मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या लहानपणी एक प्रसिद्ध गाणं नेहमी रेडिओवर लागायचं.

"समझोता, गमोंसे करलो।
समझोता, गमोंसे करलो।"

मला कित्येक वर्षे ते ऐकू यायचं

"समझोता, समोंसे करलो।
समझोता, समोंसे करलो।"

Rofl

>> समझोता, समोंसे करलो।

Lol

मला चुकीची ऐकू आलेली मराठी भजने:

देवा तुझा मी सोनार => देवा तुझा मी होणार

नाम आहे आदिअंती नाम सर्व सार आहे बुडत्याला नौका जीवनी आधार =>
नाम आहे आदिअंती नाम सर्व सार आहे बुडत्याला नव्हता जीवनी आधार

पूर्वी रेडिओवर 'चमनमें कलियाँ खिलींं है / फुल खिलें है' वगैरे ओळी असलेली बरीच गाणी लागायची. आता लहानपणी मला चमन म्हणजे डोक्याचा करतात तो 'चमनगोटाच' तेव्हढा ठाऊक होता. मला नेहमी प्रश्न पडायचा, हा काय प्रकार आहे? चमनगोट्यावर फुलं कशी उगवू शकतात? आणि हिरोला त्याचा एवढा कसला आनंद झालाय, कि तो हिरोईनला घेऊन गवतावर गडबडा लोळतोय. Rofl

चमनगोट्यावर फुलं कशी उगवू शकतात?>> Lol

आणि तुमच्या रेडियोवर हिरो हिरोईनला घेऊन गवतावर गडबडा लोळतोय हे दिसयचं पण? Light 1 Happy

@ सस्मित, आणि तुमच्या रेडियोवर हिरो हिरोईनला घेऊन गवतावर गडबडा लोळतोय हे दिसयचं पण? >>> तसं नाही हो! मी थोडी ऍडीशन घेतली. Rofl

रेडिओच्या ऐवजी टीव्हीवर वाचा. Wink

लहानपणी आजोबा रेडिओवर नाट्यसंगीत ऐकायचे. त्यामुळे अनेक प्रसिद्ध नाट्यगीते लहानपणीच माहिती झाली. पण एक गीत नक्की काय आहे कधीच कळले नाही. ते असे ऐकायला यायचे...

हे SSSS ईटांग, गमतरंग. हे SSSS ईटांग, गमतरंग.

असले निरर्थक गाणे आजोबा का ऐकत असतील असे तेंव्हा वाटे. ते शब्द नक्की काय आहेत कधीच कळले नाही. आणि पुढे मोठेपणी मी हे शब्द विसरून पण गेलो. काही महिन्यांपूर्वी राहुलजी देशपांडे नाट्यगीत गात होते ते लांबून कानावर पडले. तेच शब्द अनेक वर्षांनी पुन्हा साधारणपणे तसेच ऐकू आले. हे SSSS ईटांग.

उत्सुकता चाळवली म्हणून जवळ जाऊन लक्ष देऊन ऐकले. ते होते प्रसिद्ध नाट्यगीत "घेई छंद, मकरंद".

घे SSSS ई छंद, मकरंद. घे SSSS ई छंद, मकरंद.

हे इतक्या वर्षांनी लक्षात आल्यावर पोट धरून हसलो. आजवर प्रसिद्ध नाट्यगीतांचे जेंव्हा जेंव्हा उल्लेख वाचायचो तेंव्हा तेंव्हा मी ते लहानपणी ऐकले असल्याने त्याची चाल माहित असायची. पण "घेई छंद मकरंद" चा उल्लेख आला कि वाटायचे याची चाल नक्की कशी आहे? आणि ते इतके प्रसिद्ध असूनही लहानपणी आपल्याला कधीच ऐकायला मिळाले कसे नाही?

Lol Lol Lol

बाजीराव मस्तानी मधे दीवानी मस्तानी गाण्याच्या सुरुवातीला मराठी शब्द आहेत, त्यात नभातूनी आली अप्सरा, केसात तिच्या गजरा' एवढे शब्द कळतात, कोणाला पूर्ण माहिती आहे का?

शिला की जवानी हे जेव्हा गाणं वाजायच तेव्हा मला ते , माय नेम इज शिला, शिला केजवानी अस ऐकू यायचं मला वाटायच की ती आपल पुर्ण नाव सांगत असावी. माझ्या पत्नी ला सुद्धा समजवण्यात यशस्वी झालो होतो तीने सुद्धा पुढे चार लोकांना भाबडेपणा ने समजावल पण नंतर मानगुटीवर बसुन गाणं ऐकवलं नी आता कोणतही गाण अस नव्हे म्हणालो तर केजवानी साहेब गप्प बसा अस सांगते

टारजन ओ माय टारजन
आजा मै तुझे सिखादु तुझे प्यार कैसे हो, अस काहीस गाण आहे टारजन या चित्रपटात एकदा लहानपणी गावी गाण्याच्या भेंड्या खेळताना एकाने असं म्हटल होत....
टारजन ओ म्मे टारजन
हाजूगुजूमेरीमज प्याज केदे ओ ssss ओssओssओ
ओम्मे टारजन
हहपुवा झाली होती

चीकू, शब्दरचना अशी आहे ती..

नभातूनी आली अप्सरा
अशी सुंदरा साज सजवून
आली आली आली
आली गं आली
केसामधी माळला गजरा
लोकाच्या नजरा
खिळल्या तिच्यावSSSSSSSर गं
आली आली आली

दुनियाची प्यारी तू
अगं राणी हरणी गं
अगं राणी सुंदरा
आली गं आली
महाराणी आली..
अगंगंगंगSSSS

घेई छंद अशक्य आहे... Proud
अनिल Lol

Lol

पूर्वी रेडिओ ट्रान्समिशन इतके क्लिअर नसे. नाट्यगीतांची वाट लागायची.

विलोपले मधु मीलनात या

हे म्हणजे नाटकात विलेपार्लेच्या लोकांना लग्नाला बोलवण्यासाठी गायले असावे असे ऐकायला यायचे...

विलेपार्ले मधून लग्नात या

Biggrin Biggrin

माझे सा.बु. माहेरची साडी मधल गाणे ' बोहल्यावरी नवी नवरी ही झाली हो वेडी' असं म्हणतात आणि हसून हसून आम्हाला वेड लागीयची वेळ येते.

>>>
बोहल्यावरी नवी नवरी ही झाली हो वेडी' <<<

आम्हाला हि लहानपणी असेच एकायल यायचे. तसेही तो मूवी काही मी बघितला न्हवता( मराठी मूवी त्या काळात बंडल असत असे वाटायचे. अति आचरटपणा असे ठाम मत होते).

हे SSSS ईटांग, गमतरंग. हे SSSS ईटांग, गमतरंग.>>>> Lol Rofl
तिकडे अभिषेकी बुवा ढसा ढसा रडतील हे कळाले तर.

मी अनेक वर्षे "विठ्ठला पुर्वेला अंधार" (तू वेडा कुंभार ऐवजी) म्हणायचो. मला वाटायचे की ते उषःकाल होता होता टाइप्स गाणे आहे. म्हणजे "बघ देवा, पुर्वेलादेखील आता अंधारले आहे" असा काहीतरी अर्थ असावा असे वाटत असे.

Pages