मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामीसाहिबा, स्वागत . वेलकम ब्याक .......
नाही . तो भारतीय प्रशासन सेवेतला असून तुमच्याच राज्यातला आहे.... Proud

मस्त किस्सा हूड्जी. तो साहेब नागपुरी आहे का?>>>>>>> Rofl
हा अचानकच सिक्सर वाटला मला.
हुड किस्सा भारीच की.
इतर बरेच जणानी / जणीनी लिहिलेले किस्से देखील जबरा.

रॉबीनहुड,
लै भारी हं.

वैभव,
आणि मग संध्याकाळी मामाने माझी सांग्र-संगीत पुजा केली ती वेगळीच....>>>>>>>>>
३ वेळा पुजा केली का? Lol

राबीन हुड,
मला एक शंका आहे. जेंव्हा साहेबाना माहीत होतं की त्यांचा मोबाईल गाडितच आहे.
तेंव्हा त्यानी सरड स्वतःच्या मोबाईलवर फोन करुन ड्रायवरला परत बोलावणं सगळ्यात सोपं होतं.
त्या ऐवजी त्यानी मुंबईला फोन केला व दुसरी गाडी मागवली, व शेवट पर्यंत त्यानी स्वतःच्या मोबाईलवर फोनच केला नाही, जरा न पटण्यासारखं आहे.
असो.
वाचुन मजा आली.

मी गाडीत बसल्यावर उतरतच नाही.... Proud
मधोबा, तेवढे प्रसंगावधान त्यानी दाखवले नाही, हे खरे. दुसरे ड्रायव्हरने त्या फोनला हातही लावला नसता. कारण मागे बघायचे नाही, साहेब झोपले असावेत.झोपलेल्या साहेबाला उठवणे म्हणजे यमाला उठवणे.:) आणि बर्‍याच ड्रायवराना मोबाईल अटेन्ड करता येत नाहीत....

हल्ली बहुधा सर्व ड्रायवरकडे मोबाईल असतात. त्यामुळे मिस कॉल देऊन बोलावता येते. तरी बरेच विनोद घडतच असतात.

नाशिकच्या एका जि.प.अध्यक्षांचे देशमुख नावाचे एक मंत्री गॉडफादर होते. त्यामुळे त्यांचे नेहमी जाणे येणे असे. त्याच जिल्हा परिषदेत देश्मुख नावाचे एक उपमुख्य कार्यकारी अधिकारीही होते. नाशकात एकदा काही तरी जेवणाचा कार्यक्रम जिल्हापरिषदेत मध्ये झाला. तो रात्री उशिरापर्यन्त चालला होता. Wink . नन्तर अध्यक्षाना झोप आणि तोल अनावर झाल्याने ते निघाले आणि त्याना अचानक उपमुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांचेकडे असलेल्या अर्जन्ट कामाची आठवण झाली. त्यानी ड्रायवरला सांगितले. 'देशमुख साहेबाच्या बंगल्यावर घे'. आणि त्यानी मागच्या सीटवर 'मान टाकली'.
सकाळी उजाडता उजाडता मुम्बैला मलबार हिलवर मंत्री देशमुखांच्या बंगल्यात गाडी थाम्बवून ड्रायवरने त्याना उठवले 'साहेब', देशमुख साहेबांचा बंगला आला'. अध्यक्षानी डोळे चोळीत पाहिले तर आपण भलत्याच ठिकाणी म्हणजे मुम्बैत आहोत.' अरे *** इथे कुठे आणले?" ' तुम्हीच म्हटले देशमुख साहेबांच्या बंगल्यावर चल म्हणून. आपण नेहमी इथच येतो ना.." ''*** च्या हे नाही ते आपले डेप्युटी सी इ ओ देशमुख. नाशिकमध्येच.'
"मग तुम्ही तसे नाई म्हणाले मला" ..वगैरे वगैरे...

खीखीखी.... हा मात्र जबरी होता... Happy

मला एकदम डंब अँड डमर सिनेमाची आठवण झाली.. Happy

आधीचा किस्सा नक्की हुडाचाच असणार , इतक्या डिटेल्समधे , तोच लिहु शकतो ज्याच्यावर तो प्रसंग बेततो.

त्या साहेबांच्या किस्स्यासारखाच एक किस्सा माझ्या दिरांनी शनीवारी ऐकवला होता. चंदिगढ मधले त्यांचे एक असेच अतिवरीष्ठ आयएएस अधिकारी दिल्लीहून चंदिगढ ला जात होते. रस्त्यात पानीपतच्या जवळ कुठेतरी त्यांनी ड्रायव्हरला लस्सी घेवून यायला सांगितले. ड्रायव्हर उतरलेला असताना हे पण हातात मोबाईल वैगरे काही न घेता खाली उतरले. पाकिटपण गाडीतच ठेवलेले.
ड्रायव्हरने मागे न बघताच सांगितले लस्सी नही है अन काहीही न विचारता गाडी सुरु केली. इकडे साहेब गाडि शोधायला लागले तर गाडी नाही, जवळ ना मोबाईल ना पैसे. त्यांनी थोडीशी हुशारी दाखवून तिथेच चंदिगढसाठी एक टॅक्सी ठरवली. थोडसं पुढे आल्यावर टॅक्सीवाल्याने पेट्रोलसाठी गाडी पेट्रोलपंपावर घातली. साहेबांकडे अर्थातच पैसे नव्हते. टॅक्सीवाला काही ऐकायला तयार होईना. मग साहेबांनी पेट्रोलपंपवाल्याला सांगितले मी असा असा ऑफिसर आहे अन गाडीत पैसे राहिलेत. त्याने साहेबांवर विश्वास ठेवून पेट्रोल दिले.
इकडे कसे कोण जाणे ड्रायव्हरच्या लक्षात आले, साहेब गाडीत नाहीत हे. तो उलट दिशेने परत निघाला. रस्त्यात साहेबांना त्यांची गाडी दिसली. पण साहेब म्हणे जाम भडकलेले. लस्सी नही है म्हणूण काहीही न विचारता, साहेब गाडीत आहेत की नाही हे सुद्धा न बघता ड्रायव्हर तसाच गेला होता ना. नंतर त्या ड्रायव्हरची बदली वैगरे केली म्हणे त्यांनी.

हा माझाच किस्सा. नवीनच नोकरी होती. रुजु व्हायच्या आदल्याच दिवशी मी फेडेक्सकडे ओवरनाइट डिलिवरीसाठी एक पॅकेट दिले होते. शेवटची शिपमेंट गेल्यावर रात्री दहा वाजता दिले असल्याने ते लगेच दुसर्‍या दिवशी न मिळता मधे एक दिवस गेल्यावर मिळणार होते. पॅकेट घेताना फेडेक्सच्या माणसाने चुकुन कमी पैसे घेतले (overnight ऐवजी 2-3 days डिलिवरीचे). दुसर्‍या दिवशी पॅकेट नक्की कधी पाठवायचे आहे वगैरे विचारायला त्याने मला फोन केला. फोनवर बोलत मी डेस्कपासून चालत जरा दूर जाऊन एका ठिकाणी उभी राहिले. एकदम मागे कोणीतरी खाकरले म्हणून वळुन बघितले तर मी Mens Room समोर उभी राहुन बोलत होते, 'I want my packet to be delivered at 10 o'clock in the morning' Sad

हा किस्सा तसा जुनाच आहे. त्यावेळी नुकताच नोकरीला रुजू झालो होतो. अंगात उत्साह होता, नविन गोष्टी करण्याचा/शिकण्याचा. असेच एक दिवस मित्राची (FWD)ई-मेल आली. ती काहितरी एक बोधकथा होती.त्यात एक लहान मुलगा आपल्या बाबांना घरी लवकर येण्याची विनंती करत होता. गोष्टीचे तात्पर्य : कितीहि काम असले किंवा कितीहि पैसा मिळ्त असला तरी घरच्यांसाठी वेळ जरुर काढावा.

तर... ती मेल मी कंपनीत सगळ्यांना पाठवली(FWD केली.). अगदी डायरेक्टर ला सुद्धा.
दुसर्‍या दिवशी मॅनेजरने केबिन मधे बोलावले. अजुन पर्यंत तरी मी नॉर्मल होतो,अगदी खुशीत निघालो.
मॅनेजरने विचारले, "काल मेल तुम्हीच पाठवली होती का?". आता मात्र काहितरी गडबड आहे हे कळुन चुकले. नंतर मग त्यांनी माझा बराच उद्धार केला. बरेच दिवस साधी मेल पण मी कुणाला पाठवली नाही. Happy

Ohhhhhhhh myyyyyy God.
what a wonderul posts.
haaaaaaa haaaaaaaaa.

माझा मित्र नरेंद्र देशपांडे ची नुकतीच एक सी डी प्रसिद्ध झाली, 'स्वप्नांच्या गावी जावं...' मंजिरी त्याची बायको, दोघे मुळचे नागपुरचे. आता बंगळूरला असतात. ते दोघे उभयता पुर्वी बहारीनला माझ्या इमारतीत रहायला होते. परवा पुण्यात असताना दुपारी ४ वजता रेड एफ एम वर त्याचं गाणं वाजत होतं. माझ्या कडे तिचा मंजिरी इंडिया म्हणुन एक नं स्टोअर्ड होता. मी पटकन तिथे फोन लावला अणि पलिकडे मंजिरीच असणार ह्या कयासाने बोलायला सुरुवात केली. "अगं आपलं गाणं लागलंय रेडियोवर...'
'ती' म्हणाली 'कुठलं गं?'
'स्वप्नांच्या गावी जावं..'
'हो का? तुझ्याकडे मराठी गाणी लागतात का?'
'हो, लागतात की. अगं कसली रोमँटीक हवा पडलीय. कुठल्याही क्षणी पाऊस पडणार बहुतेक.'
'तुझा आवाज बदलल्यासारखं वाटतंय.'
'हो गं, तुझाही वेगळा वाटतोय. घसा बसलाय का? '
'हो, जरा बरं नव्हतं गं... कुठंयस तु?'
'मी पुण्यात, तु?'
'पुण्यात? पुण्याला कधी गेलीस?'
'कधी गेली म्हणजे? मी पुण्याबाहेर गेलेच नाहीये, स्वाईन फ्ल्यु मुळे अडकलेय'
'हो का? मला वाटत्लं तु बंगलोरहुन बोलतेस.'
'मी बंगलोरला? बंगलोरला आले असते तर तुझ्याकडे आले असते ना. ही: ही: ही: यप्पडच आहेस. तु कुठे आहेस?'
'मी नागपुरला, आत्ताच नितु कडे आलेय.'
'नितु? कोण?'
'अगं अशी काय करतेस? नितु माझी मुलगी नाही का!'
मंजिरीच्या भावाला पुण्यात जेव्हा मुलगी झाली तेव्हा त्याच दिवशी हॉस्पीटल मध्येच त्यांनी पासपोर्ट च्या उद्देशाने बाळाचे नामकरण केले, मला वाटलं हिला पिल्लु झालं आणि तिचं नाव ठेवलं 'नितु'. हल्ली बाळ होइपर्यंत न सांगण्याची प्रथा आहे काही ठिकाणी.
'तुला कधी मुलगी झाली? कळवलंही नाहीस ते?'
तर 'ती' वैतागुन ओरडली,
'कोण बोलताय आपण? मंजिरी नाहियेस का तु?'
'आ? मी पल्लवी. मीच तर मंजिरी ला फोन लावला. तु मंजिरी नाहीस का?'
तिकडुन फोन दुसर्‍याकुणाकडे तरी दिला गेला. बराच वेळ मी स्तब्ध. तिकडुन संभाषणाचा सुक्ष्म आवाज येत होता.
'हॅलो, काहीतरी घोळ झालाय. मी नितु बोलतेय. आत्ता बोलली ती माझी आई म्हणजे मंजिरीची मावशी. तुम्ही?'
'मी पल्लवी, मंजिरीची मैत्रीण. '
'हं, आता आलं लक्षात, मागे एकदा ती तिची आइ आजारी असताना इकडे आली होती तेव्हा हा नं तिला वापरायला दिला होता तात्पुरता. तो असेल हा.'
'अरे देवा, तुमचं वय काय आहे, आणि मगाशी मी बोलले त्यांचं?'
'मी ४० ची आहे आणि माझी आई ७० वर्षांची.'
सुज्ञास पुढचे सांगणे न लगे.... ह ह पु वा सफल संप्रुण

पल्ली Rofl

.

अगं आपलं गाणं लागलंय रेडियोवर...>>>>>
अगं आणि आपलं ह्या दोन्ही मध्ये तुझा "पेटंट" शब्द घातला होतास ना?? खरं खरं सांग. Happy

काल संध्याकाळी ऑफिसात मी एक बरेच लांबलचक गणित करत बसले होते. मंगळवारमुळे मी सोडून आणखी एकच माणूस होता आख्ख्या मजल्यावर. ( बाकी लोक घरून काम करतात )
अगदी एकाग्रतेने मी माझ्या वहीत बघत होते, तेव्हढ्यात एक माणूस मागून म्हणाला, "बरंच काम चाल्लंय! घरी नाही का जायचं?" मी दचकून बघितलं तर हा नवीनच माणूस; पण चेहरा ओळखीचा वाटला. डोक्यात अजून गणित असल्याने बाकी विचार करायला बँडविड्थ नव्हती. मी आपले एक स्मित देऊन परत वहीत डोके घातले. तर तो परत म्हणे, " काय चाल्लंय काम सध्या? "
मला तरीही काय बोलायचे आणि याला का सांगायचे ते लक्षात येईना. म्हणून मी आपला प्रश्न विचारला, "का?"
तर तो म्हणे, "साडेपाच वाजलेत. किती काम करतेस. एकतर तू खूप सावकाश करते आहेस नाहीतर तुला खूप जास्त काम पडते आहे."
मी एकदम वैतागले; कोण माणूस, काय कटकट. गणित एकदम शेवटच्या टप्प्यात होते; डोक्यातली साखळी तुटली तर परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागली असती.
तरी शांत आवाजात म्हटले, "तुला काय करायचंय? मला आवडतं हे काम आणि मी जरा उशीरा आले होते सकाळी, दहा साडेदहाला त्यामुळे साडेसात पर्यंत थांबणार आहे." आणि परत वहीत डोकं घातलं. तो माणूस मोठ्यांदा "ह्या ह्या ह्या!" असं हसत ऑफिसातल्या दुसर्‍या माणसाकडे गेला.

आणि तो दुसरा माणूस म्हणाला, "हाय नायजेल!"

माझ्या डोक्यात मोठाच प्रकाश पडला की हा तर आपला सीईओ! तरी बरं जोरात बोलले नाही.

पण गणित परत पहिल्यापासून करायला लागलंच. Sad

माझ्या जुन्या ऑफिसचा किस्सा:
मला काहि पेपरस् आमच्याच दूसर्‍या ऑफिसमधे पाठवायचे होते. मी त्या डॉक्युमेंट्स सोबत एक चिठ्ठी पाठवली . संध्याकाळी मला त्या ऑफिसच्या एका कलीगचा फोन आला. आणि चक्क तो फोन वर गायलाच लागला . मी त्याला म्हंट्ल कायरे बरा आहेस ना? तर तो म्हणतो कसा " अगं तुच तर लिहिलयस कि "
मी त्या चिठ्ठीवर please sign च्या ऐवजी please sing असं लिहिलं होतं.

मी पुण्यात नौकरीसाठी आलो.
अगदी नवीन होतो. पहिलिच मुलाखत होती, बरीच गर्दी होती, बसायला जागा नव्हती म्हणुन बरीच लोकं जिन्यावर (रांगेत म्हणाव तसं) उभी होती. आणि गम्मत म्हणजे मुलाखत घेणारा १-१.५ तास उशीरा आला. माझा नंबर पहीलाच होता. मी आत गेलो, त्यानी बसायला सांगितलं आणि तो म्हणाला " बराच उशिर झाला, त्रास झाला असेल ना, तुम्हाला " (मी गावातुन आलेला, एटिकेट्स वैगरे माहीत नव्हते पटकन उत्तर दिलं ) " हो सर, खरच त्रास झाला". त्याच्या चेह-याचा रंगच बदलला, अगदी कंहा कंहा से आते है च्या नजरेने त्यानी माझ्याकडे बघितलं.

-------------------------------------------
मी रमा मॅडमकडे असतानाचा किस्सा.
त्यांच्या शाळेच्या प्रिंसिपालच्या घरी काहीतरी कार्यक्रम होता, प्रिंसिपालचं गाव अहेरी, आल्लापल्लीपासुन ७ कि.मी. आम्ही ( मॅडम,त्यांची मुलगी माधवी व मी)गेलो अहेरिला. प्रिंसिपालच घर काही सापडेना, बरीच शोधाशोध केल्यावर शेवटी सापडल. सरांच्या सौ. नी पाणि दिलं, व सहज विचारलं " त्रास तर नाही झाला ना घर शोधन्यात" ( मॅडमना ते निट ऐकायला आल नाही, पण उत्तर देणे अनिवार्य, कारण त्या प्रिंसिपालच्या सौ. मॅडमना वाटलं "घर सापडलं ना लगेच" असा काही तरी वाक्य असावा असं समजुन मॅडमनी अंदाजे उत्तर ठोकुन दिलं ) हो हो. माधवीनी लगेच डोळे मोठे करुन आईकडे बघितलं. घरी आल्यावर मग आम्ही तिघेही आठवुन आठवुन हसायचो तो किस्सा.

------------------------------------------------
माधवी आणि मी चंद्रपुरला शिकायला होतो. मॅडम दर शनिवारी चंदपुरला यायच्या. त्या मनाने खुपच उदार, मदत करायला कुठे संधी मिळते का, शोधतच राहतात. बसनी येताना कुणी शेजारी उभं असेल तर त्या व्यक्तिला बोलावुन थोडसं सरकुन आपली सिट शेअर करायची त्याना सवयच आहे. एकदा त्या चंदपुरला येत होत्या, बस मध्ये फारशी गर्दी नव्हती, त्यांच्या सिटवर एक जागा रिकामी होती, पुस्तक वाचण्याच्या तंद्रित त्याना लक्षात आलं की आपल्या शेजारची जागा खाली आहे. त्यानी ईकडे तिकडे बघीतलं एक माणुस अगदी पुढे, लांब सिटजवळ उभा दिसला. मॅडमनी त्याला ईशारा करुन बोलावलं व पुस्तकात डोकं खुपसुनच त्याला म्हणातात " बसा बसा, ही जागा खालीच आहे, बसा". पण तो माणूस न बसता निघुन गेला हे लक्षात आल्यावर त्यानी वळुन बघितलं तर तो कंडक्टर होता.
घरी आल्यावर हासुन हासुन हा किस्सा आम्हाला ऐकविला. नंतर माधवी नेहमी जाताना सांगायची, " आई माणूस कंडक्टर नाही एवढ पटल्यावरच जागा देत जा गं "
---------------------

" बसा बसा, ही जागा खालीच आहे, बसा". पण तो माणूस न बसता निघुन गेला हे लक्षात आल्यावर त्यानी वळुन बघितलं तर तो कंडक्टर होता.

Lol

Pages