Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पियुबोले, मी पण असंच केलं
पियुबोले,
असंच केलं होतं नविन जॉईन झाल्यावर उजव्या बाजुला पहीलं रेस्टरूम मुलिंचं होतं. एके दिवशी विरूद्ध दिशेने येताना पहीलं जेण्टस होतं, घुसले.... तरिही एका चोंबड्याने पाहीलंच... हसला फिसकन... असा... 
असा एक बावळट्ट प्रश्न पडला होता. मग माझ्याच लक्षात आलं. 
मी पण
अजून एक हाईट म्हणजे, नंतर अॅक्सेस कार्डाची इतकी सवय झाली, की मी रेस्टरूमच्या दरवाज्याला २/३ वेळा अॅक्सेस कार्ड दाखवूनही का उघडत नाहीये
आता आधी प्रत्येक मजल्यावर
आता आधी प्रत्येक मजल्यावर जाऊन कुठल्या हाताला काय आहे ते पाहून ठेवा बरं..
कुठल्या हाताला काय आहे ते
कुठल्या हाताला काय आहे ते पाहून ठेवा <<< आणि कोणत्याही मजल्यावर डाव्या हाताला घड्याळच होतं म्हणून नको तेथे जऊ नका
आज मी वेंधळेपणाची हाईट असा
आज मी वेंधळेपणाची हाईट असा किस्सा सांगणार आहे....
किस्सा माझा नाही. एका अतिवरिष्ठ अधिकार्याचा आहे. हा अधिकारी ज्या विभागात त्यावेळी काम करीत होता त्या विभागामार्फत राज्यातल्या बर्याच कार्यकर्त्याना दरवर्षी पुरस्कार दिले जातात.( जसे आदर्श शिक्षक, आदिवासी मित्र ई). तसे सामाजिक कार्य करणार्या कार्यकर्त्याना पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यातून आलेल्या या कार्यकर्त्याना बायको (अथवा नवर्यासह )आमंत्रण असते. मुम्बईत त्यांची राहण्याची , जेवणाची ,आणि मुम्बई पहाण्याची सोय केली असते. राज्यपाल समारम्भाला असतात. मोठा कर्यक्रम असतो. त्यासाठी ते डिपार्टमेन्ट एखादे हॉटेलच बूक करते कारण राज्यातील अधिकारीही आलेले असतात कार्यक्रमाला. त्यांचेही एक दोन मुक्काम पडतात.
असा कार्यक्रम २००५ लाही ठेवण्यात आला होता. या अधिकार्याचे ऑफिस आणि घर पुण्यात होते स्टेशन परिसरात्.तसेच अधिकारी अत्यन्त विक्षिप्त स्वभावाचा होता.त्याच्या सरकारी चालकाला सूचना असत की गाडी चालवताना मागच्या सीटवर डोकवायचे नाही. व काही बोलायचे नाही. शिवाय स्वतःचे म्हणणे रेटणारा हा अधिकारी अप्रियही होता (आणि आहे ). असो.
२६ जुलै २००५ ला ज्या दिवशी मुम्बैत तो भयानक महापूर आला. त्या दिवशी त्यांच्या विभागाचा हा पुरस्काराचा कार्यक्रम होता. (क्रमशः)
यशवन्तराव चव्हाण्ला हा
यशवन्तराव चव्हाण्ला हा कार्यक्रम उत्तम पद्धतीने पार पडला . राज्यपालांचा कार्यक्रम म्हणजे बरेच टेन्शन असते अधिकार्याना.या सर्वांसाठी फोर्टातच एक हॉटेल बुक होते. संध्याकाळी 'तो' जोरात पाऊस सुरू झाला. साहेबही खूष होते. बाकी अधिकार्यानी एवितेवी हॉटेल बुक आहेच तर मुक्काम करायचे ठरवले. कारण तशाही राज्यभराच्या अधिकार्यांचे ए.वि.ए.ठी क्वचितच होते. त्यामुळे सगळेच रेंगाळले. साहेब म्हणाले मी आता पुण्याला निघालो , कोणाला यायचे असले तर चला. बाकीच्यानी त्याना विनन्ती केली तुम्ही कशाला पावसाचे जाताय. अनायासे हॉटेल आहेच थाम्बायला तर थाम्बा इथेच. पण साहेब म्हणाले. हा मुम्बैचा पाऊस काय नवीन आहे का? नेहमीचाच आहे. मुम्बैतून बाहेर पडलो की आरामात पुण्याला जाईन. बाकी लोक हॉटेलात थाम्बले. अर्थात फोर्टात काही पाणी फार नव्हते त्यामुळे कोणालाच अन्दाज आला नाही.
अखेर साहेब सर्व सल्ले धुडकावून पुण्याला जायला निघाले. दादर माटुंगा त्यानी क्रॉस केला. पाऊस धो धो कोसळत होता पण स्थिती फार धोकादायक नव्ह्ती त्या वेळी. पण पाणि हळू हळू चढू लागले होते.तिकडे डिपार्टमेन्टचे लोक जेवण, पार्टी या कामाला लागले . फोर्टात पाणी चढले नसल्याने त्याना मुम्बैत काय हाहाकार माजलाय याची कल्पना नव्हती. ते सगळे निवान्त होते.साहेब सुरक्षित पणे मुम्बई बाहेर गेले अन इकडे मुम्बै बुडाली. (क्रमशः)
मुम्बईच्या बाहेरही पावसाने
मुम्बईच्या बाहेरही पावसाने अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केले होते. साहेब फूड मॉलला जेवायला थाम्बले . जेवण केले. आणि निघाले. त्यावेळी मात्र पावसाने अतिशय भीतीदायक स्वरूप धारण केले होते. साहेबांच्या ड्रायव्हरला काचेवरून ओघळणार्या पाण्यामुळे एक्सप्रेस्वेचा रस्ताही नीट दिसेना. फूड मॉलपासून २-३ किमी वर ड्रायवरने गाडी थाम्बवली अन तो काच पुसण्यासाठी खाली उतरला . वायपर वगैरे अॅडजस्ट करीत होता. तेव्हढ्यात साहेबानी दार उघडून साहेब बाहेर लघुशंकेला हळूच उतरले. ड्रायवरचे काम सम्पल्यावर ड्रायवर गाडीत बसला आणि मागे न डोकावण्याच्या तत्वानुसार त्याने न पाहता गाडी सुरू केली आणि वेग घेतला. साहेबांची लघुशंका चालूच असताना गाडी चालू होऊन जाऊ लागल्याने साहेब निबिड अंधारात आणि वादळात 'अरे अरे थाम्ब थाम्ब' असे ओरडत पावसात पळू लागले पण गाडी घट्ट बन्द असल्याने व वादळाच्या आवाजाने ड्रायव्हरला काहीही कळले नाही आणि तो गाडी जोरात लोणावळ्याच्या दिशेने घेउन निघून गेला. साहेब तसेच भिजत भिजत पुन्हा फूड मॉलमध्ये परत आले. आल्यावर त्यानी मुम्बैतल्या फोर्टातल्या अधिकार्याना फोन करून झाली गोष्ट सांगितली आणि एक गाडी पाठविण्याची सूचना केली. साहेबाना आणि फोर्टातल्या मंदळीनाही मध्ये मुम्बैत काय उत्पात चालू आहे त्याची माहिती नव्हती. त्यानुसार एक जीप आणि दोन माणसे असा लवाजमा साहेबाना घेण्यासाठी निघाला . हे सर्व दादरला आल्यावर तिथला महापूर पाहून पुढे जाता येत नसल्याने ते तिथेच सुरक्षित ठिकाणी थांबले .. (क्रमशः)
साहेबांकडे आणि त्यांच्या
साहेबांकडे आणि त्यांच्या ड्रायव्हरकडे सेल फोन नाहीत का ?
हे सर्व एकाच किश्श्यात मोडते
हे सर्व एकाच किश्श्यात मोडते ना ? मग एकच पोस्ट टाका की
मुम्बैतल्या अधिकार्यानी
मुम्बैतल्या अधिकार्यानी साहेबांच्या पत्नीला फोन करून कळवले की असे असे घडले आहे आणि ड्रायवर मोकळीच गाडी घेवून येईल कदाचित, त्याला निरोप द्या आम्ही साहेबाना घेऊन येतो. तू परत मुम्बैकडे येऊ नको. दरम्यान साहेबाच्या बायकोने टीव्ही वर सर्वत्र चालू असलेल्या रौद्र पावसाच्या बातम्या दृष्ये पाहिलीच होती. ती तशीही काळजी करीतच होती. हा निरोप आल्यावर तिचा काळजाने तर ठावच सोडला. तिने साहेबाना मोबाईलवर फोन लावला. मोबाईलवर रिंग वाजू लागली पन तो मोबाईल राहिला होता गाडीत मागच्या सीटवर!!! त्यामुळे नुसतीच रिंग वाजत राहिली आणि साहेबाच्या बायकोवर जणू आभाळ कोसळले.
तिकडे मागे बघायचे नाही या साहेबादेशामुळे ड्रायवरने फोन च्या रिंगा कडे दुर्लक्ष केले.त्याला वाटले साहेब झोपले असतील, झोपू द्या. खूपच रिन्गा वाजू लागल्या म्हणून त्याने मोठयाने 'साहेबाना' सांगितले " साहब फोन बज रहा है' ,साहब फोन बज रहा है" तरीही साहेबाचा काही प्रतिसाद नाही म्हणून त्याने धैर्य करून मागे पाहिले तो काय ? त्याच्या हातापायातले तर त्राणच गेले. साहेबच गाडीत नाही. ही भुताटकी कशी झाली त्याला काही कळेना . साला हा साहेब कुठे सांडला त्याच्या काहीच लक्षात येईना. फूडमॉलला साहेब गाडीत बसल्याचे त्याला चांगले आठवत होते.
त्याने रस्त्याला अक्सेस शोधून पुन्हा गाडी मुम्बईच्या दिशेने वळवली आणि पलिकडच्या लेनने तो साहेबाला अंधारात शोधत पुन्हा मुम्बैचा रोखाने निघाला. !!!!
म्हणजे , साहेब फूड्मॉल्मध्ये, दोन माणसे दादरला, बायको घरी घाबरून गेलेली , ड्रायव्हर अंधारात आणि वादळात सायबाला शोधतेला आणि सर्व अधिकारी काळजीत.
अशा परिस्थितीत साहेबाने गप्प बसावे ना?(क्रमशः)
साहेब पुन्हा फूडमॉलच्या बाहेर
साहेब पुन्हा फूडमॉलच्या बाहेर आले आणि पुण्याकडे जाणार्या ट्रकाना हातवारे करू लागले कारण बाकी वाहने तोपर्यन्त रस्त्यावर यायची बन्दच झाली होती. एक ट्रक थाम्बला साहेबाने त्याना मला पुण्यात सोडा अशी विनन्ती केली. ट्रक वाले म्हनाले आम्ही पुण्यात जाणार नाही , आम्ही हायवेने सरळ बंगलोरला जाणार आहोत. आम्ही तुम्हाला वाकडला सोडू शकतो. 'वाकड तर वाकड' असा विचार करीत साहेब ट्रकच्या केबीनमध्ये बसले आणि तसल्या अंधारात पुण्याकडे मार्गस्थ झाले. दुसर्या विरुद्ध लेनने साहेबाचा ड्रायव्हर त्याना शोधत इकडून सुटला होता. आणि मुम्बैचे अधिकारी आणि सायबाची बायको याना मुळात साहेब कुठे आहे, बुडाला की वाहून गेला हेच कळे ना !!!! साहेब मनातल्या मनात ड्रायव्ह्रच्या सगळ्या पिढ्यांचा उद्धार करीत चालला होता.
पहाटे कधितरी ट्रकवाल्याने साहेबाना वाकड फाट्यावर भर पावसात आणि अंधारात उतरून दिले. पाहातो तो काय. वाकड ते औंध मधला सखल प्रदेश पाण्याने पूर्ण भरलेला , रस्ते पाण्याखाली गेलेले. सायबाला मुळी कुणीकडे जावे तेच कळेना. इथे तिथे उभे रिक्शावाल्यानी त्याला सांगितले सगळे पाण्याखाली आहे रिक्षा चालत नाहीत. अखेर साहेब पाण्यातून चालत चालत औंधला आले. तिथले रिक्षावालेली येईनात . त्यानीही सांगितले पुण्यातल्या पाण्याची लेव्हल त्याना माहीत नाही . आम्ही काय रिक्षा काढीत नाही.
अखेर साहेब पुन्हा अंधारात मजल दरमजल करीत विद्यापीठाच्या गेटवर आले. तेव्हा त्याना तिथे पहिली रिक्शा मिळाली आणि साहेब 'सुखरूप ' घरी क्वीन्स गार्डनला पोचले.
अशा रीतीने साहेबाच्या वेंधळेपणाची कथा सम्पूर्ण........
त्या ड्रायव्हरचे काय झाले?
त्या ड्रायव्हरचे काय झाले?
साहेबांची चांगलीच फजिती झाली
साहेबांची चांगलीच फजिती झाली कि.
सर्व पोस्ट जोडुन एक लेखच झाला असता ना.
हुडा , काय अफलातुन किस्सा आहे
हुडा , काय अफलातुन किस्सा आहे , सायबाची चांगलीच जिरली असेल.
हुडा.. मस्त किस्सा. फक्त हा
हुडा.. मस्त किस्सा. फक्त हा साहेब तू असल्यास तरच..... नाहीतर बाफ चुकला.
विनय
मला ही सगळी अतिशयोक्ती
मला ही सगळी अतिशयोक्ती वाटते.. गाडीत मागे दिसणारा आरसा नसतो का? समजा तो नसला तर गाडीत मागे (जिवंत) माणूस बसला आहे की नाही हे कळायला मागे वळूनच बघावे लागते का? तो माणूस अजिबात हालचाल न करता बसतो का? एकतर ही मोठी पचलेली थाप आहे किंवा ड्रायवर नी साहेबावर काढलेला सूड आहे.. (अर्थात IMO)
गाडीतच काय पण टू व्हीलरवरही ,
गाडीतच काय पण टू व्हीलरवरही , तेही दिवसाउजेडी मागची माणसे विसरून राहिलेले किस्से बरेच आहेत अगदी मायबोलीवरच असे बरेच किस्से प्रसिद्ध झालेत. पहा; मल्लीनाथ ११-०९-२००९ १३:३६,
शिवाय आय ए एस ऑफिसर आणि ड्रायव्हर यांचा प्रोटोकॉल तुम्ही त्यांच्याशी संबंधीत नसल्याने लक्षात येणार नाही.
नात्या तुला ती थाप वाटली असेल तर थाप समजायला हरकत नाही . मत बनवणे हा ज्याचा त्याचा हक्क आहे.
खरे असेलही. मी वर लिहीलेच आहे
खरे असेलही. मी वर लिहीलेच आहे की हे मला असे वाटते. तुम्ही स्वतः थाप मारलीत असे म्हणायचे नसून कानोकानी गोष्टी ऐकण्यात येतात त्यातली एक असावी असे मला वाटते.
>>साला हा साहेब कुठे सांडला
>>साला हा साहेब कुठे सांडला >>

बाकी किस्सा खरा, खोटा ऐकिव काहीही असो, वाचून जाम मजा आली...
ड्रायव्हरला साहेब आता ठारच
ड्रायव्हरला साहेब आता ठारच करणार असे सगळ्याना वाटत होते
पण विशेष म्हनजे ड्रायवर्ला सायबाने काहीच केले नाही. अगदी रागावले सुद्धा नाही. बहुधा आपण न सांगता लघुशंकेला उतरलो ही चूक झाली आली त्यानेच सगळे रामायण घडले हे साहेबाला लक्षात आले असावे.............
वा, मज्जा .. भली जिरली..
वा, मज्जा .. भली जिरली..
ती बिचारी रिक्षा करून घरी आली.. 

गाडीतच काय पण टू व्हीलरवरही , तेही दिवसाउजेडी मागची माणसे विसरून राहिलेले किस्से बरेच आहेत >>>> हे मात्र अगदी खर हं.. माझी बहिण भावजींबरोबर एकदा भाजीला गेली, भाजी घ्यायला आत ती एकटीच गेली, हे आपले गुणगुणत बसले स्कुटरवर.. चला, म्हणून तिने आवाज दिला की गातगातच चालू केली अन गेले की.. ही बसली की नाही पहायला तयार नाही.. अर्ध्या रस्त्यात लक्षात आले म्हणे..
बायका अस नक्की करत नसतील.. सगळे किस्से पुरूषांचेच आहेत या बाबतीत तरी..
आमची आजी(वडिलांची आई) एकदा आपल्या ६ मुलांना ( हो, हो तिला ४ मुलगे अन ४ मुली होत्या) अन एका नोकराला घेऊन मंदिरात गेली, येताना एक मुलगा(माझे बाबा) हरवला, ते तिला म्हणे घरी आल्यावर बर्याच वेळाने लक्षात आले...
अॅना आमच्या इथे पण एक
अॅना
आमच्या इथे पण एक मुस्लिम कुटुंब होते त्यांना १३ मुलं होती. एकदा त्यातलं लहान मुल लपंडाव खेळताना केळाच्या गाडीखाली लपलं आणि तिथेच झोपलं. कुणाच्याच लक्षात आलं नाही. रात्री दिड्-दोनला ते रडत उठलं, सुदैवाने घराजवळंच लपलं होतं म्हणून नशिब. मग एका माणसाने घरी आणून सोडलं... त्यादिवसापासून ते मुलं मोजून जेवू घालायचे, झोपवायचे असं ऐकलं होतं आम्ही...
२६ जुन २००५ ला ज्या दिवशी
२६ जुन २००५ ला ज्या दिवशी मुम्बैत तो भयानक महापूर आला.>>>>>>>>>>>>>> आई शप्पथ २६ जुन २००५ ला सुध्दा मुंबईत भयानक महापूर आला होता???????????? मला माहीतीच नाही मला वाटले की फक्त २६ जुलै २००५ ला च महापुर आला होता की काय? (च्यायला मग मी कुठे होतो २६ जून २००५ ला?)
*****************************
वायरसमुळे एकदा टाईप केलेलं तीन तीन वेळा येत आहे
क्षमा करा यात कोणालाही त्रास देण्याचा हेतु नाही

त्यादिवसापासून ते मुलं मोजून
त्यादिवसापासून ते मुलं मोजून जेवू घालायचे, झोपवायचे असं ऐकलं होतं आम्ही...

त्यादिवसापासून ते मुलं मोजून
त्यादिवसापासून ते मुलं मोजून जेवू घालायचे, झोपवायचे असं ऐकलं होतं आम्ही...

मस्त किस्सा हूड्जी. तो साहेब
मस्त किस्सा हूड्जी. तो साहेब नागपुरी आहे का?
एका सुट्टीमध्ये मी मामाच्या
एका सुट्टीमध्ये मी मामाच्या गावी गेलो होतो. बरोबर तीन मावस भावंडं पण होती, (सगळयांचं वय ९ ते १२ वर्षांच्या मधला) सगळा वेळ दंगामस्तीत जायचा......
एका संध्याकाळी मामाला जमिन करण्यासाठी लाल माती हवी होती त्यासाठी तो चार चाकी हाथगाडी शोधत होता.....भंगारवाल्याची गाडी मिळाली आम्ही पण येणार असा हट्ट आम्ही धरला तो म्हणाला "चला गाडी घेऊन पुढे."
समोर डोंगर होता नागमोडी कच्चा रस्ता आम्ही गाडी ढ्कलत ढ्कलत चढ चढु लागलो, थोडे वर गेल्यावर मि सगळ्यांना म्हणालो तुम्ही बसा मी गाडी ढ्कलतो. तीघेजण बसले आणि मी गाडी वर ढकलण्या ऐवजी गाडी खाली ढकलली गाडीला धरुन मी खालच्या दिशेने धावु लागलो ,पण उताराला गाडी जोरदार पळायला लागली आणि माझ्या हातुन सुट्ली मी मागुन धावतोय गाडी माझ्या पुढे चार फुट लांब एव्हाना माझ्या भावंडांना कळलेलं काय झालेलं आहे. ते सगळे घाबरुन वाचवा वाचवा असे ओरड्त होते. समोरचं दृष्य पाहुन मि म्हट्ले आता गेले सगळे कालव्यात (कारण खाली आठ्लेला कालवा होता) पण इतक्यात त्या सगळ्यांच्या सुदैवाने मामा वरच येत होता त्यानं आमची वरात पाहीली लगेच स्मोर येऊन त्याने गाडी चा रोख बदलला आणि गाडी पलटी झाली (जर त्याने तसे केले नसते तर गाडी वळण न घेता सरळ कालव्यात) तो पर्यंत मी जी धूम ठोकली होती ती सरळ घरात, घरात जाऊन मी सरळ माळ्यावर भात ठेवण्यासाठी मोठ्या कणग्या असतात (काट्यांनी विणून मग शेणाने आतून बाहेरुन सारवलेले मोठे पात्र त्यांना कणगी म्हणायचे) असतात त्या मागे लपलो. नंतर सगळे आले. आणि मग संध्याकाळी मामाने माझी सांग्र-संगीत पुजा केली ती वेगळीच....
अजूनही ते भेट्ले की मला काळ म्हाणतात (आमचा काळ ). तो विषय निघाला की अजूनही आम्ही खुप हसतो

Pages