बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्विट कॉर्न आणि लाल कांदा सॅलड - तयारीला थोडा वेळ लागेल पण मस्त लागते एकदम. गरमीकरता उत्तम !

कॉर्न ची कणसे असतील तर थोडी वाफवून दाणे काढून घ्या. कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घ्या. २-३ वेगवेगळ्या रंगांच्या ढोबळ्या मिरच्या (स्वीट पेपर्स) बारीक चिरून घ्या. पाहुणे तिखट खाणारे असतील तर एखादी हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.

सगळे एकत्र करून लिंबाचा रस घाला. थोडे मीठ, मीरपूड आणि चाट मसाला घाला.

ऑगस्ट मधे बायकोने सोसायटीच्या काही मैत्रिंणिसमवेत किटी पार्टी आयोजित केली आहे. १५-१६ जणीच आहेत.
एखादं वेलकम ड्रिंक्/स्नॅक, नंतर स्नॅक्सचा दुसरा पदार्थ आणि गोड पदार्थ.

सध्यातरी गरम कॉफी आणी दाबेली ठरलयं. गोड मधे काय द्यायचं कळेना. रसमलाई हा एक पर्याय आहे.
पण एखादा वेगळा पदार्थ करता येईल का? जसे की एखादा पारंपारिक महाराष्ट्रिअन पदार्थ.

मँगो शिरा / अननसाचा शिरा मस्तच लागतो.

दाबेली, कॉफी, गोडाबरोबर एक स्नॅकही हवंय, बरोबर?
दाबेलीला अनुरूप वाटणारे स्नॅक म्हणजे मक्याचे पॅटिस - चटणी - सॉस.
आणखी पर्याय म्हणजे रगडा-पुरी. कडक पुऱ्या किंवा पाणीपुरीच्या पुऱ्यांवर गरमागरम रगडा, शेव, आंबटगोड चटण्या, कांदा, कोथिंबीर वगैरे मालमसाला घालून देतात. रगडा-पॅटिस खूपच पोटभरीचे होते म्हणून रगडा-पुरी.

स्ट्रीट फूड नको असेल तर कांचीपुरम् इडली-चटणी.

धन्यवाद, होय कॉफी सुरुवातीला.
दाबेली-पॅटीस आणि गोड असं नंतर शेवटी.
मका पॅटिस पण मस्त पर्याय आहे, गरम गरम छान लागतील.

मका पॅटीज अगदी कॉईन्स च्या आकारात करून एकेका टूथपिकला लावून ट्रेमधून सर्व करता येतील; फिंगरफूड टाईप स्टार्टर. असेच हराभरा कबाबही करता येतील किंवा चक्क मूगभजीही चालतील.

पॅटीज ला जरा मेहेनत आहे पण मूगडाळभजी लवकर होऊ शकतात.

मोनॅको बिस्किट्सवर टॉपिंग्स घालूनही स्टार्टर टाईप काही करता येऊ शकेल; वेळ, मदतीला हात आणि हौस असेल तर!

माझ्याकडे एक चायनिज अमेरिकन कुटुंब दुपारी २-३ ला येणार आहेत, नवरा बायको आणि ३-४ मुलं. त्यांच्यापैकी बाई, माझ्या नवर्‍याची कलिग आहे, तीला आपले चाट प्रकार आवडतात पण नवर्‍याचं आणि मुलांचं माहीत नाही.
डेझर्टसाठी फालूदा आणि आल्या आल्या द्यायला कलिंगडाचं ज्युस नक्कि केलंय पण नाश्त्यासाठी काय बनवता येईल?

मी चितळेच्या ईडली आणि खमण मिक्स चे चटणी घालून ढोकळा सँडविच, दही वडे आणि मुलांसाठी पिझ्झा बाईट्स म्हणतेय किंवा चिकन खिम्याचे कटलेट्स/ कबाब. नवरा पाणीपुरी म्हणतोय पण मला वाट तंय कि ते त्यांना नीट खायला जमणार नाहीत प्ल्स मुलं ते खाणार ही नाहीत.

>> ३-४ मुलं

नक्की किती ह्यावर एकमत दिसत नाही का आई-वडिलांचं? Wink

जोक्स अपार्ट, सीमंतिनी चं सजेशन आवडलं. आणि पाणीपुरी करता तुम्ही आधी एक प्रात्यक्षिक द्या Wink

तीला आपले चाट प्रकार आवडतात >> मग तुमचा मेन्यु चांगला वाटतोय. पण एकंदरीत असा अनुभव आहे की त्यांना जरा हलके (कमी डाळ असलेले/ कमी तळलेले) पदार्थ आवडतात त्यामुळे पाणीपुरी चांगली होईल. सशल म्हणती आहे तसं आधी एक प्रात्यक्षीक द्या.

पाणीपुरी + खिमा कटलेल्ट्स / चिकन टिक्का (बोनलेस चिकनला थोडा मसाला, आले-लसूण पेस्ट लावून ते ग्रील केलेले - चटणी बरोबर) आणि सॅलड असं बरं होईल.

दुपारी ३ वाजता जास्ती ढोकळा जास्ती हेवी होईल कदाचीत !

३ -४ म्हणजे ती बाई नेहमी तिच्या भाचरांना घेऊन फिरते म्हणून, नंतर ती एका पार्टीला जाणार आहे. ढोकळा जास्तच होईल जरा, त्यात २ मुलांना पीनट अ‍ॅलर्जी आहे आणि एकाला अंड आणि दुधाची.
आता ऑप्शन्स अजून कमी झाले.

पाणी पुरी चालेल तर तेच बनवेन, बिनअंड्याचे खिमा कटलेट्स. हुश्श, आता नट्स साठी बहुतेक अख्खं किचन साफ करून मगच सुरुवात करावी लागेल.

कलिंगडाचे ज्युस,
पाणी पुरी
खिमा कटलेट्स
फालुदा
जिलेबी बनवावी कां??

जिलेबी बनवावी कां?? >> कबाबस्किवर्सला लावून द्यावी नायतर मुले सोफा इ चिकट करणार.

मग सरळ नट्स, अंडं आणि दुध पूर्णपणे वगळून काही करता येणार नाही का? फ्रुट्स घातलेलं जेलो वगैरे?

नको...ह्या काँबिनेशन मधे कलिंगडाचा ज्यूस, त्यावर पाणीपुरीचे पाणी आणि त्यावर फालुदा...असे विचित्र काँबिनेशन पोटात जाऊन त्यांना ढवळायला /मळमळायला नको नंतर!

त्यापेक्षा, आल्या आल्या कोकम सरबत किंवा आवळा सरबत, रगडा पॅटीस /आलू टिकी ऑर साबुदाणा वडे (दाण्याचा कूट न घालता!) व नंतर फालुदा (किंवा दुसरेही आईसक्रीम) असे चालेल का?
किंवा लाईट हवं असेल तर सरळ गरमागरम कांदा पोहे व वेफर्स /शंकरपाळी आणि सरबत अथवा आईसक्रीम!

स्प्रिंग रोल्स किंवा व्हेजी रॅप्स चालू शकतील बहुतेक. ब्रेड रोल्सही चालतील. आलू टिक्कीही चालू शकेल.

मी बनवलेला मेन्यू,

वेळे अभावी कलिंगड ज्युस नाहे बनवलं, नुसतंच थंड पाणी दिलं.
पाणी पुरी
शेव पुरी
चिकन खिमा कटलेट्स
फालुदा
जिलेबी

सगळेच प्रकार त्यांना खुप आवडले, सगळंच मध्यम प्रमाणात तिखट बनवलेलं. जिलेबी तर पॅक करून पण घेऊन गेले. Happy त्यांच्या मुलांनीही सगळं ट्राय केलं, एकाने फालुद्यात फक्त नुदल्स आणि रोझ सिरप घालून खाल्लं. नवर्‍याने लॅक्टोज फ्रि आईस्क्रिम आणलेलं पण नंतर समजलं की त्याला सॉय आईस्क्रिमच चालतं, ते आणायला हवं होतं. Sad

चिकन खिम्यामध्ये वाफवलेल्या भाज्या घालून माझ्या मुलांना संध्याकाळी रस्सा बनवून दिला.

माझ्याकडे भिशी आहे. बंगाली, पंजाबी, उत्तर प्रदेशी असा मिक्स क्राउड आहे. थीम आहे "विसंगत"
काय करू सुचवा.
मी आल्या आल्या थंड (कोल्ड) मारामारी (चहा+कॉफी) वरून थोडं थोडं आईसक्रिम टाकून द्यावं म्हणतीये.
खाली दिलेल्या पैकी कोणते पदार्थ छान वाटतील ?
शेव बटाटा (पुरी ऐवजी) नाचोस
पास्ता इन सांबार
उत्तप्पा पिझ्झा
कांदा कढीपत्ता हळद टाकून साबुदाणा खिचडी

गोडात सध्या तरी काही फार सुचत नाहीये
छोट्या काचेच्या कपात तिरकी जेली सेट करून उरलेल्या भागात श्रीखंड आणि वरून गोड बुंदी - हे कसं वाटेल ?

वरणातला पास्ता करा टी. नॅचोस शेव बटाटा इज गुड.
नॅचोस किंवा पापडीवर गुळ-खोबरे बरे वाटेल का? तिखट संदेश? गोड चकली?

कोल्ड कॉफी + आईसक्रीम याला पर्याय म्हणून कोक/फॅन्टा/स्प्राईट फ्लोट (अजून लाईट पर्याय हवा असेल तर - टरबूजाचा ज्यूस + खरबुज/किवी/रांबुतान पर्ल्स/मार्बल्स. दुसरा प्रकार - लेमन ड्रिंक आणि त्यात तळाला कुठल्याही वेगळ्या रंगाचं कॉन्स्न्ट्रेट उदा - ऑरेंज/मँगो/खस/गुलाब/कालाखट्टा इ. )
नाचोज शे ब मस्तच!
वरणातला पास्ता एकदम मस्त होईल, वर शेंगदाण्याची चटणी (पार्टीत कितपत करायला लागेल आणि प्रमाण एकदा विचारून घ्या)

छोट्या काचेच्या कपात तिरकी जेली सेट करून उरलेल्या भागात श्रीखंड आणि वरून गोड बुंदी >>
यात श्रीखंडापेक्षा फ्रूट कस्टर्ड + वरून एखाद्या वेगळ्या फळाची (शक्यतो सिट्रस) सजावट असं मस्त वाटेल.

गोड बुंदी भरून उकडीचे मोदक/मोमोज? हाच प्रकार उसळ्/सुकी भाजी भरून तिखटही करता येईल.

नुस्ती कोल्ड कॉफी नाही मरामारी करायची म्हणते आहे. आइस्क्रिम घालून फार हेवी होईल का ?
फ्लोट ची आयडीया पण मस्त आहे.
जेली + फ्रूट कस्टर्ड हे नेहमीचं कोम्बो आहे मला हटके हवंय
वॅनिला आइसक्रिम वर कोथिंबीर आणि लाल तिखट भुरभुरवून कसं लागेल ?
गोड बुंदी वर चाट मसाला ?

बाप रे! 'विसंगत' थीम?
पण पदार्थ खाणेबल तरी पाहीजे ना?
सगळ्यांना ड्रेस पण विसंगत घालून यायला सांगा.....

तिखट संदेशमधे ओलंखोबरं+मिरची बारीक कापून+कोथिंबीर+अगदी बारीक चिरलेला कांदा असं सारण भरता येईल किंवा मटार पॅटिसचं सारण भरता येईल. मूगडाळ कचोरीचं सारणही वापरता येईल.

वॅनिला आईसक्रिमवर कोथिंबीर नको पण तिखट मीठ चाटमसाला भुरभुरवून मस्त लागेल. पेरूला तिख्टमीठाचा मसाला लावतो तसा.

पण पदार्थ खाणेबल तरी पाहीजे ना? >> माझ्याही मनात हाच विचार आला Happy
लोकांना खायला घालायच्या अगोदर , स्वतः चाखून बघणार ना पदार्थ ?
वेलकम ड्रीन्क मला एक्दम कससंच झालं - मारामारी विथ आईसक्रीम फ्लोट Sad

बाकी - नाचोज ची शेबपुरी मस्त आहे .
उत्तपा पिझ्झा ही छान :). आमच्या ऑफिसच्या जवळ एक टपरीवरचा डोसेवाला पिझ्झा डोसा देतो .

Pages