मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता नंदीनीच्या नवर्‍यावरच चर्चा करीत रहणार कि आणखी पुढे काही लिहीणार आहात? Lol
झालं की, किती किस काढाल.

आता नंदीनीच्या नवर्‍यावरच चर्चा करीत रहणार कि आणखी पुढे काही लिहीणार आहात? Lol
झालं की, किती किस काढाल.

आता वैभवच्या परत तीन तीनदा लिहिण्यावर चर्चा करूयात ? Happy
वैभव हलके घ्या Happy
आज सकाळी आवरायला जरा घाईच झाली. स्वयंपाक आवरून माझे आवरायला घेतले. रोज मॉश्चरायझर वापरायची सवय. ड्रेसिंगटेबलवरची बाटली उचलली. तेव्हढ्यात लेक ओरडला " आई, गुडनाईट का लावतेस? क्लासमध्ये डास फार झालेत का?"

स्वाती नावाच्या दोन मैत्रिणी मुंबईलाच असल्याने झालेला हा गोंधळ Lol
त्यातली एक माबोवरचीच.. तिला काहीच दिवसापूर्वी मुलगा झाला हे कळल्याबरोबर तिला मी समस करून अभिनंदन केले. दोन दिवसापूर्वी मला मुंबईच्या लँडलाईनवरून फोन आला
ती: हाय, अगं मी स्वाती!
मी: (स्वाती म्हटल्याबरोब्बर ही माबो स्वातीच असणार ह्या खात्रीने) अगं! काय म्हणत आहेस? आत्ता कसा वेळ झाला फोन करायला? जागरणं चालू असतील ना?
ती: जागरणं? काहीही काय!
मी: अरे वा! बाळ शहाणं दिसतंय.. काय म्हणतोय? दिवसा झोपतच असेल ना?
ती: ह्म्म, औषधं दिली की drousy असतो, पण आता ठीक आहे. अगं, पण तुला कसं कळलं? मी सहजच फोन केला तुला..
मी: अगं मला अजून एका माबोकरणीकडून कळलं.. माझे हेर सर्वदूर पसरलेत.. हेहेहेहे
ती: माबोकरीण? म्हणजे?

आता मी चमकले.. हे काय? म्हणजे ही माबोकरीण स्वाती नव्हेच की काय????

मी: अगं असं काय? स्वाती आंजर्लेकर ना?
ती: बावळट आहेस तू! माझा आवाज ओळखला नाहीस गधडे? कोण आंजर्लेकर? झोपेत आहेस की काय?

आता मी तिला ओळखलं. ही दुसरी स्वाती.. हिचा न् माबोचा संबंध नाही. ती ऑफिसातून फोन करत असल्याने, माझ्याकडे लँडलाईन नंबर सेव्ह केलेला नाही तिचा.. हिलाही एक मुलगा, पण ६ वर्षाचा, जागरण करण्याच्या वयाचा नाही Proud मग, दिवसा झोपतो काय म्हणते ही? तर, त्याला ताप आला होता काही दिवसांपूर्वी, म्हणून तो दिवसा झोपत होता तेव्हा.. Lol

खास

जागरण करण्याच्या वयाचा नाही
जागरण करायला लावनार्या वयाचा म्हणायचा होता का ? Proud

दक्षिणा , हा माझा आणखीन एक वेंधळेपणा अगं गुडनाईट नव्हत म्हणायचं मला. ओडोमास म्हणायचं होतं. आता बाई शर्थ झाली माझी !

आरती Lol

Rofl

Rofl

एके दिवशी रविवारी , माझ्या कडे लली म्हणजे आपली माबोकरीण ललिता-प्रिती येणार होती. ती येणार म्हणुन आदल्या दिवशी रात्री कुल्फी सेट करायला ठेवली. सकाळी तिच्याशी फोन वर बोलता बोलता कुल्फी सेट झाली का बघायल फ्रिज उघडला आणि मोबाईल फिज मधे ठेऊन कुल्फि बाहेर काढुन परत आत ठेवली मग लली ने लँडलाईन वरुन एकदा पत्त्यासाठी फोन केला. तेव्हा वाटल लँडलाईनला कसा काय बुआ फोन केला हिने, तो पर्यंत मोबाइलच लक्षात आल नाही, मग ललु आल्या वर भरपुर गप्पा मारल्या , ललु फारच कॅलरी काँन्शस असल्यामुळे मला म्हणली फक्त सरबत कर. गप्पांच्या नादात मी कुल्फी आणि मोबाईल पार विसरुन गेले. मला त्यादिवशी आई कडे बोडणाला जायच असल्या मुळे घाई घाईत ललीला आणि माझ्या मुलीला गाडित कोंबुन आम्ही बाहेर पडलो, परत घरी येताना थोड सामान घेऊन मी आणि लेक घरी आलो. आणि मोबाईल शोध सुरु झाला. पुन्हा एकदा वाण्याच्या दुकानात जाऊन बघुन आलो, माहेरी विचारल्यामुळे त्यांची ही शोधा शोध सुरु झाली. . मोबाईल वर फोन लावला तर 'नॉट रिचेबल'. काही केल्या शोध लागेना. शेवटी मोबाईल हरवला अस समजुन व्होडाफोन ला कळवल. रात्री कशी काय लेकीला कुल्फीची आठवण झाली आणि तिने फ्रिजर उघडला आणि ओरडली जोरात आईई मोबाईल आईस कँडी. पुढे १ दिवस माझा मोबाईल बंद होता

पूनम, Lol

swa_26 च्या बाबतीत मीही असाच गोंधळ घातला होता. तिचं लग्न होऊन फार तर ४-५ महिने झाले होते. आणि त्या वर्षी झालेल्या वविनंतर आम्ही सगळे मुलुंडला एविएठी करायचं ठरवत होतो. आणि एक दिवस मला फोन आला. नंबर मी सेव केलेल्यापैकी नव्हता. आणि माझी स्वाती नावाची दुसरी कोणीही मैत्रीण नाहीये.

पलिकडून : हॅलो, मी स्वाती बोलतेय...
मी : हां..... अगं बोल, कशी आहेस?
ती : अगं एक बातमी द्यायला फोन केला...

मला वाटलं एविएठी संदर्भातच असेल.

ती : अगं मला काल मुलगा झाला....
मी : Uhoh ??????
ती : अगं बोल ना... मी चांगली बरी आहे.
मी : अगं स्वाती म्हणजे... स्वाती आंजर्लेकरच बोलत्येस ना??

मग तिला थोडा अंदाज आला असावा..
ती : अगं तू अपर्णा बोलत्येस ना?
मी : नाही, मी मंजू बोलतेय.... Lol

पलीकडून पटकन फोन ठेवला गेला.
दुसर्‍या दिवशीच्या एविएठीला स्वाती आलीच नव्हती. पण हा किस्सा मात्र पूर्ण एविएठीभर सगळ्यांना पुरला.

मी पण एकदा टाटा स्काय चा रिमोट फ्रिज मधे ठेव्लाय. गूड्नाइट्ची शन्का मला पण आली होती.

दक्षे Proud

योग्याच्या पिक्चर च्या प्रसंगावरुन वरुन मला मित्राचा वेंधळेपणा आठवला..

मी आणि मित्र, पुण्यात सिटी प्राइड कोथरुड ला ओम शांती ओम पहायला गेलो...
तिकिट वैगेरे काढले, आणि थेटर च्या आत गेलो... आता पिक्चर थोड्या वेळात सुरु होणार होता, तेवढ्यात मला आठवले कि, मी बाइक थेटरच्या बाहेरच पार्क केलिय.. ट्राफिक वाले उचलुन नेतील म्हणुन मी पटकन बाइक पार्किंग मधे लावायला खाली गेलो.. पण तिकिटे माझ्याकडेच राहिली..

त्यावेळी दोन स्क्रीन्स वर ओम शांती ओम दाखवत होते.. आणि मित्राला स्क्रीन नंबर माहित नव्हता Happy
तेवढ्यात, त्याला स्क्रीन नंबर २ मधुन लोक बाहेर पडताना दिसली... आणि हा पठ्ठया लगेच त्या स्क्रीन मधे शिरला... पण तिथे actually Interval झाले होते Proud .. त्याला ते समजलेच नाय...

तो माझी वाट पहात एका सीट वर बसला...आणि तिथे interval संपून लगेच दर्दे डिस्को गाणे पण सुरु झाले होते.. मग त्याची ट्युब पेटली.. Proud की एवढे फेमस गाणे starting लाच कसे आले म्हणुन... मग त्याच्या लक्षात आले आणि आला बाहेर मला शोधत ...आणि दुसरीकडे मी त्याला स्क्रीन १ मधे शोधतोय... Proud

संपुर्ण पिक्चर संपेपर्यंत ह्यावरुन जाम हसत होतो...

लगे रहो मुन्नाभाई ला दोघजण गेलो होतो...
सि.प्रा, सा.रो...

स्क्रीन १ आणि ४ ला मुन्नाभाई, २ नक्षा, ३ दिल दिया है
भलीमोठ्ठी रांग... निम्म्यात आलो तर स्क्रीन १ हाऊसफुल...
मी ३/४ च्या कॉमन रांगेत धावलो...
लढत लढत खिडकीला पोचलो...
मधल्या काळात स्क्रीन २ ला प्रचंड गर्दी उसळली होती... (मी मनात म्हणतोय... लोकं वेडी झालियेत.. नक्षा पहातायत...)
मी- "दोन मुन्नाभाई"
माणूस- तो २ नंबरला हालवला...
मी- (क्षणार्शात चेहेर्‍यावरून इतके भाव गेले की त्या माणसाला माझं नामकरण अनंत भावे करण्याची इच्छा झाली असेल... मी मात्र शेवटी २ समोरच्या लांबलचक रांगेकडे पाहून हताश कटाक्ष टाकत रन आऊट झालेल्या प्लेअर च्या आविर्भावात) मग २ नक्षा द्या... (आलोय तर सिनेमा बघायचाच ना...)
माणूस- संपला (परत विकेट)
मी- कोणता आहे? (शरणागती)
माणूस- दिल दिया है, ३ नंबर, लवकर जा, सुरू झाला असेल...
मी- कॉर्नर दे, नाही आवडला तर सटकता येईल... (रिटायर्ड हर्ट चा चान्स...)
माणूस- दोनशे...
मी- (कपाळाला हातमॅच तर गेलीच वर फाईन झाल्याचं फीलिंग)

आत जाऊन अख्खा बघितला, (अचीव्हमेंट)
बाहेर आलो, (जिवंत)
मग लक्षात आलं...
बाबांची गाडी आणलिये आणि ती बाहेरच लावलिये... (डकवर्थ लुईस चं कॅल्क्युलेशन चुकल्याचं फीलिंग)
नशिबानी होती जागेवर... (धो-धो पावसानी सामना रद्द)

असंच घाईत गाडी बाहेर विसरण्याचा किस्सा तारे जमीन पर च्या फर्स्ट डे फर्स्ट शो ला पण केला होता...
त्यावेळी माझीच गाडी होती आणि ती पण जागेवरच राहिली होती...

अँकी, क्रिकेट आणि फिल्म एक साथ.. Happy

नक्षा एक भयाण प्रकार होता, तो पण फुल्ल?? दिल दिया है कुणाचा रे????

नमस्कार मंडळी. हे माझे या बीबी वरचे पहिलेच पोस्ट आणि हा आजचा ताजा किस्सा.

गेले दोन दिवस ऑफिस मिटींग्सकरिता कंपनीच्या दुसर्‍या साईटला होते. दुपारी मिटींग दरम्यान घाईत रेस्टरूमला गेले. दार उघडताच काहितरी वेगळे जाणविले, पण घाईत असल्यामुळे दुर्लक्ष केले. आत शिरुन उजवीकडे वळताच लक्षात आले कि मी 'चुकीच्या' ठिकाणी आले आहे आणि तशीच बाहेर पळत सुटले. नशीब आत कोणी नव्हते किंवा मी बाहेर पडताना कोणी आले नाही ते.

त्याचे झाले असे कि या बिल्डिंग मधे सगळ्या मजल्यांवर लेडिज् आणि मेन्स रेस्टरूम समोरा समोर आहेत. काल जेंव्हा दुसर्‍या मजल्यावर गेले तेथे लेडिज् रूम डाव्या हाताला आणि मेन्स रूम उजव्या हाताला होती. आज पहिल्या मजल्याला अगदी त्याच्या उलट आणि मी घाईत चेक न करताच डाविकडच्या दाराने आत शिरले.

नंतर एकटीच कितीतरी वेळ हसत होते.

Pages