पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेमन तिरामिसुमध्ये जर का अल्कोहोल / लिकर टाकायची असेल तर कोणती टाकवी? नेहमीच्या तिरामिसुत मी रम टाकते.

घरी हांडवो करण्यासाठी रेडी मिक्स पाकीट आणले आहे. त्यावर दिलेल्या रेसिपीत हांडवो बनवायला 'हांडवो बनवायचे भांडे' लागते असे लिहिले आहे.
हे विशेष भांडे न वापरता हांडवो बनवता येईल का? कसा?

गॅसवर नॉन स्टिक कढई वापरून हांडवो बनवता येईल. बे़क करायचा असेल तर जाड बुडाची अ‍ॅल्युमिनिअम अथवा स्टीलची कढई वापरावी.

मला मेथीच्या मुटक्यांची पाककृती हवी आहे.
आज मी नाचणीच्या फुलक्यांची पाककृती लिहिणार आहे.

धन्यवाद.

बी,
दोन वाट्या मेथीची पाने निवडून, धुवून, बारीक चिरुन घ्या. त्यात आले- लसूण- मिरची पेस्ट, तिखट मीठ, तीळ, जिरे पूड इ टाकून त्यात मावेल एव्हढे बेसन (रवाळ असल्यास उत्तम - नाहीतर थोडा रवा मिक्स करावा) घालून हाताने सारखे करुन घ्या. डावभर गरम तेलाचे मोहन घाला.. (तेल नको असल्यास नका घालू!) मुठीने गोळे बांधा व तेलाचा हात लावून चाळणीवर खाली पातेलीत पाणी ठेवून वाफवून घ्या. खातांना काप करुन (वाटल्यास! लहान गोळे केल्यास गरज नाही) वरुन हिंगाची फोडणी घालून गरम गरम खा. (परत तेल ऑप्शनल आहे! :-))
यात व्हेरिएशन म्हणजे मिक्स पालेभाज्या, किंवा कोबी खिसून वापरता येईल.

लेमन तिरामिसुमध्ये जर का अल्कोहोल / लिकर टाकायची असेल तर कोणती टाकवी? >> लिमॉन्चेलो (limoncello) किंवा अ‍ॅब्सोल्यूट सिट्रॉन टाकता येईल

थाई किंवा मलेशियन पदार्थांमधे कापी किंवा बेलाखन (Belacan) म्हणून एक श्रिंप पेस्ट वापरतात. थाई मधली थोडी ऑयली आणि ओली असते तर मलेशियातली थोडी ड्राय असते.

भारतात गोव्यामधे अशी श्रिंप्स ची पेस्ट लोकल पदार्थात वापरतात असे वाचले. (माहिती स्त्रोतः विकीपिडिया: Galmbo is a dried shrimp paste used in Goa, India, particularly in the spicy sauce balchao)
तसेच प. बंगाल मधे शुक्ती पण वापरतात, कोकणा मधे सुकट चा वापर होतो.

कुणाला या पैकी कशाही बद्दल, शुक्ती आणि सुकट च्या परस्पर संबंध (जर काही असेल ) बद्दल तसेच एकूणच भारतात विविध प्रांतात अजूनही काही अशा माशांच्या पेस्ट्स वापरल्या जात असतील तर त्या बद्दल काही माहिती असेल तर प्लीज द्या. धन्यवाद!

बहूतेक मणिपुरमध्ये नागरी /नाग्री/ नग्री/न्गरी (ngari)अश्या काहीश्या नावाचा एक आंबवलेला की सुकवलेला माश्यांचा प्रकार (एकप्रकारची फिश पेस्टच असते ही) स्वयंपाकात वापरतात असं वाचलंय. कदाचीत इतर नॉर्थ इस्ट्रन स्वयंपाकामध्ये पण असा काही पदार्थ वापरत असतिल. पण इंटरनेटवर असलेल्या माहिती व्यतिरिक्त त्याबद्दल जास्त काही माहित नाहीये.
(हेसुद्धा गेल्या वर्षीच्या लेकाच्या हॉलिडे होमवर्कमधून कळालं होतं.)

https://www.researchgate.net/publication/230642003_Ngari_-_a_traditional... इथे याबद्दल थोडी माहिती दिसतेय.

अल्पना, लगेच उतर दिल्याबद्दल धन्यवाद. या बद्दल पूर्वी कधी तरी ऐकले होते पण पूर्ण विसरले होते.अगदी हीच माहिती अपेक्षित होती. शोधून बघते अजून मी पण.

अजून पण कोणाला काही माहिती असेल तर नक्की द्या.
चिनूक्ष, दिनेश, भरत तुम्हाला नक्की काही माहिती असेल तर सांगा इथे. Happy

एम्बी, प्लीज वेगळा धागा काढणार का? खूप छान माहीती आहे ही आणि वेगळ्या धाग्यावर त्याबद्द्लचं संकलन जास्त फायदेशीर होईल. कृपया फक्त लिंका देऊ नका सोबतच माहीतीही द्या. Happy
इथे खूप सर्च करायला लागेल कधी भविष्यात रेफरन्स हवा असेल तर...

रमड, बटाटा भजीसाठि बेसन पीठ भिजवतो तस भिजवून त्यात भोपळ्याची फुल बुडवून तळायची मस्त लागतात किंवा तांदूळाच्या पिठात, लाल तिखट, गरम मसाला, मीठ घालून मिक्स करून त्यात फुल घोळवून शॅलो फ्राय करायची.

सशल, आरती., योकु : मस्त सजेशन्स. थँक्यू. बहुतेक दोन्ही प्रकार थोडे थोडे करून पाहेन. Happy मी सर्च मारला त्यात मला या फुलांच्या भजीचीच कृती (कॉर्नफ्लार बॅटर) मोठ्या प्रमाणात मिळाली. म्हणून मग मायबोलीवर विचारलं की कोणी अजून काही करून पाहिलं असेल किंवा माहिती असेल तर एखादी वेगळी कृती कळेल.

http://konkanikhann.blogspot.in/2015/01/duddhya-phoola-phodi-pumpkin-flo... ही कोकणी पद्धत. तव्यावर शॅलो फ्राय करुन पण मस्त लागतात.

https://mallyascookery.wordpress.com/2014/12/06/massinga-pholla-sanna-po... या रेसिपीने भोपळ्याच्या फुलांचे डोसे पण मस्त लागतात .

Mala pravasat neta yetil ase padarth ani instant pohe,upma,khichadi,sabudana khichadi che packet tyar karun thevache ahe tyachi recipe midel ka.plz lavkar mahiti dya.

Mala pravasat neta yetil ase padarth ani instant pohe,upma,khichadi,sabudana khichadi che packet tyar karun thevache ahe tyachi recipe midel ka.plz lavkar mahiti dya.

Pages