पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठले ओटस आहेत त्यावर अवलंबून आहे ते. स्टील कट किंवा ट्रॅडिशनल असतील तर बराच वेळ लागेल. असे म्हणतात की २० - ३० मिनीटे तरी लागतात नीट शिजायला.

Hi friends ,I have 2 kg coriander powder how to store it to stay long period

दोन किलो धणे पावडर? नक्की?
झिपलॉक बॅग मध्ये ठेवून मग हवाबंद डब्यात ठेवता येईल. सगळ्या गोष्टी ठणठणीत कोरड्या हव्या.

गोव्यात पातळ भाजी पाव खातात त्यातल्या पातळ भाजी ची रेसिपी माहिती आहे का कोणाला ?
आणि तसला पाव पुण्यात कुठे चुकुन मिळतो का ?
गेल्या आठवड्यात गोव्यात खाल्लेल्या भाजी पाव ची चव अजुन जिभेवर आहे...
गोवेकर कोणी असतील तर हेल्प प्लीज.

गोव्यात पातळ भाजी पाव खातात त्यातल्या पातळ भाजी ची रेसिपी माहिती आहे का कोणाला ?>>>>>>> तुम्ही फजाव किंवा हळसांडे(एक प्रकारची लाल चवळी) ची भाजी खाल्लीत का?
वरचे कडधान्य किंवा लाल चणेउकडून घ्यायचे.थोड्याश्या तेलावर लवंग, मिरी,दालचिनी,धणे घालावे.त्यात उभा चिरलेला कांदा घालून परतावे.कांदा लाल झाला की त्यात ओले खोबरेघालून लालसर तपकिरी रंगावर परतावे.थंड झाल्यावर थोडी चिंच घालून गुळगुळीत वाटण करून घ्यावे.दुसर्‍या भांड्यात चमचा -दीड चमचा तेल घालून त्यात्बारीक चिरलेला कांदा घाला.कांदा गुलाबी झाला की त्यात तिखट किंवा मालवणी मसाला घाला,लगेच उकडलेले चणे घाला.मीठ घालून २ मिनिटे झाकण लावून उकळी घ्या.नंतर त्यात कांद्या खोबर्‍याचे वाटण घालून १ उकळी काढा.

लवंग वगैरे मधे थोडेसे जिरे,दगडफूल्,बडीशेप घालून ते वाटण परतवले किंवा बारीक कांद्यात आलेलसूण घातले तरी सुरेख लागते.मात्र ही कॄती मूग्,मटकी,पांढरी चवळी यांच्यासाठी नाही.

तुम्ही फजाव किंवा हळसांडे(एक प्रकारची लाल चवळी) ची भाजी खाल्लीत का? >>

नाही मी खाल्लेली भाजी वाटाणे+ बटाटा + टोमॅटो अशी होती..
शेफ ला रेसिपी विचारली होती पण त्यातले बरेच शब्द माझ्या डोक्यावरुन गेले.
उदा . चून म्हणजेच खोबरे हे त्याने शेवटी सांगितलं म्हणुन कळलं Wink
पण तुम्ही वर लिहिलेली जी कृती आहे साधारण तशीच सांगितली त्याने पण

लवंग, मिरी,दालचिनी,धणे,जिरे,दगडफूल्,बडीशेप,कांदा,ओले खोबरे - हे घालुन करुन बघते आता..
पण याचे अंदाजे प्रमाण हवे होते मला खरतर..
त्याने लाल मिरची पण सांगितली होती.

देवकी, लाल चवळी म्हणजे हळसांडे का? एका मैत्रिणीने गोवा ट्रीपवरून ही लाल चवळी आणली होती व उदार मनाने हे हळसांडे दिले व त्याची भाजी / आमटी / उसळ बनवायची हीच्च रेसिपी सांगितली होती. लैच भारी लागते. फक्त तिने हे नाव हळसांडे ऐवजी 'आळसाने' असं सांगितलं... तेही व्हॉट्सपवर.
'तुझ्यासाठी आळसाने आणलेत गोव्यावरून!'
मी वाट बघत बसले, आळसानेनंतर गाळला गेलेला शब्द आता ती टाईप करेल, मग करेल! (आळस करत तिने काय बरं आणलं असावं? - मी बुचकळ्यात)
नंतर तिच्याशी बोलताना कळालं की असं कडधान्य आहे म्हणून! Lol

पहिल्यांदाच इथे लिहिते आहे.वर फजाव, हळसांडे,आळ संदे ,,याबद्दल वाचले.फजाव गोव्यात म्हणतात,तिथल्या पोर्तुगीस लोकांकडून आलेला शब्द आहे . feijao .. म्हनजे बीन्स .feijao com arros. Arros ..म्हन्जे भात .बीन्स व भात हे पोर्तुगिस लोकंचे रोजचे जेवण.गोव्यात यात खुप मसाले घातले जातात्,पण ब्रझिल मध्ये यात काही मसाले नसतात. हळद , कान्दा ,जरासा लसु ण व मीट चे तुकडे.अगदी सौम्य डीश असते.बीन्स चे वेगवेगळे प्रकार असतात्.लाल काळे जास्त वापरतात.पांढर्या चवळ्या नाही वापरत. कोकणात पांढर्या चवळ्यांना आळ्सुंदे म्हणतात.

अरुंधती,हेच ते ह़ळसांडे.गोव्याच्या भाषेत ऐकताना ते 'आळसाने' ऐकायला येते खरे.हो त्यात बटाट्याच्या ४-५ जाडुल्या फोडी जरुर घालाव्या.सुरेख लागतात.
स्मिता श्रीपाद, १ वाटी हळसांडे भिजत घातल्यास अर्धा उभा चिरलेला कांदा (मध्यम आकाराचा), ४ -५ चमचे ओले खोबरे (पोहे खायचे),१ लवंग,४ मिरी,बोटाच्या पेराएवढी दालचिनी हे इतकेच मी घालते.क्वचितच वर सांगितलेले इतर मसाले घालते.त्यातच ३-४ लाल मिरच्या परतून घ्यायच्या किंवा मा.मसाला घालावा.मा.म.मधे लाल मिरची असते.

तुम्ही कुठले पाव खाल्लेत? मधेभोक असणारे का? त्याला बहुतेक' काकणां' म्हणजे बांगडी म्हणतात.माझ्या लहानपणी 'उंडे' नावाचा पाव आणि अशी दबदबीत भाजी मी गोव्याला खाल्ली होती,त्यातला पाव लक्षात आहे..

व्हेज ग्रॅटन ची रेसिपी (इथे लिहलेली एक होती) किवा तुम्ही ट्राय केलेली दिलित तरी चालेल, इथे एक शिळा ब्रेड , अन्ड मिळुन करायची पण एक रेसिपी होती ती शोधतेय. सापडली तर द्या!

If you have left over bread, you can make savory bread pudding .

Great way to use up leftover bread and cubed cheese too. Just google savory bread pudding

कॉस्ट्को मधुन उत्साहाने फ्रुट केक आणलाय पण घरी कोणालाच फारसा आवडला नाही. आता हा केक कसा संपवता येईल? कस्टर्ड मधे वा अजुन कशात खपवला तर चांगले लागेल का, बराच डेन्स आहे. प्लीज पा कृ सुचवा. धन्यवाद!

मध्यंतरी एका पाहूण्यासाठी चिकन सलामी आणि चिकन सॉसेजेस चे पाकिट आणले होते. सलामी बऱ्यापैकी वापरात आले पण सॉसेजेस चे पाकिट उघडले पण नाही.
नुसतेच पॅनमध्ये बटर/ ऑइल वर परतून खायला घरी खूपसं आवडणार नाही. सॉसेजेस नॉन फ्लेवर्ड आहेत. संपवायच्या आयडिया द्या.

अल्पना, फ्रँकी कर.

सोनपरी, त्या केकचे लॉलीपॉप्स करू शकतेस. नेटवर केकपॉप्स नावाने शोध. भरपूर कृती उपलब्ध आहेत.

सोनपरी, फूट केकचे तुकडे भांड्यात खाली घालायचे मग त्यावर कस्टर्ड आणि फळांचे तुकडे घालायचे वरून थोडे क्रीमने सजवाअय्चे असे एक पुडिंग असते. ते करता येइल. हा खूप टिकतो. चहा कॉफी बरोबर दुपारी खायला देता येइल.

अल्पना, सॉसेजेसचे बारिक तुकडे करून आमलेट मध्ये घालता येतात. किंवा पिझा टॉपिन्ग करता येइल.
तव्यावर परतून नुसतेच काडीला लावून मीठ मिरेपूड शिवरून खाता येते.

अल्पना, सॉसेजेसचे बारिक तुकडे करून भाजी केली होती मी.
कांदा टोमाटो परतून आवडीचा मसाला घालून अंगापुरता रस्सा केला होता

अल्पना, सॉसेजेसचे अर्धा बोटाएवढे तुकडे करुन वरुन मीठ, मिरीपुड, लाल तिखट / आवडिचा मसाला आणि तादुळाच पीठ लावुन थोडा वेळ ठेवुन द्या. कढईत चमचाभर तेल टाकुन गरम झाल्यावर हे मसाला लावलेले तुकडे टाका. नीट परतुन २ मिनिटे झाकण ठेवुन वाफ येवु द्या. मग पुन्हा नीट १ मिनिट परतुन टुथपिक ला लावुन द्या.

कांदा टोमाटो परतून, त्यात सॉसेजेसचे बारिक तुकडे करुन टाका शिजल्यावर बाजुला काढुन घ्या. (भुर्जि सारखाच पण अन्ड न घालता) आता तव्यावर आमलेट करा, दोन्हि बाजुने नीट भाजल्यावर त्यावरच हि भुर्जि मधोमध टाका चारी बाजु दुमडुन घ्या. मुलाना डब्यात न्यायला आवडेल. बरोबर सॉस द्या.

कांदा टोमाटो परतून, त्यात सॉसेजेसचे बारिक तुकडे करुन टाका शिजल्यावर बाजुला काढुन घ्या >> त्याच्यातच आवडीचा पास्ता सॉस घालता येईल. परतताना थोडे पिझ्झा सीझनिंग किंवा इटालियन सीझनिंग घालायचे.

फ्रुट केक चॉकलेट फॉण्ड्यू मधे वापरता येईल

पास्ता मध्ये सॉसेज मस्त लागतात. सॉसेज तुकडे करून थोडे परतून घ्यायचे त्यात पाहिजे तर थोडे लसूण तिखट मीठ घालायचे (नॉन फ्लेवर्ड आहेत म्हणून) त्यात पास्ता सॉस आणि उकडलेला पास्ता घालायचा. याचे बरेच वॅरिएशन करता येतील आणि चीज असल्याने मुलांना पण आवडेल.

ऑमलेटचा सल्ला तर आलाच आहे. पण त्याऐवजी छोट्या मफीन पॅन मध्ये घालून कीश करता येतील.

बटाटे, कांदे आणि सॉसेज एकत्र बेक करून किंवा फ्राय करून ब्रेकफास्ट पोटॅटोज करता येतील.

हॉट डॉग बन आणून त्यात घालून खाता येतील. वरतून थोडा कांदा आणि ढोबळी मिरची घालायची परतून आणि चीज ( फिली चीज स्टेक ऐवजी फिली चीज चिकन )

मास्टरशेफ इंडीया मधे कालच्या रविवारी एकाने 'पंपकीन वेफर्स' बनवले होते. बटाटा वेफर्सना हेल्दी पर्याय म्हणून चांगले वाटले. कुणाला माहिती आहे काय पाकृ?

Pages