मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हसताय काय असे पोट धरून..... शेजा-यांना फोनवर असल्या विनंत्या करताना कसे मेल्याहुनही मेल्यासारखे वाटते ते ज्याचे त्यालाच ठाऊक.. मी नेहमी ठरवायची असा प्रसंग परत येऊ द्यायचा नाही, आणि तरीही दुर्दैवाने तो आलाय परत परत....

दक्षे,
एक काम कर. बाइकला असतात तसे इंडिकेटर्स बसवून घे. वळताना नुसता स्विच दाबायचा. हात दाखवायला नको. Wink

किर्‍या.... Lol
मी दक्स विथ डोक्यावर ईंडिकेटर इमॅजिनले.... Happy ति एलियन तर वाटनार नाही ना ? Uhoh

कालची अशीच एक गोष्ट, घरचं सामान भरायला... बिग बझार मध्ये गेलेल होते. बास्केट उचलून इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ट्रॉली घेऊन फिरत होते.... त्याचं हँडल ही गाडीसारखंच असतं. मध्ये येणारे लोक पाहीले की मला उगिचच हॉर्न वाजवावासा वाटत होता.... Uhoh

त्याचं हँडल ही गाडीसारखंच असतं. मध्ये येणारे लोक पाहीले की मला उगिचच हॉर्न वाजवावासा वाटत होता....
तु आता ड्राईंव्हींग किट बसवुनच घे दक्शे !!! Proud

दक्शे Proud
मला रोज सकाळी झोपेतुन ताई ऊठवते. १० ते १५ हाकांना मी फक्त ' हो उठतेय' असे म्हणते. जेव्हा ती पांघरूण ओढते तेव्हा नाइलाजास्तव ऊठावेच लागते.
काल हापिसात जेवण झाल्यावर अतिशय झोप येत होती. बहोत नींद आ रही है क्या असे कमलेंद्र(पडोसनचा भोला टाइप माणूस) विचारल्यावर "नही तो ...हॅ हॅ" असे म्हणून वेळ मारून नेली. त्यानंतर एक डुलकी आली आणि अचानक मी ओरडले ' हो हो उठतेय'.
"क्या हुआ?" इति कमलेंद्र. "क क्कुछ नही वो मोबाइल बज रहा था" मी. "तुमच्यात मोबाइल वाजल्यावर त्याच्याशी असे बोलतात का?" असे म्हणून सन्दीपने(एक नम्बरचा डॅम्बिस ) भाण्डे फोडले. आता सर्वाना मला चिडवायला अजुन एक कारण मिळाले आहे. Sad

मित्रांनो,
हा बाफ मी केलेला वेंधळेपणा असला तरी तुमची क्षमा मागून मी हे किस्से टाकतोय. क्षमा मागण्याचे कारण म्हणजे हा वेंधळेपणा मी केलेला नाही, पण मी त्याला साक्षीदार होतो म्हणून सांगावेसे वाटले.

१) आम्ही शिकायला कराडला होतो. एकदा सर्व मित्रांनी मिळून चित्रपटाला जायचा बेत आखला. चित्रपटगृह कोणते तर कराडचे राजमहल. हे बस स्थानकाजवळ आहे, पण आसपास लाल बत्ती परिसरही आहे त्यामुळे वैताग येतो, पण आमच्या मित्रांना तोच चित्रपट पाहायचा होता. आम्ही सगळे पुढे गेलो आणि आमचा एक मित्र काही कामामुळे उशिरा येणार होता. त्याचे नाव मिल्या. तो भयंकर वेंधळा, धांदरट. त्यात जाड भिंगाचा चष्मा. आम्ही दारावरच्या माणसाला सांगून, मिल्याचे तिकीट देऊन ठेवले. चित्रपट सुरू होऊन थोडाच वेळ झाला आणि मिलिंदराव आले. आले ते सरळ इकडे तिकडे न बघता पुढच्या रांगेकडे गेले. इकडे आम्ही खाणाखुणा करतोय, दबक्या आवाजात मिल्या म्हणून ओरडतोय. त्याकडे लक्षच नाही. अंधारात चाचपडत ते ध्यान धपकन एका रिकाम्या खुर्चीत बसले आणि शेजारी वळून विचारायला लागले, 'फार उशीर नाही ना झाला मला?' त्यावर कुणी तरी त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणू लागले, 'नाही रे राज्जा! तू आलास ना. आता तर खरा पिक्चर सुरू होणार.' मिल्याला जाणीव झाली शेजारी कोण बसलंय त्याची आणि त्याला घाम फुटला. तो त्याच क्षणी उठला आणि कुत्रे मागे लागावे तसा बाहेर पळून गेला. बर एवढं होऊन थांबलं नाही. नंतर हे राजश्री मित्रांशीच भांडत सुटले, तुम्ही माझी मजा केलीत म्हणून.
२) आमच्या वाड्यात कर्नाटकातले एक राव म्हणून कुटुम्ब राहायला आले होते. त्यांच्यात कुणालाही मराठीचा गंध नव्हता. श्री राव यांना गावाची माहिती करून द्यायची जबाबदारी मी घेतली होती. आम्ही एकदा सिटीबसमधून चाललो होतो. एकदम श्री. राव जागेवर उठून नाचायला लागले. बसमधले सगळे बघायला लागले. राव साहेबांनी एकदम पँट्च काढायला सुरवात केली. इतर प्रवाशांना कळेना, हा माणूस हे काय करतोय. ते पण ओरडायला लागले. इकडे राव 'अय्यो हल्ली! अय्यो हल्ली' एवढेच ओरडत होते. रावसाहेबांनी पँट सैल करताच त्यातून एक पाल बाहेर पडली. ते बघून तर बसमध्ये पळापळ आणि ढकला ढकली सुरू झाली. या गडबडीत ती पालही पळून गेली. सगळ्यांची हसून पुरेवाट झाली.
त्यावेळी दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे पालीला कन्नडमध्ये हल्ली म्हणतात, हे मला कळले आणि दुसरे म्हणजे कंडक्टर समजूतदारपणे मला म्हणाला, 'शेजार्‍याला सांग पँट झटकून घालत जा म्हणून.' Happy

Proud

>>>>>>एक म्हणजे पालीला कन्नडमध्ये हल्ली म्हणतात,
अं हं योग्या, पाल हलली की रावसाहेब ओरडत असतील 'अय्यो हल्ली! अय्यो हल्ली' असं.. Proud

:d

<<< एक म्हणजे पालीला कन्नडमध्ये हल्ली म्हणतात, >>>
हल्ली कशालाही काहीही म्हणतात... Light 1

किर्‍या Lol

Lol

किरू आणि इतरांनो,
मी फक्त मूळ किस्सा सांगितला पण रावसाहेबांच्या त्या वेंधळेपणावर बसमधल्या सह प्रवाशांच्या कॉमेंट पण सांगून टाकतो.
एकजण म्हणाला, ' पाल बावळट का हा माणूस?'
राव यांना मराठी समजत नव्हते. मग तर काय लोकांच्या टारगटपणाला उतच आला. रावसाहेबांची नाडीची चड्डी बघून आणखी एक जण म्हणाला, की पाल बहुतेक दोरीचा मल्लखांब शिकायला आलीय.
पाल पाळीव आहे का? अशी विचारणा एकाने केली, तर पालीचा रंग आणि पँटचा रंग सारखाच कळकट असल्याने परफेक्ट मॅच होतोय, असा आणखी एक ताशेरा.
आमच्या वाड्याचे मालक हा किस्सा ऐकल्यावर म्हणाले, ' अरे याने उद्या पँटमधून चिचुंद्री, घूस नेली नाही म्हणजे मिळवली.' Lol

>>>>येंधळ्या लोकानी येंधळ्या लोकांसाठी येंधळ्या कारनाने काढलेला बीबी
टिवल्या, तिला वेंधळेशाही म्हणतात बरं.. Proud

गुड जोक. आवडला खेळकरपना इथला.
सगळे इथले खेळकर वृत्तीचेच आहे... जरा सांभाळुन..

हहपुवा

योग्या... राव साहेबांना त्या सगळ्या कमेंटस कळल्या असत्या तर बिचार्‍याने या जगाचा निरोप घेतला असता... Rofl
असो पण मला एक प्रश्न पडलाय की यात 'तु केलेला वेंधळेपणा काय'? Uhoh
कही ये किस्सा तुझ्याबरोबर तर नाही घडला? आणि तो तु रावच्या नावावर खपवलास? Proud
कुफेहीपा?

दक्स,
मी किस्से सांगण्यापूर्वीच क्षमा मागून नमूद केले आहे, की हा वेंधळेपणा माझा नसून मी त्याला साक्षीदार होतो. राव यांचा किस्सा माझ्या बाबतीत घडला नाही कारण मी त्या वेळी हाफ चड्डीत (शाळकरी वयात) होतो. पालीला निघून जायला जागा होती माझ्या बाबतीत. Proud
पण एक गोष्ट अगदी सत्य, की हे किस्से खरोखरच घडले आहेत. रचून सांगितलेले नाहीत. हा राव म्हणजे अगदी धांदरट माणूस होता. सुरवातीला जेव्हा त्याला मराठी फारसे येत नव्हते तेव्हा आणखी एक गोंधळ झाला होता. त्याच्या ऑफिसमधील एक महिला सहकारी बरीच आजारी होती. दोन तीन महिन्याच्या दुखण्यातून जेव्हा बरी होउन पुन्हा जॉइन झाली तेव्हा साहजिकच सगळ्यांनी तिची विचारपूस केली आणि काळजी दाखवली. बोलता बोलता एकजण म्हणाला, ' बाई किती खराबलात हो या दुखण्याने?' यावेळी रावपण बोलायचे म्हणून बोलला, ' तुमचं सगळं अंगच खराब झालंय हो.' बापरे! ती बाई अशी भडकली ना? वास्तविक रावला म्हणायचे होते, की आजारामुळे तुम्ही अगदी अशक्त झालात' पण त्याला मराठी नीट येत नव्हते त्यामुळे त्याला वाटले, की खराबणे म्हणजे कमी होणे आणि तो धांदरटपणाने बोलून गेला. परभाषिक असल्याने इतरांनी सांभाळून घेतले आणि त्या बाईंनीही 'जाउ दे बावळट आहे ध्यान' असे म्हणून विषय सोडून दिला. Lol

योगेश'राव' :d

Pages