पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
सस्मित, एडिट केलं Wink

माझ्या लेकीला साबुदाण्याची खिचडी अजिबात आवडत नाही असं लिहीत होते, नंतर डिलीट केलं तरी जळ्ळा मेला क्रोम!

अनघा, मन्जूडी थॅन्क्स पटकन लिहील्याबद्दल.:स्मित: पराठे खाते तसे त्यामुळे व्हरायटी करता येईल. अनघा, हो ती वान्ग खात नाही. त्यामुळे बटाटे, भेन्डी हा पर्याय उरतो. बाकी तुम्ही दोघीनी सुचवले आहेच. आता लिस्ट किचनमध्येच लिहुन ठेवते.:स्मित:

मीही यादी करून ठेवली आहे. शक्यतो दोन-तीन आठवडे पदार्थ रीपीट होत नाहीत.

१. सोमवार - इडली/ डोसा/ उत्तप्पा/ अडई/ आप्पे (कारण रविवारी धान्य भिजवून रात्री वाटून ठेवायला वेळ मिळतो)
२. मंगळवार - पोहे/ उपमा/ गोड शिरा/ सांजा/ मोकळ भाजणी
३. बुधवार - पराठे (मेथी/ दुधी/ गाजर/ पालक/ मिक्स भाज्या)
४. गुरुवार - भात प्रकार - फ्राईड राईस/ डाळिंबी भात/ तोंडली भात/ मसुराची खिचडी/ बिर्याणी मसाला भाज्या घालून भात (मी ओट्स खाते) किंवा थालिपीठ
५. शुक्रवार - ब्रेड प्रकार (सँडविच/ पिझ्झा/ ब्रेडचा चिवडा) किंवा घावन प्रकार
६. शनिवार - फोडणीची पोळी/ फोडणीचा भात किंवा ऐच्छिक (सुट्टीचा दिवस)
७. रविवार - अंडं प्रकार किंवा फर्माइश प्रकार

रश्मी, मंजूडी, तुमच्या शाळेत एकच टिफीन असतो का?

आमच्या शाळेत दोन रीसेस होतात. शॉर्ट आणि बिग रीसेस. दोन्हीसाठी वेगळा डबा. डबल टेन्शन. त्यात माझी मुलगी एकही भाजी खात नाही. फक्त कडधान्य / उसळी. Sad

हो गं... एकच टिफीन. दुपारची शाळा असल्याने लेक पोळी-भाजी-भात जेवून शाळेत जाते. रिसेस दुपारी साडेतीनला असते तेव्हा तिने पोळीभाजी खाणं मला अपेक्षितच नाहीये. घरी कधी तिच्या आवडीची भाजी असेल तर ती पोळीभाजी घेऊन जाते त्यादिवशी मलाच कौतुकाचं भरतं येतं Wink

रश्मी रोज पो.भा. किंवा पराठा अन शनि. व्हरायटी असे आहे ना? Happy

तर तू पोळी रोल विविध प्रकारचे सुध्दा देऊ शकतेस. जाम्,चटणी-तेल, फ्रैकी इ.इ.

सस्मित, माझ्या मुलीची शाळा सकाळी ७ ते १२ असते, त्यामुळे जाताना सकाळी दुधात चॉकोज किन्वा त्यान्चे क्रन्ची बाईट्स, दूध-ग्लुकोज बिस्कीट, कधी उकडलेले अन्डे, एक दिवस परत खजूर-भिजवलेला १ बदाम+ थोडे ड्रायफ्रुट्स आणी अर्धा कप दुधात बुस्ट घालुन ते पिऊन जाते. डबा असल्याने आणी लवकर उठावे लागत असल्याने सकाळी जास्त खात नाही. ५ वीत गेली की मग दुपारची शाळा असेल. त्यामुळे सध्या फार घाई होते.

अनघा आणी मन्जूडी सान्गायचे विसरले मी, एक दिवस उसळीचा पण असतो, त्या मुळे मटकी/ मुग असे देते. ती छोले/ हरभरा खात नाही, खाण्याचीच कटकट असल्याने फार आवडीने पण खात नाही. नाहीतर आपल्या लहानपणी आपण मिळेल ते आवडीने खात होतो. आता भलतीकडेच गाडी गेलीय.

निल्सन, तुमच्या फोटोतील छोले इथल्या रेसिपीप्रमाणे केलेले असतील Happy ,त्याबरोबर कुलचा आहे, स्टफ्ड कुलचा म्हणून गूगल करा. हे कॉम्बो मी दिल्लीत खाल्ले.

पराठे आवडत असतील लेकीला तर- कुठलीही पालेभाजी किंवा किसता येइल अशी फळभाजी पीठ पेरून केली तर त्याचे स्टफ्ड पराठे मस्त होतात. कणीक भिजवलेली असेल, भाजी तयार असेल तर ५-७ मिनिटांत डबा तयार होतो.

थॅन्क्स सिन्डरेला.:स्मित: मुळ्याचा पराठा एकदा देऊन बघीतला, पण डबा उघडला की खरच उग्र वास येतो. त्यामानाने आलु पराठा, कोबी, पालक बरे वाटतात.

मंजू, मीपण हेच प्रकार देते डब्यात. फक्त क्रम बदलतो. Happy
अजून काही पदार्थ -
चपाती वर पास्ता स्प्रेड लावून त्यावर चीज किसून रोल करून
ब्रेडला पास्ता स्प्रेड लावून चीज घालून ग्रिल्ड सॅडविच
पुलिओगरे
शेवयांचा उपमा (पाभा मसाला घालून)
भाज्या घालून दलिया
मॅकरोनी

मुळ्याचा पराठा नका हो नका डब्यात देऊ Proud कोबीचा पण उग्र वास येतो शिजवल्यावर.

मेथी, पालक, करडई, कांद्याची पात, झुकिनी/घोसाळी/दोडकी, कांदा या सगळ्या भाज्या पीठ पेरून चांगल्या लागतात.

खस्ता कचोरीचं सारण भरून केलेले पराठे तर खतरा लागतात. आपली वाटली डाळ पण छान लागते पराठ्यात.

शिजवलेली मसुराची डाळ घोटून आणि बाकी आलं-लसूण, तिखट- मीठ, कोथिंबीर घालून त्यात कणिक भिजवून केलेले पराठे करू शकता.

रश्मी, वालपापडी / श्रावणघेवडा / घेवडा जर निवडून आदल्या रात्री कुकरला शिजवून गार करून फ्रीजात ठेवलात तर दुसरे दिवशी पाच मिनिटांत ती भाजी होऊ शकते.
काकडी, दुधी, कोबी यांची बेसनपीठ लावून केलेली कोरोडा भाजीही खमंग होते व उग्र वासही येत नाही.
सिमला मिरची + कांदा + टोमॅटो भाजीही छान लागते. गाजर + मटार भाजीही चमचमीत लागते. भाज्यांचे लोणचे (फ्लॉवर, मटार, गाजर), सफरचंदाचे झटपट लोणचे हेही छान तोंडीलावणे आहे.

बेबी कॉर्न / स्वीट कॉर्न + सिमला मिरची + मटार + कांदा + मशरूम्स स्टर फ्राय भाजी.
टोमॅटोची चटणी / भाजी
गाजर किसून मुगडाळ भिजवून फोडणीला घालून भाजी
स्वीट कॉर्न + कांदा + सिमला मिरची स्टर फ्राय
रताळी कुकरला १ शिट्टी काढून सोलून मोठे तुकडे करायचे व जिरे, हिंग, लाल मिरची, कढीपत्ता, तिखटाच्या फोडणीत परतायचे. सांबार मसाला, मीठ घालून वाफ आणायची. हवं असल्यास जरा पाण्याचा हबका मारायचा. रताळ्याची भाजी.
कांद्याची पीठ पेरून भाजी. बटाट्याच्या काचऱ्या / उकडून डोसाभाजी किंवा उपासाची भाजी
पालक बारीक चिरून लसणाच्या फोडणीवर परतून त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून परतणे. कोरडी भाजी होते.
व्हाईट सॉसमध्ये उकडलेला व फोडी केलेला दुधी, बटाटा, श्रावण घेवडा. वर मीठ मिरपूड केचप. हवं तर ओरेगॅनो व चिली फ्लेक्स. पोळी / ब्रेडसोबत चांगला लागतो.
लसणाच्या फोडणीवर टोमॅटोच्या फोडी परतून त्यात शिजलेली मूगडाळ / तूरडाळ (गोळा) घालून आवडीनुसार सांबार मसाला किंवा गरम मसाला, मीठ घालून इन्स्टंट भाजी. हीच पध्दत वापरून (लसणाची फोडणी न करता साधी फोडणी) दुधी, फ्लॉवर, दोडका, पडवळ वगैरे मुलांना जनरली न आवडणाऱ्या भाज्या + शिजलेल्या डाळीचा घोटलेला गोळा + सांबार मसाला + मीठ घालून चविष्ट भाजी तयार होते.
हिरवा माठ, लाल माठ, चवळई, पालक, मेथी, तांदुळजा यांच्या परतून केलेल्या पालेभाज्याही डब्यात देता येऊ शकतात.

मी मागचं वर्ष मला त्यांनी काय खावं या पद्धतीने डबा देत गेले आणि लक्षात आलं की जे घरी वेळ देऊन खाता येतं ते शाळेत पटकन खाता येतंच असं नाही. मागच्या वर्षी एका स्कूल कॉन्फला लक्षात आलं की अ‍ॅक्टीव्हली पंधरा मिनिटं मुलं टेबलाशी असतात आणि बाकीचा वेळ रिसेस. नंतर मी माझा हट्ट सोडला आणि तो पंधरा मिनिटात काय खाऊ शकेल ते म्हणजे मोस्ट ऑफ टाइम फिंगर फूड सँडविचेस,इडली त्याला चमच्याने भराभरा खायला आवडेल म्हणून कधीतरी साखि/फ्राइड राइस भाज्या/चिकन घालून असं देते. डब्याला दोन किंवा तीन खण असतील असे घेतले आहेत. सो त्याच्याबरोबर सोप्पं फळ जसं बेरीज, क्युटीज (छोटी संत्री वर्गातली फळं), बेबी कॅरट्स असं असतं. कधीतरी ट्रीट म्हणून दुसरं काही जसं छोटी कुकी/चॉकलेट मिल्कचा छोटा पॅक हेही देते म्हणजे डबा नेहमीच बोअरिंग असं होत नाही.

हे लॉजिक भारतात शाळांना लागू होणार नाही. पण पाहा तुमच्या मुलीचा खायचा स्पीड इ. आणि मग पर्याय शॉर्टलिस्ट करा. सहा वर्षाचा असताना पुढचे दात पडले तेव्हाचा डबा आणि आता दुसरीचा डबा यातही फरक आहे. पुढे भूक वाढेल तसा आणखी बदल करावा लागेल. काहीवेळा विकेंडला शांतपणे मुलांशी बोललं की आपल्याला काही न काही सुचतं. शुभेच्छा Happy

सिन्डरेला, तो मुळ्याचा प्रकार एकदाच् केला आणी कानाला खडा लावला.:फिदी: हो फार उग्र वास येतो. बाकी तुम्ही सगळ्यानी ( प्राची, अकु आणी वेका पण ) मस्त पदार्थ सुचवलेत. अकुची लिस्ट भारीये. सेव्ह करते. खूप मोलाच्या सुचना पण मिळाल्यात. मनापासुन धन्यवाद तुम्हा सगळ्यान्चे.:स्मित:

संपदा, इथे काही ठिकाणी स्टफ्ड भटूरे आणि छोले पण मिळतात. निल्सन नी लिहिलेल्या सिताराम दिवानचंद कडचे पनीर भरलेले भटूरे आणि छोले खूप फेमस आहेत. हे छोले मात्र माझ्या रेसेपीच्या छोल्यांपेक्षा वेगळे असतात.
इथे त्यांची रेसेपी दिली आहे.. http://eatanddust.com/2009/05/13/chana-bhatura-at-sita-ram-diwan-chand/
निशामधुलिकाच्या ब्लॉगवर पण पनीर भरलेल्या भटूर्‍यांची रेसेपी आहे. http://nishamadhulika.com/deep_fry/paneer-stuffed-bhatura-recipe.html

मला स्वतःला छोले भटूरे अजिबात आवडत नाहीत. त्यामूळे मी हे कधी खाल्ले नाहीयेत आणि केलेही नाहीयेत. माझं मत अमृतसरी छोले आणि कुलच्यांना आहे.

संपदा धन्यवाद.

अल्पना, प्रश्न विचारताना तुच (तु चालेल ना?) मनात होतीस आणि तुझ्याकडुनच उत्तर मिळेल हि अपेक्षापण होती Happy धन्यवाद रेसीपीसाठी Happy

कोणी सोलापूरला कचोरी खाल्ली आहे का? त्यात जे एक प्रकार्चे पातळ सारण्/चटणी असते ते अप्रतिम लागते.. कोणाला त्याची रेसिपी येत असेल तर द्या न प्लिज..

मला अति पटकन आंबे हळदीचे लोणचे कसे करायचे किती दिवस ठेवायचे हे सांगू शकाल का?

माझी कृती अशी आहे:
आंबे हळदीचे छोटे गोल गोल तुकडे/काप करायचे.
सोबत साध्या हळदीचे.. ओल्या.. तिचेही असेच तुकडे करायचे.
मिठात हे तुकडे घोळवायचे.
बरणीत भरायचे
वरतून लिंबू पिळायचे - रस सर्वात वर येईपर्यंत.
त्यात एक दोन तिखट मिरच्या उभ्या चिरुन घालायचे.
हे सर्व कुठे ठेवायचे - फ्रिज मधे की वर?

मी हळदीची सालं काढुन ती किसुन घेते. अर्धा किलो आंबेहळद आणि अर्धा किलो साधी ओली हळद या प्रमाणात. त्यात १०० ग्रॅम आलं सालं काढुन किसुन घालते. मग वरुन छान खमंग फोडणी ( तेल + लाल मोहरी + हिंग + तिखट ) गार झाल्यावर घालते. ३-४ मोठी लिंब पिळते, चवीनुसार मीठ. मी हे लोणचे फ़्रीजमधे ठेवते.

Pages