बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राजक्ता - अप्पे, मिनि इडल्या फोडणी घालून, साबुदाणा वडे + चटणी, सुरळीच्या वड्या, पाटवड्या , गोगांच्या रेस्पीने बाळ बटाटे, शेव पुरी, दही वडे ,

थॅन्क्यु अकु,मेधा! बाकरवडी चाटच नेली होती करुन, सगळ्याना आवडली, बावचाट च्या धाग्यावर फोटो टाकलेत.

दही भात. भात नसेल तर दही-स्पघेटी पण चालेल (इट्स क्रिमीनल...इष्क गदर करे धिन्ना धिना, दिल का हशर करे धिना धिना...).

दहीभात, मसालेभात, पुरी-भाजी (डोसा भाजी), नारळाची चटणी, काकडीचे रायते, कैरीचा तक्कू, टोमॅटो सार किंवा रस्सम्
पापड्या कुरडया, पालकभजी
स्वीट म्हणून खीर (शेवया / पायसम् / पुरणाची खीर)
बायकांना भरगच्च गजरे
तांबूल

(फारच स्टिरिओटाईप मेनू झालाय! Lol )

Lol Lol
अग त्यांना अगदी मराठी पदार्थ खाउन बघायचे आहेत. म्हणुनच आपले पदार्थ विचारल.
पुलाव आणि सार करणारच आहे. भाजी, स्वीट आणि साईड काय कराव कळत नाहीये.
साईड सुरळीच्या वड्या नवर्‍याने सुचवल्या होत्या पण इथेच कुठेतरी साऊथ कडच्या लोकांना आजिबात आवडत नाहीत अस वाचलेल आठवल. मग सगळ्याच गोष्टीत हे आवडेल का हा प्रश्न पडतोय.. Uhoh

कांद्याची भजी / आळूच्या वड्या / कोथिंबीर वड्या साईड होऊ शकते. साधी काकडीची कोशिंबीर चांगली लागेल. किंवा मफ फोडणीची डाळ / वाटली डाळ करता येईल. स्वीट म्हणून बासूंदी , शिरा, मोदक, खुप करण्याची तयारी असेल तर पुपो ! भाजी मात्र साधी बटाटा, फ्लॉवर वगैरे ओलं खोबरं घालून चांगली लागेल. वेगळं काही म्हणून मग मटकी किंवा मुगाची उसळ करता येईल. हो बेसनाचे लाडू , खव्याची पोळी हा पण गोड बेत होऊ शकतो

मराठी पदार्थ म्हणतेस? मग वांग्याचे फर्मास भरीत किंवा कांदा-बटाटा रस्सा / फ्लॉवर मटार बटाटा ओले खोबरे वाटण रस्सा
कैरीची डाळ साईड डिश म्हणून होऊ शकते. किंवा पंचामृत.
स्वीट म्हणून दुधी/गाजर हलवा / खीर / आंब्याचा शिरा?? किंवा खरवस (पण सर्वांना हा आवडेलच असे नाही!)

शनिवारी १०-१२ मित्र मैत्रिणी येणार आहेत. पाच वाजता. प्लीज स्नॅक्स मेन्यू सुचवा.
दोन्ही प्रकार सांगा. म्ह्णजे, डाएट काँशस वाल्यांना व इतरांना...काँबिनेशन मधे . पावसाळी हवा असल्याने मिसळ पाव म्हणतेय. पण त्याच्या बरोबर काय देता येईल?

रगडा पॅटीस चा 'रगाडा' जास्त पडेल असे वाटते..म्हणाजे ते पॅटीस आधी करुन ठेवता येतील म्हणा.
गोड हवंच. आईस क्रीम किंवा मिल्क शेक म्हणतेय.

तोंडात टाकायला मजेमजेचं हवं असेल तर भाजलेले भुट्टे (किंवा भुट्ट्याचे भाजलेले दाणे वेगळे काढून त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हि मि, कोथिंबीर, चाट मसाला घालून भुट्टा सलाड), उकडलेल्या (मीठ + हळद पाण्यात) भुईमुगाच्या शेंगा, उकडलेल्या रताळ्याचे काप (थोड्या तुपावर शॅलो फ्रायही करता येतील.) वरून तिखट-मीठ-मसाला भुरभुरून.

हा कुटाणा बराच वाटत असेल तर आलू - सोया टिक्की / बटाटा + उकडलेल्या भाज्या वगैरे घालून कटलेट्स व केचप - चटणी.

मिसळ-पावासोबत खरं तर गरमागरम शिरा (सत्यनारायण स्टाईल / आंब्याचा / अननसाचा) किंवा मूग हलवा हेच सुचतंय. Proud
परंतु दुधी हलवाही मस्त वाटेल. जरा गरम करून द्यायचा.

मिसळ संध्याकाळी पाचाच्या नाश्त्याला फार अपील नाही होत. त्यापेक्षा गरमागरम बटाटावडा/ वडापाव, खेकडाभजी, बटाटाभजी, भुट्टा आणि मनसोक्त चहा. Wink

योकु, छळवादी मेनू!! Proud
भजी पकौडे हे तर मॉन्सून स्पेशल स्नेक्स!

गरमागरम साबुदाणा वडे - चटणी / उडीदवडे - चटणी - सांबार
किंवा
ब्रेड पकोडे व वाफाळता चहा / कॉफी...

बस्केने लिहिलेली बटाट्याच्या भाजीचे सँडविच रेसिपीही आहे.

पावसाळी गेट टूगेदर फॅमिलीचे होते गेल्या रविवारीच,

बटाटावडे, हिरव्या मिरची खर्डा, भुट्टा, घी/ सधी इडली चटणी, छोले समोसा चाट. सर्व चटण्या ठेवायच्या. लोकच पाहिजे तसे आणि तेवढे घेतील.

चक्का वापरून सँडविच ( डायट वल्याना), इथे रोस्टेड पेपर्स. चक्क्या मध्ये टाकून,
काकडी किसून पाणी काढून टाकायची. लोकच लावून घेतील.
फक्त ब्रॉउन ब्रेड्च्या कडा कापून ठेवायच्या.

चहा, कॉफी. गोड मधे रवा आमरस घालून मफीन्स. एक सेट साखर आणि आमरस तर दुसरा मफीन्स सेट नुसता आमरस ( साखर नियंत्रित लोकांना).

मी हे बाहेर डाबे करणार्‍य/ पुरवणार्‍या बायांकडून करून घेतले.

गरम चहा कॉफी आणि गरम मफीन्स फक्त मी घरी केली. चहा आणि कॉफीत साखर न टाकत आपापली घ्यायला ठेवली बाजूला.

पावसाळ्यात चाट आनि पकोडे, वडे मस्ट आहेत.
थंड मिल्कशेक , आईसक्रीम टोटल नो पावसा मध्ये. ते हि संध्याकळी घरच्या भेटीला?

लोक घरी भिजून आल्यावर गरम खायला मस्त वाटतं.
छोले गरम, समोसा, बवडा मज्जा वाटते.

गरमागरम समोसे, कचोरी, बटाटेवडे, आलू पहुवा / बटाटेपोहे, पकौडे, छोले-पुरी, फाफडा, टिक्की यासारख्या पदार्थांची पावसाळी दिवसांत नावं जरी वाचली तरी तोंडाला पाणी सुटते!

Happy हो पण समोसे मला घरी नाही येणार करता! ...बटाटेवडे - पाव, इडली- चटणी व भुट्टे , नंतर कॉफी वा दलीयाची खीर असे ठरविते आहे!

Pages