मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुडी गुमान - मला पण
एकतर सगळे पंजाबी म्हणून कुडी वाटणे साहजिकच आहे
आणि तो सिंगर वूमन च्या एवजी व्यवस्थित वूमान असच म्हणतो .
माझे logic एकदम perfect वाटायचे मला

अक्षय कुमार आणिक माधुरी दिक्षीत चा कुठलासा एक चित्रपट होता. त्यत एक गाण होत ते मी अस ऐकायचो

अकी: अब तेरे दिलमे हम आगये
माधु : तो
अकी: तेरे दिलमे रहेन्गे
माधु : तो
अकी: तेरी पुजा करेन्गे
माधु : तो
अकी : बादमे प्रसाद बाटे.न्गे (हे माझ अ‍ॅडीशन ) Lol

अकी: तुझे अपना कहेंगे
माधु : तो >>> हे असेच शब्द आहेत ना? नंतर अतिशय रडत्या आवाजात झूठा आआआआआअ असं पण आहे.

दिल है दिल है दिल है ये मेरा
तेरा घर ये नही है
जगह खाली नही है
झूठी आआआआआ
सनम मेरे सनम
कसम की कसम
झूठे नही हम

हे इतकं बॉलीवूडी रोमान्स करून झाल्यावर नंतर कडव्यामध्ये याच गण्यात युद्धाला गेल्यासारखे दोघं जण जोशात एकाच श्वासात म्हणतात

अगरतूकहेतो तेरी धडकनोंको तेरे नाम लिख दू सनमअ
अगरतूकहेतो तेरे नाम लिख दू मे अपना हर जनम

वहा अपनी धडकन बिछा दू जहांपे रखे म्री जान तू कदम\

तेरी धडकने है धडकती हओ धडके इसमे मेरा क्या तिलिस्म
तेरा दिल है पागर्ल दिवाना है पागल तो इसमे हम क्या करे जो पमरता है मुझ पे मरे
तू ना मिली मर जाऊं गा सनम
तो (कोरसमध्ये तो तो तो तो)
जान जायेगी मेरी
तो (कोरसमध्ये तो तो तो तो)
जिंदगी तू है मेरी
झूठा आआआआआआआ

एवढं गाणं आठिवलंय. पुढचंही कडवं आठवतंय. पन टायपायचा कंटाला आला.

चित्रपट आरजू. लॉरेन्स डीसूझाच्या अगणित प्रेमत्रिकोणामधला हा एक प्रेम त्रिकोण.

कुडी गुमान + ११११११११११११११११११११११

नंदिनी, एक करेक्शन ... Proud

सनम मेरे सनम
कसम की कसम
झूठे नही हम

>>> या ओळी अश्या आहेत :

कसम की कसम
हम तेरे हैं हम
बात मेरी मान
झूठे नहीं हम
तो...

ते गुलाबी आंखे तेरी देखी शराबी ये दिल हो गया गाणं मला नेहमी गोंधळात टाकतं. मी कोणाचे डोळे गुलाबी वगैरे पाहिले तर आधी किंचाळत पळून जाईन.

ईथे कोणी मुम्बई मेट्रो नी प्रवास करणारे असेल तर त्यात ही एक अ‍ॅड लावतात , ड्रीम होम च्या क्सल्याश्या प्रोजेक्ट ची...

मेरी पेन्गविन स्विटहार्ट.. मुझ जेसे भालु को चाहीये ईक नजारा... सामने हो नीला सा कीनाराssssss!!!!

आणि मग ती बया , ड्रीम होम ची माहीती देते!!

ऐक्लीये का कुणी?!! खुप हसायला आले आधी पण आता दर ५ मि. ला तेच गाणे वाजवत असतात..:डोकेदुखी:

प्यासा चित्रपटातल अजरामर ड्युयेट स्वप्नाळू प्रियकराच्या प्रश्नाना जर प्रत्यक्ष जीवनातल्या वास्तव दर्शी प्रेयसीने उत्तर / दुरुत्तरे दिली तर ....

गाणे मजेदार होईल पुढीलप्रमाणे

हम आपके आखोमे ईस दिल को बसा दे तो
टेनन्ट कण्टरोल अ‍ॅक्ट अण्डर हम नोटीस भेजे तो
हम आपके आखोमे ईस दिल को बसा दे तो

ईन जुल्फोमे गुन्ढेन्गे हम फूल महोब्बत के
लायसील लगाकर हम ये फूल गिरा दे तो
हम आपके आखोमे ईस दिल को बसा दे तो

हम आपको ख्वाबोमे ला ला कर सतायेन्गे
हम आपको जेल भेज कर निन्देही ऊडा दे तो
हम आपके आखोमे ईस दिल को बसा दे तो

हम आपके कदमो पर गीर जायेन्गे गश खा कर
ईस पर हम अगर अपनी ऐरो की कीक दे तो
हम आपके आखोमे ईस दिल को बसा दे तो

Proud

(हे गाण मला खुप आवडत. हे असच एक गम्मत म्हणून )

लले, करेक्शन बरोबरे. Happy

हे गाणं आलं तेव्हा स्टाईलमध्ये प्रत्येक् वाक्याला "तो" म्हणायची पद्धत काही ज्युनिअर माधुरींनी उचलली होती.

"लकड़ी की काठी काठी पे घोड़ा..." गाण्यात एक ओळ आहे

घोड़ा अपना तगड़ा है देखो कितनी चरबी है,
चलता है महरौली में पर घोड़ा अपना अरबी है

महरौली में पर कधी नीट कळलेच नाही. लहानपणी असे ऐकायचो...

चलता है नेहरूजी जैसा घोड़ा अपना अरबी है

(आमचा घोडा पंडित नेहरूंसारख्या रुबाबात चालतो... बोंबला)

Uhoh Biggrin Lol

ते अ‍ॅक्शन जॅक्सन चं गाणं आहे ते 'तुमसे मिलने का जो बुरा अंतर है' वगैरे ऐकत होते.
(म्हणजे अत्रंग वाटलेच विचार करताना, पण 'तुला भेटायची वाईट इच्छा अंतर्मनात आहे' असा काहीतरी अर्थ काढला होता. Happy )

तुम्से मिलनेका कीडा अंदर है
डेटींग करले तू ओपन कॅलेंडर है
सोम मंगल बुध गुरु शुक्र शनि रवि आजा मेरी गली ... Happy

घोड़ा अपना तगड़ा है देखो कितनी चरबी है,
चलता है महरौली में पर घोड़ा अपना अरबी है>>
हे असं आहे?????

मी सस्मितपेक्षा पण भलतंच वेगळं ऐकते आणि म्हणत पण आलेय. Uhoh

करता सिनाजौरी है, घोड़ा अपना अरबी है Lol
भाच्याला पण तसंच शिकवलंय. Proud

Biggrin
अगं मला वाटलं असेल आडदांड अरबी घोडा... जो त्याच्यावर बसू देत नाही, म्हणून सीनाजौरी करतो म्हटलंय की काय.. Happy

Pages