Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे एक कृती आहे बवड्याबरोबर
इथे एक कृती आहे बवड्याबरोबर करायच्या चटणीची - http://www.maayboli.com/node/32591
बेसनाची बाळे असलेली चटणीत
बेसनाची बाळे असलेली चटणीत कोरडे घटक घातले ( लसूण, तिखट, मीठ ) तर कोरडी होते.
<<
बेसनाची बाळे = वडे तळून कढईत उरतात ते छोटे छोटे बुंदी टाईप भजेच नं?
मला आवडणार्या वडापाव वाल्याकडे या बेसनाच्या बाळांत सरळ रेडिमेड कांदा-लसूण मसाल्याचं पाकिट ओतून मिक्स करतात, प्लस थोडं मीठ. तळणाचे तेल ऑलरेडी असतेच. ही होते लाल चटणी.
हिरवी चटणी = हिरव्या मिरच्यांचा ठेचाच असतो. मिरच्या त्याच कढईत झर्रकन तळून डब्यात बंद. त्याने थोड्या शिजल्यासारख्या होतात. मग ठेचल्या जातात, व त्यात मीठ, जिरं, लिंबू-सत्व.
हिरवी ओली चटणी = पुदिन्याची, मलातरी वडापावसोबत आवडत नाही.
सरळ रेडिमेड कांदा-लसूण
सरळ रेडिमेड कांदा-लसूण मसाल्याचं पाकिट ओतून मिक्स करतात >> मी पण अशीच करतो आणि ती एकदम झकास होते !
बेसनाची बाळे? पण मस्त लागते
बेसनाची बाळे?
पण मस्त लागते ती चटणी!!
दिनेश, नक्की कशी करायची बरं ती? घरी इतक्या प्रमाणात वडे करत नसल्याने बेसनाची बाळे मुद्दाम तळावीत का?
बाळे होतात .. करत नाहीत
बाळे होतात .. करत नाहीत (म्हणजे वडे तळल्यावरच बाळे होतात)
घरी इतक्या प्रमाणात वडे करत
घरी इतक्या प्रमाणात वडे करत नसल्याने बेसनाची बाळे मुद्दाम तळावीत का?>> खार्या बुंदी वापरता येतात.
सर्वाना धन्यवाद बेसनाची बाळे
सर्वाना धन्यवाद
बेसनाची बाळे व् कांदा लसुन मसाला मिक्स करून मिक्सर ला लावायच का????
हाताने कुस्करून होइल का बारीक़ ????
कारण ती लाल चटणी झट पट होइल व् वेळ वाचेल माझा
वडापावसोबत खरं तर लसणाचीच
वडापावसोबत खरं तर लसणाचीच तिखटजाळ, लालबुंद चटणी हवी! हाहा:कार माजला पाहिजे चटणी खाल्ल्यावर!!
सौम्या, हाताने कुस्करुन होईल
सौम्या, हाताने कुस्करुन होईल ती चटणी.
बापरे मला बेसनाचे बाळे वगैरे
बापरे
मला बेसनाचे बाळे वगैरे म्हणायला नारायण धारप कादंबरी सिनारियो प्रमाणे अघोरी वाटतंय.
वडे तळून आजूबाजूला गेलेले बेसनाचे छोटे तुकडे: यांचा आयडीयल खप म्हणजे तळणार्याने/रिने तळण्याचे श्रम कमी करण्यासाठी बाजूला ठेवून तोंडात टाकावे, किंवा मग पेशन्स असल्यास चटणी करावी.
लादि पाव खुप उरले आहेत त्याच
लादि पाव खुप उरले आहेत त्याच काय करता येइल.
फोडणीचा पाव
फोडणीचा पाव
मस्तपैकी रस्सा, शेवभाजी किंवा
मस्तपैकी रस्सा, शेवभाजी किंवा तर्रीदार मिसळ करून त्यासोबत लादीपाव खपवता येतो. भुर्जी, बटाटेवडे, भजी यांसोबतही छान लागतो.
लोण्यावर भाजलेला लादीपाव व गरमागरम चहा हा प्रकार तर ऑटाफे आहे.
मिक्सरमधे लादीपावांचा चुरा
मिक्सरमधे लादीपावांचा चुरा करता येतो. हा चुरा कोरड्या आणि घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रिजमधे ठेवला तर ८ दिवस टिकतो. हा चुरा वापरून फोडणीचा ब्रेड, कटलेट, पॅटीस, पुडिंग इत्यादी पदार्थ करता येतात.
अनु, अगं ती विचारणा ब
अनु, अगं ती विचारणा ब वड्यांच्या गाडीसाठी आहे. एवढी जास्त बाळे खाणार कशी (धारपांना जागून
)
लादीपाव आयडीयल वे म्हणजे गरम
लादीपाव
आयडीयल वे म्हणजे गरम गरम मसाला पाव.कितीही गटकता येतात.मसाला पाव ची कृती गुगल करा.
सगळ्याना धन्यवाद, पर्याय
सगळ्याना धन्यवाद, पर्याय सुचवल्या बद्द्ल
पण एक बेसिक शंका
पण एक बेसिक शंका आहे...पहिल्या २०- २५ ग्राहकांना ही चटणी मिळणार नाही कारण बाळे तोवर झाली नसतील!!
एकदा मात्र सुरु झाली व्हायला की काळजी नाही!
पण वर मंजूडीने खार्या
पण वर मंजूडीने खार्या बुंदीचा पर्याय सुचवलाय की. मला पण ते आवडले आता खारी बुंदी आणुन करुन बघेन.
बेसिक शंका कशी चुकली ते
बेसिक शंका कशी चुकली ते पाहण्यासाठी एकाद्या वडापाव गाडीवर जाऊन एकावेळी किती वडे कसे तळतात, व बाळाची चटणी वडे तळणातून निघण्याआधीच कशी बनते ते पहा.
(*संपादन : आधीचा प्रतिसाद मोबल्यातून होता. टंकाळा
)
भाजनिचे थलिपितर रेसेचिपे (
भाजनिचे थलिपितर रेसेचिपे (
नको.... बेसनाची बाळे
नको....
बेसनाची बाळे नको.....यापुढे ती चटणी कधीही खाणार नाही.नारायण धारप कथातल्या एक एक सिच्युएशन्स डोळ्यासमोर आल्या.
ओके तळून झालं असेल तर जरा
ओके तळून झालं असेल तर जरा बेकिंग कडे वळुया का
नीट शब्दात लिहिता येत नाही पण अगदी संक्षिप्त विचारायचं तर उरलेल्या कुकी डो चं तुम्ही कुकीज सोडून काही करता का? (इथे मला पुन्हा त्याचे शंकरपाळे तळा या सल्ला येईल असं जाम वाटतंय. सो वी मे गो बॅक टू तळणे अगेन असो)
कुकीला मुलांनी दिलेला प्रतिसाद पाहता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही (म्हणून माकाचुवर जायचं फायनली टाळलं) होल व्हीट पेस्टी फ्लार मुळे असू शकेल किंवा ओव्हरमिक्सिंग पण आता जे काही उरलंय ते विकेंडला फ्रीजरमध्ये टाकलंय.
आभार्स इन अॅडव्हान्स.
बेसनाची बाळे?>> आइगं...कित्ती
बेसनाची बाळे?>> आइगं...कित्ती क्युट!!
नारळाच्या दुधातली कच्च्या
नारळाच्या दुधातली कच्च्या केळीच्या कोफ्त्यांची रेसीपी कोणाला माहीत आहे काय? माझ्याकडे लिहून होती ती नेम्की सापडत नाहीए, नेटवर शोधली सापडली नाही.
कोनि सान्गु शकेल का? इडलि चे
कोनि सान्गु शकेल का?
इडलि चे पिठ कसे करवे?
झटपट असेल तर उत्तम..
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/57557.html?1210873575
इथे वाचा, रतिका!
सारीका, असा एक जैन प्रकार
सारीका, असा एक जैन प्रकार वाचला होता मी... खाल्लाही होता बहुतेक.
कच्ची केळी सालासकट वाफवून सोलून कुस्करायची. मग त्यात मीठ मसाले घालून तळायचे आणि मग ग्रेव्हीत सोडायचे.. असे काहितरी होते.. पण गेव्ही नारळाच्या दूधाची नव्हती बहुतेक.
सारिका, इथे तरला दलाल यांची
सारिका, इथे तरला दलाल यांची रेसिपी मिळेल.
http://www.tarladalal.com/Kachhe-Kele-ke-Kofte-30956r
बेसनाची बाळे शब्द पहील्यांदाच
बेसनाची बाळे शब्द पहील्यांदाच ऐकला. आमच्याकडे जास्तकरुन बेसनाचा कुरकुरीत चुरा हा शब्द प्रचलित आहे, काही ठिकाणी चुरा-पाव (चुरा-कांदा-सुकी चटणी-ओली चटणी पावात घालून) पण मिळतो जसा वडा-पाव तसा.
Pages