मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> तिकडे अभिषेकी बुवा ढसा ढसा रडतील हे कळाले तर.

मी ज्याचा उल्लेख केलाय ते डॉ. वसंतरावजी देशपांडे यांनी गायलेले "घेई छंद". इथे ऐका:

https://www.youtube.com/watch?v=FIpEFqyv9YE

अतुल, अभिषेकींचे व्हर्जन पण आहे, आणि ते स्लो चालीत आहे, मला तेच वाटले होते आधी.
तसेही नाटकाचे संगीतकार अभिषेकीच आहेत.

माय नेम इज शिला, शिला केजवानी अस ऐकू यायचं मला वाटायच की ती आपल पुर्ण नाव सांगत असावी. >>>

ते तसच आहे बहुदा! त्या सिनेमाच्या प्रोमोशन साठी अक्षय कुठल्यतरी टीव्ही शो मध्ये आला तेंव्हा त्याने हेच सांगितलेले शीला केजवानी तिचे नांव आहे म्हणून! ख खो अक्षयच जाणे! Wink

>> अतुल, अभिषेकींचे व्हर्जन पण आहे, आणि ते स्लो चालीत आहे
हो. ते ही ऐकले आहे. पण "हे SSSS ईटांग" साठी फास्ट व्हर्जनच हवे Biggrin जुन्या काळात रेडिओवर ऐकायला मिळणारे
(ऐकायला काय येतेय हा विनोदाचा भाग झाला. पण डॉ. वसंतराव देशपांडे यांनी हे अप्रतिम गायिले आहे. तळपत्या तलवारीप्रमाणे आवाज)

<<ते तसच आहे बहुदा! त्या सिनेमाच्या प्रोमोशन साठी अक्षय कुठल्यतरी टीव्ही शो मध्ये आला तेंव्हा त्याने हेच सांगितलेले शीला केजवानी तिचे नांव आहे म्हणून! ख खो अक्षयच जाणे<< बरोब्बर कृष्णाजी! मी पण हे वाचले होते ...बहुधा इथेच माबोवर चर्चा झाली होती.

मी पण हे वाचले होते ...बहुधा इथेच माबोवर चर्चा झाली होती.>> मी तो प्रमोशन शो पाहिला होता टीव्हीवर! त्यात त्याने संगितले होते!

इचक दाना बिचक दाना हे गाणं मी लहानपणी असे गात होतो

इचक दाना बिचक दाना
दाने उपर दाना इचक दाना
लडकी उपर लडका नाचे ( Proud )
लडका है दिवाना, इचक दाना

गाणं असं आहे

इचक दाना बिचक दाना
दाने उपर दाना इचक दाना
छज्जे उपर लडकी नाचे, लडका है दिवाना इचक दाना

मला ऐकू यायचं

ये नयन डरे डरे, ये जाम भरे भरे,
जरा पीने दो,
कल कि किसको खबर, इस रात के निरर,
मुझे जिने दो.

गाणं असं आहे
ये नयन डरे डरे, ये जाम भरे भरे,
जरा पीने दो,
कल कि किसको खबर, एक रात होके निडर,
मुझे जिने दो. Happy

आधी अर्थ कळायचा नाही, आजच सकाळी नीट ऐकू आलं आणि कळाला.

"लव्ह, सेक्स और धोखा डार्लिंग" ला मी "राँग साईड को ठोका डार्लिंग" असं ऐकायचे Happy

>> "लव्ह, सेक्स और धोखा डार्लिंग" ला मी "राँग साईड को ठोका डार्लिंग" असं ऐकायचे
आत्ताच ऐकून पाहिले. अगदी असेच ऐकायला येतंय Rofl Biggrin Biggrin

अजुन एक

मेरा नाम राजु घर आना जरा
रहती है गंगा वहा मेरा काम

मला वाटायचं हा घरी तर बोलवतोय, मग काम इकडे करतो असे का सांगतोय कि म्हणजे तुम्हाला जर मला भेटायचंय तर डायरेक्ट तिकडे या असं तर नाही ना सुचवायचं आहे.

करेक्ट गाणं :-
मेरा नाम राजु घराना अनाम
बहती है गंगा जहा मेरा धाम

गाणी चुकीची ऐकू येण्यापेक्षा सुद्धा, आपण जे ऐकलं त्याचा आपल्याला पटेल असा अर्थ लावणं (पूर्वेला अंधार, गंगेकाठी घर आहे, तिथे जरा काम होतं वगैरे) हे जास्त मनोरंजक आहे.

ऐंशी च्या आसपास आलेल्या "नूरी" मधील नितीन मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेले प्रसिद्ध गाणे,

आजा रे, आजा रे ओ मेरे दिलबर आजा. दिल कि प्यास बुझा जा रे...

"दिलबर" हा हिंदी शब्द परिचित नसल्याने हे लहानपणी असे ऐकायला यायचे

आजा रे, आजा रे ओ मेरे दिल पर आजा. दिल कि प्यास बुझा जा रे...

आणि अर्थ समजून घेण्यासाठी याचे मराठीत भाषांतर करताना भलतेच अर्थ निघायचे Biggrin Biggrin

माझा एक मित्र 'बेबी डॉल मै सोने दी' हे गाणं मराठीत लदबदलेल्या आणि अनेक नादयुक्त शब्दांनी बरबटलेल्या पंजाबी+हिंदी मध्ये अत्यंत आत्मविश्वासपूर्ण गात असताना मध्येच 'मैने खा लिया रेनडिअर अख्खा' अशी ओळ ऐकू आली आणि माझा माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही!
'क्कॅssssssय???' असं विचारल्यावर पुन्हा तीच ओळ त्याच प्रकारे आणि त्याच आत्मविश्वासाने ऐकायला मिळाली.
वर म्हणे - 'सनी लिऑन आहे बाबा ती... काय्पण करील.'

मी हसून हसून फुटले. Rofl

'मैने खा लिया रेनडिअर अख्खा' अशी ओळ ऐकू आली >>>> अगदी! मी पण ती ओळ " थकलिया रेनडिअर अक्का" अशी ऐक्ली होती!

सुमन कल्याणपूर यान्च "म्रुदुल करानी छेडित तारा , स्मरते रूप हरीचे मीरा" हे गाण ऐकायचो .
त्यात बाईनी "म्रुदुल" "करानी" हे शब्द न तोडता सलग म्हन्टले आहेत
तेव्हा
"म्रुदुलकरानी" म्हन्टल्यावर मला वाटायचे की "म्रुदुलकर " या आडनावाच्या माणसाने तारा छेडल्या आहेत , मग ही "मीरा" कुठे आली इथे मधेच !!!

म्हारे हिवडा में नाचे मोर तक थैय्या थैय्या हे म्हारे हिबडा नाचे मोर असं ऐकू यायचं तेव्हा ना हिवडा म्हणजे काय आणि ना हिबडा माहित Lol

Pages