पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी एकदा स्टील कट ओट्स चा केला होता नेहेमीच्या उपम्याच्या कृतीने. भाजलेल्या रव्याऐवजी ओट्स.

किन्वा रुपी साबुदाण्याची खिचडी जितकी चविष्ट लागते तितकाच चविष्ट झाला.

ओट्सचा 'चविष्ट' उपमा हे ऑक्सिमोरॉन आहे Proud

किन्व्याची खिचडी गिळगिळीत होत नाही हां अजिबात. ओट्सना सोन्याचा मुलामा देउन हिर्‍याच्या कोंदणात बसवलं तरी त्यांचा चिकटपणा जात नाही.

इथे मुंबईत कायम ते rolled ओट्स मिळतात. त्यांना कितीही सजवले तरी त्यांची चव भयाण या शब्दापालिकडे जाऊ शकत नाही. आड्यातच नाही तर पोहर्यात कुठून येणार?

त्यापेक्षा वरईच्या तांदळाचा उपमा करून पाहा, जास्त चांगला होतो. तांदूळ भाजून घ्या आधी. मी एका साऊथी ब्लॉगवर रेसिपी पाहिली.

परवाच्या एका खाजगी माबो गटगला एका माबोकरणीने वरई तांदळाचा गोड शिरा करून आणलेला. अप्रतिम चविचा झालेला!!!

ओटस चे घावन छान लागतात. एक वाटी भर ओटस थोड्या पाण्यात भिजत ठेवायचे १५ मिनीट्स. तोपर्यंत पातेल्यात पाऊण पाऊण वाटी रवा व बेसन घेऊन त्यात लसूण मिरची पेस्ट- कोथिंबीर, हळद, ओवा, मीठ वगैरे घालून मग हे भिजलेले ओटस अजून कुस्करुन मिक्स करायचे व नॉन स्टीक तव्यावर उत्तप्या टाईप जाडसर घावन घालायचे.

मी रोल्ड ओट्स चे घावन करते. रोल्ड ओट्स मिक्सरला बारीक करून घ्यायचे. त्यात ओट्स च्या अर्धा रवा, थोडं दही, थोडी तांदूळ पिठी, थोडं बेसन, मिरची, कोथिंबीर, कांदा आणि कन्सिस्टन्सी प्रमाणे पाणीघालून धिरडी करते. मस्त होतात. हव्या असतील त्या भाज्या ही घालू शकतो.

उपमा कसाही केला चांगला होत नाही

सशल एकदम ठ्ठोओओओओ करून हासतीय मी Happy

एकंदरित ओट्स या विषयावर एक धागा आहे असं वाटतंय मोस्टली माबोफेम दक्शीचा. कॉलिंग डी Wink

परवाच्या एका खाजगी माबो गटगला एका माबोकरणीने वरई तांदळाचा गोड शिरा करून आणलेला. अप्रतिम चविचा झालेला!!!>>>.साबा नेहेमी करतात, मला पण जाम आवडतो.

देवकी, अगं एकदम सोपे आहे. भगर न धुता ( ती खडे नसलेली स्वच्छ असेल तर चांगलीच) मिक्सरला कोरडीच फिरवुन घ्यावी आणी थोड्या साजुक तुपात गुलाबीसर भाजुन घ्यावी. मग नेहेमी सारखाच शिरा करावा. आणी वेलची-जायफळ उपासाला चालतेच की ते पण टाकावे. किंचीत फरक जाणवतो, पण खरच खूप मस्त होतो भगरीचा ( वरईचा ) शिरा. तुपात भगर भाजतांना बदाम काप वगैरे घाला.

मोड आलेल्या कडधान्यांच्या सलादच्या सोप्या रेसेपी हव्यात.

लेकाला शाळेत बनवायचे आहे सलाद. स्प्राउट्स चे हेल्दी सलाद सांगितलं आहे. डेकोरेशन आणि प्लेटींगकडे लक्ष द्या असे सांगितले आहे.

लेकाची आयडिया - स्प्राउट्स, वाफवलेले स्वीट कॉर्न्स, रेड - यलो पेपर्स च्या स्ट्रीप्स, टॉमॅटो, कांदा, काकडीचे क्युब्ज, बारिक चिरलेला जांभळा कोबी हे सगळं मिक्स करून नॅचोज वर सर्व्ह करायचं आणि वर पनीर आणि चीज कुस्करून घालायचं.

मला यासोबत ड्रेसींग कोणतं द्यावे कळत नाहीये तो टॉमॅटो सालसा दे म्हणतोय

खूप जास्त पदार्थ आहेत यात असं माझं मत आहे. यात काही सुधारणा किंवा नविन आयडिया?

सगळे पदार्थ घरून चिरून शाळेत ड्रेसींग मध्ये मिक्स करून सर्व्ह करायचे आहेत.

स्प्राउट्स मध्ये मूग - मटकी वापरणार आहे.

लेकाची आयडिया वापरून नाचो-सॅलड करायचं असेल तर यादीतल्या भाज्या आणि स्प्राउट्सचं काँबिनेशन चवीला कसं लागेल ह्याची कल्पना येत नाही, Happy

एक पाककृती विचारपुशीत दिली आहे. ठीक वाटतेय का बघ.

मटकी, मुगाला मोड आणताना चमचा - २ चमचे मुग, मठ घेऊन काचेच्या उंच बरणीत भिजत घालायचे. २ दिवस पाणी बदलत भिजू द्यायचे. मग पाणी काढून बरणीला कापड बांधून २ दिवस मोड येऊ द्यायचे.

इथे मायबोलीवरच पाहिले का इतर कुठे आठवत नाही पण टोमॅटोची परडी करून त्यात सर्व्ह करता येईल किंवा काकडीची बोट. बोटीला टूथपिक वापरून केप्सिकमच्या पट्टीचा निशाण किंवा तत्सम काही डेकोरेशन.
हेल्दिच्या व्याख्येत बसेल की नाही माहीत नाही पण बास्केटमध्येही घालता येईल (बास्केट चाट साठी वापरतात ते बास्केट वापरून).
आम्ही कडधान्याच्य सॅलडला लिंबू रस, तिखट, मीठ, चाट मसाला, कोथिंबीर असं ड्रेसिंग वापरतो!

यादीतल्या भाज्या आणि स्प्राउट्सचं काँबिनेशन चवीला कसं लागेल ह्याची कल्पना येत नाही,>> अगदी अगदी.

विपुतली रेसेपी छान आहे. आज करून बघतो आम्ही.

मोड आलेल्या कडधान्यावर लिंबु-साखर-मीठ-जीरेपुड /चाटमसाला, कांदा-टॉमॅटो. जास्त लाड करायचे असतिल तर शेव /नमकीन, डाळिंबाचे दाणे हेच मी पण नेहेमी करते. पण लेकाला म्हणे नेहेमीचं तेच ते नाही करायचं. बाकी सगळे असेच करतिल म्हणून वेगळं सलाद करायचं आहे. Uhoh

सनव, टॉमॅटोच्या परड्या किंवा तसे इतर सजावटीचे प्रकार मलाच करून द्यावे लागतिल. त्याला फक्त अंजलीची चॉपर /विळी वापरून काकडी /कांदा चिरता येतो. ही स्पर्धा असेल त्यामूळे मी अगदी मिनिमम मदत करणार आहे.

http://m.tarladalal.com/recipes-for-Salad-Dressing-Homemade-Veg-Salad-Dr...

अल्पना, या यादीत ३० सलाद ड्रेसिंग्ज आहेत. ती बघ. मला

http://m.tarladalal.com/Bean-Sprouts-Salad-in-A-Peanut-Chilli-Dressing-452r

हे सलाद ड्रेसिंग तुला हव्या असलेल्या काँबोसाठी योग्य ठरेल असं वाटतंय...

बाव चाट कसे काय विसरले मी. चालेल म्हणतोय बाव चाट. फक्त आता त्याचं डेकोरेशन /प्लेटींग आयडिया दे म्हणे. त्याला बाव चाटचा फोटो टेम्प्टींग नाही वाटला म्हणे.

आज तिन्ही सलाद करून बघतो. जे आवडेल ते करेल.

बावचाट कुकी कटरमध्ये ठेवून शेप देतो म्हणतोय. आता तसा शेप देता येईल का बघावं लागेल. मिनी बाव आणते आजच. बाकी सामान रेडी आहे.

सुनिधी दॅट्स ओके. इथं केव्हाही आलं तर्री एकच आयटम सजेस्ट करून मिळेल

बावचाट जिंदाबाद Light 1

मला आपल्या मायबोलीवर लिहलेली मारी बिसस्क्टीक चुरा आनि वर चोकोलेट चा थर असलेली पाकृ हवी होती.मला अजिबात च नाव आठवत नाहीये. Sad प्लीज शोधायला मदत करा ना.

अजुनही ओट्सना सोडले नाही बरं. Happy शेवटी ओटचा उपमा रद्द करुन ओटची लापशी/पेज/ पातळ उकड सारखे केले आणि ते मात्र मस्त झाले.

Pages