पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती दिवस टिकणारे पदार्थ अपेक्षित आहेत हे लिहिलेत तर बरे पडेल. अगोदर अनेकदा लिहिलंय, तरी सामान्यत: पुरणपोळ्या, गुळपोळ्या सात आठ दिवस टिकतात. कोरड्या चटण्या, खाकरा, कोरडी भेळ टिकतात. वाटली डाळ (कोरडी) एक दोन दिवस टिकू शकते. भोपळ घारगे, तिखट मिठाच्या पुऱ्या चार पाच दिवस. बाकी उन्हाळ्यात जमेल तितके ताजे अन्न खावे. सोबत लिंबे, आले, जाम, सॉस वगैरे ठेवावे. नारळपाणी, फळे, सलाद ताजेच खावे / घ्यावे. काकड्या नेता येतील. कोकम सरबताचा लहान कॅन नेता येऊ शकतो. खारी, टोस्ट, बटर वगैरे नेल्यास चहा कॉफीसोबत खाता येते.

धन्यवाद अरुंधती ताई, मला दोन दिवसांच्या प्रवासात चिकन / मटन अथवा मासे ह्याच्या टिकणा-या पा.क्रु. ह्व्या आहेत.

'प्रवासी मटण' अशी पाककृती माझ्याकडे आहे. उद्यापर्यंत दिली तर चालेल का ? विचारपुशीत लिहिते. मी स्वतः केली किंवा खाल्लेली नाही. पण करणारी व्यक्ती अनेकदा करून प्रवासात नेते. २ दिवस नक्कीच टिकेल.

ho, mrunmayi, chalel, ani itaranahi tyacha fayda hoil. thanks, aajach dya , karan udya amhi pravasala nighnar aahot.

मसूर डाळीची आमटी (अख्खा मसूर नव्हे) कशी करायची? जशी तूर शिजवून घेतो तशीच घेऊन फोडणी द्यायची का? ही मसूर डाळा रात्रभर पाण्यात भिजवावी लागते का?

मूग-तूर डाळ शिजवताना सोबत मसूरडाळ एकत्रपणे शिजवता येते ना?

आम्ही कुकरमध्ये भाताबरोबरच मसूर डाळ शिजवून घेतो.
मग हिंगमोहरी+मेथी+कढीपत्ता+सुक्या लाल मिरच्या या फोडणीवर टमाटो मऊ होईतो परतून त्यात शिजलेली मसूर डाळ आणि गरजेपुरतं पाणी.

धन्यवाद मंजूताई आणि भरत, इतके दिवस डाळ पडूनच होती. अख्खे मसूर होतात भरपूरदा पण ही डाळ काही होत नाही.
आत्ता वापरेन. Happy

आमच्याकडे, पंजाब्यांमध्ये मुंगी- मसर की दाल करतात. पिवळी मुगाची डाळ ( धुली मुंग दाल), मसुराची डाळ समप्रमाणात घेवून कुकरला शिजवून घ्यायची. एका शिट्टीत शिजते. शुद्ध तुपामध्ये आले-लसूण, जीरे, मेथ्या, हळद, कांदा, टोमॅटो, धण्याची पुड, गरम मसाला / चिकन मसला/ किचन किंग पैकी जो असेल तो घालून फोड्णी करायची... वरून कोथिंबीर..

मी मसुरीची आमटी बर्‍याचवेळा करते घरी. चवीला मस्त आणि अगदी wholesome!
पाकृ: मसुरीची डाळ शिजवून, हाटुन घ्यायची. जरा सढळहस्ते तेल घालून मोहरी आणि जिर्‍याची फोडणी करायची. हिंग, कढिलिंब, आमसूल (कोकम) आणि लसूण घालून मग कांदा आणि टमाटा घलून नीट शिजेपर्यंत परतून घ्यायचं. तेल सुटायला लागलं की त्यात हळद आणि लाल तिखट घालायचं. आवडत असल्यास चिमुट्भर कांदा लसूण मसालाही चालेल. एकदा परतून हाटलेली डाळ घालायची आणि सरबरीत होण्यापुरतं पाणी घालायचं. (मी खूप ढुळुक गंगा नाही करत). मस्त उकळी आली की वरून कोथिंबीर भुरभुरुन घ्यायची आणि गरम फुलके किंवा भातबरोबर ओरपायची!

नाही , जसे आपण जीरे- मोहरी वापरतो तसेच जीऱ्यांबरोबर आमच्याकडे जवळपास सगळ्या भाज्यांच्या, डाळींच्या फोडण्यान्मध्ये मेथी दाणे घालतात. जीऱ्यांसोबतच घालायचे.
काहीजण फोडणीत न घालता डाळ शिजवताना डाळीबरोबर कुकरमध्ये घालतात.

कूकरमधे मसूर डाळ शिजवताना, जरा जास्त वेळ राहिली तर तिचा गाळ होतो. त्यापेक्षा बाहेर शिजवली तर चांगली, ती लवकर शिजते आणि तिचा उग्र वास निघून जातो. उकळताना वरती फेस येतो, तो मात्र झार्‍याने काढावा लागतो.

रोजच्या आमट्या/फोडणीची वरणं, दाल-तडका, सांबार, खिचडी या सगळ्यात मी बरेचदा तुरीऐवजी मसूर डाळ वापरते. चांगली लागते. भेसळीचं वरण करतात त्यात पण मसूर डाळ असतेच. शिजवलेल्या मसूरडाळीचा गोळा पराठ्याची कणिक भिजवताना त्यात घातला तर मस्त मऊसूत पराठे होतात.

तुरीच्या डाळीचं साधं वरण करतो तसं मात्र चांगलं लागत नाही मसुराचं.

नमस्कार मी वडा पाव चा स्टॉल सुरू करतीये मला पातळ हिरवी चटणी च्या काही छान रेसिपी सुचवा प्लिज
बेसन ची बाळे असलेली चटनी सुकी होते का ???

हिरवी मिरची + पुदिना + कोथिंबीर + मीठ + साखर + पंढरपुरी डाळं / ओलं खोबरं / सुकं खोबरं ही एक बेसिक चटणी आहे. काहीजण आंबटपणासाठी कैरी / आमचूर पावडरही घालतात. काहींना दाणेकूट आवडते.

सौम्या, उपलब्ध असतील तर आंबट चुक्याची पाने या चटणीत वापरायची. छान रंग आणि चव येते.

बेसनाची बाळे असलेली चटणीत कोरडे घटक घातले ( लसूण, तिखट, मीठ ) तर कोरडी होते.

Pages