पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रस काढून नुसतं मीठ घालून ठेवलं फ्रीजमध्ये तरी टिकेल बहुतेक. मग लाईम सोडा गोड्/खारा/जलजिरा असं सगळीकडे ते कॉन्संट्रेट वापरता येईल. साध्या सोड्याची बाटली तयार असेल फ्रीजमध्ये तर घरच्याघरी मस्त सोडा तयार होतो. आवडीनुसार साखर कमीजास्त वापरता येईल.

रस काढल्यावर उरलेली सालं, उन्हात खडखडीत वाळवून त्याची पूड करून ठेवायची. आंघोळीच्या वेळेस उटण्यासारखी वापरायची. डिओ, स्प्रे वगेरे काहीही वापरायची गरज पडत नाही. मस्त मंद फ्रेश सुवास दरवळतो.

असंच संत्र्यांच्या सालीचंही करता येईल.

खीर - गोड, खारी. साबुदाणा वडे, थालीपीठ, भाजून, दळून तूपसाखर घालून लाडू किंवा दळलेला साबुदाणात ताकात घालुन त्यात मीठ, मिरची, कोथिंबीर घालावी.

दही साबुदाणा. भिजवलेल्या साबुदाण्यात गोड दही, मीठ,साखर, मिरची, कोथिंबीर, आवडत असल्यास थोडे दाण्याचे कूट घालून खाणे.
साबुदाण्याचं बोदगं. खिचडीचं थोडं पातळ स्वरूप. तूप, जिरं, हिरव्या मिरचीच्या फोडणीत भिजवेला मोकळा साबुदाणा व दाणेकूट घालून साबुदाणा शिजला की थोडे ताक घालायचे. आवडीनुसार सरसरीत करून चवीनुसार मीठ, साखर, कोथिंबीर. वाफ आणून गरम / गार कसेही चांगले लागते.
साबुदाण्याची फोडणीमध्ये तूप, लवंग, दालचिनी, मिरी, वेलदोडा व चवीनुसार साखर घालून गोड खिचडीही करतात.

रस काढून नुसतं मीठ घालून ठेवलं फ्रीजमध्ये तरी टिकेल बहुतेक.>> नाही टिकत. लिंबाचा रस कडू होतो. कारण त्यातलं मीठ अगदीच नगण्य असतं. टिकण्याच्या दृष्टीने त्याचा काहीही उपयोग होत नाही. पूनमने सांगितलंय तशी साखर घालून रस ठेवला, किंवा साखरेच्या पाकात लिंबाचा रस मिसळला तरच टिकतो.

काल करून ठेवल सरबत . साखर विरघळायला वेळ लागेल म्हणून पाक करून घेतला .
आज गार झाले कि भरून ठेवेन .

साबुदाण्याचे धिरडे माझी आई अशी करते:

एक वाटी साबुदाण्यामधे दोन वाट्या पाणी घालून चार तास भिजवून कापडात बांधून ठेवते आणि लख्ख उन्हामधे एक ते दोन दिवस तेच कापडाचे गाठोडे सुकवायला ठेवते. तो साबुदाणा मग ती बारीक कांडते. कांडताना त्यातच लाल मिरची, तिळ, शेंगदाणे, जिरे, मिरी - हे सर्व भाजून, शेंदीमिठ घालते. ताकामधे सरबरीत भिजवून त्याचे धिरडे करते. मस्त होतात साबुदाण्याचे असे धिरडे. हळद नको इथे. धिरडे छोटे छोटे करते म्हणजे ते नीट होतात. मोठी धिरडी उलटताना तुटतात मोडतात. म्हणून छोटी छोटीच करते.

हर्ट,
हे असे साबुदाणे, तूमच्याकडच्या हवामानातच वाळतील. मुंबईला नाही वाळणार. पिठ करायचे तर भाजून करावे लागते.

सकुरा, दीड वाटी इडली रव्याला पाऊण वाटी उडदाची डाळ घ्यायची. दोन्ही वेगवेगळं भिजवायचं. वेगवेगळं ग्राईंडरला वाटून घेऊन मग मीठ घालून एकत्र करून उबदार जागी फर्मेंट करायचं. मस्त हलक्या इडल्या होतात ह्या प्रमाणाच्या.

सकाळी झटपट होतील अशा न्याहारीच्या काही कृतींसाठी एखादा धागा आहे काय?

दररोज सकाळी बाहेरचं इडली/उपमा/पोहे खाऊन कंटाळा आलाय.
बायकोला ९ ला जॉबवर जावं लागतं, तर ८:३०-९ दरम्यान झटपट असा काही नाष्टा तयार करता येईल का हे पाहतोय ज्यात वैविध्य असेल.

घरच्या घरीच पोहे/उपमा/इडली शिवाय आणखी काय करता येईल?

कैरी भात कसा करायचा नेमका?>>>>> म्हणजे चित्रान्न का? तसं असेल तर कृती खालीलप्रमाणे आहे.
भात कुकरमधे करून ताटात थंड होऊ द्यावा.कैरी किसावी. तेलात प्रथम शेंगदाणे तळून घ्यावे.नंतर त्यात हिंग,मोहरी,थोडा अधिक कढीलिंब, थोडी भिजवलेली चणाडाळ (ऐच्छिक),हळद घालून ती फोडणी भातावर ओतावी.कैरीचा कीस घालून हलक्या हाताने (डावाने) मिसळावे.

मी लोकसत्तेत आलेल्या कृतीने कैरी भात करतो.
त्यात कैरीचा कीस शिजवून घ्यायचा आहे.
कैरीचा अर्धा कीस , ओला नारळ, १ हिरवी मिरची, ४ लाल सुक्या मिरच्या, मोहरी हिंग हळद हे वाटून घ्यायचं.
फोडणीत मोहरीबरोबर उडीद्+चणा डाळ + शेंगदाणे + लाल सुकी मिरची तुकडे करून + कढीपत्ता घालायचे. आधी कैरीचा नुसता कीस आणि मग वाटण परतून घ्यायचं आणि मग (आधीच मोकळा शिजवलेला व गार केलेला ) भात त्यात मिक्स करायचा.

मस्त वाटतेय कैरी भाताची रेसिपी. मयेकर, फोटो आहे का?
(शिजवून घेतलेला कीस बाकी जिन्नसांबरोबर वाटायचा की कच्चा कीस वाटायचा?)

वाटणात अर्धा कीस घालायचा आणि उरलेला शिजवायचा असं आहे बहुतेक.

तांदूळ किती, कैरीचा कीस किती सगळं वजनमापांसहीत सांगा कुणीतरी.

नाही. अर्धा कीस नारळ इ.बरोबर वाटायचाय. अर्धा कीस तसाच ठेवायचाय.

या महिन्यातच दोनदा करून झालाय त्यामुळे इतक्यात पुन्हा होणे नाही.

Pages