बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूगडाळ तांदूळ खिचडी / मिश्र डाळी व तांदळाची खिचडी / डाळ तांदूळ व मोड आलेली कडधान्ये घालून खिचडी, ताकाची कढी किंवा सार, तळलेली सांडगी मिरची, पापड मिरगुंडं, टोमॅटो-कांदा कोशिंबीर किंवा मेतकुटाचं डांगर असा मेनूही प्लान करता येईल.

ऊंधियो, फुलके / ब्रेड, काकडी रायता, जिरा राईस व फोडणीचं वरण.

उंधियो + फुलके
मूगडाळ + तांदूळ अशी पातळसर खिचडी + साजुक तूप
दही, लोणचं, पापड
सोबत एखादी कोशिंबीर
गुलाबजाम/काला जाम

असा मेन्यू पुरेसा होईल ४/५ लोकांकरता

साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी मराठमोळा मेन्यू सुचवा. परगावची मंडळी साधारण 10 वाजता हॉल वर पोहोचतील. आल्या वर चहा, साखरपुडा कार्यक्रम आणि जेवण असा कार्यक्रम 10 ते 3 या वेळात करणार आहोत.
परगावची मंडळी on the way ब्रेक फास्ट करून येतील.
पण आल्या आल्या चहाबरोबर काय द्यावे जेणेकरून भुकमोड होणार नाही पण काहीतरी तोंडात टाकल्यासारखे होईल.
सध्या सुचलेले पर्याय:
माफीन्स, बॉम्बे सँडविच, चहा कॉफी
जेवण: व भा, पोळी/पुरी, वांग्याची मसालेदार रस्सा भाजी किंवा अळूची पातळ भाजी, ब भा, नारळाची चटणी, कोशिंबीर (प्रकार सुचवा), अळूच्या वड्या/ सुरळी च्या वड्या + भजी+ पापड, मसाले भात, कढी किंवा टोमॅटो सार किंवा सोलकढी, पुरण पोळी + आंब्याचे उकडीचे मोदक किंवा मुगाचा शीरा.

अजून मराठमोळे पदार्थ सुचवा! धन्यवाद!

वांग्याची भाजी + मसालेभात खूप मसालेदार होईल. वांग्याची भाजी असेल तर साधा वरण भात ठेवा.
अळूची भाजी + मसालेभात +बटाट्याची भाजी + जिलेबी + मठ्ठा हा पारंपरिक मेनू. वालाचं बिरडं करायला जमलं तर सोनेपे सुहागा. डावीकडे या मेनूला खमंग काकडीच बेस्ट जाते + तळण.
जिलेबी मिळणार नसेल, तर श्रीखंड पुरी. बाकी मेनू तोच.
पण पुरणपोळी असेल तर बाकी फ्रिल्स लागत नाहीत काही. कटाची आमटी, ब. भा, तळण, का.को., वरण-भात इज इनफ. सेम विथ मोदक. पण शिरा हे काही मुख्य पक्वान्न होत नाही. मग शिरा असेल तर आणखी एक पक्वान्न हवं.

आधी पक्वान्न ठरवावं, मेनू आपोआप त्यानुसार फिरतो. खूप मसालेदार पदार्थ किंवा सगळेच पदार्थ दूध-दही बेस्ड असं नसावं.

आणि प्रवास करून आल्यावर मला चहा मिळणार असेल आणि त्या बरोबर तोंडात टाकायला मिनी बटाटेवडे मिळणार असतील तर अतीप्रसन्न मनाने मी समारंभात सहभागी होईन Wink पण हे कितपत जमण्यासारखं आहे मला माहित नाही. सॅन्ड्विच, मफिन्स मस्तच आहेत ऑप्शन्स, पण मेनू मराठी हवाय ना Happy

चहा बरोबर कॉफी पण ठेवावी लागेल. ( काही लोक्स असतात. भावी साबांना च कॉफी हवी असेल तर उगीच टेन्शन नको. )
स्नॅक्स मध्ये उपमा एक मूद.( आधी करोन ठेवता येइल ) व खोबर्‍याची बर्फी. साजरे दिसते

उपासाचा दिवस असेल तर साखि.

ऑक्टोबर हीट असल्याने लिंबूपाणी पण व्यवस्था ठेवता आली तर बघा. काही लोक्स मा गतात

जेव्णाचा मेनू मस्तच आहे वरचा. कोथिंबीर वडी? टोमॅटो सार व मसाले भात पोळ्या ब भा. काकडीची कोशिंबीर.

साखर पुडा आहे तर बीटाची दह्यातली गुलाबी कोशिंबीर?

आल्या आल्या- साबुदाणा वडे व चहा / कॉफी / कोकम सरबत (उपास असलेले व नसलेले)
जेवणात - खव्याची पोळी, सोलकढी/ टोमॅटो सार, हार्ट शेप्ड कॉर्न पॅटीस/ कोथिंबीर वडी, वालाचं बिरडं / रस्सा/ मटकी/ व सुक्या भाजीत भेंडी- शिमलामिरची ची मिक्स भाजी (खूप मस्त होते -नारळ व थोडा चिंच गूळ घालून!) अथवा सुकी बटाट्याची भाजी, मसालेभात, गाजराची कोशिंबीर, वाटली डाळ वगैरे.......
Happy

अजून मराठमोळे पदार्थ सुचवा!>>>

भाज्या:
डाळिंब्यांची उसळ, फ्लॉवर बटाटा रस्सा भाजी, मटकीची उसळ, भोपळी मिरची किंवा तोंडल्याची पंचामृती भाजी

डाव्या बाजूला:
पंचामृत, गाजराची कोशिंबीर, कोबीचा चटका, आंबेडाळ, खमंग काकडी, लाल भोपळ्याचं भरीत, खोबर्‍याची तुकडे (हे म्हणजे तेलाची फोडणी करून हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे परतायचे, त्यात ओलं खोबरं परतायचं आणि मीठ साखर लिंबू पिळायचं.खूप मस्त हिरवा पिवळ्या रंगाचं खमंग चटणी टाईप तोंडीलावणां होतं)

फरसाणः
कोथिंबीर वड्या, बटाटेवडे, मूगभजी, पाटवड्या

कॉम्बिनेशन मात्र ठरवावं लागेल पूनम म्हणाली तसं, म्हणजे भरली वांगी असतील तर अळूचं फदफदं नको आणि पंचामृतही नको, कारण दोन्हीत चिंचगूळ. श्रीखंड असेल तर कढी नको कारण दोन्ही दह्याचे पदार्थ.

कार्यक्रम मुंबईत आहे डिसेंबर महिन्यात!>>> हे आत्त्ता वाचलं.

दोन गोड पदार्थ असतील तर एक गोड पदार्थ म्हणून ओल्या नारळाच्या करंज्यांचा विचार करता येईल. तसंच फरसाण किंवा स्टार्टर म्हणून ओल्या मटाराच्या करंज्याही करता येतील.

डायबिटीस वाल्या एक आजी जेवायला येणार आहेत, अशावेळी काय बेत करावा? त्यांच्यासाठी वेगळा बेत आणि इतर पाहुण्यांसाठी वेगळा बेत असं की सगळ्यांना एकच? ऑप्शन्स?

सहसा मधुमेहाचे रुग्ण स्वतःच काळजी घेतात, मर्यादेत खाणे, गोड कमी अथवा अजिबात न खाणे इ. तरी भात, बटाटा आणि तळण मुख्य मेनूत नसले तर बर. तसेच भाजी-आमटी, चटणी-कोशिंबीरपण साखर न घालता केलेली बरी. पालेभाजी, डाळ-कडधान्य चालवीत.

एका आजींसाठी सगळा मेन्यूच 'मधुमेही' करणे योग्य नाही.. अर्थात जर ती "शत्रूपक्षातली" मुख्य बाईच असेल तर गोष्ट वेगळी!..मग तिच्या साठी गर्भरेशमी साडी आणि अगोड स्वयंपाक!!
Happy

सनव, माफक गोड शेवयांची खीर / गाजर हलवा / शिरा करता येईल. वेगळं काही हवं असेल तर पपई, सफरचंद, डाळिंब घालून माफक गोड फ्रूट सलाद. शुगर फ्री आईसक्रीम / श्रीखंडही आणू शकता.

आजींना वेगळं काही - थालिपीठे आवडत व चाववत असतील तर खमंग व मऊ थालिपिठे, रायते किंवा दही / ताक, लोणी व लिंबाचे किंवा मिश्र भाज्यांचे लोणचे. पंचामृत. मूगडाळ तांदळाची मऊ खिचडी. पापड कुरडया.

सगळ्यांसाठी एकत्र बेत करायचा असेल तर भरली वांगी / ऊंधियो, फुलके, काकडीची कोशिंबीर, नारळाची चटणी, पापड कुरडया, टोमॅटो सार, पुलाव. कोथिंबीर वडी / टिक्की प्रकार किंवा इतर कोणताही चाट आयटेम ऑप्शनल.

शक्यतो एकत्रच बेत करावा. साखर, बटाटा, खूप तेलकट प्रकार जेवढे जमतील तेवढे टाळावेत. साखर घालायचीच असेल तर ती बेतानेच.

धन्यवाद! आजी नात्यातल्या नाहीत, मी आधी बासुंदी पुरी बटाटा भाजी पुलाव वगैरे ठरवलं होतं मग कळलं आजीना मधुमेह आहे. आता पोळ्या , मटकीची उसळ, कोशिंबीर असं काहीतरी बघते. गोड पदार्थ अजून एक भाजी आणि भाताचा प्रकार असेलच. आजींसाठी थालीपीठ ही आयडियाही छान आहे.

अमेरिकन मॉम्स नाईट आउट ला जायचे आहे. लेकिच्या शाळेतील आया आहेत .
मेल मधे तिने वाईन आणि स्नॅक्स लिहिले आहे. एखादे देसी अ‍ॅपिटायझर सुचवा जे करायला सोपे असेल आणि सर्वांना खाता येईल. मी त्या दिवशी दिवस् भर बाहेर असणार आहे, आणि संध्याकाळी जायचे आहे या गेट टुगेदर ला.

भाजणीचे मिनी साईज वडे /कोथिंबीरवडी / इडली फ्राय (दिवसभर किती टिकतील माहीत नाही, पण नीट रॅप केले तर शक्य आहे) / चिंटू बटाटेवडे / तयार मिनी बाकरवडी / मेथी मुठिया / मक्याचा चिवडा

फुलवडी तिथे तयार मिळेल का माहीत नाही, परंतु मध्यंतरी मयूर कंपनीची फुलवडी खाल्ली ती खूपच टेस्टी होती. तशी मिळत असेल तर मस्त पर्याय आहे तोही.

रिमझिम, चिकन टिक्का घेऊन जा. आदल्या दिवशी करून ठेवता येईल. बोनलेस चिकन चे तुकडे करून घ्या. दही, थोडे तिखट, मीठ आणि तंदूर मसाला एकत्र करून चिकन मॅरिनेट करा. (आलं लसूण पेस्ट पण घालता येईल) मग ३५० डीग्री फॅ वर १५ - २० मिनीटं बेक करा आणि १ मिनीट प्रत्येक बाजूवरून ब्रॉइल करा. मस्त खरपूर होतो. अमेरिकन आया आहेत तर फक्त तिखट कमी टाका Lol

चिंटू बटाटेवडे>>>> हे बघेन.
खिरापत' >>:)

अकु फुलवडी म्हण्जे काय? घरी करता येते का?

धनु, मी व्हेजि आहे ग Sad

रिमझिम, मी धनि आहे धनु नाही Lol

आणि व्हेजी आहे तर चिकन ऐवजी पनीर करा. मॅरिनेशन ला पण वेळ लागणार नाही हाकानाका Wink

अरे सॉरी वगैरेची गरज नाही. मी वरच्या दोन्ही गोष्टी करून पाहिल्या आहेत आणि माझ्या आम्रु मित्रांना त्या आवडलेल्या आहेत Wink

Pages