Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा वेंधळेपणा माझा नाही तर RTO
हा वेंधळेपणा माझा नाही तर RTO चा.. (फॉर अ चेंज ;))
अमेरीकेला जाण्याअगोदर मी आणि माझा एक मित्र RTO मधे IDP (Inernational Driving Permit) काढण्याकरता म्हणून गेलो होतो. आमची सगळी माहिती वगैरे देऊन झाल्यावर आम्हाला संध्याकाळी ४:३० वाजता IDP घेण्याकरता बोलावण्यात आलं.
संध्याकाळी आमच्या हातात जेंव्हा IDP पडलं तेंव्हा त्यावरच नांव वाचून माझ्या मित्राचे डोळे पांढरे झाले.
RTO वाल्यांनाही विनोद बुद्धी असते हे तेंव्हा कळलं (पोस्टखात्याची विनोदबुद्धी पु. लं. नी जगजाहीर केलीच आहे :))
मित्र पक्का गुजराथी. त्याचं नांव होतं 'हरीत ललित भूता'.
IDP वर उमटलं होतं 'हनिफ लतिफ भुत्तो'.
नांवाबरोबर धर्मही बदलण्याची करामत त्या महान लोकांनी केली होती.
'हरीत ललित भूता' <<< काय
'हरीत ललित भूता' <<<
काय नांव आहे का चेष्टा....
माझं नांव विनय रघूवीर देसाई असून आणि फॉर्मवर (आडनांव, नांव, बापाचे नांव) असे स्वच्छ रकाने असूनही सेंट्रल बँक मुंबईच्या कर्मचार्यानी D. V. Raghuvir नावाने पासबूक तयार केले आणि मी पासबूक घ्यायला गेलो तेव्हा तास भर शोधत बसले...
विनय
>> कविता महाजनांचे 'ब्र' हे
>>
कविता महाजनांचे 'ब्र' हे पुस्तक शोधत होतो. >> उच्च! मी अत्यंत मोठ्या मनाने माझे वेंधळे पणाचे पारितोषीक विनय ला देत आहे.
आत्ताच मी आपला ऑफिसमध्ये फिरत
आत्ताच मी आपला ऑफिसमध्ये फिरत होतो....
HR चा डेस्क रिकामा होता..... चुकुन माझा तिच्या कॉम्पुटरला धक्का लागला...
आणि मी genuinely त्याला सॉरी म्हणालो.
काय करणार टेकी आहे ना !!
परवा संध्याकाळी फोनवर
परवा संध्याकाळी फोनवर बालमित्राशी बोलत होते, मध्येच बॉसचा फोन वेटींगवर दिसला, मित्राला म्हणलं फोन करते परत २ मिनटात. बॉसला फोन केला बोलले; फोन ठेवला. ग्रीन बटण दाबलं. लेटेस्ट कॉल मध्ये बॉसचा नं. आहे ते विसरले परत त्यालाच कॉल गेला, खूप वेळाने फोन (बॉसने) उचलला, मी घाईत त्याला बोलू न देता म्हणलं, "चम्या तुझ्याशीच बोलत होते ना २ मिनिटांपुर्वी... मग इतका वेळ का लावलास फोन उचलायला?
पलिकडून बॉस --> ................(नि:शब्द... :अओ:) एक्स्क्यूज मी...
दक्षु नंतर कितीवेळ एकटी हसत
दक्षु

नंतर कितीवेळ एकटी हसत होतीस....
दक्षे,
दक्षे,
दक्षे BTW नंतर चम्या काय
दक्षे
BTW नंतर चम्या काय बोलला?
दक्स नंतर चम्या काय
दक्स
नंतर चम्या काय म्हणाला>>> किरु
आज गाड्यांचा गोंधळ म्हणुन गर्दीत भर. दादर पर्यंत खडा पारशी होणार म्हणुन मी मोबाईलवर गाण ऐकत होते. दादरला उतरणार्यांच्या धक्का बुक्कीत सेल मधे घातलेली पीन निघाली ते कळलच नाही. कानात घातलेले अलंकार (पक्षी: हेडफोन) तसाच होता, आवाज थोडा कमी वाटला गोंधळात म्हणुन मी अजुन मोठा करत होते, समद्या पब्लिकला गाण ऐकवत होते स्पिकर वरुन कानातल तसच ठेवुन. नशीब कोणी सांगायच्या आत मला कळल ते (किती जणांनी न बोलुन एन्जॉय केल देव जाणे :फिदी:)
गाणं कोणतं होतं ग कवे??
गाणं कोणतं होतं ग कवे??
@योडे, जब कोई बात बिगड जाये
@योडे, जब कोई बात बिगड जाये
म्हंजे आजच्या दिवसाला सुट
म्हंजे आजच्या दिवसाला सुट होतं गाणं तर,..
माझ्या बहिणीने एकदा दन्त
माझ्या बहिणीने एकदा दन्त मन्जन ने दात घासण्याएवजी पिताम्बरी पावडर्ने दात घासले होते...
मित्राचा घरी गेलो होतो.
मित्राचा घरी गेलो होतो. त्याच्याकडे बरेच मित्र आले होते. तिथून निघताना एका पायात माझा एक बूट आणि एक पायात दुसर्या एका मित्राचा एक बूट घालून घरी आलो. मग त्याला रात्री 'सिंडरेला' शोध करत फिरावे लागले... (म्हणजे एक बूट घेऊन हा कुणाचा बूट ते शोधणे....)
विनय
नवरा मराठी असला तरी
नवरा मराठी असला तरी इंदोरमध्ये वाढला आहे. त्यामुळे त्याचं मराठी जरा जास्तच 'उच्च' आहे. लग्नानंतर एकदा असंच माहेरी गेल्यावर साहेबांना माझी एकदम फार आठवण आली आणि फोन करून घाईघाईत म्हणाला, ' तू नसलीस की घर कसं 'चावायला' उठतं गं'...
नवरा मराठी असला तरी
नवरा मराठी असला तरी इंदोरमध्ये वाढला आहे. त्यामुळे त्याचं मराठी जरा जास्तच 'उच्च' आहे. लग्नानंतर एकदा असंच माहेरी गेल्यावर साहेबांना माझी एकदम फार आठवण आली आणि फोन करून घाईघाईत म्हणाला, ' तू नसलीस की घर कसं 'चावायला' उठतं गं'...
ही पोस्ट त्याच्या कडून बरं का !
जवानी एकदम उच्च!
जवानी एकदम उच्च!
हा किस्सा मागच्याच
हा किस्सा मागच्याच आठवड्यातला, गणपतीचे दिवस असल्याने ऑफिसला त्या दिवशी उशीर झालेला. बरे आल्यावरही कामाच्या एवजी आधी अर्धी सकाळ मायबोलीवर वेळ घालवला. मग अचानक लक्षात आले मिटींग आहे ११:३० ते १:३०. इतक्या वेळ भुकेले रहाणार म्हणून खावून घेवुया असे ठरवून घाईत ब्रेकरूम मध्ये गेले जेवणाचा डब्बा गरम करायला आत ठेवला व परत आले(क्युब छोटाश्या ब्रेकरूमच्या बाजूलाच आहे तसा). म्हटले उशीर झालाच आहे दोन तीन मेल्स करून मोकळे होवुया डबा गरम होइपर्यन्त. त्या काळात माझ्या मागून चपटा आला त्याने बहुधा माझा डब्बा वेळ झाल्याने मायक्रोवेव बीप करत होता म्हणून डब्बा आतून काढून झाकणासकट बाजूला ठेवला. व आपले जेवण गरम करायला ठेवले. मी तेवढ्यात पळत आले, काहि न बघता मायक्रोवेवमधला डब्बा घेतला व जाग्यावर आले. इतक्यात एक मेल दिसले म्हणून त्याला उत्तर देवूया करत डब्बा तसाच ठेवला बाजूलाच.
गम्मत हि झाली की मी आत गेले तेव्हा हे चायनीज महाशय दुसर्या कोपर्यात पाठ मागे करून बॉटल्समध्ये पाणी भरून घेत होते, ना त्याने मला पाहिले ना मी त्याचा चेहरा पाहीला आधी. मेल झाले लिहून मग डब्बा खायला घेतला.. अगदी मेल वाचत. अचानक वेगळाच विचित्र वास का आला नी खाली पाहिले.. अरे बापरे हे काय.. कोणाचे उचलून आणले... डबा बंद करून अंदाज घेत ब्रेकरूमध्ये गेले तर चायनीज महाराज कोणाला तरी स्वताचा डब्बा गूल कसा झाला हे सांगत होते. जेवणाची वेळ असल्याने आणखी दोन तीन तिथे जमा झालेले. लाज वाटली म्हणून तसेच मागे आले. डबा उष्टा केला न्हवता पण खूप विचित्र वाटले होते. इथे मिटिंग उशीर होत होता. तो माणूस facility सांगायला गेला दुसर्या चपट्याने सांगितली की कम्प्लेन्ट सांग म्हणून्..(कमाल असते ह्या चपट्यांची). पटकन आत गेले,डब्ब ठेवला आत व माझा घेवून आले मायक्रोवेवच्या बाजूचा. मग लक्षात आले दोघांचा डब्बा पण pyrex सेम आकाराचा व झाकण ही लाल रंगाचे. आणखी गम्मत म्हणजे,मी ही स्टीम्ड वेज आणलेल्या पण त्यात ते टिपिकल चायनीज वासाचे सॉस न्हवते.
मी डबा घाईत तसाच घेवून आले. तो चायनीज एकदम घाबरून गेला व facility च्या माणसाला घेवून येताना दिसला. नशीब मी आधीच आटपून आत आले. एकदंरीत त्या माणसाने बराच गोंधळ घातला ह्या गोष्टीवर. एक dept email आले दुपारी मिटींग वरून परत आल्यावर की जेवणाचे डबे चोरीला जातात वगैरे वगैरे.... हे राम मनात म्हटले ईमेल वाचून व पुन्हा शांतपणे मायबोली.कॉम टाईप करून IE मध्ये लॉगीन करून ऑफेसच्या कामाला लागले.
दोन महिन्यां पुर्वि चावि न
दोन महिन्यां पुर्वि चावि न घेता अपार्टमेंन्ट च्या बाहेर पडले, दोन मीनटात कचरा गारबेज कॅन मध्ये टाकुन तर यायचय म्हणुन दार लॉक न करता नुसत ढकलल.... गॅस वर कुकर चढवला होता आपण परते पर्यंत कुकरच्या शीट्ट्या हि होतील वाटलेल... पण ह्या सगळ्यात बिल्डिंगच्या बाहेर पडल्यावर बिल्डिंगच दार स्वःताच ओढुन बंद केल जे लॉक झाल... कचरा टकुन आल्यावर मस्त फजीती... अपार्टमेंट उघडी... गॅस वर कुकर... आता काय करणार!! बराच वेळ बिल्डिंगच दार वाजवल तेव्हा कुणी तरी येवुन उघडल... तोवर भात जळाला होता आणी कुकरही
मागच्या आठवड्यात सकाळी सकाळी दुधाची कॅन शोधत होते... फ्रीज मध्ये नाही मग कुठे गेली कॅन म्हणुन सगळी अपार्टमेंट, बाथरुम सगळ पाहिल, शेवटि फ्रिजर उघडुन पाहिल तर त्यात दुधाची कॅन :आओ: रात्री कॅन मधुन दुध घेतल्यावर कॅन फ्रीज एवजी फ्रीजर मध्ये ठेवली
कहर म्हणजे काही दिवसांपुर्वि घड्याळाचा अलार्म आपल्या स्वप्नात होतोय समजुन अलार्म बंद करुन परत झोपले...... जाग आली नसती तर मस्त उशीर झाला असता... घाई झाली ते वेगळच
काय योगायोग.. मी देखील
काय योगायोग.. मी देखील माझ्या वेण्धळेपाणाच्या गोष्टी आजच्या विनोदी लेखनात लिहिल्यात, जमल्यास जरूर वाचा..
प्रविण, योगायोग काय आहे
प्रविण, योगायोग काय आहे ह्यात?
१५ मिनिटांपूर्वीचा
१५ मिनिटांपूर्वीचा वेंधळेपणा... चहा करायला भांडे आणि उरलेले दुध गरम करण्यासाठी भांडे गॅसवर ठेवले.... चहाची पावडर टाकली की हो एक लिटर दूधात. !!!..... या आता सगळे चहा प्यायला...
परवा बायको गावाला गेलेली
परवा बायको गावाला गेलेली म्हणुन स्वयंपाकघरावर राज्य करायची संधी मिळाली.
त्या दिवशीचा मेनु ग्रिन पिस (मी ठरवला होता !). मटर सोलताना आधी काही वाटले नाही, पण नंतर एक दोन वेळा असे झाले की मटर सोलुन साल ताटात नि मटर कचर्यात. सगळे मटर कसेबसे सोलुन धुवुन एका ताटात किचन वर ठेवले. गॅस वर कढई ठेउन तेल ओतुन फोडनी मारनार इतक्यात मटर च्या ताटाला हात लागला नि सगळे मटर (नुसते किचनभर नाहि तर) अख्खे घर भर पसरले... 
पटकन गॅस बंद करुन मटर गोळा केले...
नको नको तिथे गेलेले... किचनच्या खाली, शेल्फच्या खाली, काहि तर हॉल नि देवघरातही गेलेले, जे आजही बायकोला झाडताना सापडतात नि रोज 'ऐकावे' लागते....
त्या ४-५ दिवसात किचन मध्ये खुप काही 'उद्योग' केले....
:)
किचनच्या खाली >>> मल्ली लेका
किचनच्या खाली >>> मल्ली लेका किचन च्या खाली म्हणजे दुसर्याच्या फ्लॅट मधे पण टाकलेस का मटर.
त्या ४-५ दिवसात किचन मध्ये खुप काही 'उद्योग' केले.... >>> उद्योग करायला तुला किचन च मिळालं का ???;)
प्रकाश काळेल पुण्यात आल्याचं
प्रकाश काळेल पुण्यात आल्याचं मला कळालं, त्याला भेटावं किंवा निदान फोन करावा म्हणुन स्मिता गद्रेला फोन लावला तिने मला कुणाचा तरी नं दिला, मी फोन करुन पक्या असल्याची खात्री न करताच त्याला भाइगिरीत स्सॉल्लेड दम दिला, पलिकडुन फारच समंजस आवाज येत होता, मला शंका आली पण तेवढ्यात पलिकडुन पृच्छा झाली 'कोण बोलताय आपण?' मग मी स्वतःला सावरुन घेत म्हणाले मी मायबोलीची पल्ली, तुम्ही?' पलिकडुन तितक्याच धीरगंभीर पणे उत्तर आलं मी लिमये..... मी गडबडुन म्हणाले, 'अहो, मी ना ते ना..... ' मला सुसंस्कृत म्हणायचं होतें पण वाईट्ट गडबडल्यानं मी म्हणाले अहो मी ना सुसुंकृत बाई आहे हो..म्हणजे चांगल्या घरच्या देशपांड्यांची सुन बायको आहे...' पलिकडुन मस्त हसण्याचा आवाज आला. ते इतकंच म्हणाले,' इट्स ऑल राईट' नंतर मनिषा लिमयेचा फोन आला मग उलगडा झाला की स्मि नं मला पक्या समजुन मनिषा लिमयेचा नं दिला होता. आणि फोनवर तिचे अहो होते..... मने, पुढचं तु सांग बाई. मी नाही ज्जा.
पल्ली यप्पड
पल्ली यप्पड
त्याला भाइगिरीत स्सॉल्लेड दम
त्याला भाइगिरीत स्सॉल्लेड दम दिला,>>>>>>>>>>>>>>> पल्ले काय खंडणी गोळा करायला लागलीस कि काय?
***********************
हे नतद्रष्ट वायरस खुपच त्रास देतयं
एकदा टाईप केलेलं तीन तीन वेळा येतयं
***********************
त्याला भाइगिरीत स्सॉल्लेड दम
त्याला भाइगिरीत स्सॉल्लेड दम दिला,>>>>>>>>>>>>>>> पल्ले काय खंडणी गोळा करायला लागलीस कि काय?
***********************
हे नतद्रष्ट वायरस खुपच त्रास देतयं
एकदा टाईप केलेलं तीन तीन वेळा येतयं
***********************
त्याला भाइगिरीत स्सॉल्लेड दम
त्याला भाइगिरीत स्सॉल्लेड दम दिला,>>>>>>>>>>>>>>> पल्ले काय खंडणी गोळा करायला लागलीस कि काय?
***********************
हे नतद्रष्ट वायरस खुपच त्रास देतयं
एकदा टाईप केलेलं तीन तीन वेळा येतयं
***********************
Pages