बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनिवारी एका तेलगु फॅमिली ने जेवायला बोलावले आहे. दोसे चटण्या , दही भात असा काहिसा बेत आहे.
याला साजेलसे काय करुन न्यावे?
दोन्ही कडे पेरेंट्स आलेले आहेत आणि मुली साधारण ८ ते १२ या वयोगटातील आहेत.

रिमझिम, इथे नंदिनीने लिहिलेली सुंदलची रेसिपी आहे. ती या मेनूसोबत चांगली वाटेल.
तसेच आलू बोंडा / मूग भजी / मिक्स पकौडे हेही सूट होतील. किसलेले गाजर, कोचवलेली काकडी, भिजवलेली मूगडाळ, डाळिंबाचे दाणे, मोड आणलेले हिरवे मूग व मीठ-साखर-लिंबाचा रस अशी मिक्स कोशिंबीरही नेता येईल.
गोडाचा विचार असेल तर शेवयांची सुकामेवा, केशर वगैरे घालून राजेशाही खीर. किंवा आंब्याचा शिरा.

किसलेले गाजर, कोचवलेली काकडी, भिजवलेली मूगडाळ, डाळिंबाचे दाणे, मोड आणलेले हिरवे मूग व मीठ-साखर-लिंबाचा रस अशी मिक्स कोशिंबीरही नेता येईल. >> माझ्या ओळखीतल्या तेलुगु ज्ये ना मंडळींना कोशिंबीर , सॅलड याचं फारसं कौतुक नसतं. कुठे बाहेर गेले तेंव्हा असा पदार्थ असेल तर अगदी नावापुरता पानात वाढून घेतात.

सुरळीचा वड्या, अळू वड्या, कच्च्या केळाचे काप, बटाटे वडे , साबुदाणे वडे हे प्रकार आवडलेले आहेत.

हो खरय मेधा ,कोशिंबिरी हे लोक हात पण नाय लावत.

वडे प्रकार बघते . अकु सुंदल ची रेसिपी शोधते आता.

शेवयाचा तिखट प्रकार नेता येईल का?

Rimzim, shevayaanchyaa instant iDalyaa chhaan laagataat. Lavakar hotaat.

शेवयांच्या इन्स्टंट इडल्यांची मृचीच रेसिपी आहे. मस्त, झटपट होतात. आणि (दीपच्या) फ्रोजन कोथिंबीर चटणीबरोबर बेष्ह्ह्ट लागतात.

Deep chyaa frozen chaTaNeeshee (chutney thaw karron) kuthalaahee padaartha best laagato he praanjaLapaNe kabool karaava laagel. Proud

अय्यो, तेलुगु होय? मी घाईघाईत ते तमिळ वाचलं. त्या जेवणात असते अशी कोशिंबीर.

वांग्याचे काप, वाटली (कोरडी) डाळ, दालवडा हेही प्रकार चालतील.

शेवयांच्या ईडल्या छान वाटतात ...एकायला हो. अजुन खावुन नाही पाहिल्या. पहिला ट्राय फेल होणार नाही ना?

नाही तर शेवयांचा उपमाच करेन.

मुलीचा वाढदिवस आहे

मुलगी ४ वर्शाची होईल
आत्ता तिच्या एका मैत्रिणीकडे गेलो होतो वाढदिवसाला तर फूड बॉक्स
दिले होते ज्यात एक ढोकळा, एक क्रिम रोल... केक.. चिप्स असं सगळं होत..

जेवणाचा पसारा करण्यापेक्शा ते बरं वाटल
शिवाय ४ वर्शाच्या मुलाना अजुन काय देणार..

मी पण पॅक बॉक्स द्यायचा विचार करत आहे..
मोतीचुर लाडु/ केक/ पापडी/ दोन ढोकळे..

अजुन काय टाकता येईल बॉक्स करा?
मदत करा

बर्गर, पोटॆटो फिंगर्स सॆंडविचेस, वडापाव, चिवडा, काजू कतली , बाकरवडी, कचोरी, पट्टी सामोसे, पॆटीस, करंजी....असंख्य ऑप्शन्स आहेत!

म्हणजे साईड ऑप्शन्स बरेच आहेत पण ..
मोठ्या माणसांसाठी एक मोठा पदार्थ असतो अशा बॉक्सेस मधे तो असतो बटाटावडा/ समोसा ई.

ते लहान मुलाना नाही देता येणार (४ वर्शाच्या) म्हणुन विचार करत होते ..
सँडविच ओके आहे अजुन विचार करते

The shop from where you're going to buy / get food box package would give you various options for adult and kids food box. Fill the box with food items which your daughter likes, kids like similar items more or less.

बोटांनी उचलून खाता येईल असा पदार्थ. जास्त तिखट नको. ओनियन रिंग्ज, चीझ बॉल्स, मिनी पिझ्झा असे पदार्थही ठेवू शकता. मिनी चीझ सँडविच, फ्रेंच फ्राईज् , मिनी व्हेज पफ्स, कटलेट्स हेही ठेवता येऊ शकतील.

बजेट कंन्ट्रेंट आणि जंक फूड ला एक दिवस ऑब्जेक्शन नसेल तर डॉमिनोज चा जॉय बॉक्स १४० ला येतो तो द्या.(महाग आहे पण बरेच श्रम वाचतात्+मुले खात्रीशीर रित्या आवडीने खातात.आम्ही नाही पण एक दोन ठिकाणी दिलेला पाहिलाय.)

मोतीचुर लाडु/ केक/ पापडी/ दोन ढोकळे >>> यात केक वगळता सगळे पदार्थ डाळीचे आहेत.

जेली किंवा चीज सँडविच/पिझा/मिनिबर्गर, चिप्स/पॉपकॉर्न, केक आणि सोबत ज्यूसचा टेट्रापॅक किंवा छोटी पाण्याची बाटली असं देता येइल.

@रिमझि@,
माझ्यावर एकदा अशीच "वेळ" आली होतत्य

तेव्हा मला "तेलुगु" लोकान्बद्दल फारसे माहीत नसल्याने मी मोठ्या उस्ताहाने "गाजर-हलवा" करून नेला भरपूर, तर ते म्हणाले "आम्ही जास्त गोड खात नाही" Sad
तेव्हा चटपटी त पदार्थ न्या...नोन-वेज जमत असले तर त्यातले काही नेउ शकता..नाही तर "आन्डा-पको डा" + चटणी

dinner menu : welcome drink, chips/salsa and dabeli as appetizer.
दाबेली सोबत मेन डिश काय बनवता येईल ?

किती लोक, काय वयाचे लोक आहेत , नॉन व्हेज चालेल का , तुम्ही रहाता तिथे ऋतु कुठला आहे , तब्येतीच्या किंवा इतर कारणांसाठी काही कन्स्ट्रेंट्स आहेत का - लो कार्ब, तळण नको वगैरे ?

तरी जेनेरिक सजेशन
( तुम्ही साल्सा म्हटलंय म्हणून )वेलकम ड्रिंक मोहितो, मिशेलाडा किंवा मार्गरिटा
मेन कोर्स टाको बार . कॉर्न टॉर्तिया, हार्ड टाको शेल्स, कांदा , कोथिंबीर, श्रेडेड चिकन ,, परतलेले मश्रुम्स, परतलेले बेल पेपर्स, पातीचा कांदा , चीझ , हिरवा आणि लाल साल्सा, सावर क्रीम, ग्वाकामोले, आवडत / चालत असल्यास चोरिझो किंवा इतर सॉसेजस पण ठेवू शकता

गोड म्हणून फ्लॅन

दाबेलीसोबत:

तवा पुलाव, छोले-भटुरे / पुरी, बुंदी रायता.

किंवा

स्टफ्ड पराठे, लोणचे, जिरा राईस, टोमॅटो सार किंवा रस्सम्, काकडी रायता / पुदिना रायता

किंवा

ऊंधियो, पोळ्या / फुलके, पुलाव, कांदा - काकडी - टोमॅटो रायता, पापड.

गोडात (विकतची) जिलबी + आईसक्रीम
किंवा
मूग शिरा

छोटे पराठे (तवा पराठा) + चिकन करी + स्विट कॉर्न आणि लाल कांदा सॅलड - लिंबाचा रस घालून + जिरा राईस / दही भात / कर्ड राईस ( साऊथ इंडीयन स्टाईल)

सध्या उन्हाळ्यामुळे थंड फ्रुट सॅलड - विथ ऑर विदाऊट क्रीम

आंबा पिच वगैरे फळं असतील तर विथ क्रीम / ग्रीक योगर्ट

कलिंगड, द्राक्ष असतील तर विदाऊट क्रीम

Pages