Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59
सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रचु, मेनु करताना कॉमन करता
रचु, मेनु करताना कॉमन करता येतो का बघा ना...हेल्थ फ्रीक आणि बाकी लोकांना वेगवेग़ळं कुठे करत बसणार.
काही कॉमन करता येतील असे पदार्थ :
अक्खा मसुर कबाब - ( मसुर ५-६ तास भिजवुन , पाणी काढुन वाटुन घ्या. त्यात तिखटतिखट्,आलं लसुण पेस्ट, चाट मसाला,बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर घाला. कबाब करुन शॅलो फ्राय. मस्त होतात...हेल्दी पण होईल )
मश्रुम , रंगीत ढबु मिरच्या अशी भाजी - कोरडी किंवा कांदा टोमॅटो ग्रेव्ही वाली - हेल्दी वाल्याना पण खाता येइल
ग्रीन सॅलड
ब्राउन राईस दावत चा मिळतो त्याची खिचडी / पुलाव किंवा बिर्याणी पण मस्त होते. दावत चा भात मस्त मोकळा शिजतो.
एखादं सुप
आणि मग तुम्ही ठरवल्याप्रमाणे मलाई कोफ्ता व ईतर पदार्थ बाकी लोकांसाठी
स्मिता, तुम्ही लिहिलेले मसुर
स्मिता, तुम्ही लिहिलेले मसुर कबाब मस्त वाटताहेत. डब्यात द्यायला छान पर्याय आहे. त्यात बाईंडिंगसाठी बटाटा किंवा ब्रेडक्रम्ब्ज घालावे लागतात का?
मंजुडी, काहीही घालावे लागत
मंजुडी, काहीही घालावे लागत नाही.....मस्त खुटखुटीत होतात...
फक्त मिक्सर वर वाटताना अज्जीबात पाणी नाही घालायचे
डब्याला आणि डाएट करणार्यांना मस्त पर्याय आहे.
ओक्के! थँक्स गं.. (आधी
ओक्के! थँक्स गं.. (आधी अहोजाहो, आता अगंतुगं
)
लेकीला मसुर खूपच आवडतात गं.. त्यामुळे माझे डोळे टवकारले लगेच
सलाड वर जगत असेल तर त्यालाच
सलाड वर जगत असेल तर त्यालाच काय चालेल विचारा. प्रकृतीची कारणं असूं शकतात. हवं तर त्यांना तुमचे पर्याय द्या. उस्तवार करुन काकडी, टोमॅटोवर राहिला तर तुम्हांला त्रास होईल.
अगंतुगं च ठीक आहे की
अगंतुगं च ठीक आहे की
मंजूडी.... कान "टवकारतात" व
मंजूडी.... कान "टवकारतात" व डोळे "विस्फारतात" !
(त्वचा "हुळहुळते", जीभ "चाळवते" व नाक "सुरसुरते" )
इथे वरचा शब्दप्रयोग बरोबर
इथे वरचा शब्दप्रयोग बरोबर वाटतो- डोळे टवकारणे
डोळे वटारतात किंवा
डोळे वटारतात किंवा विस्फारतात.
चला लयच अवांतर झालं
आंबटगोड, त्या वाक्याच्या
आंबटगोड, त्या वाक्याच्या पुढची स्मायली दिसली नाही का?
कानच टवकारतात, पण इथे ते शक्य नाहीये ना, म्हणून माझे 'डोळे' टवकारले.
माझ्या लेकीला मसूर आवडतात, त्यामुळे स्मिताच्या वाक्यात मसूर वाचून मी 'अलर्ट झाले' असं मला 'थोडक्यात' म्हणायचं होतं.
हुश्य!
स्मिता. थँक्यू गं! मी करून
स्मिता. थँक्यू गं! मी करून बघेन लवकरच. सांगेन तुला.
मोड आलेले मसूर घेतले तर डबल
मोड आलेले मसूर घेतले तर डबल हेल्दी
त्या नवरोबाला मोडाच्या
त्या नवरोबाला मोडाच्या मसुराचे सलाद व बाकीच्यांना कबाब! लाजवाब!!

रायतं खात असेल तर जेवणातलं एक तोंडीलावणं रायतं ठेवता येईल. काकडी / टोमॅटो / दुधी / लाल भोपळा / काकडी कांदा टोमॅटो मिक्स / पालक / पुदिना रायता वगैरे बरेच पर्याय आहेत.
तवा फ्राय भाजी
एखादी तरी अनहेल्दी भाजी / तोंडीलावणं ज्यामुळे जेवणाची लज्जत वाढेल (उदा मलई कोफ्ता, पनीरची भाजी)
सार / रस्सम् / डाळ
जिरा राईस
डेझर्ट म्हणून रसगुल्ला न
डेझर्ट म्हणून रसगुल्ला न ठेवता नुसते मिक्स फ्रुट्स ठेवता येतील किंवा त्यात थोडे स्विट योगर्ट आणि खजूर / मनुके आणि ड्रायफ्रुट्स घालून पारफे करता येईल. योगर्ट ऐवजी व्हिप्ड क्रिम हा थोडा हेवी ऑप्शन होईन.
खिरापत कोणी काय केली सध्या?
खिरापत कोणी काय केली सध्या?
थोडे वेगळे हटके काही असतील तर!
इथे टाका ऑप्शन्स
बाव चाट बहुतेक हीट आयटेम असणार यावेळी खिरापतीचा...
@ स्वप्नाली, सगळाच खिरापत
@ स्वप्नाली, सगळाच खिरापत मेनू उपासमय करायला काय हरकत आहे? गोडात नारळवडी किंवा फ्रूट सॅलड? बाकीचा मेनू चांगलाच आहे. साबुखिचडी ऐवजी मी साबु वडा सुचवेन. तरी दोन्हीपैकी कोणताही पर्याय चालावा.
धन्यवाद स्मिता मसुर कबाब
धन्यवाद

स्मिता मसुर कबाब मस्त.
अरुंधती, एक तोंडीलावणं रायतं करीन.
धनि, डेझर्टची कल्पना चांगली आहे.
मी कांदा भजी बाकी मैत्रिणीनी
मी कांदा भजी बाकी मैत्रिणीनी बेसन बेस्ड पदार्थ आणले होते.
(No subject)
(No subject)
मसूराच्या कबाबात एखादी
मसूराच्या कबाबात एखादी पालेभाजी बारीक चिरून पण छान लागते. मी मनाला येइल त्या भाज्या ढकलते. बीट, गाजर किसून उकडलेला बटाटा / किन्वा, मेथी वगैरे.
costco चे फ्रोझन स्प्रिंग रोल कुणी वापरलेत का पूर्वी?>> मी खाल्लेत. बरे असतात.
बंगाली कुटुंबाला रसगुल्ला
बंगाली कुटुंबाला रसगुल्ला देण्यापेक्षा एखादं मराठमोळं पक्वान्न द्या. आपल्याला रोज जे खायला मिळत नाही, ते दिलं तर एग्झॉटिक वाटतं माणसाला! शिवाय करायला तुम्हालाही सोपं!!
मेन्यु बद्दलही तेच सुचवेन. पनीर पेक्षा मस्त चमचमीत भरली वांगी, दाल-फ्राय पेक्षा चिंच-गुळाची शेवग्याच्या शेंगांची आमटी वगैरे...तुमच्या घरच्या आवडीनुसार बदल करा. आणि सॅलड खाणार्या पाहुण्याला विचारून त्याच्या आवडीचे काही बनवा.
येणाऱ्या पाहुण्यांमध्येही
येणाऱ्या पाहुण्यांमध्येही जेवणाच्या बाबतीत बरेच प्रकार असतात. काहींना त्यांच्या नेहमीच्या खाद्यवर्तुळातलेच पदार्थ लागतात. नवे किंवा वेगळे काही ट्राय करायची अजिबात तयारी, आवड, इच्छा नसते. काहींना तुम्ही जितके वेगळे, एग्झॉटिक पदार्थ खाऊ घालाल तितके हवेच असतात. काहीजणांना तुम्ही तुमच्याकडील पारंपारिक पदार्थ खाऊ घातलेत तर त्याचे जाम कौतुक वाटते. काहींना पॉप्युलर असणारे पदार्थच कम्फर्टेबल वाटतात. काहींना ट्रेंडी पदार्थ खायला आवडतात. हेल्थ कॉन्शस होऊन खाणारे पुन्हा वेगळे. काहींना जेवणात बटाटा / पनीर लागतेच लागते.... तरी यात ऑरगॅनिक, व्हेगन, नो नट्स् वगैरेंची जंत्री नाही. थोडक्यात काय, मिक्स क्राऊड असेल तेव्हा मिक्स मेनू असावा. (हा आपला माझा ठोकताळा!)
व्वा, सही जबाब अकु
व्वा, सही जबाब अकु
काहीजणांना तुम्ही तुमच्याकडील
काहीजणांना तुम्ही तुमच्याकडील पारंपारिक पदार्थ खाऊ घातलेत तर त्याचे जाम कौतुक वाटते.>> हो मोस्टली हा अनुभव आलाय पण नियम अपवादाने सिद्ध करायला एक वेगळा अनुभव पण आहेच, एक्दा आमच्या एका पन्जाबी फ्रेन्डने पुरणपोळीच कौतुक एकुन हे काय एवढ स्पेशल असत तुमच्यात म्हणुन विचारलेल , याला एक्दा खाउच घातली पाहिजे म्हणून बाकी मिक्स मेनुत हे ही अॅडल आणी घातला घाट, त्याच्यामते पुरणपोळी म्हणजे आलु -पराठ्यासारखच पण गोड सारण भरुन केलेल्या पोळ्या ,त्यात काय एवढ कौतुक करण्यासारख ! तेव्हापासुन मराठी पब्लिक असल्याशिवाय ऑथेन्टिक मराठी पदार्थ करायचे नाही अस ठरवुन टाकल.
येस, प्राजक्ता, आपल्या
येस, प्राजक्ता, आपल्या चैत्रातल्या आंबेडाळी ला ही ऑफिस मधल्या नॉन मराठी पब्लिक ने दाल की चटणी म्हणून डिग्रेड केलं होतं
वीकएंड ला एक अमेरिकन मित्र
वीकएंड ला एक अमेरिकन मित्र आणि त्याची गर्लफ्रेंड यांना डिनर ला बोलवायचा आहे. मित्राला चाट आवडते म्हणून पाणीपुरी आणि रगडा पेटीस करायचा विचार आहे. मेन मेन्यु सुचवा. वेज-नोन्वेज चालेल. नेहमी बाहेर खाल्ले जाणारे आयटम्स नकोत.
पुरणपोळी म्हणजे आलु
पुरणपोळी म्हणजे आलु -पराठ्यासारखच पण गोड सारण भरुन केलेल्या पोळ्या >>
पण खरंच तर आहे की. 
सुरभि १. मिसळ पाव - खिमा
सुरभि
१. मिसळ पाव - खिमा पाव ;
२. खिमा किंवा कोलंबीचं सुकं घालून मसाला डोसा ;
३. मालवणी कोंबडी वडे, आंबोळ्या , काळ्या वाटाण्याची उसळ ;
४. दाल बाटी बरोबर गट्टे घालून पुलाव , राजस्थानी लाल मास ( मिसळ्पाव वर कातिल फोटो असलेली रेसिपी आहे )
५. टिनाच्या रेस्पीने वर्हाडी चिकन बरोबर भाकरी , भरल्या वांग्याची भाजी
मसाले भात, टॉमेटो राइस, टॅमरिंड राइस, लेमन राइस असा कुठलाही एक भाताचा प्रकार
मेधा +१ >>> सगळे options छान.
मेधा +१ >>> सगळे options छान. I would add salad + dessert to this.
Pages