पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, माझ्या कलिगच्या आईने हळदीच्या लोणच्यात मोहरी फेसुन टाकली होती. लिंबाचा रस आणि साधं पाणी, यामधे फेसलेली. त्याला ते पाण्याचं लोणचं म्हणतात. नो फोडणी. नो ऑइल. बाकी कृती तुम्ही लिहिली तशीच.

चवीला मस्त लागलं होतं. फ्रीजमधे ठेवायला लागतं बहुतेक.

बी, मी दोन्ही हळदी मिक्स लोणचं, तयार लोणचं मसाला (बेडेकर, केप्र) घालून करते त्यामुळे झटपट होतं, फोडणी जास्त तेलाची गार करून घालते आणि मीठ त्यात आलेपण घालते थोडं आणि लिंबूरस (हे दोन्ही ऑप्शनल) . एक दिवस बाहेर ठेऊन फ्रीजमध्ये ठेवते.

मी आंबे हळद, आले साफ करून जाड किसणीने किसून घेते. त्यात चवीप्रमाणे मीठ, साखर, लिंबू, थोड्या काळ्या मनुका ( या मुरल्यावर अप्रतिम चव येते) घालून भरून ठेवते. एक-दोन दिवसात खायला योग्य होते. फारसे टिकत नाही. फ्रिजमधे ठेवावे लागते.

माझ्या मुलाला (Middle Schooler) फ्रेंच प्रोजेक्ट्साठी french meal प्लॅन करुन बनवायचे आहे.(adult supervision/help is ok, but he must be involved in all aspects of the meal. Happy ) प्लीज काही सोप्या (मिडल- स्कूलर्स करु शकतील अशा) रेसिपीज सांगा. चिकन / अंडी चालतील. सध्या तरी आम्ही असा मेनु प्लॅन केला आहे.
hors-d'oeuvre - Spinach Mini Quiches
plat principal (main dish)-Mushroom or chicken Stroganoff
garnitures (side dish)-French potato salad
boissons (drinks)- French lemonade
dessert - स्वाती२ यांचे हमखास चॉकलेट सुफ्ले
आगाऊ धन्यवाद.:)

मी २ दिवस ट्रेन प्रवासात आहे . कृपया मला काही पदार्थ सुचवा जे २ दिवस टिकू शकतील ,कारण माझ्या बरोबर माझा ४ वर्षाचा मुलगा पण आहे. त्याच्या जेवणासाठी मला उपयोगी ठरतिल असे.

मी २ दिवस ट्रेन प्रवासात आहे . कृपया मला काही पदार्थ सुचवा जे २ दिवस टिकू शकतील ,कारण माझ्या बरोबर माझा ४ वर्षाचा मुलगा पण आहे. त्याच्या जेवणासाठी मला उपयोगी ठरतिल असे.

ज्या दिवशी प्रवास कराल त्या दिवसासाठी बटाटा कोरडी भाजी पोळित गुंडाळून. फोड्णीचा भात
दुसर्या दिवशी साठी ठेपले, पराठे पुर्या यातले काही एक. सोबत पिचकू सॉस.
बाकी लाडू , चिवडा, बिस्किटं चिक्की असं काहीतरी !

उन्हाळ्याचे दिवस अन ट्रेन चा प्रवास! मस्त!

पाणी भरपूर ठेवा सोबत.
पाच लिटरवाल्या कूलकेज (?) मध्ये पूर्ण बर्फच भरून न्यायचा. त्यातही मोठे मोठे खडक करून घ्यायचे बर्फाचे (फ्रिजर मधे वाट्यांत बर्फ जमवायचा). पाणी प्यायच्या वेळेस हे बर्फाचं अतीथंड पाणी + साधं पाणी असं करून मग प्यायचं. बराच वेळ टिकतो असा बर्फ. गार पाणीही मिळतं Happy

योकुचा सल्ला उत्तम आहे, पण प्यायचे पाणी आधी उकळुन गार करा मग त्याचा बर्फ बनवा आणी फ्रिझ मध्ये बॉटल्स मध्ये पण ठेवा. लहान मुलाना सुद्धा अजीबात हे बर्फाळ पाणी वा बर्फ बाधत नाही. उत्तम अनूभव आहे मला. मागच्या वर्षी माहेरी गेले असताना पाण्याचा तुटवडा होताच. माठात पाणी पुरेसे गार होत नव्हते तेव्हा असे पाणी फ्रिझ मध्ये ठेवत होतो. मुलगी ते प्यायची, तिला ना सर्दी झाली ना घसा दुखला.

भाजी साठी फण्स आणला होता. चकत्या करुन उकडुन घेतला. सुट्टा करताना लक्षात आले. गरे पिकलेले आहेत काही. काढुन फ्रीजमधे ठेवला . बाकी याची भाजी केली.

आता त्या कमी गोड , पिकलेल्या , शिजवलेल्या गराचे काय करता येइल ?

हे करता येईल की नाही ते माहित नाही पण सुचले म्हणून

जॅम,
फिंगर चिप्स सारखे कापले आणि सुकवले तर नंतर तळून त्यावर मिठ शिवारता येईल,
एखादी चटणी

खिचडी सोबात बर्याच जणान्कडे "सार" करतात, त्याची पा. क्रू. सान्गू शकेल का कोणि ?

मी एकदा ओले खोबरे+उ. टोमाटो+ आले+लसून वाटून केले होते, ओरीजीनल पा. क्रू. काय आहे त्याची ?

टोमॅटोचं सारः
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/109504.html?1178259288

टोमॅटोचं सारः
http://www.maayboli.com/node/2618

नारळाचं दुध घालून टोमॅटोचं सार:
http://www.maayboli.com/node/2619

टोमॅटोची आमटी:
http://www.maayboli.com/node/25141

सशल, तू लिहिलेली कुठलीच रेसिपी शोधसुविधेला आवडत नाही वाटतं. सर्च रिझल्ट्समध्ये येत नाही. हे टोमॅटोचं सार माझ्या लक्षात होतं म्हणून तुझ्या लेखनखुणांमधून शोधून आणलं.

सशल, तू लिहिलेली कुठलीच रेसिपी शोधसुविधेला आवडत नाही वाटतं >> रेसिपी सार्वजनिक नाहि म्हणून बहुतेक.

घरी भरपूर लिंब आली होती. त्याचा रस काढून डीप फ्रीज करून ठेवलाय.
त्याच टिकणार सरबत कसे करू?

रसात अडीच पट साखर आणि चवीपुरतं मीठ घालून ते रसात विरघळव. हे कॉन्सन्ट्रेट ठेव फ्रीजमध्ये. किंवा फ्रीझरमध्ये आईस ट्रेमध्ये घालून क्यूब्जही करू शकतेस. सरबत करतेवेळी लागतील तसे वापर.
एक महिना टिकतं नक्की.

Pages