Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरत पिया की >>> लहानपणी ते
सुरत पिया की >>> लहानपणी ते मला "सुरत पियाकी न जिलबी सुराही" असं ऐकू यायचं
<< 'मैने खा लिया रेनडिअर
<< 'मैने खा लिया रेनडिअर अख्खा' >>
आ... मेले मी हसून हसून. ख्रिसमसच्या वेळी .. हे भयंकर आहे
सुरत पिया की >> मला तर ते
सुरत पिया की >>
मला तर ते "सूरत पिया की नींद बिसराये" असे वाटायचे
(पण जाणीव सुद्धा असायची कि हे असे नसणार आहे).
आशाजींनी गायिलेल्या "युवती मना"ची तर रेडिओवर हद्द व्हायची. एकही शब्द नीट कळत नसे. मध्येच "मेलेSSS रणभजना" असे काहीतरी कानावर यायचे. आणि पुढे एकेठिकाणी दोनतीन वेळा "जमिनीवर नवसागर, जमिनीवर नवसागर" असे काहीसे. कशाचा कशाला पत्ता नाही.
अतुल पाटिल... <<मेलेSSS
अतुल पाटिल...
<<मेलेSSS रणभजना"> आणि .<<जमिनीवर नवसागर, जमिनीवर नवसागर">>
वाईट्टं हसले. पुन्हा म्हणून बघताना मूळचे शब्दं आठवेनात. श्शी.. कायच्या काय आहे हे.
"जमिनीवर नवसागर, जमिनीवर
"जमिनीवर नवसागर, जमिनीवर नवसागर" >>> अरारा ! थेट "संगीत हातभट्टी" !
रेनडिअर आणि युवतीमना
रेनडिअर आणि युवतीमना
सगळ्या पोस्ट्स हहपुवा! राँग
सगळ्या पोस्ट्स हहपुवा!
अशक्य आहे
राँग साईड को ठोका डार्लिंग
युवती मन दारुण ह्यावरून आता
युवती मन दारुण ह्यावरून आता इतक्या वर्षांची आठवण झाली.
हे गाणं मला कैक वर्षे अतिशय भयानक शब्द असलेले एकू यायचे. ना मी आजोबांना विचारले लाजून ना कोणाला.
जोवर ते लिटल चँप मध्ये आर्याने गायले आणि मी मग उत्सुक्तेपोटी गूगल( गूगल सर्च आले तोवर) वर लिरिक्स शोधले तेव्हा कळेले.
त्यात आशा ताईंनी इतके लाडिक म्हटलेत काही शब्द, किंबहुना म्हटलेच नाही असे केलेय.. खास करून "मन" मधला "न" हा त्यांनी म्हटलाच नाही इतका लाडिकपणा आणलाय. खरेच एकून पहा.
ते गाणे अगदी मला असेच एकायला यायचे,
झाले युवती मग दारु नळ रुचि आ.. आ.. प्रेम हे,
केले वरण जना संसारी, अती अमर मी.
रमणी अन हंसा नर, साहस करती रमवी
काही म्हणजे काही कळायचे नाही, अगदी आर्या आंबेकरने जेव्हा म्हटले २००७ चँप वेळी मग लिरिक्स शोधून काढायची हुक्की आल्ली. तिचे तरी शब्द स्पष्ट वाटलेले म्हणून बरेच शब्द कळले मग शोधून काढले शब्द.
अजून अर्थ नीट समजायचा आहे. कारण एकदम जुने मराठी आहे.
ते विलपार्ले मी गाउन पाहिले,
ते विलपार्ले मी गाउन पाहिले, अगदी अगदी झाले.
विलेपार्ले मधून लग्नात या.... हसून वाट लागली. त्याचे असे एक वर्जन आमचे बंधू गायचे.
मी लपले मधू मिलत नाय.. असे अशुद्ध गायचा असे त्या मिलत वरून...
पण इथे पंडीत कारेकर गुरुजींनी अति सुंदर गायलेय.... त्यांना नमस्कार!
मी रात्री हेड फोन लावून त्यांनी गायलेली वर्जन्स एकते. शब्द उच्चार बरेचसे स्पष्ट आहेत. आस्वाद घ्या.
http://sonichits.com/video/Prabhakar_Karekar/Yuvati_Mana_Darun
झंपी किती एडीटायचं ते.
झंपी किती एडीटायचं ते.
अग लिहिलं की आठवायचा
अग लिहिलं की आठवायचा संदर्भ.
किती वर्षे झाली.
>> पण इथे पंडीत कारेकर
>> पण इथे पंडीत कारेकर गुरुजींनी अति सुंदर गायलेय.... त्यांना नमस्कार!
सुंदर आहे. डॉ. वसंतराव देशपांडे यांनी सुद्धा "मधू मिलनात या" हे कसे गायला हवे याचे अत्यंत दुर्मिळ रेकोर्डिंग इथे उपलब्ध आहे. ते हि आवर्जून ऐकण्यासारखे आहे:
https://www.youtube.com/watch?v=-AsW4tri0Xs
>> मी लपले मधू मिलत नाय.. >>
>> मी लपले मधू मिलत नाय..
>> झाले युवती मग दारु नळ
हे भारीच
म्हारे हिवडा में नाचे मोर तक
म्हारे हिवडा में नाचे मोर तक थैय्या थैय्या हे म्हारे हिबडा नाचे मोर असं ऐकू यायचं तेव्हा ना हिवडा म्हणजे काय आणि ना हिबडा माहित >>>
मला ब/व च्या जागी ज ऐकु यायचा
अजुन एक गाणे लहानपणी न
अजुन एक गाणे लहानपणी न कळलेले!
'काळ्या मातीत मातीत 'ती' पण चालते'
आता ती पण काळ्या मातीत का चालते हे तेंव्हा कधी कळले नाही!
ती कोण??
तिफण रे किस्ना
तिफण रे किस्ना
तिफण रे किस्ना>>> दक्षिणा,
तिफण रे किस्ना>>>
दक्षिणा, ठाऊक आहे गं! ते लहानपणी ऐकलेलं लिहलयं!
आता म्हणू नका की, दंगल
आता म्हणू नका की, दंगल सिनेमातील 'कैसी धाकड है' हे गाणं 'कैसी माकड है' असं ऐकायला येतं म्हणून.
शत जन्म शोधिताना, शत आरती
शत जन्म शोधिताना, शत आरती व्यर्थ गेल्या या पदामधे एक ओळ मला नेहमी अशी ऐकू येते,
हा हाय दोन गाई ?? हे काय आहे कोणी सांगेल का ?
युवती मना मूळ शब्द असे
युवती मना
मूळ शब्द असे आहेत
युवतीमना दारूण रण रुचिर प्रेमसे झाले
रणभजना संसारी असे अमर मी केले
रमणीमनहंसा नर साहससरसी रमवी
शूर तोची विजय तोची हे शुभ यश मज आले
साधारण अर्थ असा: या तरूणीला हा रणसंग्राम प्रिय वाटतो, माझ्या साहसामुळे युद्धावर्/शौर्यावर भक्ती बसली आहे. जो पुरुष स्त्रीचे मन साहसावर लुब्ध करतो तोच खरा शूर आणि तोच खरा विजय. आणि हे यश मला लाभले आहे.
अर्थात गाणं ऐकताना काहीच्या काहीच शब्द ऐकू येतात ही बाब वेगळी
<<मी लपले मधू मिलत नाय..
<<मी लपले मधू मिलत नाय.. >>
मी ऑफिसात वाचलं... मेले मी हसून
मी लपले मधू मिलत नाय.. >>
मी लपले मधू मिलत नाय.. >>

@महेश: >> शत जन्म शोधिताना,
@महेश:
>> शत जन्म शोधिताना, शत आरती व्यर्थ गेल्या या पदामधे एक ओळ मला नेहमी अशी ऐकू येते,
>> हा हाय दोन गाई ?? हे काय आहे कोणी सांगेल का ? अ ओ, आता काय करायचं
ते शब्द "हा हाय जो न जाई" असे आहेत. या गीतावर माबोवर रसग्रहणात्मक एक अखंड धागाच सापडला इथे.
>> साधारण अर्थ असा: या
>> साधारण अर्थ असा: या तरूणीला हा रणसंग्राम प्रिय वाटतो, माझ्या साहसामुळे युद्धावर्/शौर्यावर भक्ती बसली आहे. जो पुरुष स्त्रीचे मन साहसावर लुब्ध करतो तोच खरा शूर आणि तोच खरा विजय. आणि हे यश मला लाभले आहे.
वाह! थोडक्यात पण सुंदर सांगितलेत. धन्यवाद.
बाकी "रण रुचिर प्रेमसे" हि शब्दरचना सुरांशी खूप तादात्म्य पावलेली आहे. कारण सूरपेटीतूनही हे शब्द अगदी जसेच्या तसेच ऐकू येतात. अजूनही हे म्हणताना ते सूर तसेच कानात घुमतात.
आमचे हे बिंदास स्वतःच्या
आमचे हे बिंदास स्वतःच्या मनाने गाणं गातात...
अफगाण जलेबी, क्या खूब तलेगी,
घायल है तेरा दीवाना..
ऎ मालिक तेरे बंदे हम तेरे
ऎ मालिक तेरे बंदे हम
तेरे कमरे मे कितने धरम _ इति सा.बु.
अतुल, योग्य माहिती आणि
अतुल, योग्य माहिती आणि धाग्याच्या लिन्कबद्दल धन्यवाद
हाऊसफुल 3 मधलं टांग उठाके
हाऊसफुल 3 मधलं टांग उठाके गाणं कुणी ऐकलंय का? त्यात:
आजा करे गोविंदकाका डान्स टांग उठाके
हे मला चुकून ऐकू येतंय की तसंच खरं आहे?
आजा करे गोविंदकाका डान्स टांग
आजा करे गोविंदकाका डान्स टांग उठाके>> आजा करे गोवींदाका डान्स टांग उठाके असे आहे ते.
अखेरचा हा तुला दंडवत गाणे...
अखेरचा हा तुला दंडवत गाणे...
"अखेरचा ऽ हा ऽऽऽ ... तुला दंड... तुला दंड... तुला दंड...."
Pages