मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीनाजोरी चनेके खेतमे असं आहे????ख्ररंच? Uhoh
मी ते 'छोरा छोरी चनेके खेतमे' असं ऐकते आणि म्हणते पण Uhoh

टूटटूटटू...

अठरा बरस की कंवारी कली थी
घूंघट मे मुखडा छुपा के चली थी
फंसी गोरी
फंसी गोरी
चने के खेतमे
हुइ चोरी चने के खेत म[अ\
पहले तो जुल्मी ने पकडी कलाई
फिर उसने चुपकेसे उंगली दबाई
जोराजोरी
चने के खेतमे
हुइ चोरी चने के खेतमे
टूटटूटटू...

मेरे आगे पिछे शिकारीयों के घेरे
बैठे वहा सारे जवानी के लुटेरे
हारी मै हारी पुकारके
यहा वहा देखी निखारके
जोबनमे चुनरी गिराके चली थी
हाथोंमे कंगना सजाके चली थी
चूडी टूटी
चने के खेत मे
जोरा जोरी चने के खेतमे
टूटटूटटू...

(मला माझ्या स्मरणशक्तीचा अतोनात अभिमान वाटायला लागलेला आहे)

मलाही येतं पुर्ण गाणं. हेच नाही तर बरीच गाणी. Happy (मला माझ्या स्मरणशक्तीचा अतोनात अभिमान वाटायला लागलेला आहे) Happy

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र.. ते मेहरुली जागेचे नाव म्हणून येते होय?
मी समजायचे की, मेहरुली म्हणजे कुबड्या. म्ह्णजे तो लाकडाचा मागे-पुढे डोलणारा घोडा असतो तो जसा काठ्यांवर असतो म्हणजेच कुबड्यांवर असतो आणि तरीपण तो अरबी आहे.
कल्पनेचे वारू फारच उधळले की. Happy

तेरे वीच भेण दी पूरा लन्डन ठूमकदा Biggrin

आजकाल गाण्यांमध्ये लिरिक्स म्हणजे "ठेक्यांच्या मध्ये चालीबरहुकुम घुसडलेले शब्द" ह्यापलीकडे त्या लिरिक्स ला काही अर्थ नसतो. कधीकधी तर हे शब्द भरण्याचे पुण्यकर्म संगीतकार स्वत:च करत असावा असे वाटते. त्यात आणि ते शब्द पंजाबी असतील तर काय विचारूच नका. भेन डी पेन डी काय वाटेल ते ऐकू येते.

"सिंग इज किंग" मधले "जी करदा.." गाणे

जी करदा भाई जी करदा तेरे चोर का मामा जी कर दा Biggrin Biggrin

असे संपूर्ण अर्थहीन ऐकायला येते. आणि ते नक्की काय आहे हे जाणून घ्यायची पण तसदी घ्यावी वाटत नाही. Proud

सगळेच Rofl
असे संपूर्ण अर्थहीन ऐकायला येते. आणि ते नक्की काय आहे हे जाणून घ्यायची पण तसदी घ्यावी वाटत नाही. >>>> मलाही.. बर्याच पंजाबी सिंगर च्या बाबतीत गाणे कैच्याकै एकु येते.

जी करदा भाई जी करदा तेरे चोर का मामा जी कर दा >>>

जी करदा भाई जी करदा तने खोळ मे बिठायका जी कर दा असे मला ऐकू येते. Uhoh गुजरातीत खोळमां = मांडीवर...

इश्श अन अओ अदलाबदल झालीये.. Happy

अनघा... Lol Lol

बाप्रे मला अजुन डेन्जर ऐकु येते हे गाणे.
जी करदा भाई जी करदा तने चोर पाजामा तर कधी ढोल पजामा जी करदा... अस काहीतरी. tuzki-bunny-emoticon-023.gif

:-D....

जी करदा भाई जी करदा
तेनु कोर बिठावा जी कर दा..

असं आहे ते. कोर बिठावा म्हणजे जवळ चिकटून बसणे.
सरदाराच्या रोमँटिक मूड्चा कचरा केला की वो Wink

बर्याच पंजाबी सिंगर च्या बाबतीत गाणे कैच्याकै एकु येते.>>> +१

दिल धडकने दो मधल "गल्ला गूडिया" गाण्यातले शब्द असे ऐकू येतात

दिल कबूतर हसेया के उड गयी हसे बिना !!!

आता पंजाब्यांचा विषय आलाच आहे तर...
'सड्डी गली आजा....
तेणू हो क्का मार दा फिरां...' त्यातला होक्का, हुक्का जे काही आहे ते काय आहे ते सांगा..

खी खी खी आमचे वाचताना स्लिप ऑफ आईज झाले, तरी मोजून १,२,३.......३५० छुरियाँ चालवायाच्या म्हणजे काय? की पाच रेघा काढून मग तिरकी रेघ अशी बंडलं करुन मोजायच्या?☺☺☺

Pages