बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विसंगत थीमला सोडा + फ्राईड आईसक्रीम याचाही विचार करता येईल. भाजलेले / तळलेले पापड साल्सा डिप बरोबर देता येतील. गोड पिझ्झा बनवता येईल. पिझ्झ्यावर क्रीम चीझ, पाकवलेली फळे, सुकामेवा, क्रीमचे टॉपिग. जेली / जॅम आयत्यावेळी वरून.
गोड रताळ्याचे सूप हाही एक पर्याय ठरू शकतो.

मुलांच्या वाढदिवसासाठी बेत काय करात येईल? साधारणपणे ४० माणसे आणि १५ लहान मुले.
पाव भाजी, सामोसे आणि खमण ढोकळा आणि केक विचार करतेय, मुलांसाठी चिज पिझ्झा.
कलिंगड फोडी आणि द्राक्ष यांचं सॅलड ?

मुलं किती वयाची आहेत साधारण ? जेवणाची वेळ आहे का संध्याकाळी खेळ आणि स्नॅक्स असा विचार आहे

४० लोकांसाठी पाव गरम गरम वाढण्यासाठी कोणी पूर्ण जबाबदारीने मदत करणारे असणार का ?

हाका नूडल्स, व्हेज मांचुरियन, फ्राइड राइस असा मेनू ठेऊ शकता. अगदी लहान २-४ वर्षे वयाची मुल नसतील तर हाच मेनू मुलांना पण चालेल.

मला वाटतं, पावभाजी, ढोकळे, समोसे, केक हा बेत भरपूर आहे. खरंतर समोसे जास्त (हेवी) होऊ शकतात. मुलं चीज पिझ्झा, केक, पावभाजी व फ्रूट डिश यातच आटपणार. बटाटा वेफर्स / चिप्स ठेवू शकता.
फ्रूट्स सीझनल ठेवा. किंवा मिल्कशेक / स्मूदी / आईसक्रीम वगैरेही ठेवू शकता.

धन्यवाद मेधा, आणि अरुंधती . मूल २ ते ७ वयोगट, म्हणूनच त्यांच्यासाठी पिझ्झा,तो बाहेरून आणणार. आणि बाकीचा मेनू मोठ्यांसाठी.
व्हेज मांचुरियन, मी कधी घरी केलं नाहीये, पण सामोसा ऐवजी जमेल का बघते, बटाटा वेफर्स / चिप्स आहेतच, आणि दोघांचा वाढदिवस आहे त्यामुळे एक आईस्क्रीम केक आणि एक साधा अस करता येईल.

मुलांचा वयोगट २ ते ७ असेल तर सगळी चिल्ल्लीपिल्ली पिझ्झा खातील का? अशावेळी चीज सँडविच सेफ पडतात. मुलं जॅम सँडविचही खातात आवडीने. इडली व बेतास बात तिखट चटणीही खातात मुलं!

सगळी मुलं पिझ्झा लव्हर्स आहेत, Happy मोठ्यांचाच काय करायचं ते विचार करतेय,
पाव भाजी सोपी वाटतेय, पण मग सगळ्यांना घरीच बोलवावं लागेल,बाहेर बागेत गार होईल, पुलाव, भाजी, स्टार्टर एकटीला जमेल का असा वाटतंय Happy
costco चे फ्रोझन स्प्रिंग रोल कुणी वापरलेत का पूर्वी?

मीमराठी, लहान मुलांकरता पिझा + जॅम सँडविच + चीज सॅंडविच (थोडं थोडं) असं करू शकाल.

मोठ्यांकरता -
पावभाजी (चविष्ट पावभाजी कशी जमवावी धाग्यावर भरपूर युक्त्या ही मिळतील)

सोबत दहीबुत्ती (आधी करून ठेवता येईल, थंडगार दहीबुत्तीवर डाळींबाच्या दाण्याची सजावट भाव खाऊन जाते!)
किंवा ताक लस्सी असंही ठेवता येईल

केक (वर तुम्ही म्हणलंय तसा दोन प्रकारात)

यात खरंतर वेगळ्या फरसाण आयटेम ची भर लागायला नको; कारण पावभाजी + दहीबुत्ती पोटभरीची आहेच. पण हवंच असेल तर डिप्स/सालसा चे २-४ प्रकार + नाचोज, चिप्स, वेफर्स, काकडी वगैरे सारख्या भाज्यांचे काप असल्यात होईल.

मीमराठी, मुलांसाठी ओपन पिझ्झा सँडविचेस / पिझ्झा रॅप्स हाही एक पर्याय आहे.

योकु म्हणतोय तसा पावभाजी व दहीभुत्ती मेनू, सलाद (काकडी, टोमॅटो, कांदा, गाजर, मुळा चकत्या) हा मेनूच पोटभरीचा होतो. सोबत चिप्स / तळलेले चिंटू पापड किंवा ओनियन रिंग्जसारखे प्रकार म्हणजे लहान-मोठे सर्वांनाच चालू शकतात.

पाव भाजी ऐवजी मिसळ पाव करु शकता. पाव भाजी बरोबर पाव गरम लागतील. मिसळी सोबत पाव रूम टेम्परेचरला असले तरी चालतील.
पार्क मधे करणार असाल तर वॉर्मिंग ट्रेज लागतील. पार्कमधे स्टर्नो कॅंडल्स वापरलेल्या चालतील का नाही हे आधी विचारुन घ्या .

मिसळ पाव, बाखरवडी चाट, समोसे किंवा ढोकळे , दही भात, गाजर हलवा + व्हनिला आइस क्रीम असा मेनू ठेवू शकता.
मिसळ , समोसे आणि हलवा साठी वॉर्मिंग ट्रेज लागतील .

Burger buns miltat.. cutlet types tikki banvta yeil.. aadhi banvun theun mag garam fry karun deta yetil.. sobat french fries, wafers, cold drinks, icecream asa menu thevta yeil. Lahan mulana khup aavdta asa.

हो, असतील कदाचित. मी कधी ट्राय केले नाही. मैत्रिणीने एकदा घरी केलेले कटलेट वापरून बनवलेला बर्गर खाऊ घातला तो छान लागत होता. उकडलेला बटाटा, गाजर, मटार, कॉर्न कुस्करून त्यात धणेपूड, गरम मसाला, तिखट, मीठ, आमचूर पावडर वगैरे घालून चपट्या टिक्की केल्या. त्या रव्यात घोळून शॅलो फ्राय केल्या. बनला आतून घरचे लोणी लावले. कांद्याची रिंग काकडी, टोमॅटो रिंग, कटलेट, थोडी हिरवी चटणी, लेट्यूसचं पान व वरून भरपूर किसलेलं चीज घालून बर्गर तयार केला. सोबत टोमॅटो केचप.

लहान मुलं बर्गर खाताना मात्र भरपूर सांडलवंड करायचे चान्सेस असतात. बर्गरच्या आतील जिन्नस एकेक करून खाली उड्या मारायला लागतात! Lol

२० जना साठी मेनू हवा आहे....
फूलके
आलू मटर
दाल
जिरा राईस
काकडिच कोशिंबीर
पापड
गोड मधे fruit custard ठरल आहे
अजून एखादि भाजी करावी का?

आलू मटर थोडे घट्ट (कमी रस असणारे) करणार असाल तर अजून कुठली भाजी लागणार नाही कारण दाल आणि कोशिंबीर आहेच. दालच साधी न करता तडका दाल किंवा मखनी दाल करता येईल.

पण जर आलू मटर रस्सेवाले असतील तर त्याबरोबर काही तरी कोरडे चांगले लागेल. पनीर मसाला, मसाला भेंडी, बीन्स, किंवा मेथी असे काही तरी.

पनीर आणी कॉटेज चीज एकचआहोे का? >> आहोे आहोे Wink

यात पापडाऐवजी काही फरसाण आयटेम अ‍ॅडता येईल. बरेच पर्याय आहेत. इन दॅट केस दुसरी एखादी भाजी नसेल तरी चालू शकेल. पण २० माणसं (अ‍ॅडल्ट्स) धरली तर एकाच भाजीवर तरण्यापेक्षा धनि म्हणतोय तसं सुक्या मसाल्याची एखादी भाजी हवी.

२० जणांकरता
फुलके
आलू मटर
भरवां भिंडी, तवा व्हेज, मिक्स व्हेज इ
दाल (तडका/ मखनी/ बुखारा इ)
जिरा राईस (यात ताजे मटार घालून सिंपल पुलाव)
काकडीची कोशिंबीर (दही आधी टांगून पाणी काढून टाकून)
फरसाण आयटेम (ढोकळा, सुरळीची वडी, कोथिंबीर वडी, अळूवडी, भजी- वेगवेगळ्या पानांची/ बटाटा, कांदा इ)
गोड मधे fruit custard ठरलेलं आहेच (यातही सर्वींग बोल्स मध्ये पोर्शन काढून प्रत्येकी एक बोल असं देता येईल; तेव्हढाच वेळही वाचेल)

पनीर आणी कॉटेज चीज एकचआहोे का? >> आहोे आहोे >.
जपून. अमेरिकन ग्रोसरी मधे कॉटेज चीझ नावाने जो प्रकार विकतात तो अजिबात पनीर सारखा नसतो. ( खाणेबल पण नसतो असं माझं मत. पण इथली काहि मंडळी खातात ब्वा )

भारतातील इंग्रजी मासिके , रेस्पीची पुस्तके यात पनीर आणि कॉटेज चीझ दोन्ही समानार्थी वापरतात. त्यामुळे तशा सोर्सेस मधून रेसिपी पाहणार असाल तर पनीर आणि कॉटेज चीझ एकच.
पण परदेशातल्या ग्रोसरी मधून कॉटेज चीझ आणून पनीरचा पदार्थ करणार असाल तर आधी एकदा आणून, पदार्थ करुन , खाउन पहा .

नवरात्री निमित्त ८-९ मुलि ना (वय २-६ ) घरी बोलावले आहे...बेत काय करावा ?
उत्तर, दक्शिण, पुर्व, पश्चिम सगळ्या ठीकाण च्या मुली आहेत..
मी हा विचार करतेयः
- साबू. खिचडी (आम्हाला उपास आहे त्या दिवशी)
- १ केळ
- बटाटा चिप्स
- शीरा / जिलेबी

वयं २ ते ६ मधली आहेत. तुम्ही तुमच्याकरताच काय असेल ते करा. पोरी एखादं फळ + बटाटा चिप्सवरच गार होतील. Wink Light 1

साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची उपासाची भाजी, भगर + आमटी,
बटाटा चिप्स / साबुदाण्याचे पापड तळून
रताळ्याचे गोड कापं/ शिरा
उपास आहे म्हणून फळंही Wink

दिवसभरात असंच चावायला म्हणून खारे दाणे, उपासाचा चिवडा/फराळी चिवडा इ घेता येईल
संध्याकाळी साबुदाणा वडा + फ्रूट सलाड

कसा भरगच्च उपास करायचा. दुपारचं जागरण करायचं नाही.

माझ्याकडे एक बंगाली कुटुंब जेवायला येणार आहे. त्यांच्यापैकी नवरा एकदम हेल्थ फ्रिक आहे. नुसत्या सलाड वर जगतो. बायको आणि मुलाचा काही प्रोब्लेम नाही. काय करु सुचतच नाही आहे.
तरी मी मलई कोफ्ता, एक बटाटा भाजी ठरवली आहे. गोडा मधे रस मलई किंवा रसगुल्ले.
तीच्या नवरोबा करीता सलाड आणि किंन्वाची मसुर खिचडी करावी असा विचार करते आहे.
अजुन काय करु?

Pages