आठवणीतलं पुणं

Submitted by चिनूक्स on 27 March, 2017 - 03:17

गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.

जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चतु:शृंगीची यात्रा अजूनही असते, पण आधी सारखी गर्दी आता नसते. अजूनही बरेच लोक दर्शनाला येतात. यात्रेच्या दिवसात रात्री उशिरा गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रॉड वरून गेलात तर पायी येणारे पण बरेच जण दिसतात.
या यात्रेच्या माझ्या पण बऱ्याच आठवणी आहेत. अगदी कॉलेजला जायीपर्यंत दरवर्षी यात्रेला न चुकता गेलो आहे.

सर्वात महत्वाची आठवण म्हणजे मी माझ्या पहिल्या गफ्रे ला पहिल्यांदा फिरायला कुठे नेले असेल तर त्या यात्रेला. अगदी आम्ही पाळण्यात वगैरे बसल्याचे पण आठवतंय. Proud

गवत बाजार होता (जिथे रेल्वे रिझर्वेशन सेंटर आहे) तिथे बैलगाडीतून गवताचे हारेच्या हारे आणले जात उतरवले जात विकले जात.>>> हे अजिब्बात माहित नव्हतं !

लाँग लिव्ह गुडलक+१ .. बन, मसाला-ऑम्लेट + आइस टी.. यम्म !!!

माझी पुण्याची सर्वात पहिली आणि लख्ख आठवण आहे ती म्हणजे कात्रजच्या बोगद्यातून बाहेर पडताना होणा-या पहिल्या पुणे दर्शनाची >> +१
कात्रजचा बोगदा !!! अजूनही या बोगद्याचं आकर्षण आहे. मनात कुठेतरी हा बोगदा म्हणजे जणू पुण्याची वेस आहे असं समीकरण आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूला उतार असल्याने, तो कुठल्याही बाजूला पार केल्यावर गाडीला आपसुकपणे वेग येतो. सुट्टीत गावाला जायचं, म्हणजे लाल डब्यातून कात्रज बोगदा पार करणं व्हायचंच.. सगळे नातेवाईक बोगद्याच्या पलिकडच्या कोल्हापूर, बेळगाव, गोवा , कारवार या भागातले असल्याने कात्रजचा बोगदा यायचाच. लाल डब्यात बसून स्वारगेट ते कात्रज बोगदा, असा प्रवास झाला की बोगद्यानंतर गाडी जरा वेग घ्यायची आणि पुणं सोडून सुट्टीला निघालो आहे याचा खरा फिल यायचा. सुट्टीहून परत येतानादेखील, हा बोगदा पार केला की.. चला.. पुण्यात आलो! हा फिल यायचा. कात्रज बोगद्यानंतर खंबाटकी बोगदा पण यायचा, पण त्याची सर कात्रजच्या बोगद्याला नाही येणार! आणि बर्‍याचदा खंबाटकी घाट आणि बोगदा झोपेतच पार व्हायचा ! Happy कॉलेजच्या दिवसात एकदा धाडसीपणा करुन एम-८० घेऊन खेड शिवापूर पर्यंत जाऊ आलो होतो, तेव्हा कात्रजचा बोगदा इतका जवळून पाहताना जाम भारी वाटलं होतं Happy

Yes. M.e.s. college. My love affair with chemistry started there. Still miss the labs raut sir. General wisdom amongst boys was to learn chemistry and then stuff like heat treatment because all factories around pune would certainly have heat treatment plants and there would be enough jobs for all of us. I wonder where are these boys now.

लग्नाच्या वराती असायच्या पूर्वी पुण्यात (इतर शहरांतही असतीलच). संध्याकाळच्या वरातीला रोषणाई केलेल्या रथाच्या आकाराच्या गाड्या, पुढे वाजत गाजत बँडपथक, काही जणांच्या डोक्यावर प्रकाशासाठी पेट्रोमॅक्सच्या बत्त्या असा थाट असे. नवरानवरी बरोबर ही ढिगाने पोरं बसलेली असायची. मुंजीची भिक्षावळ असेल तर बटूसमवेत बसायची.

शनिवार पेठेत अहिल्यादेवीकडून येणारा नातूवाड्याचा बोळ आहे. त्याला वाघाचा बोळ म्हणत. कारण दर मोहरमला तिथे नव्याने वाघाचे चित्र काढले जायचे. समोरच चंदूभाई दारूवाल्याचे मोठ्ठे फटाक्याचे दुकान होते (आहे बहुदा अजून). वाघाच्या चित्राशेजारी जो लगेचच लागून वाडा होता तिथेही एक लिमयेवाडीसारखं आत शंकराचं देऊळ होतं. तेही बहुदा इमारतीबरोबर नव्याने बांधून काढलं आहे. थोडं पुढे अहिल्यादेवीच्या दिशेने गेलं की नातूंच्या आणखी एका वाड्यात उजवीकडे एक छोटा दिंडी दरवाजा होता. त्यात गेलं की एक लांबलचक अंधारी कुबट वासाची बोळकंडी होती. किमान शंभरेक मीटर. त्यातून गेलं की एकदम अप्पा बळवंत चौकाच्या दिशेने मोठ्या रस्त्यावर असलेलं शिवमंगल (बहुदा) नामक मंगल कार्यालय आणि लक्ष्मीक्रीडा बालकमंदिराचं मोठ्ठं पटांगण होतं तिथे निघता यायचं. वहिवाटीतला शॉर्टकट होता तो. त्या दिंडी दरवाज्याच्या डायगोनली समोर गुप्ते वाडा. तिथे चित्रलीला निकेतन म्हणून चित्रकलेचे कोर्सेस चालत. खालच्या मजल्यावर महादेवशास्त्री जोशांचे कोशमंडळ. जुने कॉन्ग्रेस पुढारी नानासाहेब गुप्त्यांचा तो वाडा होता. त्यांची बायको म्हणजे जनरल अरुण वैद्यांची धाकटी आत्या. तिथून लगेचच पुढे डावीकडे एक गल्ली. तोंडावर कोळशाची वखार. तो छोटा बोळ आत व्हीनस प्रकाशनापाशी जाऊन संपायचा. अतिशय साक्षेपी आणि विद्वान संपादक स. कृ. पाध्ये यांचं ते प्रकाशन. त्यांचं ऑफिस आणि घर एका (त्याकाळी खूप मोठ्ठ्या आणि पॉश वाटणार्‍या) इमारतीत होतं. तिचं नाव तपश्चर्या. अजून ती आहे तिथे. प्रकाशन मात्र बंद झालंय.
तिथून पुढे गेलं की उजवी कडे जो बोळ जातो तिथे वळून लगेच डावीकडे वळलं की परत एक डेड-एन्ड बोळ. त्या टोकापाशी राजमाचीकराची गिरणी. गिरणी ही इतकी मोठी, स्वच्छ आणि कारखान्यासारखी चालवली जाते हे पहिल्यांदा आणि एकमेव तिथेच बघितलं. अजस्त्र पासून ते छोट्या सगळ्या आकाराची चाकं. सतत मसाले, हळद, तिखट, भाजण्या, पिठं याचा वास.
तो उजवीकडचा बोळ न घेता सरळ जायला लागलं की उजवीकडे आजच्या सुदर्शन रंगमंच ची जागा. त्याच्याखाली भारत डेअरी. समोरच एक मोठ्ठा गोठा. तिथून पुढे बोळ संपून डावीकडच्या रस्त्यावर अहिल्यादेवी आणि नंतर सुयोग मंगल कार्यालय. सरळ जाऊन डॉ. वा.क. साठ्ये यांचा मूळ दवाखाना (तेव्हा ते खूप नामांकित होते) उजवीकडे, पुढे शनिवार पेठ पोलिस चौकी, मारुतीचा पार, उजवीकडे जाणार्‍या बोळात साधनाचं ऑफिस आणि पलिकडे एक राममंदिर. ही उजवी न घेता सरळ गेलं की नदीकडे, नेनेघाटाकडे जाणारा रस्ता....

हुश्श, एका बोळाचं वर्णन करता करता एवढं लिहिलं... आता कुणीतरी हसबनीस बखळ वगैरे भाग लिहा ब्वा!

वरदा, कुठे ठेवू तुला? त्या काळी शनिवार पेठेत ३ खोल्या होत्या आम्च्या. नेने घाटापाशी एक, वाक साठ्येंच्या शेजारच्या बोळात एक, नवीन मराठीजवळ एक....सदाशिव पेठेत हौदासमोर मामा, ३ आत्या, आईचे माहेर, आजोळ...... खूप नातेवाईक पुण्यातच...नंतर सासरही सदाशिव पेठेत, सासूबाईंचे माहेरही पुण्यातच त्यामुळे जे कोणी जे काही लिहित आहेत ना ते सगळे अगदी थेट ह्रदयापर्यंत पोचतंय. वा . क. साठ्ये च्या शेजारी एक न्हावी होता. केस कापले की तो मुलांना बडिशेपेच्या गोळ्या देत असे. म्हणून आम्ही सगळी मुले आ नंदाने केस कापायला जायचो ते आठवले.

वा . क. साठ्ये च्या शेजारी एक न्हावी होता>> परशुराम त्याचं नाव. मीही केस कापून घेतलेत त्याच्याकडनं - त्या पत्र्याच्या उभट डब्यात ठेवलेल्या बडिशेपच्या गोळ्या खात खात

Hasabnis bakhal my mawas saasu used to live there. In a ti ny one and a half room. Half room was kitchen. She was a school teacher. Husband had a government job. She had a strict schedule of visiting all nearby temples. Very strict but loving lady sadly they were childless. One mame sasar was near that girni. And their mother was living opposite kanya shala. In that tiny one room also they had a tv cabinet anf a showcase. With cute toys no kids played with. I used to love suyog mangal because three functions at the same time!!! I knew all my in laws very well because they were our neighbours.eka kholitale neat sansaar. Bhk language was not so common.

आमच्या घराच्या खिडकीतून ह.बख्ळ दिसायची.
रोज रात्रीची जेवणे झाली की रस्त्यावरून (उरले सुरले अन्न न्यायला) भिकारणी फिरायच्या.

There is a point in hasabnis bakhal if you stand there and look right ahead you will see a narrow lane and other buildings whitewashed just like a medieval painting. White buildings narrow road blue sky. Light pillar. Must visit to see if it is still there.

शनिवार पेठेत अहिल्यादेवीकडून येणारा नातूवाड्याचा बोळ आहे. >>> वरदा, हाच बोळ म्हणजे चित्रशाळा प्रेस वाला का? काकासाहेब गाडगीळ्/विठठलराव गाडगीळांचे घरही त्याच बोळात आहे बहुधा.

कर्वे रस्त्यावर डेक्कन ते नळस्टॉपपर्यंत वडाची मोठी झाडे होती. ती रुंदीकरणात नष्ट झाली. तोपर्यंत कर्वेरोड हा निवांत आणि छान रस्ता होता. आज तो अशक्य गर्दीचा रस्ता बनला आहे. म्हात्रे पूल व्हायच्या आधी त्या भागात देवळे होती. शंकराचे, मारुतीचे आणि समोरे मोठ्ठे वडाचे झाड होते. मुले पारंब्यांना झोके घेत. जवळपास मोजकीच दुकाने. मस्त होते. गोठा, शेजारी बर्फाचा कारखाना. नदीच्या जवळ तर चक्क उसाची शेतं होती. कुठे पेरूच्या बागा होत्या. आता तो निवांतपणा गेला. प्रचंड वाहतूक, आवाज आणि प्रदूषण. :-(.

आयुर्वेदीक रसशाळा गरवारे कॉलेजच्या जवळ होती (आजही आहे बहुधा). तिथे काढ्याचा आणि कुठल्याशा औषधाचा मंदसा वास येत असे. तिथे कुंपणाला लागून सागरगोट्याची झाडे होती असे वाटते. कर्वे रस्त्याला समांतर असणारा तो रस्ता (नाव नाही आठवत) अत्यंत निर्जन आणि रम्य होता.

प्रभात रोड व लॉ कॉलेज रोड हे रस्ते रात्री ८ नंतर एकट्याने जायला थोडी भीती वाटेल इतपत निर्जन होते. आज ते रस्ते ओलांडणे म्हणजे एक दिव्य आहे. लॉ कॉलेजच्या आवारात चंदनाची झाडे होती. त्याच्या बिया चंदन चारोळ्या म्हणून खाल्ल्या आहेत. चंदनाचे लाकूड मोठे झाल्यावरच त्याचा तो सुप्रसिद्ध सुगंध मिळवते. कधी कधी जरा मोठे झाड दिसले की त्याच्या खोडाचा बारिकसा तुकडा काढून त्याचा सुगंध अनुभवला आहे. तिकडून मागे टेकडीवर चिकार भटकलो आहे. हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, गोखले स्मारक, पॅगोडा टेकडी. मस्त होत्या. ससे, साप, विंचू, अनेक प्रकारचे पक्षी दिसायचे. ह्यातले किती आता टिकून आहे माहित नाही.

अमा
हसबनिसांची बखळ +१
तिथे एक पार्किंगची समस्या असलेली इमारत आहे सध्या. मी तीच पाहिलीय पहिल्यापासून.

ह. बखळीपाशी होल्सेल दरात प्रिंटींग पेपर (ए ४ , लिगल ई ई ) मिळत. पेठांमधले तमाम सी ए सी एस पब्लिक तिथुन हे पेपर घेत. आमचे मास्तर आम्हाला महिन्यातून एकदा तरी हे पेपर आणायला लावत. Happy काय काय आठवणी एक एक .. मस्त धागा.

मी आर्टीकलशिपला ज्या ऑफिस मधे कामाला होतो ते बिझिलॅण्ड मधे होते Happy तिथे दिवस्भर विविधभारती चालू असे, तमाम शिंपी लोक रेडिओ लावून मशिनीवर काम करत आणि मशिनचा आवाज आणि मधेच ते विविधभारती अशा वातावरणात ३ वर्षे काढली Happy तिथला च्यावाला च्या सांगितला की जवळ्जवळ २ तासाने च्या घेवुन येई तोवर क्लायंट गेला असे मग तो च्या आम्हाला मिळत असे..

ससे, साप, विंचू, अनेक प्रकारचे पक्षी दिसायचे. >> हे अजून सुद्धा दिसते. अगदी मोर सुद्धा. afp/ vikhe patil school side ने टेकडी चढायला सुरुवात केली की हे प्राणि पक्षी दिसतात.

हसबनीस बखळीसंबंधीची एक सोसेल मीडीयावरची पोस्ट खाली शेअर केली आहे.

पेशव्यांच्या काळात मृत्युदंडासाठी एक वेगळी शिक्षा होती. शनिवारवाड्याच्या मागील भागात थोड्याशा अंतरावर एक खड्डा होता. त्या खड्ड्याच्या तोंडाला एक मोठ्या उखळीसारखे यंत्र होते. मर्जीतून उतरलेल्या माणसाला त्या उखळीत घालत. त्यास एक मनुष्य पुणेरी टोमणे मारून बेजार करत असे तर दोन काडी पैलवान त्यास गुदगुल्या करत. पुणेरी टोमणे खाऊन नामोहरम झालेला असला तरी तो जोरजोरात हसत असे. टोमणे मारणारे पथक एक वाजता घरी गेल्यानंतर मधल्या काळात वरून एक मुसळ जोराने खाली येत असे. त्या मुसळाने मनुष्य अक्षरश: कुटला जाई. मुसळ चालवणा-यास कुटे असे म्हणत. पुढे ते आडनावच पडले. हसवणा-यांचे नाव हसबनीस असे पडले. चार वाजता टोमणे पथक आल्यानंतर त्या माणसाचा जीव किती राहिला आहे याची तपासणी करून कार्यक्रम पुढे चालू ठेवला जाई. मध्येच जीव गेला असल्यास ईसमास त्या खड्ड्यात लोटून दिले जाई.
आज ती जागा हसबनिसांची बखळ म्हणून ओळखले जाते. तिथून पाच पावलांवरच एका नागपुरी संत्र्याचे माफ करा संस्थेचे कार्यालय देखील आहे

हे खरे आहे का ?

हसबनीसांच्या बखळीवरून पंताचा गोठ आठवला. याचं नाव असं का आहे कोणाला माहित आहे का? कोणते पंत होते हे? गोठ म्हणजे, गोठा असावा का?
माझ्या घराची मागची बाजू ही. आमच्या वाड्याच्या मागे एक बोळ होता, त्या पलिकडे एक बिल्डिंग आणि एक बैठं घर होतं आणि मग हा गोठ. एक अजस्त्र असं गुलमोहराचं झाड आहे तिथे अजूनही. आणि फाटकांचा 'बाळंतपणाचा दवाखाना'ही Happy आत्ताची खूण सांगायची, तर न्यू इंग्लिश स्कूलसमोर अमित कॉम्प्लेक्सच्या इथून आत जाणारा हा रस्ता. अजूनही बर्‍यापैकी जुन्या खुणा बाळगून आहे.
घरामागे जे बैठं घर होतं, त्यात आत्ताचा नावाजलेला लेखक- दिग्दर्शक सचिन कुंडलकर रहायचा, म्हणजे त्याचं आख्खं कुटुंबच. तो, सुयोग आणि मी एका रिक्षात होतो. माझी आणि त्यांची शाळा वेगवेगळी होती, पण रिक्षा एक होती- त्याकाळी असं चालत असे Happy लहान असताना ते दोघंही मस्त गब्रू आणि हसरे होते. मग मी शाळा बदलली आणि त्यामुळे रिक्षाही. सचिनच्या एकूण लेखनातून पुण्याचा उबग जाणवतो, फॉर हिज ओन व्हॅलिड रीझन्स, त्यामुळे त्याला ते त्याचं जुनं घर आठवतं का माहित नाही! पण त्याच्या आई-बाबांना नक्कीच ते जुनं घर आठवत असेल, त्यांच्या घरातून कायम रेडिओ/ संगीताचे आवाज यायचे.

काळानुसार आमचा वाडा पाडला आणि कुंडलकर रहायचे ते घरही, तिथे आता एक सरकारी बिल्डिंग आहे, आमचं रेसिडेन्शिअल आहे. पण अजूनही एकमेकांच्या पाठीला पाठी आहेत. तो गुलमोहर दिसतो. आईच्या घराच्या खिडकीत उभं राहिलं की समोर काळ सरकत राहतो. आज एकदम आठवलं हे. फीलिंग गुड! Happy

Suyog ani sachin chya aaiche faar changle palnaaghar hote. Khup motthi jaga hoti tyanchi. Bahula bahuliche lagn faar zokaat asayche tyanchyakade. Aadlya divshi saglya balanchya hataavar mendi kadhaychya kaku. Bale rahayala asaychi tyanchya ghari. Aadlya divashi kadhibhataache tar Dustya divshi jilbiche jevan asayche.

ओहोके! वरदा, धन्यवाद! 'गोट' म्हणजे, एकदम त्यांची खास जागाच डोळ्यासमोर आली Happy

मेधावि, हो का? Happy मला पाळणाघराचं आठवत नाहीये. आईला विचारते, तिला माहित असेल. माझ्या आठवणी रिक्षातल्या आणि रेडिओच्या आवाजाच्या आहेत फक्त.

वरदा मला आठवतो आहे नातूवाडा. मी शनिवार पेठेत रहात होते आणि मोठ भाऊ नूमवि मध्ये होता. त्याला शाळेतून आणायला आईबरोबर मीपण जायचे तेव्हा परत येताना आम्ही नातूवाड्यातून यायचो. खूप नॉस्टॅल्जिक वाटले एकदम. नातूवाडा पाडून मोठे अपार्टंमेंट झाले तेव्हा फार वाईट वाटले होते. त्या वाड्यात एक मोठ्ठा हौदपण होता.

गणपतीच्या दिवसात नातूवाड्याचा गणपती बघायला जायला खूप आवडायचे. मी आई आणि भाऊ असे तिघे जायचो. तिथे नेहमी सायंटीफिक मेसेज मिळेल असा देखावा असायचा. एका वर्षी भूकंप कसा होतो अशी माहिती देणारा देखावा होता तेव्हा त्यांनी आम्ही उभे असलेली जमीन हादरवून भूकंपाचा अनुभव दिला होता. फार भारी वाटलं होतं तेव्हा!!

डॉ. वा.क. साठ्ये पण आठवत आहेत. तू खूपच नॉस्टॅल्जिक केलंस एकदम.

सुरेश भट पुण्यात असले की त्यान्चा मुक्काम पन्ताच्या गोटातल्या एक वाड्यात असायचा. तिथे त्यान्च्या कडून त्यान्च्या गझल त्यान्च्या दिलखुअलास गायकीत खूप वेळा ऐकल्या आहेत .

नातूवाडा म्हणजे चिमण्या गणपतीजवळचा ना? >>>>> नाही. तिथला नाही. अप्पा बळवंत चौकाच्या जवळचा.

Natunchech Shri Mangal karyaalay mazya vadyaatlya jivalag maitrinichech hote. Ghari Roj karyaalayaatun shrikhand puri, jilbi v itar panch pakvannancha daba yaycha. To roj khaun tyanchya gharaatle lok ati kantalale hote parantu aamhi nity nemaane te sagle padaarth mitkyaa maarat avadine khaat asu.

Konala Dr. Anand Gokhale athavatat ka? Bhaveschool chya samor davakhana hota tyancha. Dhanvantari mhanun khyaati hoti tyanchi.

नातूवाड्यातल्या हौदात / विहीरीत लाल मोठे मासेही होते ना!

मी महाराष्ट्रीय मंडळात जात असे तेव्हा पंतांच्या गोटातून रोजच जाणे येणे व्हायचे. तिथेच कामगार न्यायालय होते /आहे. थंडीच्या दिवसात साडेसात वाजताच सामसूम होत असे आणी तिकडून येताना जरा भिती वाटेल असेच वातावरण तयार होई मोकळ्या जागे / वडाच्या मोठ्या झाडामुळे. (अर्थात माझ्याच मनाचे खेळ) घरून, घाबरायचे काही कारण नाही आणि भितीबिती वाटलीच तर भीमरुपी /रामरक्षा म्हणायची असे सांगीतल्या नंतर रात्री बारा वाजता मंडळातले स्नेहसंमेलन संपल्यावरही त्या वेळेसही घरच्यांना येऊ नका असे सांगून एकटेच यायचो. एक मित्र पंताच्या गोटाच्या अलीकडेच (टिळक रस्त्याच्या बाजूला) रहायचा तो एक दिवस फक्त मला लकडी पूलापर्यंत सोबत म्हणून आला होता. पण संपुर्ण निर्मनुष्य लकडी पूलावरून रमत गमत यायला मजा यायची. एरवी रोज येता जाता एखादे लाकूड / दगड लकडीपूलाच्या गजांवर आपटून आवाज करत यायचो तेही करावेसे वाटायचे नाही. त्यावेळेस एकदा वाटलेले 'हाच का तो रोजचा रस्ता, का आपण रस्ताच चुकलोय' असे क्षणभराकरता वाटणे मनात खूप खोलवर उतरले आहे.

लकडीपूलाबाबत अजून एक एकदम लहानपणची आठवण म्हणजे पूर आलेला असताना काही लोकं त्यात उड्या मारून पुढे अष्टभुजे/ओंकारश्वरा पाशी लागत असत. त्यांना पहायला गेलो होतो भितीही वाटत होती आणि उत्सुकताही. उड्या मारल्यावर नुसती डोकीच दिसू लागलेली व नंतर काहीतरी भेलकांडत वाहत जाणारे लाकूड नारळ किंवा तत्स्मम काहीतरी पाहून ते कोणाचे तरी डोकेच आहे असे वाटून खूप भिती वाटली होती.

अष्टभुजेपाशी एक कॉजवे होता त्यावरून पलिकडे गेल्यावर औदुंबर आळीत मॅजेस्टीकची तीन मजली इमारत आहे. खाली प्रकाशन संस्थचे कार्यालय / छापखाना / बांधणी विभाग आणि सर्वात वरच्या मजल्यावर पुस्तक विक्री दालन होते. तिथे हवी तितकी पुस्तके हव्या तितक्या वेळ थांबून वाचायची पुर्ण मुभा होती. माझ्या शाळकरी वयात उन्हाळ्याच्या सुट्टीत मी एकटा जाऊनही / अजीबात पुस्तके विकत न घेताही मला कधीही हटकले नव्हते. निखळ आनंदाचे दिवस. येता जाता नदीतले मासे (हो नदीत स्वच्छ पाणी होते, मासे होते इतकंच नव्हे तर रंगीत मासे ही होते) पकडून व बाटलीत ठेवण्याचे उद्योगही केले आहेत. ती बाटली घरच्यांपासून लपवून पोटमाळ्यावर ठेवणे, जेणेकरून आपण नदीत उतरून मासे बिसे पकडतो हे त्यांना कळू नये या करता केलेला आटापिटा आठवून मजा वाटते.

हर्पेन, आम्हीही बाटलीतून मासे पकडून आणायचो कॉजवेवरून. मजा वाटायची तेव्हा.
मॅजेस्टीक गप्पांना तर अनेक वर्षे हजेरी लावली आहे. खूप सह्या पण गोळा केल्या तेव्हा.... मृणाल व मधुरा देव, विणा व विजय देव असे सगळे जण असायचे तिथे. खूप चांगल्या चांगल्या लोकांच्या मुलाखती ऐकता आल्या शालेय वयात. त्याचा पुढील जडण घडणीत खूपच चांगला फायदा झाला.
पुलावरून उ ड्या मारून मग पुढे तरंगत बंड गार्डन पर्यंत जाणे हा आम्च्या वर्गातल्या बर्याच जणांच्या आजोबांचा तरूणपणीचा छंद होता बहुतेक Happy कारण सिमिलर स्टोर्‍या बर्‍याच जणांकडून ऐकल्या होत्या Happy

<>
आम्ही जात असू त्यान्च्याकडे.
आता डॉ. गोखले हयात नाहित. तिथे आता डॉ दिलीप देवधर दवाखाना चालवतात.

Pages