मांड्व पडायचा श्रिकृष्ण मंडळ. हे आपले मंड्ळ.
९५) पालखी, गणेश विसर्जन अश्या वेळे फुल्टू जत्रा घराच्या पाय थ्याशीच. मूड आला तर भटकून या. नैतर घरी पुस्तक वाचत बसा.
९६) दुसृया लाटेच्या दुकानाच्या तिथे आता पोळी भाजी केंद्र सुरू झाले आहे. तर ते!!
९७) वीज बिल भरणी चे बारके केंद्र शिशुविहारच्या इमारतीत घराच्या समोरच. रांग नसेल तेव्हा बघून बिल भरून यायचे.
९८) कराची दुकानाच्या शेजारी एक भांडी पातेली विकणा रे दुकान होते/ आहे. शरद नावाचे जनरल स्टोअर होते. व शेजारी एक कपड्याचे दुकान
९९) ही दुकाने बंद असली की तिथे अल्पोपहार मिळे पोहे खिचडी, स्टिलच्या डब्यातून आणत .
पहिल्या मजल्यावर क्लासेस असत. गणिताचे, मराठी स्पेशलचे तांबेसरांचे.
१००) नदी पल्याड स्मशान घाट. हु श्श आता लंच करून येते.

>>>>> पण भाड्याच्या मुलांना द्यायच्या सायकली वेगळ्या असाव्यात <<<<<
असे लिहिले, तर
>>>>> "अहो भाड्या, तुमची सायकल देता का?" <<< अशी परिस्थिति ओढवते... Proud
सबब,
"पण मुलांना भाड्याने द्यायच्या सायकली वेगळ्या असाव्यात " असे लिहावे Wink Happy

पी एम टी बसचे नंबर व रुट दाखवायचे तंत्रही वेगळे होते.
एक लांब लचक कापडी पट्टीवर नंबर व दुसऱ्या तेवढ्याच लांब व बर्याच रुंद कापडी पट्टीवर बस कुठे जाणार त्या भागाचे नाव.
या दोन्हि पट्ट्या दोन वेगवेगळ्या रिळांमध्ये अडकवुन ठेवलेल्या असायच्या प्रत्येक बसमध्ये पुढे व मागच्या दाराच्या वर या कायम स्वरुपी असायच्या या पट्ट्यांवर प्रत्येक रुटचे नाव व नंबर रंगाने (किवा प्रिंटेड) असायचे बस ज्या मार्गावर पाठवायची असेल तो नंबर व रुट रिळ वरखाली फिरवुन लोकांना दिसेल असा ठेवायचा यामुळे प्रत्येक बसमध्ये कोणताहि रुट व नंबर दाखवणे शक्य होते. pmt तेव्हा शिस्तबध्द होती.
कोणाला शक्य असेल तर जुन्या बस, डेक्कन व इतरहि फोटो टाका रे .

एक लांब लचक कापडी पट्टीवर नंबर व दुसऱ्या तेवढ्याच लांब व बर्याच रुंद कापडी पट्टीवर बस कुठे जाणार त्या भागाचे नाव.
या दोन्हि पट्ट्या दोन वेगवेगळ्या रिळांमध्येअडकवुन ठेवलेल्या असायच्या प्रत्येक बसमध्ये पुढे व मागच्या दाराच्या वर या कायम स्वरुपी असायच्या या पट्ट्यांवर प्रत्येक रुटचे नाव व नंबर रंगाने (किवा प्रिंटेड) असायचे बस ज्या मार्गावर पाठवायची असेल तो नंबर व रुट रिळ वरखाली फिरवुन लोकांना दिसेल असा ठेवायचा यामुळे प्रत्येक बसमध्ये कोणताहि रुट व नंबर दाखवणे शक्य होते.>> हो हो अशी पट्टी मी घरी बनवली होती मजा म्हणून मे महिन्याच्या सुट्टीत.

श्रावणी सोमवारी पर्वती च्या पायथ्याशी जत्रा भरायची.आमच्या घराच्या खिडकीतून सगळा परिसर दिसायचा. चार पाळण्याचे चक्र (जे दोन माणसे हातानेच ओढून फिरवत असत) फिरण्याचा आवाज आणि पिप्पाण्यान्चा आवाज रात्रीपर्यन्त येत राही. तासन तास खिडकीत बसून निरिक्षण करण्यात करमणूक होत असे. मधेच पर्वती वर दर्शन घेउन मग डोन्गरावर पतन्ग उडवायला जात असू.
दर वेळेस पर्वती चढताना पहिर्या मोजणे हे न चुकता होई.
३ नम्बर ची बस अगदी सुरुवातीला(१९७२च्या सुमारास) पर्वती चौकातून सुटत असे. खिडकीतून बस आलेली बघून आम्ही पण घरातून निघत असू. बस तिथून कॅनॉलच्या बाजूने तीव्र उताराच्या रस्त्यावरून उतरून ,आता नीलायम आहे तिथून ना सी फडके बन्गल्याच्या इथून वळून विश्व-कल्पनाच्या बाजूने बाजीराव रस्त्यावरून नव्या पुलावरून २० मिनिटात शिवाजी नगरला पोहोचत असे (न. तानाजीवाडी असे नाव होते शेवटच्या स्टॉपचे). पुढे पर्वतीहून निघून मागून लक्ष्मी नगरला वळसा घालून मित्र मन्डळ वरून जाउ लागली. नन्तर ती पद्मावतीहून सुटू लागली.

खडक्वासला धरणा पासून निघून एक कालवा एस एन डी टी च्या बाजुने फिल्म इन्स्टिट्युट रोड , प्रभात रोड , भान्डारकर रो ड ओलान्डून फर्ग्युसन कॉलेज मधून अ‍ॅग्रिकल्चर कॉलेज पर्यन्त गेलेला होता. त्यातून पाणी कधीच वाहताना पाहिले नाही. आम्ही क्रॉस कन्ट्री धावण्याचा सराव या कॅनॉलच्या बाजूच्या पायवाटेवरून करायचो. फर्गुसन कॉ. मैदानातून निघून एस एन डी टी पर्यन्त जाउन परत यायचो. अगदी निर्मनुष्य वाट होती ही. कुत्री पण मागे लागायची. आता कॅनॉल बुजवून त्यावरून डाम्बरी रस्ता झाला आहे.

चतु:शृंगी च्या जत्रेच्या पण अनेक आठवणी आहेत. जाताना चालत, येताना रिक्षा किंवा या उलट, या तोंडी करारावरच घरातून प्रस्थान केलं जायचं.
लहानपणी तिथल्या फोटो स्टुडियोत खोट्या बाइकवर ऐटीत बसून किंवा मग मोराच्या पिसार्‍याच्या आकारातल्या सिंहासन छाप खुर्चीत बसून फोटो काढून घ्यायला आवडायचं. अजूनही जुने असले फोटो जपून ठेवले आहेत. दरवर्षी काही तरी नवीन खेळणं घेण्यासाठी हट्ट करायचो. 'दिल है के मानता नहीं' आला होता, त्या वर्षी आमीर खानची त्या सिनेमातली टोपी घेण्याकरता नऊ दिवस न चुकता हट्ट केला होता, पण घेतली नाही म्हणून जाम चिडचिड झालेली पण आठवते. Happy
आता त्या देवळाचा परिसर पाहिला तर कधी काळी इकडे जत्रा भरत असेल यावर विश्वासच बसणार नाही एवढा बदल झालाय !

केसरी वाड्यात गणपती च्या वेळी आणि मॅजेस्टिक गप्पा हे कार्यक्रम खूप छान असायचे. बालगंधर्व मधे बालनाट्यं ही खूप पाहिली.(एका तिकीटात ३ वगैरे स्कीम्स असाय्च्या!)

अमांच्या पोस्टी मस्त. त्या डेक्कन -चितळे परिसराच्या आठवणी म्हणजे गजरे, हारांचा, उदबत्त्यांचा, फळांचा + चितळे मधल्या खव्याच्या अशा एका विशिष्ट मिश्रित सुवासाशी जोडल्या गेल्या आहेत. Happy

धन्यवाद माझी मेमरी गेली तर मी इथे येउन रिफ्रेश करू शकेन. आज यीअर एंड च्या शुभ मुहुर्तावर डेटा राक्षसाने मला खाउन टाकले आहे. त्यात पोस्ट केल्याव्र मी आर मॉल मध्ये व्हिलेज नावाच्या हाटेलात जेवायला गेले. ते म्हणजे एकदमच खेडेगावात चौकात बसल्या सारखे व पुरुष माणसे बाहेर कामाला गेल्याव्र कसे सुकून वातावरण असते तसे होते. बारकी कॉलेजातली मुले मुली पहिल्यांदाच मिक्स्ड ग्रूप मध्ये आलेली. एक तरूण आयांचा गॄप व बरोबर सर्व वयाची मुले मुली. सर्व झिंगाट, झूपर बूमर घूमर गरबा इत्यादि नाचत होते. त्यामुळे डोक्यात इन्से प्शन सार्खे झाले. एक खरे मुंबईतली उकाड्याची दुपार व प्रेशर खाली असलेले कलीग्ज. ते व्हिलेज मधले उत्साही वातावरण, ते आताच डोक्यातल्या लहान पणातल्या पुण्यातून चक्कर मारून आल्याने तिथेच आहोत असे वाट्णे. अशी सर् मिसळ होत राहिली काही वेळ. त्यात जेवायला पूरी आमरस!! पुरी खायचे दिवस नाही राहिले आता.

चतु:शृंगी यात्रेच्या वेळेस "यात्रा स्पेशल" असे बोर्ड असलेल्या बसेस पीएमटी सोडत असे. विद्यापीठ गेट च्या समोरून त्या सुटत असे लक्षात आहे.

अगदी १९९२-९३ पर्यंत यात्रेच्या वेळेस चतु:शृंगी च्या पायथ्याचा भाग पूर्ण वाहतुकीला बंद होत असे हे लक्षात आहे. मग सलग दोन वर्षे ती जत्रा झाली नाही - एकदा बहुधा प्लेग ची भीती होती व एकदा अजून काहीतरी कारण झाले. नंतर मग कमीच होत गेली.

हो चतुर्शृंगी जत्रा हे एक नवरात्रातलं रिचुअल होतं. ते टिक टिक, पिसांच्या टोप्या, भेळ पाणीपुरीचे स्टॉल आरसे महाल , मौत का कुआँ ... धमाल असायची. त्या जत्रेला जाऊन झालं की वेध लागायचे ते सणस मैदानावर दिवाळीच्या फटाक्यांचे स्टॉल लागायचे तिथे फटाके खरेदी. तेव्हा दिवाळीच्या वेळेस फटाके तिथेच घ्यायला जायचो दर वर्षी. बहुतेक तेव्हा असे कोपर्‍या कोपर्‍यावर या गोष्टी मिळायच्या नाहीत. लक्श्मी रोड वर नवे कपडे खरेदी, तुळशी बागेत किल्ल्याचे सामान, पणत्या वगैरे, मग फीवर चढायचा नुस्ता दिवाळीचा!!

मी लहानपणी सिंहगडला गेलो होतो तेव्हा ते एक निवांत आणि रम्य पर्यटनस्थळ होते हे आज खरे वाटणार नाही. आमचा गट सोडल्यास जवळपास निर्मनुष्य! पावलोपावली ताक हवे आहे का, भाकरी हवी आहे का, भजी देऊ का विचारणारे लोक नव्हते. एखादा ताकवाला कुठेतरी दिसायचा. आणि ते प्यायला मजा वाटायची. एस टी ने पायथ्यापर्यंत आणि मग चाल चाल. एक तो टी व्ही टॉवर सोडल्यास निसर्गरम्य होता. देवटाके, टिळकांचा बंगला, तानाजी कडा, समाधी हे सगळे निवांत बघितले होते. आज इतकी गर्दी असते की तिथे जाणे नको वाटते.

हो. आम्ही शाळेत असताना जायचो तेव्हाही असेच होते. मोजुन ४/५ बायका दही, ताक विकत असायच्या. भजी, पिठले वगैरे लाड नव्हते. घरुनच डबा घेउन जायचो. संध्याकाळी ५.३० का ६.३० ची शेवटची एसटी. ती चुकली की मग बोंबाबोंब. येताना आम्ही खडकवासल्याला उतरायचोच. पाणी अतिशय स्वच्छ असायचे तेव्हा. बादशाहीचा पत्ता दिल्याबद्दल धन्यवाद. पुण्यात गेल्यावर नक्की जाणार.

माझ्या आठवणीतल पुणं म्हणजे शिवाजी नगर (COEP) आणि आजुबाजुचा एरीया. चार वर्षात डेक्कन्/कॅम्प/ लक्षी रोड ला केलेल्या (सायकवरुन) अगणित चकरा आठवतात. चतुर्शृंगी जत्रा पण आठवते. त्यात काढलेला कार मधला, चन्द्रा वरचा फोटो नुकताच व्हॉट्स अप च्या ग्रुप मधे सरकुलेट झालाय Lol

Pages