आठवणीतलं पुणं

Submitted by चिनूक्स on 27 March, 2017 - 03:17

गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.

जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तळजाईचा भूत बन्गला ४-५ वर्षान्पूर्वी जमीन्दोस्त केला. आता तळजाईवर जायला डाम्बरी रस्ता आहे. रोज रात्री ९-१० वाजेपर्यन्त भरपूर वर्दळ असते. आतल्या वनात ( जिथे अजूनही मोर दिसतात) जायचे दार सन्ध्याकाळी ७ वाजता बन्द होते.
सवाई महोत्सव रेणुकास्वरूप मधे असेपर्यन्तच खूप मजा होती (माझे मत). रात्रभर पूर्ण जागून तीनही दिवस नोकरीवर हजर रहायचो आम्हीही मित्र लोक. तिथे १९८१ ते ८७ पर्यन्त कुमारजी , भीमसेनजी , हरीजी , जसराज जी , शिवकुमार जी , झाकीर जी , अल्ला रख्खा जी , रवी शन्कर जी , अभिषेकीबुवा यान्ना भरभरून ऐकले आहे. हे सर्व दिग्गज कलाकार पुणेकर रसिकान्चे आवर्जून कौतूक आणि आदर करायचे.

शनिवारात एक स्टोव्ह रिपेअरचे दुकान व त्याच्याकडचा बोलणारा पोपट >>> हे अंधुक आठ्वते आहे.
राजमाचीकर गिरणी आठवते. आता आहे की नाही माहित नाही.

आम्ही तळजाईचा भूत बंगला बघायला लहान असताना गेलो होतो. तेव्हाच वाघजाईच्या पाच टेकड्या चढायचो. तिथून पर्वतीवर मागच्या बाजूने जाता यायचे. आता कदचित ह्या टेकड्या गायब झाल्या असतील

पर्वती च्या मागील सर्व टेकड्या वनविभागाच्या देखरेखीमधे सुस्थितीत आहेत. परन्तू पर्वतीवर विष्णू मन्दीर - कार्ती कस्वामी मन्दीराच्या मागच्या बाजूला कुम्पण घातल्यामिळे तिकडून प्रवेश करता येत नाही.

तसंच आता त्या बाजूला प्रायव्हेट कॉलेज झालंय त्यामुळे सकाळी आठला तुळशीबागवाले कॉलनीतून तिकडे जाणारं गेट बंद करून टाकतात.

पर्वती च्या मागील सर्व टेकड्या वनविभागाच्या देखरेखीमधे सुस्थितीत आहेत. >>> अरे वा!! हे ऐकून फारच आनंद झाला.

लिमयेवाडीत एक खूप सुरेख जुने शंकराचे देऊळ होते. तिथे बसायला खूप छान वाटायचे. मध्यंतरी बघितलं तर एकदम नव्याने बांधून काढले आहे. सगळा चार्म गेलाय त्याचा.>> खरच. माझ्या शाळेच्या रस्त्यावरचे हे देऊळ. हमखास शाळेत जाताना किंवा येताना इकडे पावले वळायचीच. तिथेच बहूतेक एक पेरुचे झाडही होते.

तर नामशेष झालेल्या काही वास्तुंपैकी आणखी एक म्हणजे आत्ता जिथे ९ सदाशिव नामक सदाशिव पेठेतील मोट्ठी सोसायटी होऊ घातली आहे तिथले शिवाजी मंदिर व त्या समोरील रस्त्याच्या मध्यभागी असलेले हनुमान मंदिर हा दोन्ही वास्तुच गायब झाल्या. शिवाजी मंदिर तरी गेल्या ३-४ वर्षात झाले असेल पण ते हनुमान मंदिर अचानकच रस्तारुंदीमधे गायब झाले.

काळ्या हौदाच्या बरोब्बर समोर एक इंद्रायणी नावाचा बंगला (बिल्डींग) आहे. भुताचा बंगला म्हणुन कुप्रसिध्द असलेल्या या बंगल्यात मी अनेक वर्ष कुणालाच रहाताना बघीतले नव्हते. तिथेच खाली एक दुकान होते जिथे कुठलाही धंदा कधी चालला नाही किंवा चालवताना बघीतला नाही. मध्यंतरी पोस्टाची एक शाखा मात्र तिथे चालु झाली होती. काळ्या हौदाच्या बरोबर मागे एक छोटे ग्राउंड होते. तिथे शाखा भरत असे. खेळायला मिळते म्हणुन अधुन मधुन उत्साहाने या शाखेत जाणे होते पण मुख्य आकर्षण समोरील नातु पटांगणाचे होते.

असे मध्यंतरी वाचले होते व एक व्हिडीओ पण बघीतला होता की कात्रज तलावा पासुन शनिवारवाड्यपर्यंत एक पाण्याची ऐतिहासीक लाईन आहे व त्या लाईनला जोडुन हे सगळे हौद आहेत. काळा हौद, बदामी हौद, भाऊ महाराज बोळातला हौद वगैरे. या पैकी बदामी हौद मी कधी बघीतला नाही पण काळा हौद व भाऊ महाराज बोळातील हौदावर बायकांना कपडे धुताना बघीतले आहे. आता हे दोन्ही बंद झाले. आता भाऊ महाराज बोळात जिथे पार्कींगची जागा आहे तिथे होता हौद.

बदामी हौदापाशी अनेक वर्ष एक आईसक्रिमवाला बसत असे. पॉट आईसक्रिम. 'सावळा हरी' असे त्याचे नाव. याच्या कडुन आईसक्रिम आणणे म्हणजे धमाल असेल. पत्रावळीच्या पानावर ते मिळत असे. त्यामुळे सोबत पोळ्यांचा डबा वगैरे नेऊन त्यात ४ ५ गोळे आणायला पळणे म्हणजे सुख.

आमच्या शाळेतही (पेरुगेट भावे हायस्कुल) एक भाग होता तो खूप जुना व कौलारु होता. शाळेत त्याला झोपडपट्टी वर्ग संबोधले जायचे. आमचा वर्ग इथेच असायचा. शाळेतुन पलायन करताना जो खुष्कीचा मार्ग लागे तो झोपडपट्टी जवळच होता त्यामुळे आमचे या वर्गांवर भयंकर प्रेम. Proud

आमच्या शाळेतही (पेरुगेट भावे हायस्कुल) एक भाग होता तो खूप जुना व कौलारु होता. शाळेत त्याला झोपडपट्टी वर्ग संबोधले जायचे. आमचा वर्ग इथेच असायचा. शाळेतुन पलायन करताना जो खुष्कीचा मार्ग लागे तो झोपडपट्टी जवळच होता त्यामुळे आमचे या वर्गांवर भयंकर प्रेम. अ‍>> हा हा. आमच्या विमला बाई गरवारे मधून पण वर्ग क्रमांक २८ अतिशय बेस्ट लोकेशन. टिळक टयांक. दिसायचा व गारवा असे. उत्तम नवी बाके शाळेने घातली होती तिथे त्या वर्गात पण लोकांनी कंपासच्या नाइतर कर्कटकाच्या टोकाने सर्व बाकांमधली लांबी काढून टाकली.
तिथे टीव्ही पण होता शाळेतला एक मेव. कॅबिनेट मध्ये बंद.

शाळेतुन पलायन करताना जो खुष्कीचा मार्ग लागे >:D . आम्च्या नविन मराठी शाळेतुनही होता असा एक खुष्कीचा मार्ग ! नुस्तं त्या एरियातुन गेलं तरी मला फार सुरेख वाटतं!. फार निरागस आणि सुखाच्या बालपणाचे दिवस!

नवीन मराठी शाळेच्या आठवणींवर वेगळा बाफ काढावा लागेल. चिंचेच्या झाडात बसल्यासारखे वाटत आहे. मागच्या पटांगणा त मागे कोपर्‍यात एक होते.

राजमाचीकर गिरणी आहे. उत्तम स्थितीत चालू आहे.
तळजाईवर डांबरीकरण, पथदिवे, भिंती घालून तिला बरीच 'माणसळवली' आहे- जे एका दृष्टीनं बरंच आहे. तिथला सिनिस्टरपणा त्यामुळे कमी झालाय. भूत बंगल्याची पडझड झाली आहे. त्याची भीती आता कोणालाच वाटत नसेल, पण एकेकाळी जबरदस्त थ्रिलिंग स्पॉट होता तो Happy

माझ्या वडिलांची शाळेची 'सहल' (ट्रिप नव्हे! :)) अरण्येश्वर आणि पद्मावतीला यायची. अरण्येश्वरापाशी आता एकही झाड नाही, पण पद्मावतीचा परिसर बर्‍यापैकी रम्य आहे.

चतुर्श्रुंगीचाही कायापालट झालाय. पण मस्त आहे तो भाग अजूनही.

तो 'नर्तकीचा पुतळा' तो लकडीपुलावरून दिसायचा, तो बाजीराव रस्त्यावरच्या राणा प्रताप उद्यानात हलवला होता ना?

माझ्या वडिलांची शाळेची 'सहल' ( ट्रिप नव्हे! :)) अरण्येश्वर आणि पद्मावतीला यायची>> आमची पण सहल जायची तिथे. नाहीतर खडकी दूध कारखाना. तिथे प्रथम गार गोड दूध प्यायला मिळाले. ते ही फ्री फ्री फ्री. राजमाचीकर गिरणी जवळ आमचे नातेवाईक राहायचे. कायम येणार्‍या जाणार्‍यांचा राबता असे. आणि एक फेंट दरवळ असे. तिखट मसाल्यांचा.
चतुश्रुंगीच्या देवळाच्या डोंगरातच अलिक्डे पायथ्याशी बहिरट वाडी म्हणून वस्ती होती. तिथे माझा मामा काही वर्शे राहायचा. किर्लोस्कर मध्ये नोकरी. कधी तिथे राहायला गेले की डोंगर चढून वर जाउन बसायचो. आणि मग दिवेलागणीला बहिरट वाडीतून तूर डाळ व भात एकत्र शिजल्याचा वास हवेत यायचा. साधी वस्ती होती. दीप बंगल्याच्या पुढे गेले की राइटला. बसने जायचो मामाकडे जिमखान्या वरून. पण परत घरी यायला मस्त वाटायचे. जत्रा खरेच मस्त होती. गजाननाने एक धागा काढला आहे जत्रांवर तिथे लिहीले आहे. तिथे एक उंच उंच माणूस ड्रेस घातलेला. आरश्यांचा स्टॉल. मौत का कुंवा. रंगरंगोटी करून देणारे स्टॉल, बुढ्ढी के बाल. व प्लास्टिकच्या आणि रंगीत पिसे लावलेल्या टोप्या मिळत. ह्या टोप्या घातलेला आम्हा सर्व भावंडांचा एक फोटो मजकडे आहे. फोटो स्टॉल मध्ये कार च्या कटाउ ट च्या मागे बसलेली मुले. धाक ट्या मामेभावाला मी कडेवर घेउन बसले होते. व तो दोन हातांनी टोपी संभाळत होता. दोन मामे बहिणी व दोघी माझ्या बहिणी.
हे फोटो लगेच मिळत व काळे पांढरे व रंगीत असे मिळत. कलर प्रिंट नव्हे. तेच चित्र वरून रंगवलेले. Happy

चोर चोर नावाचा एक जुना हिंदी सिनेमा (विजय आनंद, इफ्तेकार इ.) लायब्ररीत मिळाला. तो पहायला घेतला तर त्यात चक्क अलका टॉकिजच्या समोरच्या चौकाचे दृश्य होते. १९७० -७५ साली तो भाग जसा होता तसे. राधेचा पुतळा, कारंजे, ते इराणी हॉटेल, जुना लकडी पूल. खूपच आनंद झाला ते पाहून. तसे जेमतेम मिनिटभर दिसले असेल. पण पुन्हा पुन्हा पाहिले.

तो सिनेमा तसा ठीकच होता. पण ह्या दृश्यामुळे तो खूपच आवडला!

पेरुगेट भवेस्कूल मधे ३ वर्षे मझा वर्ग झोपडपट्टीत होता. शेजारच्या जागेत नारळाची झाडे होती आणि अचानक नारळ आणि झावळ्या पडायच्या !
विमलाबाई गरवारे मधला पहिल्या मजल्यावरचा टिळक तलावाच्या बाजूच्या वर्गात एक वर्ष मी होतो. दुपारी तलावातले शान्त पाणी बघण्यात छान वेळ जायचा. गम्मत म्हणजे पुढे एस पी कॉलेज मधेही बायॉलॉजी बिल्डिन्ग मधे आमचा १.५ वर्ग तलावाच्या बाजुलाच होता.

माझा एरिया पर्वती आणि डेक्कन जिमखाना . मे महिन्याच्या किव्वा कधी मधी दिवाळीच्या सुटीत फक्त जात असू . राहायला मुंबईत . सकाळी उठून पर्वतीवर जायचंच जायचं आणि संध्याकाळी पेशवे उद्यानात. निलायम मध्ये सिनेमे बघायचे . कल्पना भेळपुरी वाला असायचा तिथे भेळ . अधून मधून मामाकडे डेक्कन वर चालत. वाटेत ना. सी फडक्यांचा बंगला लागायचा . अरे हो सारस बागेत पण जात असू. गुडलक कँफे. नटराज, डेक्कन, भानूविलास मध्ये बघितलेले सिनेमे Happy

भावेहायस्कुलमधिल त्या "झोपडपट्टी" वर्गातील दोन वर्षे, व एकुणच भावेस्कुलमधिल ३ वर्षे माझ्या जीवनातील अत्यंत कटू कालखंड होता. पण तरीही आम्ही मजाही खुप केली.

शेजारच्या जागेत नारळाची झाडे होती आणि अचानक नारळ आणि झावळ्या पडायच्या !>> तो नेमका शनिवारी पडला तर आमचे इतिहासाचे सर कुणाला तरी पिटाळायचे तो आणायला. जो आणायला जाई त्याला नारळातला मोठा भाग व पाणी मिळे त्यामुळे त्या करता चढाओढ लागत असे. Happy

मला माझ्या बालपणीचे कॅम्प जास्त आठवतय.
बरयाच इराणी कॅफे अजुन ही आहेत.पण बरीच जुनी बंद ही झाली आहेत.त्यात मिळणारे पदार्थ ही दुर्मिळ झालेत.बडे का मटन, खिम्याचे सामोसे.इ. बनमस्का आनि चहा मात्र अजुनही मिळतो.
एम.जी रोडवर मात्र लहानपणी वाटायची तेवढी गंम्मत अनै मजा सध्या च्या नाताळ आनि ३१डिंसेबर ला वाटत नाही.एम.जी ऱोड ही बराच बदलला आहे.कॅम्पातल्या छोट्या छोट्या गल्ल्या बोळामधल्या फुटभर दुकांनानी मात्र आता कात टाकली आहे.जुन्या बेकरीस पण आहेत.माझ्या छोट्याला हे सगळ आता दाखवायला हव. Happy
पुण्यातल्या पुण्यात सुदधा दोन चौकांच्या अंतरावर वातावरण , लोक्,खान पिण सगळ वेगळ होत आनि आज ही अजुन बदलत जात आहे.

वरच्या पोस्ट्स मधे कोणीतरी पी एम टीचा उल्लेख केलाय .
जोडबस सातारा रोड वर अन सिंहगड रस्त्यावर धावायची अस आठवतय. विठ्ठल्वाडीला जायला ( तेव्हा कुठल्याकुठे लाम्ब होत ते.
३ नंबरची बस ( ही जुन्या बसेस पैकी गोल एजेस असलेली )स्वारगेट पेरुगेट कॉर्पोरेशन अन ४ नंबर्ची सरळ अलका प्र्यन्त जाउन डेक्कन ला जायची ही अशोकाची चौकोनी डब्बा नव्यापैकी होती . ह्या दोन्ही विषेश जिवलग होत्या. सदाशिव्पेठेत शाळा होती . साहित्य्परिषदेचा स्टॉप २५ पैसे तिकिट असायच. चालत एस पी पर्यंत गेल तर ४ अन ३ दोन्ही बस मिळायची सोय व्हायची अन तिकिट २० पैसे अस्ल्यानी पाच पैशात ३ पानाच्या गोळ्या यायच्या.
मार्केट यार्डाचा बस स्टॉप चे पहिले प्रवासी आम्ही म्हणायला हरकत नाही. सकाळाच्य पहिल्या बस नी शाळेत जाताना , बस काका ( कंट्रोलर ) ना कुलूप उघडणे , इतर मदत केल्याच आठवतय अन मैदानावरून पळात येणार्‍या मी अन माझी बहिण दिसलो की बस आमच्या साठी थांबायची हे ही आठवतय! Happy

जोडबस सातारा रोड वर अन सिंहगड रस्त्यावर धावायची अस आठवतय.>>>>>>>एक जोडबस वारजे जकातनाका ते डेक्कन जिमखाना अशी पण होती. आम्ही तेव्हा वारजे जकातनाक्याजवळ रहात होतो. ती बस वळून नाक्यावर ५ मिनीटं थांबून परत निघायची. ती बस आलेली बघून , आम्ही घरातून घरातून निघून बस पकडत असू. तिकीट बहुतेक कर्वेनगर पर्यंत ५०/- पैसे आणि डेक्कन पर्यंत १ रुपया होते.

नंतर पौड रोडला रहायला आलो. तेव्हा तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वडाची खूप झाडे होती. वटपौर्णीमेला महिलांची गर्दी आणि दोर्‍यांनी बांधलेली वडाची झाडे दिसायची. आता जिथे शिवतीर्थ नगरची कमान आहे, त्याच्याअलिकडे, तिथे पूर्वी एक नाला होता. पावसाळ्यात तो सर्व परिसर "पाणीच पाणी चोहीकडे, गेला रस्ता कुणीकडे" असा होत असे. आता जिथे "समर्थ" हॉटेल आहे तिथे पूर्वी उकीरडा होता आणि पूर्वी तिथे स्मशान होतं असं ऐकलं होतं.
खूप कमी इमारती आणि भरपूर झाडे असा मस्त परिसर होता. फक्त डांबरी रस्ता नसल्याने, पावसाळ्यात चपलांचे वजन वाढून, कधी कधी त्या आमच्या पायांचा त्याग करायच्या. Proud

ईथे आधी उल्लेख झालाय का माहित नाही पण मी एक खानावळ शोधतेय गेले काही वर्षे. कुठेतरी मध्यवर्ती भागातच आहे. तिथे अगदी जुन्या काळातले कपडे घालुन काका, मामा लोकं अगदी सात्विक जेवण वाढत असतात. पेल्यातुन ताक देतात. थाळी २५ का ३५ रु. ला मिळते. नावच आठवत नाहीए. अगदी जुने बांधकाम आहे खानावळीचे.

राया तुम्हाला आशा डायनिंग हॉल ची आठवण काढताय का?
आपटे रोड ला होता मस्त कौलारू वास्तु होती,
आता तो पण री डेव्हलप झालाय, आणि it's just another dining hall now.

बादशाही म्हणत असतील. तिकडे गेल्यावर्षी पर्यंत जुन्या काळातले (कदाचित जुनेच) कपडे घालून जेवण वाढत असत. पण यावर्षी गेलो तर फुल पॅट घालून जेवण वाढलं, आणि पुण बदललं, आमच्यावेळी असं न्हवत म्हणायची वेळ आली.
पण एकदम छान प्रेमळ पणे आग्रह करून जेवण वाढतात आणि ताक अजूनही अनलिमिटेड मिळतं.
आशा एकदम कमर्शिअल झालाय.

पेरुगेट कौलारी वर्गांच्या बाजूने मीदेखील अनेकदा पळून गेलो आहे. त्या मागल्या गल्लीत उडी टाकली की सीलाइ टेलरच्या दुकानाच्या बाजूने बाहेर येऊन धूम फटाक. आमच्यावेळी त्या कौलारी वर्गात ११/१२वीचे वर्ग भरत.

bhaveschool.JPG

म्हात्रे पूल बांधल्यावर लगेच खचला होता की कायतरी झाले होते. त्यामुळे त्यावरून रहदारी सुरू झाली नव्हते अनेक दिवस. तो पर्यंत म्हणजे बहुतेक ८७-८९च्या दरम्यान सेनादत्त कडून पुढे दत्तवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर (अनंत कान्हेरे पथ) आम्ही भर दुपारी स्केटिंग केल्याचे तसेच क्रिकेट पण खेळल्याचे आठवते.

माझ्या आईला सांगितले पाहिजे लिहायला. तिच्या आठवणी साधारण ६० ते ७५च्या मधल्या आहेत. पुरात त्यांच्या लक्ष्मी रोडच्या माजघरात पाणी भरले होते. त्यानंतर आजोबांनी स्वतःचे घर बांधले राजेंद्रनगरमध्ये (सेनादत्त पोलिस चौकीच्या पुढे दत्तवाडीकडे जाताना). तेव्हा म्हणे अलका टॉकीज पासून पुढे संध्याकाळी एकट्याने येताना भिती वाटत असे - म्हणजे आजच्या लालबहादुर शास्त्री रोडवरून Happy
तिच्या आठवणीत बर्‍याच सभा/व्याख्याने/साहित्यविषयक चर्चा आणि भांडणे यांचे उल्लेख येत असतात. कुमार सप्तर्षीचे कुटुंब त्यांचे भाडेकरू होते. त्यामुळे अनिल अवचट व गँग त्यांच्या घरात अनेकदा येत असे. सप्तर्षी अनेक वर्षांचे भाडे बुडवून गेले याचे आजोबांना वैषम्य होते! Proud

"बादशाही" मधे जाणे होत नाही पण "आशा डायनिन्ग" मधे नेहमी चक्कर असते. वास्तू नवीन झाली असली तरि बरेच वाढपी जुनेच आहेत , अतिशय प्रेमाने / आपूलकीने वाढतात. पदार्थान्ची चवही अजून तीच टिकून आहे.
कॅम्पातले "नाझ" सामोशान्साठी अतिशय फेमस. ते आता बहुधा बन्द झाले पण मार्झ- ओ- रीन अजुनही आहे . कायापालट झालाय पण त्यान्चा वेगळेपणा टिकून आहे !

<<येस्स. बादशाही! पत्ता देता का प्लीज?>>
टिळक रोड वर बादशाही इतक सान्गीतले तरी कोणीही दा़खवेल. फार तर "टिळक स्मारक मन्दिरा जवळ" अस सान्गा !

टिळक रोड वर बादशाही इतक सान्गीतले तरी कोणीही दा़खवेल. फार तर "टिळक स्मारक मन्दिरा जवळ" अस सान्गा !>>> +१००
छोटी छोटी बाकडी स्टुल आहेत.तरीही एकमेकांना कोपर न ढोसता नीट जेवता येते.पाट्या पण वाचनीय. Happy

Pages