मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तर एक अजुन भयानक गाणं अजुन भयानक ऐकु येत.

लव आज कल मधे ते ट्विस्ट ट्विस्ट गाणं आहे. त्याच्या सुरवातीला जे काय बोलतो ते ऐकुन मी चकीत. मुलीला म्हटलं काय बोलतो ग हा? ती म्हणे रॉन्देचा रॉन्देचा.
मी काय भलतंच ऐकलं होतं.

सस्मित Lol Lol Lol
बर पण रॉन्देचा. चा अर्थ काय ?
आणि ते गोष्टीगावाचे न पडलेला प्रश्न मला पण पडलाय

त्यातला होक्का, हुक्का जे काही आहे ते काय आहे ते सांगा..+१

बर पण रॉन्देचा. चा अर्थ काय ?>>>आतापर्यंत शोधला नव्हता. आता सहज गुगुला विचारलं तर गुगु मला समजेल असं काही सांगतच नाहीये. पण तरी मला वाट्तं एखादी डान्स स्टेप असावी.

तेणू हो क्का मार दा फिरां...' त्यातला होक्का, हुक्का >> हाका मारत फिरतो !
खुद्द आयुश्मान ने सान्गितल होतं एकदा , रेडिओवर .

रॉन्देचा रॉन्देचा.
मी काय भलतंच ऐकलं होतं.>>> Lol

ते round de chak असं आहे हे वेगवेगळ्या लिरिक्स साइट्स धुंडाळल्यावर लक्षात आलं Happy

लडकी ब्युटिफूल भर गई चुल

गाण्यामध्ये माउथ-वॉश संबंधीत प्रसंग असावा म्हणून मान्य केले होते. मागच्या आठवड्यात गाणे बघितले तर तसे काही नव्हते. मग कन्यारत्नाने 'बाबा काहीही हं' म्हणत लडकी ब्युटिफूल कर गई चुल अशी दुरुस्ती केली.

पण 'चुल' म्हणजे काय हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

ह्याच गाण्याचे काही शब्द
सॅण्डल मेरे चम चम करते रहेते हर एक बॅर्ण्ड मौ...
देखके हर एक मुंडे मेरे हिल पे होते लॅन्ड वे... सारी कुडियॉं ,,देसी फिरीया...कब ती मै पुढच काहीच कळत नाही. Proud
गुगलुन पाहायला हव.

सॅण्डल मेरे चम चम करते , ...<कळत नाही > ........
देखके हर एक मुंडे मेरे हिल पे होते लॅन्ड वे... सारी कुडियॉं ,,देसी चिडीया
क्लब की मै बुलबल

पाहिलं गाणं. गाण्याचे शब्द समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. आलिया भट्ट cute दिसते आहे. अधून मधून सिद्धार्थ पण दिसतो. मग त्या गाण्याच्या शब्दाकडे कोण लक्ष देतय.:डोमा:

पूर्वी "ऐका सत्यनारायणाची कथा..." असे एक गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. अजूनही खेड्यापाड्यात गल्लीत कुणाच्यात सत्यनारायण असेल तर लाउडस्पीकरवर लावतात. हे गाणे एक कधीच नीट ऐकू आले नाही. पण प्रत्येक ओळीत शेवटचे शब्द मात्र "यशवंत", "जयवंत", "बळवंत", "कुलवंत" असे असतील असे उगाचच वाटते Happy

पोराच्या गॅदरींगला हे गाणे (गोंधळ) शाळेत बसविले होते

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला .............

जेव्हा त्यांची पॅक्टीस सुरु झाली तेव्हा माझ्या मुलाने घरी असे गाणे म्हणून डान्स केला होता

आई भवानी तुझ्या कृपेने पाउस पडताना
अगाध महिमा तुझी मावरी वारी संक्टाला
आई तूपा करी,माझ्यावरी धावत ये लवकरी
.... अंबे गोंधळाला ये ....

हे विचित्र गाण ऐकून मी त्याच्यासाठी डाऊनलोड करुन त्याला १० वेळा ऐकवले होते.

शिन्मा : लव इन टोकियो

गाणं : ओ मेरे शाहे खुबा ..........

लहान असताना ते मला ओ मेरे शहाणे खुदा असं वाटत होतं.

हिमेसच्या नव्या पिच्चरमधलं एक गाणं आहे - वफामे बेवफाई बेवफाई बेवफाई की है
त्यातली एक ओळ माझ्या मुलीने गायली - 'अब तो नैनोसे मेरा हात उंचा जाता है' ते ही एकदम हात डोळ्याच्या बाजुने वर नेउन साभिनय. Lol मी म्हणाले काय ग हे? आणि खुप हसले.

खरं गाण्यात आहे - अब तो गैरोसे मेरा हाल पुछा जाता है
Lol Rofl

अतुल, हे गाणं मी सुद्धा सुरुवातीला असच ऐकायचो. कुस्तीच्या आखाड्यात ऊभं असल्यासारखं वाटायचं.

Pages