मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनय Rofl

मी तर लहानपणी बर्यापैकी वेंधळेपणा केलाय. मला शाळेत सोडायला माझे आजोबा यायचे. आणि लाडकी नात असल्यामुळे माझं दप्तर पण तेच उचलायचे. मी ३री त असताना, एक दिवस नेहमी प्रमाणे राणी च्या ऐटीत मी वर्गात शिरले, आणि बाईनी विचारलं, "काय हो महाराणी, आज काय शाळेत जेवण आहे का? दप्तर कुठे आहे?" तेव्हा कुठे माझ्या लक्षात आले की ते राहिलं आजोबांकडेच. बाईंना तसं सांगून मी पळत पळत खाली आले, तर त्यांनी पण ते आणलं नाहीये असे लक्षात आले. Uhoh मग वर न जाता तशीच घरी नेली मला आजोबांनी, आणि शाळेला सुट्टी...... आईने उत्तरपूजा बांधली ना पण त्यानंतर माझी..

लगेचच ४थी तला अजून एक प्रकार..:डोमा:
दसर्याला शाळेत पाटीपूजन असायचे. मग आदले दिवशीच आईने एका पिशवी मधे फुले, हळद-कुंकू, आणि सरस्वती चं चित्र काढलेली पाटी असे सगळे भरुन ठेवलं. त्या दिवशी आजोबांऐवजी सोडायला (कधी नव्हे ते) बाबा आले. पूजा वगैरे झाली. आणि माझ्या इतर मैत्रिणिंबरोबर मी बाहेर आले. आजोबा आलेले दिसले नाहीत. मी हातात ती फुलं, हळद-कुंकू घातलेली पाटी घेउन रडत रडत घरी गेले. पिशवी वगैरे शाळेतच..इकडे बाबा वाट पाहात बसले शाळेबाहेर. आजोबांची सवय असल्यामुळे त्या दिवशी आमचा ट्रान्सपोर्ट बाबांकडे होता हेच मी विसरले.

माझ्या गाढवपणाची कहाणी तर झालीच, आता थोडं माझ्या मैत्रिणी बद्दल.
तीची आई गावाला गेली होती. घरी ती आणि तिचे वडील. तिला फक्त जीरा राइस बनवता येत होता तेव्हा. मग तेच बनवायचं ठरवलं आणि तेल तापत ठेवलं. भात आधी बनवून घेतलाच होता. फोडणीच्या डब्यात जिरे नव्हतेच. मोहरी घातली जिरे समजून. आणि बिचार्या तिच्या बाबांनी मोहरी राइस खाल्ला. :अरेर::

माझ्या आईने पण एकदा केलाय असला प्रकार. माझ्या भावाला शाळेत सोडायला चालली होती. त्याचा डबा, दप्तर गाडीला लावलं आणि भावाला न घेताच त्याच्या शाळेत गेली. तिथे गेल्यावर तिला समजलं काय झालं ते.

माझी एक आत्तेबहिण इथे पुण्यात नोकरी करते. एका पावसाळी दिवशी, कंपनीतून घरी जाताना, इ-स्क्वेअर समोर तिची स्कूटी घसरली, आणि ही तोंडावर आपटली. जरावेळाने, उठुन बसली मांडी घालून, आणि खारट काय लागतयं म्हणून तोंडावर हात लावला, तर एक दात हातात आला. आणि मग दात कसा तुटला म्हणून हसत बसली. आजुबाजुच्या लोकांना वाटलं असेल, तोंडावर पडली आणि डोकं गेलं कामातून. हा किस्सा वेंधळेपणाचा आहे की नाही ते माहीत नाही, पण एक मजेदार किस्सा म्हणून समजून घ्या...

एका संध्याकाळी वेळ होता म्हणुन काही पेपर्स फाईल करत होतो.त्याचबरोबर काही नको असलेले पेपर्स पण फाडण्याचं काम चालु होतं. दुसर्या दिवशी सकाळी गोव्याला जायची विमानाची आमच्या दोघांची तिकीटं पण मी नको असलेल्या पेपरांबरोबर फाडुन टाकली.मग शोधाशोध करताना आठवलं की तिकीटं पण फाडली गेलीत. मग सगळे तुकडे शोधुन आणि टेप ने चिकटवून दोन्ही तिकीटं तयार केली.तेव्हा ठरवलं की तिकीटांची झेराँक्स काढु. तो पर्यंत रात्रीचे १० वाजले.झेराँक्स ची दुकानं तर बंद. शेवटी बिल्डींगमधल्या एका मित्राच्या घरी जाउन फँक्स मशिनवरुन काँपीज काढल्या.

तिकिटावरून माझ्या मैत्रिणीने केलेला वेंधळेपणा आठवला. तिला ऑफिसच्या कामासाठी मुंबईला जायचं होतं. ऑफिसने तिकिट काढून आदल्या दिवशी बाईंच्या हातात दिलं. घरी आल्यावर दुसर्‍या दिवशीची तयारी करून ठेव असं सांगितल्यावर हिने पर्स मध्ये तिकिटाची शोधाशोध सुरू केली. तर एक ऑफिससाठी स्टेशनरी घेतलेल्या रिसिटखेरिज तिला पर्समध्ये अन्य काही सापडलं नाही. तिकिट हरवलं. Sad डुप्लिकेट मिळतंय का ते पहायला ती स्वारगेटला गेली. तिथे हजार भानगडी, पोलिस कंप्लेंट वगैरे करावी लागली, स्वारगेटपर्यंत चा रिक्षाचा खर्च, तिथून महामंडळाने तिला स्टेशनलाही पाठवलं, तिथे जायचा यायचा रिक्षेचा खर्च.... सगळं मुंबईच्या तिकिटाइतकंच झालं. इतक्या द्राविडीप्राणायामा नंतर तिकिटाची ड्युप्लिकेट कॉपी मिळाली. मॅडम मुंबईला जाऊन ही आल्या.
दुसर्‍या दिवशी ऑफिसात गेल्यावर अकाऊंटंट ठाणठाण करत आली. माझ्या मैत्रिणीने स्टेशनरीचं बिल खिशात ठेऊन, ऑफिसने काढून दिलेलं तिकिटच एक्सपेन्स रिपोर्टला लावलं होतं आणि घरभर शोधत होती.

अर्र, हापण वेंधळेपणा लिहिला का कुणीतरी>
मी मागच्या आठवड्यात पुणाला आले होते तेव्हाचं परतीचं टिकिट हरवलय!!! आता व्हाऊचरला काय लावणार? पाचशे रूपये वाया गेले
कुणाकडे पुणे मुंबईची वीकेंडची दोन तिकिटे असल्यास मला द्या कृपया. Sad

परवा एटिएम मध्ये एका पठ्ठ्याने स्लिप निघते त्याठिकाणी कार्ड टाकुन अडकवले. बाहेर रांगेतले लोक्स आरडाओरडा करताहेत आणि हे मस्त बाहेर बघुन मशिनकडे बोट दाखवुन Proud असे हसताहेत.

:d

माझ्या आईने माझ्या वाढदिवसाला गाजरचा हलवा बनवला होता. (फिल्मी इस्टाइल - बेटा मेने तुम्हारेलिये बडे प्यार से गाजरका हलवा बनाया हे) आणि मि पण अगदि प्यारसे तोंडात घातला तर साखरे एवजी चक्क मिठ. आइ ग! शिवाय तिला स्वता:ला मधुमेह असल्यामुळे चव पण घेतलि नव्हति.

माझा नाही पण माझ्या मित्राने गाजवलेला हा किस्सा..

एकदा आम्ही सगळे शालेय मित्र एका मित्राकडे सहकुटूंब भेटलो. (प्रत्येकाच्या बायकामुलांसकट)
खूप गप्पा झाल्या. त्या जून्या आठवणी निघाल्या. कुणाला कशी शिक्षा झाली होती. कुणाला बाईंनी कसे फटकावले होते वगैर वगैरे. एवढ्यांत कसा कोण जाणे पण कोकणचा विषय निघाला. आणि एका मित्राने मला इथे माबो वर टाकलेले फोटो दाखवायला सांगीतले.
मी फोटो उघडले आणि सगळी मंडळी काँप्युटर भोवती गर्दी करून फोटो बघायला लागली. प्रत्येक फोटो बघताना चित्कार वगैरे निघत होते.
काँप्युटरसमोर बसलेला एक मित्र प्रत्येक फोटो वरती असलेले शिर्षक त त प प करत मोठ्यांदा वाचत होता.
शाळेत असताना एखादा धडा वाचताना हा माझा मित्र त्याच्याही नकळत बरेच विनोद करत असे.
तसे विनोद तो अजुनही करत असेल हे मला माहीत नव्हते.

एक शिर्षक होते..
"बरीच धावपळ करून पकडलेला दोन माडांमधला सूर्यास्त."

त्या थोर माणसाने 'माडांमधला' अस म्हणण्याऐवजी 'डां' चा अनुस्वार 'मा' वर टाकला आणि 'डा' ला 'या' जोडून दिला.
ते ऐकल्याबरोब्बर आणि मित्रांच्या बायकांचा चेहरा बघीतल्यावर माझा वरचा श्वास वरच राहीला. प्रचंड हशा पिकला.
मात्र नंतरची सगळी कॅप्शन्स मी वाचली.

बापरे !! Uhoh

माझा वेंधळेपणा तर माझी लाज काढायला कारणीभूत ठरला होता.
मी पुण्यात personality development & conversation च्या एका वर्गात प्रशिक्षण घेत होतो. दर आठवड्याला सगळ्या बॅचेस एकत्र यायच्या आणि त्यांच्यापुढे प्रत्येकाला चिठ्ठीतल्या विषयावर उत्स्फूर्त (extempore) इंग्रजी भाषण करावे लागे. मला दिलेला विषय होता "कामाला गडबडीत जाताना झटपट कोणता खाद्यपदार्थ तयार कराल?' आणि मी अंड्याच्या ऑम्लेट्ची रेसिपी समजाऊन सांगत होतो. वर्गाचा नियम असा होता, की तुम्ही लहान मुलांना समजावतात तशा पद्धतीने बोललात तरी चालेल, पण बोलणे थांबवायचे नाही. मी अगदी अंडी फोडल्यावर त्यात पांढरा बलक (व्हाईट) आणि पिवळा बलक (योक) कसा असतो आणि तो फेटून कसा घ्यायचा असतो, हे सांगत होतो. पण घाई गडबडीत मी बोलून गेलो. Mix the white and the yolk from the legs inside. मी एग्ज्च्या जागी लेग्ज म्हणून गेलो आणि अख्ख्या वर्गात हशा उसळला. Lol

योगल्या Lol Rofl

मस्त आहेत वेंधळेपणाचे किस्से .
"बरीच धावपळ करून पकडलेला दोन माडांमधला सूर्यास्त." तर बेफाट.:हहगलो:
Mix the white and the yolk from the legs inside. योगेश Biggrin

एक आगळावेगळा वेंधळेपणा - आज सहजच एक लेख वाचत असतांना अतिशय सुंदर वेंधळेपणा वाचन्यात आला: विदुरानीने अचानक आलेल्या केशवाला बघुन, गोधंळुन केळिच्या ऐवजी केळिच्या सालीच चारल्या... आणि त्या केशवानेहि मग आपल्या भक्ताने दिलेल्या भेटिचा तेवढ्याच अप्रतिमतेने स्विकार पन केलेला (कसल ते भाग्य!).

माझा मित्र - अरविंद औताडे - स्वाध्यायच्या कार्यक्रमाला जायचा. राखी पौर्णीमेला स्वाध्यायी मुलींनी मुलांना राख्या बांधायच्या होत्या. ग्रुप मोठा असल्याने कुणालाही बाकी सगळ्यांची नावे फारशी माहीती नव्हती. स्टेजवरती एका मुलीने ह्याला राखी बांधली व नाव विचारले. ह्याने सांगीतले 'औताडे', तीला ऎकू गेले 'अवघड आहे'. तर ती म्हणाली 'अवघड असले तरीही सांगा ना, आता मी तुमची बहीण झाले ना!'
सगळया ग्रुपमध्ये मोठा हशा झाला. Happy

माझ्या कंपनी ने काही स्पेअर पार्टस ठाण्याच्या एका वर्कशॉप मधे करायला दिले होते. मी ठाण्याला राहायला म्हणुन मी ते कलेक्ट करुन कंपनीत नेणार होतो. मी आधल्या दिवशी त्या वर्कशॉप च्या मालकाला फोन करुन सांगितले के मी सकाळी ९ च्या सुमारास पार्टस न्यायला येतो.दुसर्या दिवशी मी ठरल्याप्रमाणे मी त्या वर्कशॉप ला पोचलो. त्या वर्कशॉप चा मालक एक सरदारजी होता. सगळे पार्टस त्याने
रेडी करुन ठेवले होते. त्याच्या ऑफिस मधे सगळे पेपर सह्या करुन दिले.तो पर्यंत त्याने चहा मागवला.
चहा घेता घेता गप्पा झाल्या.त्या अशा...
सरदार : कहा रहते हो आप?
मी : यही थाना मे ही.
सरदार : बच्चे?
मी : एक बेटी है.स्कूल मे जाती है.
सरदार : भाभीजी सर्व्हिस करती है?
मी : नही, मेरी भाभी सर्व्हिस नही करती......( मी भलत्याच तंद्रीत होतो)
सरदार : ( मोठ्याने हसत ) ओ आपकी नही, हमारी भाभी..
तेव्हा कुठे माझ्या डोक्यात प्रकाश पडला की तो माझी पत्नी कुठे नोकरीला याची चौकशी करत होता.
त्या दिवशी त्या सरदारजी ला त्याच्या आयुष्यातील अतीव आनंद झाला असेल की मराठी सरदारजी पण असतात्..................त्यानंतर आजतागायत मी त्या वर्कशॉप मधे गेलेलो नाही.

मी पाचवीत असतानाची गोष्ट. इन्ग्लिशचे ज्ञान तसे यथातथाच होते. (आताही काही फार सुधारणा नाही.) पाठान्तरासाठी आम्हाला एक शब्द ४० वेळेस लिहावा लागत असे. शिवाय बाकीचा अभ्यास असे तो वेगळाच. मी अगदी कन्टाळून जायची. जराही विचार न करता लिहून काढायची.
तेव्हा पार्टी चा अर्थ 'जवानी' असा लिहिला होता.(४० वेळा) वही तपासायला देताना सहज पहीले तेव्हा कहीतरी चुकल्यासारखे वाटले. बाजूच्या मूलीच्या वहीत पाहीले तेव्हा कळले की ते जवानी नसून 'मेजवानी' आहे. मग काय भराभर ४० वेळेला मे मे मे मे .. करीत(लिहित) सूटले. तशीच वही दिली असती तर ५ छड्या नक्किच मिळाल्या असत्या. वर सर्वाना हसायला कारण मिळाले असते ते वेगळेच.
आता हा गाढवपणा आठवला की अजून हसू येते.

जवानी Rofl

Lol

जवानी Lol Rofl
>>>>>बाजीच्या मूलीच्या वहीत पाहीले
बाजीच्या नाही बाजूच्या.. लिहा बरं ४० वेळा.. Proud

Lol

Pages