आयपीएल-९ (२०१६)

Submitted by स्वरुप on 3 April, 2016 - 14:36

विंडीजने मोठ्या दिमाखात विश्वचषक जिंकला..... भारतासाठी तो "थोडी खुशी थोडा गम" च्या नोटवर सेमीज मध्येच संपला!
कोहलीची बॅटींग आणि धोनीच्या कॅप्टन्सीने सगळ्यांची वाहवा मिळवली!
एकंदरीत मजा आली Happy

पुढच्या आठवड्यापासून आयपीएल चे नववे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!

हा धागा आयपीएल-9 वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मॉरीस पंड्याला आऊट केल्यावर ईतका चिडला का होता? सहसा तो असं रिअ‍ॅक्ट करत नाही. काही घडलं होतं का? पंड्या ने मसल्स दाखवले म्हणुन का?

सहसा तो असं रिअ‍ॅक्ट करत नाही. >> कॅरी आउट झाला असेल खेळाच्या इंटेंसिटी मधे. बटलरला बॉल लागल्यावर अतिशय विचित्र expressions होते. पांड्याचे मसल्स पोलार्ड साठी होते ना ?

मिश्राबद्दल आपण परवाच बोललो होतो. आज त्याची लाईन ब्दलली नाहि पण लेंग्थ बदलली. त्यापेक्षा ताहिर ने शेवटचे तीन बॉल नीट हँडल केले.

पाँटींग ने ३ वर पांड्या बंधू, रायडू, मॅक्लेशान ला वापरले. हार्दिक वगळता तीन निर्णय बरोबर आलेत.

आज साउथीला न घ्यायचा निर्णय बरोबर असेल का ?

<< मॉरीस पंड्याला आऊट केल्यावर ईतका चिडला का होता? >> मॉरीसने सगळं गोलंदाजीचं प्लानींग हार्दिक पांड्यासाठी केलं होतं. त्यामुळें भडकून ' जा सांग त्याला , घाबरून भावाला पुढे करतोस काय ?', असं म्हणाला असावा [ अर्थात इंग्लीशमधे !] तो कुनाल पांड्याला आऊट केल्यावर !! Wink
आतां आरसीबीमुळे २००+ स्कोअरची साथ पसरणार वाटतं आयपीएल- २०१६मधे !!

गुण-तक्त्यावर नजर टाकली तर केकेआर व हैदराबाद अग्रेसर रहातील व गुजरात, मुंबई, दिल्ली व आरसीबी यांच्यात चुरस असेल असं वाटतंय. मुंबईचा एकच सामना शिल्लक आहे व तोही गुजरात विरुद्ध ! तो जिंकला तरीही मुंबई १६ गुणांवरच रहाणार व तें फार आश्वासक नाही वाटत. आरसीबी सध्याच्या फॉर्मवर पुढच्या सर्व मॅचेस जिंकूनही १६ गुणांपर्यंतच मजल मारूं शकते. गुजरात व दिल्ली १८ गुणांपर्यंत झेंप घेवूं शकतात. एकंदरीत, केकेआर, हैदराबाद संभाव्य अग्रक्रम व तिसर्‍या व चौथ्या क्रमांकासाठी गुजरात, मुंबई, आरसीबी व दिल्ली यांच्यात राडा, असं चित्र दिसतंय. मुंबई गुजरातविरुद्ध हरली तर 'घर वापसी' निश्चित !

गंभीर आणी पांडे जर अजुन ३-४ ओव्हर्स खेळले तर कोलकत्ता शेवटच्या ६-७ ओव्हर्स मधे पठाण, रसेल, यादव च्या फायरपॉवर वर मोठी धावसंख्या उभारू शकते.

द बेस्ट बोलींग साईड >> I thought it would be sunrisers ?

रसेल फनी आहे. He crouches so much to get under every ball. While doing that he tends to go in awkward position. And if bowler bowls yorker to him, he then floors himself, getting into tangle.

भाऊ सॅमी गंभीर बद्दल म्हणाला 'Is he ever happy though ?' Wink

नरैनने गेलचं स्टॉर्म थांबवलं तर आतां एबीडी घोंघावतंय !!
<< भाऊ सॅमी गंभीर बद्दल म्हणाला ...>> सॅमीशी सहमत !
ह्या राजपुतवर खरंच लक्ष ठेवायला हवं. पहिल्या षटकांत फक्त २ धांवा, गेल मोकाट सुटला असताना !!

एबीडी व विराटने ११५ धांवांच्या भागीदारीत केकेआरचं दिवाळं काढलं !!!
हे दोघेही अफलातून फॉर्ममधे आहेत. विराट तर दृष्ट लागावी असं खेळतोय !!! अभिनंदन .

वन स्टेप अ‍ॅट अ टाईम. - परत एकदा रिपिट - फायनल मध्ये विराट चेस करताना हवा. Happy

मला बंगलोर टीमशी ममत्व नाही पण विराटशी आहे. आणि सगळ्या भारतीय चॅम्प मध्ये तो खूपच चांगला खेळत आहे. त्यामुळे तो जिंकावा. शिवाय आणखी एखादे शतक झाले तर मजा येईल. तसेही ७०० + रन्स आत्तापर्यंत कोणी केले नव्हते. तो एक रेकॉर्डच.

<< मला बंगलोर टीमशी ममत्व नाही पण विराटशी आहे. >> माझं केकेआरशी वैर नाही पण गंभीरशी आहे ! Wink कालही शेवटच्या षटकात मॅच हरल्यात जमा असतानाही तो अंपायरकडे जावून कसली तरी कुरकूर करत होताच !
<< KKR नरिन मूळे हरले. अ‍ॅबे चा फॉर्म बघता गेल परवडला हे उघड असताना त्याला बाद केले >> Wink पण काल गेलही 'हम भी कुछ कम नही ', हें दाखवायलाच मैदानात उतरल्यासारखा वाटत होता, हेंहीं खरं.

एबी अणि विराट धोपटतच आहेत.. त्यात गेल पण सुरु झाला तर आरसीबीला हारवणं अवघड जाणार.. आणि राहुल पण चान्स मिळाला तेव्हा मस्त खेळलाय. पहिले चार बॅट्समन फॉर्म मध्ये आल्यामुळे एकदम फ्रीली खेळताहेत...

<<एबी अणि विराट धोपटतच आहेत..>> दोघेही अफलातूनच पण एबीचे ९०% फटके अप्रचलीत असतात तर विराटचे ९५% फटके 'गुड क्रिकेटींग शॉटस' या वर्गातले, असं नाही वाटत ?
<< त्यात गेल पण सुरु झाला तर आरसीबीला हारवणं अवघड जाणार..>> अशा मोठ्या स्पर्धांमधे 'peaking at the right time' निर्णायक ठरण्याचीच जास्त शक्यता असते. या बाबतींत तरी आरसीबी सरस दिसतेय !

आज दिल्लीला मॅच जिंकलीच पाहिजे.... नाहीतर पुढच्या दोन मॅचमध्ये टिकाव लागण अवघड आहे.... दिल्ली तणावाखाली ढेपाळती हे आपण बघीतलय.... सो आजचा सामना जिंकुन सेफ झोनमध्ये राहणे दिल्लीसाठी महत्वाचे आहे
क्यूडी, बिल्लींग्स, ब्रॅथवेट आणि मॉरीस या चौघांना दिल्लीने उरलेल्या मॅचेसमध्ये खेळवले पाहिजे.... आता प्रयोग करत बसले तर महागात पडायचे!
ताहीरला मार पडलाय आणि ड्युमिनी मारधाड करण्यात कमी पडतोय.... त्यामुळे बिल्लींग्स, ब्रॅथवेट आणि मॉरीस हे लोअर ऑर्डरमध्ये पाहिजेतच!
क्यूडी त्याला दोन मॅचमध्ये ढापल्याचा वचपा काढेल असे वाटतेय
नेगीला अजुन एखादा चान्स देवुन बघायला हरकत नाही

कम ऑन यंग गन्स..... शो युवर मेटल!

<< आज दिल्लीला मॅच जिंकलीच पाहिजे...>> खरंय. पुणे व पंजाब या दोन संघाना आतां प्रचंड उपद्रव शक्ती [ nuisance value] मिळाली आहे; हरण्या-जिंकण्याचं टेंशन नसेल तर टी२०मधे कोणतीही टीम उलथापालथ करुं शकते. या दोन संघांविरुद्धचे सामने पहिले चार संघ निवडण्यात महत्वाचे ठरणार आहेत !

दिल्लीचे प्रयोग काही थांबत नाहीत राव!
फास्ट खेळणारे बिल्लींग्स आणि ब्रॅथवेट बाहेर.... पहीली बॅटींग आणि पावसाची शक्यता!

तरीपण दिल्लीला शुभेच्छा!

दिल्लीने अय्यर ला फारशा संधी दिल्या नाहित. का कळत नाही ? असे नाही कि त्यांच्याकडे फारसे पर्याय होते.

धोनीसाठी म्हणून पुणे जिंकावे अशी इच्छा !

मॉरीसला वर का पाठवत नाहि कधी कधी असा प्रश्न पडणारा मी एकटाच नाही हे कळल्यावर बरे वाटले.

मुंबई चा कोच ऑसी आहे पण संघात एकही ऑसी नाही, पुण्याचा कोच किवी आहे पण एकही किवी संघात नाही. यंदा IPL मधे warner नि थोड्याफार प्रमाणात zampa, smith वगळता फारसे ऑसी contribution नाही.

पावसाच्या शक्यतेमुळे (डीआरेस) दिल्ली हळु खेळतेय (विकेट्स वाचवुन) की पुण्याची बॉलिंग ईतकी चांगली पडतीये की बॅटींग ईतकी अवघड आहे त्या पीचवर?

विझाग चे पिच unpredictable आहे म्हणे. पुण्याची बॉलिंग विशेषतः आपला आवडता खेळाडू दिंडा चांगली बॉलिंग करतोय Wink

संजू संमसन जसा बाद ब्झाला ते बघून हसावे कि रडावे ते कळत नाही. एव्हढी वाईट स्थिती असणार आहे का स्पिन खेळताना आपली पुढे Sad

आता १० ओव्हर ५० वरुन १५० पर्यंत पोहोचवायला त्या ड्युमिनीचा काही उपयोग आहे का?
तिथे बिलिंग्स आणि ब्रॅथॅवेटच पाहिजेत

Wrong Team Selection.... Once again DD!

१४ षटकांत ६८-४ ! दिल्लीचं कांहीं खरं नाही !!
<< विझाग चे पिच unpredictable आहे म्हणे.>> रोहित शर्माला विचारा !! Wink
<< एव्हढी वाईट स्थिती असणार आहे का स्पिन खेळताना आपली पुढे >> टी-२० मधल्या स्पीनला खेळण्यावरून असा निष्कर्ष काढणं तितकंसं उचित नसावं.

Pages